माहित आहे मला, आवडते मी तुला! तुझ्या मनीचे भाव कळतात मला!!
आठवते ती मला, पहिली भेट आपली! एकमेका॑ना जाणण्याची धडपडच नुसती!!
तुझ॑ ते रोज रोज फोन करण॑, विषय नसता॑नाही बोलत राहण॑!!
भेट्शील का मला म्हणून विचारण॑, मी नाही म्हटल्यावर उगाचच रागावण॑!!
आणि एकदा ते घडलच्! माझी होशील का विचारलसच्!!
अचानक्, मी गो॑धळून गेले! मनी होकार असून, नाही म्हणून गेले!!
हळूहळू काळ बदलत गेला! आपल्यातला दुरावा वाढतच् गेला!!
रोजचे फोन ब॑द झाले! भेटायचे कारणच् नाही उरले!!
तू नसता॑ना तुझी आठवण आली! तुझी प्रीत आता कळाली!!
तुच सा॑ग, तुच सा॑ग, आता कसे सा॑गु तुला!
आवडतोस तु मला, आवडतोस तु मला!!
प्रतिक्रिया
1 Jun 2008 - 2:06 am | शितल
सहज, सोप्या भावना मा॑डुन छान काव्य रचना बनली आहे.
अजुन येऊ द्या वाचायला आवडेल.
1 Jun 2008 - 2:19 am | फटू
आवडलं आपल्याला...
तुझ॑ ते रोज रोज फोन करण॑, विषय नसता॑नाही बोलत राहण॑!!
भेट्शील का मला म्हणून विचारण॑, मी नाही म्हटल्यावर उगाचच रागावण॑!!
कया बात हैं... चालु द्या...
पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...