नावडतीचे मीठ अळणी!

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
29 Oct 2011 - 12:34 am

नावडतीचे मीठ अळणी!
‘नावडतीचे मीठ अळणी’ म्हण सहज आठवली...
पुरुषांना एक आवडती तर दुसरी नावडती असे असते. निदान खाण्याच्या बाबतीत तरी. एक आई व दुसरी पत्नी. पैकी कोणीतरी आवडते असेल तर दुसरे नावडते ठरते.
एकीचा स्वैपाक मिळमिळीत तर दुसरीचा चवदार वाटतो. नावडतीने कितीही मनलाऊन पदार्थ बनवला तरी त्यात काहीतरी उणे काढले जाते असे म्हण सुचवते. असो.
तीच गोष्ट अन्य ठिकाणीही लागू होते असे व्यवहारात दिसते. एखाद्या गोष्टीचा तिटकारा निर्माण झाला की त्याला नावे ठेवण्यासाठी मनात कल्पना विस्तार सुरू होतो. नाडी ग्रंथांना असेच नावडतेपण सहन करावे लागते.
नावडतीच्या स्वयंपाकातील मीठासारखा पदार्थ, जो तयार होण्यात नावडतीचा अजिबात संबंध नसतो, तरीही तिला बोल लावायला ते कारण सोईचे जाते म्हणून वापरले जाते. म्हणीत निदान पदार्थाची चव घेऊन म्हटले जाते असे सूचित होते. नाडी ग्रंथाबाबत (नावडतीच्या) कथनांची (चव) अनुभव घ्यायची तसदी न घेता नाडीतील संकल्पनांचे ‘मीठ अळणी’ म्हणून संभावना करताना पाहून ती म्हण अन्य कारणांना देखील कशी चपखल लागू पडते याचा प्रत्यय येतो.
नाडीग्रंथावर एक कार्यशाळा पुणे मुक्कामी करायचे घाटत आहे. इच्छुकांनी सहभागी व्हायला काय हरकत आहे. निदान नाडीग्रंथांचे मीठ अळणी आहे का नाही याचा अनुभव येईल.

मांडणीम्हणीमाहिती

प्रतिक्रिया

अशोक पतिल's picture

29 Oct 2011 - 7:37 am | अशोक पतिल

फार पुर्वी नेपोलियन चे हि प्रश्न सुचि विषयी असेच पुस्तक वाचले होते. त्या पुस्तकात भविष्या विषयी उत्तरे दिलेली होती .

आत्मशून्य's picture

1 Nov 2011 - 12:31 pm | आत्मशून्य

होय नेपोलीयन प्रश्नावलीचा वापर मी स्व्तः यशस्वीपणे केला आहे. मूलभूत १३ प्रश्नांची उत्तरे ते (अर्थात पॅरॅमीटर्स बदलून) अत्यंत अचूकतेने देतं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Oct 2011 - 10:09 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नाडीग्रंथावर एक कार्यशाळा पुणे मुक्कामी करायचे घाटत आहे.

माझ्या शुभेच्छा आहेतच. झकास होऊ द्या कार्यशाळा.
वृतांत टाकायला विसरु नका.

निदान नाडीग्रंथांचे मीठ अळणी आहे का नाही याचा अनुभव येईल.

खरं आहे, नाडीपट्टीची सिरियसली कोणीतरी चव घ्या रे.....!

(हल्ली आपले लेख दिसले नाही की, मलाच चुक चुकल्यासारखं होतं. तेव्हा पब्लिक काहीही म्हणो, तुम्ही आपलं लिहित राहा)

-दिलीप बिरुटे

शशिकांत ओक's picture

31 Oct 2011 - 1:30 am | शशिकांत ओक

नाडीपट्टीची सिरियसली कोणीतरी चव घ्या रे.....!

आटपाट नगरीचे दिलीपराजे - अरे कोण आहे रे तिकडे? पर्धानजींना ताबडतोब बोलवा.
शिपाई - जी, महाराज.
पर्धानजी येतात
ओ...पर्धानजी, संभाजी नगरच्या कोणाला तरी चव घ्यायला पाठवा बरें ... आणि हो, निकाल काय लागला तो आमच्या जनानखान्यात कळवायची व्यवस्था करा बरें....
.....
पर्धानजी - आपली नाडी निघाली. प्रकरण जरा नाजुक हाय महाराज. आपण जातीने त्याचा समाचार घ्यावा ...
राजे - बर बर ...

Nile's picture

31 Oct 2011 - 4:34 am | Nile

(हल्ली आपले लेख दिसले नाही की, मलाच चुक चुकल्यासारखं होतं. तेव्हा पब्लिक काहीही म्हणो, तुम्ही आपलं लिहित राहा)

सहमत आहे. पब्लिकनी एव्हढंस काही म्हणलं की ओक साहेब लगेच नाराज होऊन वर्ष वर्ष भर काहीच लिहित नाहीत. नाडीवर त्यांना काहीतरी लिहायला लावायलाच म्हणजे कित्ती कित्ती कठिण काम!! असं करू नका हो ओकसाहेब, दररोज किमान एकतरी लेख लिहित जा की नाडीवर!!

तिमा's picture

29 Oct 2011 - 7:14 pm | तिमा

'नावडती' ने स्वतःचे नांव नाडीवती ठेऊन पहावे, कदाचित ती आवडती होईल.
कार्यशाळेस शुभेच्छा.

मित्रा,
अक्षरांची हेराफेरी मजेशीर खरी पण नाडीची माडी न चढता नावडतीला आवडती करायची कार्यशाळा काय कामाची?

तिमा's picture

30 Oct 2011 - 9:55 am | तिमा

ओकसाहेब,

एखाद्या गोष्टीचा अनुभव न घेता त्यावर टीका करणे योग्य नाही असेच माझे मत आहे. तुमच्या लेखमाला मी वाचल्या आहेत. त्यावरील टीका व टिंगलही वाचली आहे. आयुष्यात मला असे काही अनुभव आले आहेत की ते विज्ञानाच्या आधारे समजणे कठीण आहे. त्यामुळे माणसाच्या आकलनापलिकडेही ह्या जगात बर्‍याच गोष्टी आहेत हे मला मान्य आहे. आता त्याचा अनुभव घ्यायचा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
म्हणून म्हणतो की आपल्या कार्यशाळेला मनापासून शुभेच्छा.

दादा कोंडके's picture

30 Oct 2011 - 2:55 pm | दादा कोंडके

आयुष्यात मला असे काही अनुभव आले आहेत की ते विज्ञानाच्या आधारे समजणे कठीण आहे

ति. मा. साहेब, येउद्या काही अनुभव.

शशिकांत ओक's picture

31 Oct 2011 - 10:48 pm | शशिकांत ओक

मित्रांनो, आणि तिरशिंगराव माणूसघाणे,
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
कार्यशाळेची प्राथमिक तयारी झाली की काही अधिक माहिती कळवीन. ही कार्यशाळा ज्यांना नाडी ग्रंथांवर आस्था आहे अशांसाठी सशुल्क आहे.

श्रावण मोडक's picture

1 Nov 2011 - 12:40 am | श्रावण मोडक

ही कार्यशाळा ज्यांना नाडी ग्रंथांवर आस्था आहे अशांसाठी सशुल्क आहे.

श्री. शशिकांत ओक,
धंदा करा; पण चोख करा. इथं संधी आहे म्हणून त्याची छुपी जाहिरातबाजी नको. तुमचे एकूण 'अनुभव घ्या'चा पाढा गात मग सशुल्क कार्यशाळा, नाडीपट्टीवाल्यांचा व्यवसाय वगैरे जे चालले आहे ते 'मी नाही त्यातला, कोयंडा लावा आतला' या धर्तीचे आहे.
उघड लिहा, की हा माझा धंदा आहे, आणि धंदा करा.
त्या शुल्काची स्पष्टीकरणे देत बसू नका. कारण ती ऐकून मी काही ठकणार नाही.

Nile's picture

1 Nov 2011 - 1:46 am | Nile

ओकांना असं काही म्हणू नका हो. मग ते नाराज होऊन वर्ष वर्ष भर लिहित नाहीत अन मग प्रा. डॉ. बिरुटेंना चुक चुकल्यासारखं व्हायला होतं!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Nov 2011 - 10:20 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> प्रा. डॉ. बिरुटेंना चुक चुकल्यासारखं व्हायला होतं !

आपली व्यथा, आपला त्रागा, आपली भावना, आपली तळमळ आणि मळमळही मला कळते. सर्वप्रथम आपल्या सारख्या सन्माननीय सदस्यांना एक गोष्ट सांगितली पाहिजे की, ओकांना मी आपले लेखन दिसत नाही म्हणतो म्हणजे मी त्यांच्या नाडीपट्टीचा आणि त्यांच्या विषयाचे समर्थन करतो असे आपल्याला वाटत असेल तर ते एकदाचे डोक्यातून काढून टाका. कोणी मिपाकर किंवा अन्य कोणी वाचक ग्राहक नाडीच्या श्रद्धेपोटी आपल्या भविष्यकाळाबद्दलच्या रम्य स्वप्नाच्या आशेने नाडीपट्टीत गोवल्या जावू नये असे आपल्याला वाट्त असेल तर मलाही तसेच वाटते. प्रत्येकाजवळ आपापली सदसदविवेक बुद्धी असते आणि तिचा वापर करावा हे काही मी सांगण्याची गरज नाही. मिपावर वावरणारी मंडळी नुसती शिक्षित नाही तर उच्चविद्याविभूषित आहेत. जाणकार आहेत. अनुभवी आहेत. विज्ञानाची कास धरणारी आहे. कोणी कोणाचे प्रबोधन करण्याची आणि अक्कल शिकविण्याची गरज नाही, बाकी, कोणी लुबाडल्या जावू नये याच्याशी काही दुमत नाही.

मी ओकांना खासगीत आणि प्रतिसादातही अनेकदा हेच सांगितले आहे की, माझा नाडीपट्टी आणि त्याच्या कथनावर विश्वास नाही. नाडीपट्टीतील लिपीचा कोणी सविस्तर अभ्यास करावा (भाषाशास्त्राच्या दृष्टीने) इतकेच मी म्हटले आहे. नाडीपट्टीचे महत्त्व सांगण्याच्या चिकाटीचे मी कौतुक केले आहे. चुकचुकल्यासारखं म्हणजे ओक येतात ते केवळ नाडीपट्टीचा विषय घेऊन असे मला म्हणायचे आहे, दुसरं काही लिहित नाही या अर्थाने.

अजून एक; त्यांचे लेखन दिसत नसल्यामुळे मला जर चुकचुकल्यासारखे होते तर आपण कशाला त्रास करुन घेता. आपल्या प्रतिसादात मला विनाकारण ओढू नये, ओढायचं कारण नाही. मी आपल्या प्रतिसादाकडे दुर्लक्ष करतो म्हणून आपण वाटेल ते प्रतिसादात बरळले पाहिजेच असे काही नाही, तेव्हा आपल्याला काय प्रतिवाद करायचा तो लेखकाच्या लेखनावर, प्रतिसादावर करावा. सदरील लेखन जाहीरातीच्या स्वरुपाचे वाटत असेल तर नीलकांतशी थेट संपर्क करावा. अन्य संपादक-सल्लागाराशी संपर्क करावा. माझे सदस्यनाम घेऊन प्रतिसादात लिहितांना कोणाचे काही समज- गैरसमज होणार नाही, याची काळजी आपण घ्यावी, घ्याल इतकीच अपेक्षा आहे. करिता हा प्रतिसाद प्रपंच.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

1 Nov 2011 - 8:16 am | प्रचेतस

ही कार्यशाळा ज्यांना नाडी ग्रंथांवर आस्था आहे अशांसाठी सशुल्क आहे.

नाडी ग्रंथावर आमची आस्था नाही मग आमच्यासाठी ती कार्यशाळा नि:शुल्क आहे का हो ओक महर्षी?

इंटरनेटस्नेही's picture

29 Oct 2011 - 8:24 pm | इंटरनेटस्नेही

वा! वा! चान!! चान!!

नंदू's picture

30 Oct 2011 - 7:14 am | नंदू

‘शिळ्या कढीला उत’ म्हण सहज आठवली.....

शशिकांत ओक's picture

31 Oct 2011 - 1:14 am | शशिकांत ओक

मित्रा, खरे आहे.
तुमच्या दृष्टीने कदाचित म्हण म्हणून कढी शिळी आहे. पण सत्यतेचा उत आणून तिला ताजे केले जाते. तर मग तिचा अनुभव पिऊन घ्यायला का लाजता.

तर मग तिचा अनुभव पिऊन घ्यायला का लाजता.

कढी फुकट आहे का? आम्ही दारु, सिगारेट आणि कढी फुकट मिळत असेल तरच पितो ;)

आत्मशून्य's picture

31 Oct 2011 - 10:54 pm | आत्मशून्य

रा-वन पाहीलात काय ? कसा वाटला तूम्हाला ? मलातरी रजनीचा रोबोटच आवडला होता/आहे. सूपर स्टार, सूपर हिरो, बिग बजेट मसाला मोव्ही म्हणजे काय याची कल्पना रोबोटच देऊ शकतो. रावन नाही.

पाहिला ना.
सिनेमॅक्सच्या त्रीडी पडद्यावर.
अंमळ रंजक.
भाभडा सुब्बु का कोण ज्याला १०वर्षांचा मुलगा आहे अशाची बायको फारच मारू वाटली.
त्यात तिचे चाळणीतून १ चांद पाहून नंतर धडाधडा नाचात रंग भरून ४ चांद लावले असे नाकावरील जड ३डी चष्मा काढून १००रुपये परत घेताना हलके वाटले.

आत्मशून्य's picture

1 Nov 2011 - 12:33 pm | आत्मशून्य

तूम्हाला कोण जिंकलेल आवडेल रा-वन ? कि जि-वन ?

मूळात चित्रपटात रा-वन ला व्हिलन का म्हणायच हेच मला कळलं नाही ? त्याच कामच आहे फाइट करणं आणी समोर येणार्‍याला मारणं, जि-वनच कामही तेच आहे फाइट करण आणी समोरच्याला मारणं मग तो अचानक लूसीफरला वाचवायचा निर्णय का घेतो हेच कळत नाही. रोबोटमधे मात्र दे-मार साय-फाय अ‍ॅक्शन आहेच, पण तो रावणासारखा का बनतो ते ही व्यवस्थीत दाखवल आहे.

कार्यशाळा मोफत असेल तर अवश्य उपस्थीती लावल्या जाइल. चेतन साहेबही येतील.

चेतन सुभाष गुगळे's picture

1 Nov 2011 - 7:38 pm | चेतन सुभाष गुगळे

<< आपण नाडीवरचा शो चेतनना दाखवलात काय़ >>

इथे आपल्या प्रतिसादात मला खेचण्याचं प्रयोजन काही कळलं नाही. एक तर आपल्या या धाग्यावर प्रतिसाद देऊन गोंधळ वाढविण्यापेक्षा मी थेट आपल्यासोबतच दूरध्वनीवर संभाषण केले होते. त्यातून मला जी माहिती मिळाली ती निश्चितच आशादायी नव्हती, त्यामुळे माझ्यापुरता तरी मी हा विषय संपवून टाकला होता. शिवाय आपल्यात झालेल्या संभाषणाचा इथे उल्लेख करायचेही टाळले होते. तरीही आता आपण माझा उल्लेख केलाच आहे तर मी आपल्या संभाषणाचा तपशील इतर सदस्यांकरिता इथे मांडतो म्हणजे पुन्हा गैरसमज नको.

मी आपल्याला विचारले होते की आपण स्वत: नाडी भविष्य बघता का? आपण नकारार्थी उत्तर दिले. त्यावर मी आपणांस पुण्यात निगडीच्या आसपास असे भविष्य कोण बघतात हे विचारले तसेच त्याबाबतचे शुल्क ही विचारले? त्यावर आपण सरळ उत्तर न देता ही माहिती मिळविण्याकरिता आपले या विषयावरील पुस्तक विकत घेऊन वाचण्यास सांगितले, जे की जास्तकरुन अप्पा बळवंत चौकात मिळण्याची शक्यता आहे.

थोडक्यात जो व्यवसाय आपण करीत नाही त्याची केवळ जनहितार्थ माहिती आपण देता (ज्याला जाहिरात म्हणणे आपल्याला मान्य नाही). बरे जी माहिती देता ती अपूर्ण असते. अधिक तपशीलाची विचारणा केल्यास त्याकरिता आपण स्वत:च लिहीलेले पन्नास रूपयांचे पुस्तक विकत घेण्यास सूचविता जे की मला पंचवीस किमी लांबवर मिळेल. हा प्रकार माझ्या तरी पचनी पडला नाही. आपण इथे इतके धागे काढता, त्या धाग्यांवर होणार्‍या गंभीर, चिडखोर, हास्यास्पद अशा सर्व प्रकारच्या टीकाकारांना उत्तरे देत बसता. त्यात बरीच ऊर्जा खर्च होत असणारच. त्यापेक्षा इतकीच ऊर्जा खर्च करून आपण नाडी भविष्य कथन पुण्यात अमूक अमूक ठिकाणी केले जाते, त्याचे अमूक इतके शुल्क आहे. वाचकांनी स्वत: जाऊन अनुभव घेण्यास हरकत नाही इतक्या साध्या सोप्या पद्धतीत लिहू शकत नाही का?

असो. मला जे योग्य वाटले ते आपणांस सूचविले. बाकी आपली मर्जी...

श्रावण मोडक's picture

1 Nov 2011 - 7:53 pm | श्रावण मोडक

मी आपल्याला विचारले होते की आपण स्वत: नाडी भविष्य बघता का? आपण नकारार्थी उत्तर दिले. त्यावर मी आपणांस पुण्यात निगडीच्या आसपास असे भविष्य कोण बघतात हे विचारले तसेच त्याबाबतचे शुल्क ही विचारले? त्यावर आपण सरळ उत्तर न देता ही माहिती मिळविण्याकरिता आपले या विषयावरील पुस्तक विकत घेऊन वाचण्यास सांगितले, जे की जास्तकरुन अप्पा बळवंत चौकात मिळण्याची शक्यता आहे.

हे केवळ अपेक्षीत अनपेक्षीत आहे. म्हणजे, ओकांच्या आजवरच्या पवित्र्यात ते बसत नसल्याने त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. पण एकूण त्यांची वाटचाल पाहता, अपेक्षीतच.

राजेश घासकडवी's picture

1 Nov 2011 - 4:15 am | राजेश घासकडवी

कदाचित तिच्याकडून लग्नात हुंडा येण्याऐवजी तिचा बाप जावयाकडून वेळोवेळी हिचं दर्शन घे आणि मलाच हुंडा दे म्हणत असेल. म्हणून नावडती झाली असेल.

ऋषिकेश's picture

1 Nov 2011 - 9:47 am | ऋषिकेश

नावडती कसली!?.. लोचट आहे

सुहास..'s picture

1 Nov 2011 - 3:36 pm | सुहास..

काल-परवाच आमचे एक जुने स्नेही म्हणत होते की पेन्शन पुरत नाही म्हणुन, त्यांना कार्यशाळेविषयी सांगीतले आहे, येतील बघा त्यांची काय नाडी का नासाडी काय असेल ते !

धन्यवाद !