माझ्या आत सतत काहीतरी वाजतंय
कोण आहे?
सारखी टक टक टक
.
.
.
सहन होत नाहीये आता
कोण आहे आत?
.
.
.
बहुतेक एक कविता अडकली आहे
.
.
गोजीर्या शब्दांची,
साजीर्या उपमांची,
खूप काळ लोटला आहे
अडकली आहे, तळघरात
.
.
तिने बराच प्रयत्न केला, बाहेर पडण्याचा
पण सगळं निष्फळ
.
.
.
.
.
एकदा त्सुनामी सारखी उसळून बाहेर आली
.
.
.
बाहेर पडलीय तर
छिन्नविछिन्न अन् रक्तबंबाळ
.
.
.
डॉक्टर म्हणाले
आता ती अन् तिचे नशीब
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(३१/१०/२०११)
प्रतिक्रिया
31 Oct 2011 - 4:42 pm | फिझा
छान अहे कविता !! सोउमित्र यन्च्या हार्ट सर्गरि सरखि भासते !!!
31 Oct 2011 - 9:46 pm | प्रकाश१११
खूप छान -
गोजीर्या शब्दांची,
साजीर्या उपमांची,
खूप काळ लोटला आहे
अडकली आहे, तळघरात
.आवडली कविता
1 Nov 2011 - 12:37 pm | ज्ञानराम
छान आहे.......
1 Nov 2011 - 12:57 pm | रामदास
माझी कविता थोडी वेगळी आहे .स्तुनामी सारखी न येता सगळे पहारे चुकवून येते. डोळे झाकते . कानात गुणगुणते .
क्या करते हो साजना तुम हमसे दूर रहके
1 Nov 2011 - 1:07 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
:)
1 Nov 2011 - 1:14 pm | गवि
मिका..
आता ती अन् तिचे नशीब
कवितेचे नशीब अत्यंत उत्तम आहे.. काळजी नसावी.. कारण अतिशय दमदार हेल्दी कविता आहे.