अंगणात एकदा हत्ती आला
अंगणात एकदा हत्ती आला
पाठीवरती बस मला तो म्हणाला
ऐटीत बसलो पाठीवर त्याच्या
मग झाली माझी मज्जाच मज्जा
गल्लीतली मुले बघत राहीली खुप
सगळी दिसत होती ठेंगणी ठूस
ईकडून तिकडे फिर फिर फिरलो
इतका की कंटाळ्याने मी थकलो
तेव्हढ्यात काही माणसे आली
हत्तीला सर्कशीत घेवून गेली
- पाषाणभेद
१२/१०/२०११
प्रतिक्रिया
21 Oct 2011 - 9:51 pm | प्रकाश१११
पाषाणभेद -व ..वा
अंगणात एकदा हत्ती आला
पाठीवरती बस मला तो म्हणाला
ऐटीत बसलो पाठीवर त्याच्या
मग झाली माझी मज्जाच मज्जा
सुंदर सुरेख ...!!
21 Oct 2011 - 10:12 pm | आत्मशून्य
.
22 Oct 2011 - 1:43 am | शिल्पा ब
छान कविता आहे. आवडली.
22 Oct 2011 - 7:29 am | प्रचेतस
आवडली.
22 Oct 2011 - 9:19 am | मदनबाण
मस्त... :)
कोल्हापूरच्या रंकाळ्यावर अशीच एक हत्तीण होती त्याची आठवण आली,अंबाई टॅकच्या बाजुला तिच्यासाठी जागा होती.