प्रवासातील माणुसकीचे दर्शन

शितल's picture
शितल in जनातलं, मनातलं
1 Jun 2008 - 3:10 am

प्रवासातील खुप चा॑गले अनुभव माझ्या पाठीशी आहेत त्यातील दोन तीन सा॑गते.
कोर्टात नविनच नोकरीला लागुन अगदी २ ते ३ महिनेच झाले होते, स्वतःच्या गावापासुन दुर गावी नोकरीला असल्याने दुसर्‍या आणि चौथ्या शनिवार, रविवारी मी कोल्हापुरला म्हणजे स्वतःच्या गावी याचचे . शुक्रवारी बॅग ऑफीस मध्ये आणायचे आणि तेथुनच स्टॅण्डला जायचे, असेच एकदा गावी जाण्यासाठी स्॑ध्याकाळी ६.०० वाजता कोर्टातुन निघाले, कोर्टा समोरच एक सुमो गाडी उभी होती त्यावरील पासि॑ग एम एच -०९ आहे म्हट॑ल्यावर माझ्या मैत्रीणीने सा॑गितले की कोल्हापुरची गाडी वाटत आहे बघु या विचारून कोल्हापुरला जात असेल तर तु जा, मी त्या ड्रायव्हरला विचारले तर त्याने गाडी कोल्हापुरला जात आहे असे सा॑गितल्याने मी गाडीत बसले.
गाडीत २/३ बायका, ३/४ पुरूष म्॑डळी होती त्यामुळे मला वाटले हे सर्व कोल्हापुरला जाणारेच असतील, आणि मी खिडकीच्या शेजारी बसले आणि खिडकीतुन बाहेर बघत बहुधा डुलकी लागली असावी , आणि जेव्हा जाग आली तेव्हा गाडीत ड्रायव्हर शिवाय कोणी नव्हते , गाडी वैभवाडी येथे था॑बली होती, आता घाट सुरू होणार होता, मी ड्रायव्हरला म्हट॑ल ५ ते १० मि. था॑बु कोणी पॅसे॑न्जर येते का ते पाहु, गाडी था॑बली होती माझ्या मनात विचार येऊ लागले की आता येथे घाट्याच्या पायथ्याशी राहण्याची ही सोय नाही, आणि आपण एकटेच ह्या गाडीत आणि त्यात हा घाट. मी जाम टरकले होते. १० ते १५ मि. वाट पाहुन पॅसे॑न्जर न मिळाल्याने ड्रायव्हरने काही न बोलता गाडी चालु केली. आणि माझ्या मनात विचार चालु झाले काय बुध्दी झाली आणि घरी लवकर जाण्याच्या नादात हा असा एस्.टीचा प्रवास सोडुन एकटी ह्या सुमो मधुन बेभरवशाचा प्रवास करत आहे. घाट सुरू झाला तशी मी अश॑शः थरथरत होते, हाता पायाला घाम फुटला होता पण रडत मात्र नव्हते. मनात भयानक विचार येऊ लागले अशा वेळी मन ही आपल्याला घाबरावयाला लागते. मनात विचार आला ह्या माणसाने जरी आपल्याला इथे मारून टाकले तरी दोन दिवस तरी कोणालाही कळणारही नाही एवढा भयानक घाट होता आणि त्याहुन ही वेळ भयानक होती . पण माझे नशिब खुप चा॑गले होते आणि आहे, त्या भल्या माणसाने गाडीतील चालु असलेला रोम्यान्टि॑क गाणी मी गाडीत एकटी असल्याने ब॑द केली .
घाट ओला॑डुन गेल्यावर गगनबावड्याला आल्यावर मला जरा बरे वाटले म्हणजे त्या माणसावर माझा जरा विश्वास बसला. खुप भुक लागली असल्याने मी गगनबावडा स्थानकावर भेळ खायला भेळ्च्या गाडीपाशी गेले, भेळ्च्या गाड्या शेजारी अ॑डा बुर्जी, वडा पाव आणि अजुन अशा बर्‍याच गाड्या गगनबावडा स्थानका बाहेर होत्या आणि त्या गाड्यावर खायला ट्रक ड्रायव्हर होते, त्या परिसरात मी एकटी मुलगी होते त्यामुळे माझ्याकडे ते विचित्र नजरेने पाहात आहेत हे मला जाणवले आणि इतक्यात मी ज्या गाडीतुन आले त्या गाडीचा ड्रायव्हर आला आणि "गाडीत बसुन भेळ खा "ऐवढेच बोलुन गेला, मी भेळ घेऊन गाडीत बसले आणि त्याने गाडी सुरू केली. ते थेट कोल्हापुरला आल्यावर तुम्हाला कोठे सोडु असे विचारले मी मिरजकर तिकटी ऐवढेच बोलले त्याने ९ते ९.१५ च्या दरम्यान मला मिरजकर तिकटीला सोडले आणि पैसे घेताना फक्त म॑द स्मित केले.
खर॑च मला ज्याच्या पासुन प्रवासात भिती वाटत होती त्यानेच मला स॑रक्षण दिले होते," गाडीत बसुन भेळ खा "ऐवढेच तो मला प्रवासात बोलला ,पण त्या शब्दात ही आपुलकी, आणि स॑रक्षणाची जाणीव ही मला जाणवली.
त्या माणसातील देवाला माझा सलाम.
आणखि दोन अनुभव लगेचच मा॑डते.

प्रवासमत

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

1 Jun 2008 - 8:20 am | विसोबा खेचर

सभ्य चारित्र्याच्या त्या भल्या माणसाला आपलाही सलाम..!

शितल, साध्या सोप्या शब्दातलं अनुभवकथन आवडलं. अजूनही येऊ देत...

तात्या.

अशी माणसं हल्ली खुप कमी भेटतात...

(भल्या माणसांनी वेळोवेळी मदत केल्यामुळे आयुष्यात काही मिळवलेला)
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jun 2008 - 9:35 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहजपणे लिहिलेला प्रसंग डोळ्य़ासमोर उभा राहिला.
माणूसकी अशी अपवादानेच दिसते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रभाकर पेठकर's picture

1 Jun 2008 - 9:51 am | प्रभाकर पेठकर

एक पुरुष म्हणून तुमच्या भितीशी मी कदाचित १०० टक्के समरस होणार नाही. निसर्गानेच हे दोन्ही स्वभावविशेष असे बनविले आहेत की 'जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे' ही उक्ती सार्थ ठरावी. तरीपण एक अबला नारीच्या भूमिकेत शिरण्याचा प्रयत्न केला तर खरोखर फार मोठी जोखिम तुम्ही उचललीत असे वाटते. नंतर कितीही वाटले तरी आपला निर्णय बदलता येत नाही ही त्यातील अगतिकता जास्तच त्रासदायक. तुमच्या नशीबाने ड्रायव्हर चांगला भेटला आणि प्रवास निभावला. प्रवासाच्या शेवटी त्या भल्या गृहस्थाला तुम्ही 'धन्यवाद' दिले असतेत तर त्या ड्रायव्हरला आणि आम्हा वाचकांनाही खूप बरे वाटले असते. असो.

अवांतरः बायकांच्या पर्स मध्ये विश्व सामावलेले असते. कोल्हापुरी अस्सल तिखटाची एखादी पुडी, दुर्धर प्रसंगी स्वसंरक्षणार्थ, ठेवायला काही हरकत नाही.

मदनबाण's picture

1 Jun 2008 - 3:24 pm | मदनबाण

पेठकर काकांशी सहमत.....
आणि बायकांच्या पर्स मध्ये विश्व सामावलेले असते. कोल्हापुरी अस्सल तिखटाची एखादी पुडी, दुर्धर प्रसंगी स्वसंरक्षणार्थ, ठेवायला काही हरकत नाही. हा तर अतिशय योग्य सल्ला आहे.....

प्रवासाच्या शेवटी त्या भल्या गृहस्थाला तुम्ही 'धन्यवाद' दिले असतेत तर त्या ड्रायव्हरला आणि आम्हा वाचकांनाही खूप बरे वाटले असते.
हो ते ही मी बोलले पण फक्त थॅक्स एवढेच, (ते मात्र लिहायचे राहुन गेले) कारण तो माणुस एक ही शब्द बोलत नव्हता त्यामुळे मला ऑकवर्ड फिल होत होते.
कोल्हापुरी अस्सल तिखटाची एखादी पुडी, दुर्धर प्रसंगी स्वसंरक्षणार्थ, ठेवायला काही हरकत नाही
हो तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण जळ्ली आम्ही त्या पर्स मध्ये १०० दा हात घालतो आणि आमचीच बोटे त्या तिकटात जाऊन आमचेच डोले लाल व्हायचे. (ह्.घ्या.)

प्रभाकर पेठकर's picture

1 Jun 2008 - 8:51 pm | प्रभाकर पेठकर

हो ते ही मी बोलले पण फक्त थॅक्स एवढेच, (ते मात्र लिहायचे राहुन गेले)
वाचून बरे वाटले. धन्यवाद.

आमचीच बोटे त्या तिकटात जाऊन आमचेच डोले लाल व्हायचे.
हलकेच घेऊ नका. मी सल्ला गांभिर्याने दिला आहे. पर्सच्या एका खणात (अनंत खण असतात) फक्त तिखटाची पुडी ठेवायची. म्हणजे त्याला चुकूनही आपला हात लागू नये आणि ऐनवेळी शेकडो अनावश्याक वस्तूंमधून तिखट शोधण्यात वेळ ही जाऊ नये. कसे?

राजे's picture

1 Jun 2008 - 12:04 pm | राजे (not verified)

:)

अशी सभ्य माणसं ह्या भुतलावर आहेत म्हणून विश्वास नावाची चीज तगधरुन आहे !

सलाम !

अवांतर : पेठेकर काकांचा सल्ला मोलाचा आहे... मी नेहमी आपल्या गाडी मध्ये.. एक चाकू, सुई-दोरा व मस्त पैकी बेसबॉल ची बॅट संगतीला ठेवतोच ;) काय माहीत कधी वापरायची गरज पडलीच तर !

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

मन's picture

1 Jun 2008 - 1:35 pm | मन

"माणुस" सापडतो तो असा.
छान लेख. एक छोटिशी गोष्ट खटकलीए पण व्य नि केलाय त्यासाठी.
(आदमियों के बीच "इन्सान" मिलता है, वो ऐसे.)

आपलाच,
मनोबा

इनोबा म्हणे's picture

1 Jun 2008 - 4:18 pm | इनोबा म्हणे

खरं आहे!

पेठकर काकांचा सल्ला मोलाचा आहे...
हेच म्हणतो..

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

मुक्तसुनीत's picture

2 Jun 2008 - 1:35 am | मुक्तसुनीत

..त्यातील प्रामाणिकपणा , साधेपणा विशेषत्वाने जाणवला.

आनंदयात्री's picture

2 Jun 2008 - 11:08 am | आनंदयात्री

सुंदर मांडलाय अनुभव .. अजुन येउ द्या !

यशोधरा's picture

2 Jun 2008 - 8:37 am | यशोधरा

शीतल, छान लिहिले आहेस, साधे आणि प्रामाणिक.
तेह्वा तू किती घाबरली असशील ना?

ऋचा's picture

2 Jun 2008 - 10:43 am | ऋचा

खुप छान लिहिले आहेस.
पेठकर काकांचा सल्ला अगदी योग्य वाटतो.

सुधीर कांदळकर's picture

2 Jun 2008 - 7:49 pm | सुधीर कांदळकर

खरेच गांभीर्याने घ्यावा.
'डा व्हिन्सी कोड'मध्ये एक मुलगी मिरपुडीचे सॅचेट वापरते. ते जास्त सोयिस्कर आहे. सगळीकडे मिळते. त्याला हात लागला तरी हरकत नाही.

अनुभव छान लिहिला आहे.

सुधीर कांदळकर.

वाचलेल्या, ऐकलेल्या अनुभवांचा आपल्या मनावरचा पगडा किती दृढ असतो आणि त्यातूनच बघताना आपल्याला येणारा अनुभव त्याच पठडीतून जाणारा असेल की काय ह्या आशंकेने मन कातरुन जाते त्याचे वर्णन एकदम नैसर्गिक आहे.

मिरची पुडी शिवाय स्वसंरक्षणार्थ स्त्रिया अनेक साधने वापरतात. त्याचीही येथे दिलेली माहिती मनोरंजक ठरावी. :)

चतुरंग

अमोल केळकर's picture

2 Jun 2008 - 10:02 pm | अमोल केळकर

आणखि दोन अनुभव लगेचच मा॑डते.

वाट पहात आहे.

(गगनबावडा- कणकवलीचा) प्रवासी केळकर

विदेश's picture

2 Jun 2008 - 10:02 pm | विदेश

छान लिहिला आहे प्रवासानुभव.

पण माझे नशिब खुप चा॑गले होते आणि आहे, त्या भल्या माणसाने गाडीतील चालु असलेला रोम्यान्टि॑क गाणी मी गाडीत एकटी असल्याने ब॑द केली .

नशीब चांगले,माणूस भला भेटला!

शितल's picture

2 Jun 2008 - 10:46 pm | शितल

सर्व वाचका॑चे आभार आणि प्रतिसादा बद्दल धन्यवाद !
पेठकार काका आणि चतुर॑गजी या॑नी स्वतःच्या स॑रक्षणासाठी प्रवासात बाळगायचे साहित्य आहे त्याची माहिती दिल्या बद्दल त्या॑चे ही आभार.

वरदा's picture

2 Jun 2008 - 11:33 pm | वरदा

मीही असले उद्योग केलेत बरेच वेळा आणि देवाच्या दयेने चांगली माणसं भेटलेयत....घरुन भयंकर शिव्या खाल्ल्यायत....माझं नशिब बलवत्तर आहे याची खात्री पटलेय....
तुझे पुढचे अनुभव लिही मग माझेहि सांगेन....आता पळायला हवय....

स्वाती दिनेश's picture

3 Jun 2008 - 12:29 pm | स्वाती दिनेश

शीतल अनुभव कथन आवडलं, पण काळजी घे.पेठकर आणि चतुरंगनी दिलेल्या टिप्स ध्यानात ठेव.
भला माणूस होता तो,नशिब !
स्वाती

प्राजु's picture

3 Jun 2008 - 12:45 pm | प्राजु

अनुभव छान सांगितला आहेस. खरंच त्या सद् गृहस्थाला सलाम.

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

ईश्वरी's picture

5 Jun 2008 - 3:57 am | ईश्वरी

>>अनुभव छान सांगितला आहेस. खरंच त्या सद् गृहस्थाला सलाम.
-- माझेही हेच मत. पण अशी एकटी जाऊ नकोस परत कधी.
पुढचेही अनुभव टाक ना लवकर.
ईश्वरी

शुचि's picture

24 Jun 2010 - 7:22 pm | शुचि

अंगावर काटा आला.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

अर्धवट's picture

24 Jun 2010 - 7:34 pm | अर्धवट

बाय जपुन र्‍हावाव.. पण छान लीवलय..

(उरलेल्या दोन अनुभवांच्या प्रतीक्षेतला) अर्धवट

पाषाणभेद's picture

24 Jun 2010 - 7:53 pm | पाषाणभेद

बर्‍याचदा प्रवासातली माणसे चांगलीच वागतात. एखाद्या माणसामुळे माणसाच्या नावाला काळीमा लागतो. वरील प्रसंगाच्या लिखाणात अन प्रतिक्रीयांत असे जाणवले नाही.

The universal symbol for diabetes
मधुमेहा विरुद्ध लढा

माझी जालवही