(हा कोणत्या दिशेला आहे प्रयास अजुनी)

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
17 Oct 2011 - 7:57 pm

ग्रासस्टांझाज ने केलेली गजल आम्हाला आवडली त्यावर आमची ही दाद ;)

हलकेच मलम लावू, किति या बुडास अजुनी?
हा कोणत्या दिशेला आहे प्रयास अजुनी?

ही प्यांट फाटली अन्, तुटल्या जरी वहाणा
'क्षितिजा' दिसे बरी हा, भलताच ध्यास अजुनी?

'ज्योती' लगेच पटवू, ही वल्गना कशाला?
वणवा उठेल कानी, 'नियती'स आस अजुनी!

उद्दाम कन्यका या काका म्हणोत मजला
उत्स्फूर्त खोकल्याची लपवीत ढास अजुनी!

ही स्यांडले खुणेची नेती मला घराशी!
होतो मुशाफिरीचा 'रंग्या'स भास अजुनी!

(इतरत्र पूर्वचाचणीसिद्ध)

हास्यविडंबन

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

17 Oct 2011 - 8:00 pm | विनायक प्रभू

विडंबन खुपच आवडले.
काही ओळी क्रिप्टीक असल्यामुले खुपच आनंद जाहला.
जे आयला रंगा बिगाडला की काय?

:)
हे ही एक विडंबन काव्य म्हणुनच आवडले.

बाकी रंगाशेटने बरेच दिसांनी कळफळकावरील धुळ झटकलेली पाहुन बर वाटल. एकुण काय दिवाळी जवळ येउन ठेपली.

मेघवेडा's picture

17 Oct 2011 - 8:08 pm | मेघवेडा

मस्त मस्त मस्त हो रंगाबाबू!

पैसा's picture

17 Oct 2011 - 8:09 pm | पैसा

ही स्यांडले खुणेची नेती मला घराशी!
होतो मुशाफिरीचा 'रंग्या'स भास अजुनी!

=)) =)) =))

राजेश घासकडवी's picture

17 Oct 2011 - 8:19 pm | राजेश घासकडवी

दाद आवडली.

शॉलिट्ट्ट... :)

उद्दाम कन्यका या काका म्हणोत मजला
उत्स्फूर्त खोकल्याची लपवीत ढास अजुनी!

खी खी खी... ;)

आत्मशून्य's picture

17 Oct 2011 - 9:18 pm | आत्मशून्य

दाद फार मनापासून दिली वाटत. ;)

अत्रुप्त आत्मा's picture

17 Oct 2011 - 10:36 pm | अत्रुप्त आत्मा

'ज्योती' लगेच पटवू, ही वल्गना कशाला?
वणवा उठेल कानी, 'नियती'स आस अजुनी!.......................... :-)

उद्दाम कन्यका या काका म्हणोत मजला
उत्स्फूर्त खोकल्याची लपवीत ढास अजुनी! :-D ---^---

मूळ गझल आणि तीची दाद दोन्हीही भन्नाट

परिकथेतील राजकुमार's picture

18 Oct 2011 - 11:53 am | परिकथेतील राजकुमार

छानच विडंबन हो..

अंमळ "हे चित्र दक्षिणेचे, दररोज मीच पाही.." ची आठवण करुन दिली ह्या विडंबनाने ;)

अविनाशकुलकर्णी's picture

18 Oct 2011 - 12:07 pm | अविनाशकुलकर्णी

मूळ गझल आणि तीची दाद दोन्हीही भन्नाट