कार्यक्रम..

प्राजु's picture
प्राजु in जनातलं, मनातलं
16 Oct 2007 - 12:36 am

मंडळी,
थोडी स्वस्तुती करते आहे. इथे अमेरिकेत एक इंटरनेट रेडिओ आहे. तिथे मी निवेदिकेचं काम करते. माझे २-३ कार्यक्रम झाले आतापर्यंत. आता येत्या गुरूवारी माझा श्रीमती शांताबाई शेळके यांच्यावर त्यांच्या जयंती निमित्त ( १२ आक्टो) कार्यक्रम मी सादर करणार आहे.
पॅसिफिक टाईम सकाळी ७.०० , ११.००
www.eprasaran.com
इथे मराठी चॅनेल.

भारतामध्ये हा कार्यक्रम गुरूवारी ७.३० ला संध्याकाळी ऐकता येइल.

कार्यक्रम मिसळपाव करांनी ऐकावा ही विनंती आणि आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात.

- प्राजु.

कलाआस्वाद

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Oct 2007 - 12:43 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पण आज तर १६ तारीख आहे ना ! म्हणजे १८ तारखेला गुरुवारी हा कार्यक्रम आहे का ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्राजु's picture

16 Oct 2007 - 12:47 am | प्राजु

१८ तारखेलाच..!

विसोबा खेचर's picture

16 Oct 2007 - 12:56 am | विसोबा खेचर

आता येत्या गुरूवारी माझा श्रीमती शांताबाई शेळके यांच्यावर त्यांच्या जयंती निमित्त ( १२ आक्टो) कार्यक्रम मी सादर करणार आहे.

कार्यक्रमास अनेकानेक शुभेच्छा...

भारतामध्ये हा कार्यक्रम गुरूवारी ७.३० ला संध्याकाळी ऐकता येइल.

सकाळी की संध्याकाळी? माझं 'घड्याळ' थोडं कच्चं आहे म्हणून प्रामाणिकपणे विचारतो! :)
कामधंद्यातून सवड झाल्यास कार्यक्रम नक्की ऐकेन. कार्यक्रमातील दोन्ही बायका माझ्या चांगल्या परिचयाच्या आहेत! शांताबाई, एक उत्तम कवयत्री म्हणून आणि प्राजू, आपल्या मिसळपाव परिवाराची एक कुटुंबीय म्हणून! :)

आपला,
(आकाशवाणी मुंबई 'ब' केन्द्रावरचा 'कामगार विश्व' आणि 'आपली आवड' या कार्यक्रमांचा चाहता!) तात्या.

विसोबा खेचर's picture

16 Oct 2007 - 1:03 am | विसोबा खेचर

गुरुवारी 'संध्याकाळी' हे वाचायचंच विसरलो! :)

आपला,
(वेंधळा!) तात्या.

कोलबेर's picture

16 Oct 2007 - 1:50 am | कोलबेर

आम्ही पण जरूर ऐकू.
पण त्या लिंकवर ऐकायचे कसे? बरीच खटपट केली तरी काहीच ऐकायला मिळाले नाही :-(

प्राजु's picture

16 Oct 2007 - 3:43 am | प्राजु

लिंकवर त्यांनी दिलेल्या वेळेलाच कार्यक्रम चालू असतात. एरवी रेडीओ बंद. आणि त्यावेळी लिंक वर गेलात तर मराठी वर क्लिक करताच कार्यक्रम चालू होतो.
- प्राजु.

सहज's picture

16 Oct 2007 - 6:47 am | सहज

शुभेच्छा! (एव्हाना बहूदा रेकॉर्ड झाला असेल म्हणा का थेट प्रक्षेपण?)

शक्यतो जमवूच. पुनःप्रसारीत होणार असेल तरी कळवा म्हणजे ज्यांना काही कारणाने जमणार नाही त्यांना सोयीचे.

जमल्यास तबकडी मिळवा म्हणजे कायमस्वरूपी आस्वाद घेता येईल ज्याला जसे जमेल तेव्हा, पुन्हा पुन्हा! :-)

स्वाती दिनेश's picture

16 Oct 2007 - 10:03 am | स्वाती दिनेश

वा छान प्राजु, कार्यक्रमाला शुभेच्छा! सहजराव म्हणतात त्याप्रमाणे तबकडीचे पण पहा.:)
स्वाती

ध्रुव's picture

16 Oct 2007 - 11:09 am | ध्रुव

माझ्याही शुभेच्छा!!
पण अजून कुठलाही कार्यक्रम ऐकता आला नाही. लिंकवर क्लिक केले तरी ऐकू येत नाही!! :(
११.am ला कार्यक्रम आहे. आज त्या वेळेस काही चालू नाही का??

ध्रुव
सद्ध्याचा पत्ता - http://www.flickr.com/photos/dhruva

चित्रा's picture

16 Oct 2007 - 8:26 pm | चित्रा

शुभेच्छा! तुमचा कार्यक्रम नक्कीच ऐकायला आवडला असता. पण कामाच्या वेळेमुळे ऐकता येणार नाही. सी डी किंवा इतर काही रेकॉर्डिंग मिळेल का?

प्रियाली's picture

16 Oct 2007 - 9:04 pm | प्रियाली

शुभेच्छा तर आहेतच पण कार्यक्रम नेहमीसारखाच बहारदार सादर करशील अशी खात्रीही आहे.

गुरुवार लक्षात ठेवायला हवा. :)

राजीव अनंत भिडे's picture

17 Oct 2007 - 1:44 am | राजीव अनंत भिडे

कार्यक्रमाकरता शुभेच्छा!

अद्याप हे सदर 'तांदुळातून खडा बाजूला काढून टाकतात' त्या पद्धतीने दुजाभाव किंवा पंक्तिप्रपंच करणार्‍या 'माध्यमिक मिसळपावकर' सारख्या एखाद्या सदरात न जाता मिसळपावच्या मेनस्ट्रीमवरच आहे याबद्दल मी मिसळपावचे अभिनंदन करतो!

राजीव अनंत भिडे,
हिंदु कॉलनी, मुंबई.

विश्वजीत's picture

17 Oct 2007 - 10:50 am | विश्वजीत

कार्यक्रम जरूर ऐकू.

प्राजु's picture

18 Oct 2007 - 5:03 am | प्राजु

मिसळपाव वासियांना धन्यवाद..!
आपल्या प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत..

आपली,
प्राजु.

मोगॅम्बो's picture

25 Oct 2007 - 7:54 pm | मोगॅम्बो

आणि एकदा नाही तर दोनदा ऐकला. कार्यक्रम लई ब्येस्ट वाटला.