मी गेल्यावर

पुष्कराज's picture
पुष्कराज in जे न देखे रवी...
2 Jun 2008 - 7:15 pm

मी गेल्यावर वि़झुनी जातील
रत्नदीप आकाशी
मी गेल्यावर थांबून राहील
वीज तशी मेघाशी

मी गेल्यावर पोर्णिमेसही
चंद्र यायचा नाही
मी गेल्यावर रवी तळपूनी
तेज द्यायचा नाही

मी मी माझे किती कल्पना
किती मानसी वेड
गेल्यानंतर सरणावरती
दोन क्षणांचा खेळ

शूरवीर बलशाली राजे
किती जाहले येथे
स्मरण तयांचे या जगताला
कुठे आज रे होते

नररत्नांची ही पहा अवस्था
काय आपुले आहे
आपुल्यानंतर कशास वेड्या
नाव आपुले राहे

चैनीमध्ये दिवस संपला
धुंदीमध्ये राती
भोगून भोगून क्षीण जाहली
आयुष्याची ज्योती

तरीही वाटे मनास माझ्या
नाव इथे होणार
गेल्यानंतर दोन अश्रुही
कोण तुला देणार

- पुष्कराज

कविताआस्वाद

प्रतिक्रिया

llपुण्याचे पेशवेll's picture

2 Jun 2008 - 7:43 pm | llपुण्याचे पेशवेll

मिपावरील तुझ्या २-३ कविता मी वाचल्या आणि फॅनच झालो आहे बघ तुझा.
तरीही वाटे मनास माझ्या
नाव इथे होणार
गेल्यानंतर दोन अश्रुही
कोण तुला देणार

हे कडवे खास.
पुण्याचे पेशवे

गिरिजा's picture

2 Jun 2008 - 7:44 pm | गिरिजा

पुष्कराज,

तरीही वाटे मनास माझ्या
नाव इथे होणार
गेल्यानंतर दोन अश्रुही
कोण तुला देणार

मस्तच..

खूप छान आहे कविता..

--
गिरिजा..

लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग
-----------------------

अमोल केळकर's picture

2 Jun 2008 - 10:16 pm | अमोल केळकर

मी मी माझे किती कल्पना
किती मानसी वेड
गेल्यानंतर सरणावरती
दोन क्षणांचा खेळ

एकदम सही

शितल's picture

3 Jun 2008 - 2:02 am | शितल

पण

मी मी माझे किती कल्पना
किती मानसी वेड
गेल्यानंतर सरणावरती
दोन क्षणांचा खेळ

मला ही हेच जास्त आवडले .

विसोबा खेचर's picture

4 Jun 2008 - 8:03 am | विसोबा खेचर

सहमत आहे..

मी मी माझे किती कल्पना
किती मानसी वेड
गेल्यानंतर सरणावरती
दोन क्षणांचा खेळ

मलाही ह्याच ओळी जास्त आवडल्या!

छान कविता..!

आपला,
(क्षणभंगूर) तात्या.

जयवी's picture

4 Jun 2008 - 2:46 pm | जयवी

सुरेख कविता !!

प्रशांतकवळे's picture

4 Jun 2008 - 6:28 pm | प्रशांतकवळे

मी मी माझे किती कल्पना
किती मानसी वेड
गेल्यानंतर सरणावरती
दोन क्षणांचा खेळ

एकदम अप्रतीम!