राजकीय द्रुष्टीकोन

राजघराणं's picture
राजघराणं in जनातलं, मनातलं
1 Nov 2011 - 6:44 pm

डिस्क्लेमर : विनोद वाचून सोडून द्यावा. कुणीही भावना दुखावून घेउ नये.

आटपाट नगर होतं तिथं चार भाउ आपल्या आई वडिलांबरोबर सुखाने राहत होते. होत्याचं न्हवतं झाल. वडिलांच निधन झाल. वडिलांकडे होत्या दोन गायी ..... भाउ चार.... बहुत नाइंन्साफी..... प्रकरण पेटलं.. सरकारात गेलं.. सरकारी निवाडा दिला - मोठ्या भावाला एक गाय .. उरलेल्या तिन भावांना मिळून .. एक गाय. सगळ्यांनी गुण्या गोविंदानि रहावं !...............

(नारायण ... नारायण....वरतुन मुनी सारं पहात होते.... अजब हा न्याय ? नारायण ... नारायण... ही काय न्यायाची रीति ? नारायण ... नारायण... उठा मालक ऊठा ...नारायण ... नारायण...

"""" सारख उठा ऊठा करू नको रे । मला आवडत नाही तो शब्द । """"

नारायण ... नारायण... ह्यापेक्षा कलियुग परवडले म्हणायचे... सरकारी निर्णय आवडला नाही तर सरकार बदलायचं स्वातंत्र्य आहे तिथे... वेगवेगळे पक्ष .. त्यांची वेगवेगळी विचारसरणी .... आइकलं का महाराज ?

""''''' कटकट पुरे । मुद्द्यावर ये । """"

नारायण ... नारायण... आमुचा तिन्ही लोकी तिन्ही काळी संचार.... नारायण ... नारायण... थांबा.. थांबा... कलियुगातल्या भारतवर्षात्ल्या प्रत्येक पक्षाने हा गायींचा निवाडा कसा केला असता... ते ऐकवतोच तुम्हाला .... )

नारायण ... नारायण... मुनी सूक्ष्मरूपात जातात ... सर्व राजकीय आणि अराजकीय कार्यालयात फिरू लागतात...

कॉंग्रेस कार्यालय

मनीष तिवारी : १ गाय = 1 G.... २ गाय = 2 G.... अरे बापरे !
सोनिया मॅडम : Guy ? what Guy ? I tell you Guys --- PLEASE SPEAK IN ENGLISH.
राहुलबाबा : मॉम.. मॉम ... गाय म्हणजे बुफ्फेलो... सुनो गाय हमारी माता है ! चारो भाइयोंको युवक काँग्रेस मे स्थान दिया जायेगा.

इतर सर्व : राहुल बाबा झिंदाबाद !

दिग्विजय सिंग : ह्यात RSS चा हात आहे. ते चार भाउ १ हिंदू २ मुस्लिम ३ सिख ४ ईसाइ ऐक्याचे प्रतीक आहेत. जातीय दंगे करण्यासाठी संघाने गायीवरून त्या चार भावात भांडणे लावली.

इतर सर्व : राहुल बाबा झिंदाबाद !

चिदंबरम : ही केस NIA कडे सोपवूया.
इतर सर्व : राहुल बाबा झिंदाबाद !

प्रणवदा: मला चिदंबरम चे विचार पटत नाहीत..
मनमोहन (क्षीण आवाजात) : कोणते विचार ?
प्रणवदा : मला काय माहित ? दर वेळी तुम्ही मल्लाच का विचारता ? त्या चिदंबरम ला विचारा ....

मनमोहन (अतीक्षीण आवाजत): दोन्ही गायी लहान भावाला द्या. मग उरलेले तीन भाउ आत्महत्या करतील. आत्मह्त्या ग्रस्त भावांसाठी ...त्यांच्यासाठी दहा हजार कोटींचे पॅकेज काढू... खासदार आणी आमदार ह्या निधीचे वाटप करतील

पॅकेजचे नाव ऐकताच सर्व काँग्रेसी अत्यानंदाने बेहोष होउन नाचू लागतात.

इतर : राहुल बाबा झिंदाबाद !
मनमोहन, प्रणवदा, चिदंबरम : राहुल बाबा झिंदाबाद !
सर्व काँग्रेसी : राहुल बाबा झिंदाबाद ! राहुल बाबा झिंदाबाद !राहुल बाबा झिंदाबाद !राहुल बाबा झिंदाबाद !

मुनींना भोवळ येउ लागते .. ते भेलकांडत ... भेलकांडत कम्युनिस्ट कार्यालयात पोचतात.

कम्युनिस्ट कार्यालय

लाल डोळ्यांचा एकमेव तरुण : हि भांडवलदारांची चाल आहे. बूर्झ्वा मूर्दाबाद ...

इतर सर्व ज्ञानवॄद्ध : Z ZZZ ZZ Z Z ZZ Z Z Z zz z z z z z zz z z z z z

लाल डोळ्यांचा एकमेव तरुण: संपत्तीचे समान वाटप झाले पाहिजे... त्यासाठी रक्तरंजित क्रांती आवश्यक आहे.

इतर सर्व ज्ञानवॄद्ध : Z ZZZ ZZ Z Z ZZ Z Z Z zz z z z z z zz z z z z z

लाल डोळ्यांचा एकमेव तरुण: रक्तरंजित क्रांती ! दोन गायींचे बरोबर चार तुकडे करा.. आणी चारी भावांना समान वाटून द्या...

इतर सर्व ज्ञानवॄद्ध : Z ZZZ ZZ Z Z ZZ Z Z Z zz z z z z z zz z z z z z

लाल डोळ्यांचा एकमेव तरुण : हि भांडवलदारांची चाल आहे. बूर्झ्वा मूर्दाबाद ...

इतर सर्व ज्ञानवॄद्ध : Z ZZZ ZZ Z Z ZZ Z Z Z zz z z z z z zz z z z z z

लाल डोळ्यांचा एकमेव तरुण : आपण काँग्रेस शी युती करूया

इतर सर्व ज्ञानवॄद्ध : Z ZZZ ZZ Z Z ZZ Z Z Z zz z z z z z zz z z z z
इतर सर्व ज्ञानवॄद्ध : Z ZZZ ZZ Z Z ZZ Z Z Z zz z z z z z zz z z z z
इतर सर्व ज्ञानवॄद्ध : Z ZZZ ZZ Z Z ZZ Z Z Z zz z z z z z zz z z z z

लाल डोळ्यांचा एकमेव तरुण : Z ZZZ zz z z z z z zz z z z z

मुनी : Z ZZZ ZZ Z Z ZZ Z Z Z zz z z z z z zz z z z z . कंटाळून भा़जपा कार्यालयाकडे मोर्चा वळवतात.. तिथे यच्च यावत हिंदुत्व वादी संघटनांची बैठ़क भरलेली असते...

भा ज पा कार्यालय

सनातन प्रभात : गोमूत्र, गोमय यांचे मिश्रण दिवसातून ३ वेळा ४ ही भावांनी प्राशन करावे. म्हणजे त्यांत भांडणे होणारच नाहीत. गोमूत्र हा सर्व शारिरीक आणी मानसीक आजारांवरचा एकमेव उपाय आहे. २१ दिवस ४ हि भावानी गोमूत्र प्राशनाचे व्रत करावे. २२ व्या दिवशी दोन्ही गायी एका सत्शील ब्राह्मणास दान कराव्यात. तद् नंतर चारही भावांनी काशीयात्रेस प्रयाण करावे. ता.क. : सत्शील ब्राह्मणांच्या यादीसाठी संपर्क : कु. मंजिरी डेंगळे.

वाजपेयी : ""

बजरंग दल : गोहत्या करणार्यांचे हात कलम केले जातील. ता.क. : चारी भावाना गोरक्षणाचे ट्रेनींग द्या.

वाजपेयी : ""

मोदित्व : गायींचा विकास झाला पाहिजे. त्यासाठी खास काठेवाडी बैल मागवा. दोन गायींच्या चार गायी होतील. चारी गायींचे दूध आणंद च्या अमूल डेरीत घाला. दुधाचे लोणी करून......(गडकरी मधेच थांबवतात)

गडकरी : (स्वगत : नुस्ते खायच्या गोष्टींची चर्चा करतायत मेले).-- मोदिना मध्येच थांबवून---. प्रकटः काहितरी खायला मागवूया का?

वाजपेयी : ""

सुषमा , जेटली : आम्हाला बोलू द्या ....आम्हाला बोलू द्या ....आम्हाला बोलू द्या ....

वाजपेयी : ""

अडवानी : थांबा....
(भीषण शांतता)

वाजपेयी : ""

अडवानी: गायींच्या प्रश्नावर चींतन बैठक घेउया... बैठकीच्या निर्णयानुसार दोन्ही गायींना रथाला जुंपूया. रथयात्रा काढूया. रथयात्रेने सर्व प्रश्न मिटतात.

इतक्या गहन चर्चेमुळे मुनींचे डोके जड होते. ते वाट फुटेल तिकडे पळू लागतात.... रस्ता चुकुन महाराष्ट्रात येतात.... थेट राष्ट्रवादीच्या कार्यालयात ....

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय

भु़जबळ : सामाजिक समतेसाठी मा. पवार साहेबांनी जे योगदान दिलय ....

दादा : (भुजबळांना मधेच तोडून): आबा तुमच्या तंटामुक्तीचं काय झालं.... चारी भावातली भांडण सोडवा.. गायी बारामतीला पाठवा.

आबा: बडे बडे शहरोमे छोटे छोटे हादसे होते रहते है. (स्वगतः काय पिन हिन्दी डायलूग सुचला राव !)

भु़जबळ : सामाजिक समतेसाठी मा. पवार साहेबांनी जे योगदान दिलय ....

दादा : (भुजबळांना मधेच तोडून): चारी भावांची पुण्याच्या आसपास जमीन आहे का?

इतर सर्व : मी पण... मी पण .. मी पण ....

मुनींचा बुध्यांक कमी असल्याने त्यांना ह्या चर्चेचा ""अर्थ"" समजत नाही... पण तमोगुणाची बाधा कमी करायला ते तडक राळेगण सिद्धी गाठतात

राळेगण सिद्धी

अण्णा : नेहमी खरे बोलावे. त्याग करावा.
केजरीवाल : लोकपाल झाल्यास गायींचे तंटे झालेच नस्ते.
अण्णा : नेहमी खरे बोलावे. त्याग करावा.
बेदी: लोकपाल झाल्यास गायींचे तंटे झालेच नस्ते.
अण्णा : नेहमी खरे बोलावे. त्याग करावा.
भूषण १: लोकपाल झाल्यास गायींचे तंटे झालेच नस्ते.
भूषण २: लोकपाल झाल्यास गायींचे तंटे झालेच नस्ते. काश्मीर वेगळे करा.
अण्णा: अत्तापासून मौनव्रत

अण्णांच्या मौनव्रतामुळे निबिड शांतता पसरली. आणी मुनींना शेजारच्याच सभेतले मनसे जयघोष ऐकू येवू लागले.

मनसे सभा

राजः जमलेल्या माझ्या तमाम मराठी गायींनो, बैलांनो आणी वासरांनो.

प्रेक्षक : हम्मा.. .. हम्मा.... हम्मा.हम्मा.हम्मा

राजः ह्या भैये लोकांनी तुमची पिळवणूक चालवलीय ... सकाळ संध्याकाळ तुम्हाला पिळतात ... आणी... मराठी गायींच दूध मराठी माणसालाच विकतात.... भड्वे..

प्रेक्षक :(अत्यानंदाने.. हर्षातिरेकाने ) हम्मा.. .. हम्मा.... हम्मा.हम्मा.हम्मा.. काही लाथा आनी दुगण्या

राजः हे चालणार नाही म्हण्जे. नाही. काही झालं तरी...... अंगावर येणार्याला शिंगावर घ्यायचंच.... हीच मर्‍हाटी बैलांची उज्ज्वल परंपरा आहे.

मनसेची सभा रिपोर्ट केली... आणी शिव सेनेची नाही तर... पक्षपाताचा आरोप होइल.... म्हणून मुनी लगबगीने तिकडे जातात.

मातोश्री

बा (ळ) ठा (करे) : जय महाराष्ट्र !

इतरः (तिथं कुणी नस्तंच)

बाठा: कोण आहे रे तिकडे.....

युवा सेनाप्रमुख दुडु दुडु धावत येतात...

आठा: आजोबा.. आजोबा... बाहेर तिकडे गायी आल्यात .. युवकांचा प्रश्न असता तर सोडवला असता मी..

(लाडात येउन युवा सेनाप्रमुख आजोबांची शाल ओढतात)

बाठा: अं अं.अं अं. कुणी मुंबई महाराष्ट्रापासून तोड्ली.. तर मी त्याला गोळी घालीन.

आठा: सारख सारख तेच तेच काय हो ! बाहेर गायी आल्यात आणी बाबा फोटो काढतायत त्यांचे.....

(ललकारी : शिवसेना कार्यकारी प्रमूख येत आहेत हो sssss )

उठा: फोटू मस्त आलेत .... पण नाकं फेंदार्लीयत त्या गायींची.... नक्कीच राज च भाषण ऐकून आल्या असणार. तो कॉपी का हो करतो सारखी तुमची ......... त्याला सांगा नं sssssssss.....

बाठा : जय महाराष्ट्र ! कुणी मुंबई महाराष्ट्रापासून तोड्ली.. तर मी त्याला गोळी घालीन.

ऊठा: वैतागून स्वत्।चेच फोटू घेतो आता मी.

.
.
.

मूनी नैराश्याच्या झट्क्याने ग्रस्त होतात .... स्वलोकी परत जातात. नारायण ... नारायण... उठा मालक ऊठा ...नारायण ... नारायण... नारायण ... नारायण... उठा मालक ऊठा ..


"""" सारख उठा ऊठा करू नको रे । मला आवडत नाही तो शब्द । """"

शिंच्या मुन्ना --------- उठा आवडत नाही म्हणू न ... मी शिवसेना सोड्ली------ आणी सारखं काय तेच तेच.......तेच तेच.......तेच तेच.......

(सदर स्वप्न नारायणास पडले. त्यावेळी त्यांचे डोळे अर्धोन्मलित होते. त्यासमयी ते दुग्धसागरातील शेषशैयेवर पहुडले होते. लक्षुमी पाय चेपत होती. नाभीवर कमळासारखे काहीतरी उगवले होते.)

साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण........

ता. क. : ही कहाणी जो वाचील त्यास ब्रह्मह्त्येचे पातक लागेल. जो वाचणार नाही त्यास आठ पुत्र होतील.

विनोदमाहिती

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

1 Nov 2011 - 7:50 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

बाहेर गायी आल्यात आणी बाबा फोटो काढतायत त्यांचे

टाळ्या :)

राजघराणं's picture

2 Nov 2011 - 11:42 am | राजघराणं

काहि दुष्ट लोक .. नारायणास ... नार्‍या, नारोबा अथवा देड फुटीया ऐसे बोल लावतात. मु.पो. सिन्धुदुर्ग

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

1 Nov 2011 - 7:50 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

बाहेर गायी आल्यात आणी बाबा फोटो काढतायत त्यांचे

टाळ्या :)

अर्धवटराव's picture

1 Nov 2011 - 8:29 pm | अर्धवटराव

मस्त जमलीय भट्टी...

(स्वाभिमानी संघटना सदस्य) अर्धवटराव

पैसा's picture

1 Nov 2011 - 8:37 pm | पैसा

ताजा कलम तर फारच छान!

पिंगू's picture

1 Nov 2011 - 9:10 pm | पिंगू

हाहाहा.. लोळून लोळून हसतोय..

- पिंगू

भास्कर केन्डे's picture

1 Nov 2011 - 11:41 pm | भास्कर केन्डे

हा हा हा.... हसून हसून पोटात आकडा आलाय...

Nile's picture

1 Nov 2011 - 11:51 pm | Nile

आवडलं. थोडं विरामचिन्हांना जपून वापरलं तर वाचायला अजून मजा येईल.

(आमचे डानराव जेव्हा यंग होते तेव्हा तेही असल्या विषयांवर लिहायचे.. ;-) )

परिकथेतील राजकुमार's picture

2 Nov 2011 - 12:38 pm | परिकथेतील राजकुमार

निळ्यानी ह्या वेळी लेखन वाचून मग प्रतिक्रिया दिलेली पाहून ड्वाले पाणावले.

निळ्या मेल्या आता येवढे सगळे वाचलेच आहेस, तर मला त्याचे सार सांग आणि माझे कष्ट वाचव.