जखमेस तेल मागू, कितिदा जगास अजुनी?
हा कोणत्या दिशेचा आहे प्रवास अजुनी?
हे शीड फाटले अन्, तुटले जरी सुकाणू
क्षितिजा तरी तुला का, माझाच ध्यास अजुनी?
ज्योती फुकून टाकू, ही वल्गना कशाला?
वणवा उठेल गगनी, नियतीस आस अजुनी!
उद्दाम शुष्क पर्णे झाकोळती मला का?
उत्स्फूर्त वादळांचे जपलेत श्वास अजुनी!
ही पाउले खुणेची नेती मला कुठेशी?
कुठल्या मुशाफिराचा रस्त्यास भास अजुनी
(इतरत्र पूर्वप्रकाशित)
प्रतिक्रिया
16 Oct 2011 - 8:04 pm | श्रावण मोडक
वा, वा... रचना उत्तम जमली आहे.
16 Oct 2011 - 8:11 pm | जयंत कुलकर्णी
G............R.............E...............A..............T.
फारच अर्थपूर्ण.
प्रत्येक मानवाला पडणारा आणि छळणारा हा प्रश्न... त्याचे उत्तर एकच..... आपण अश्वथामा नसल्यामुळे नशिबवान !
17 Oct 2011 - 10:59 pm | धनंजय
छान.
जखमेसाठी तेल मागत वणवण फिरणार्या अश्वत्थाम्याची कथा ऐकलेली आहे. त्या उपमेसारखी कवीची तडफड चालू आहे. पण अश्वत्थाम्यापेक्षा वेगळा असा हा कवी अजून आशा ठेवून आहे.
शैली लक्षणीय आहे. (काहीसे संस्कृतप्रचुर शब्द आणि "अजुनी" सारखा लडिवाळ-जुना शब्द एकत्र क्वचित दिसतात. ["अजुनी" बरोबर सामान्यपणे लडिवाळ-जुने-मराठमोळे शब्द असलेली शैली बघायची सवय आहे.] पण राजेश घासकडवी यांच्यासाठी ही शैली नैसर्गिक असू शकते.) पहिल्या कडव्यातली दुसरी ओळ, आणि त्यातील अंत्ययमक हे समस्यापूर्तीकरता कवीला कोणीतरी दिलेले आहे, असे खालील प्रतिसाद वाचून समजले. त्यामुळे अंत्ययमक - म्हणजे समस्या मांडणार्याच्या शैलीतला "अजुनी" शब्द - आणि उर्वरित समस्यापूर्तीतील कवीच्या शैलीतील उत्स्फूर्त शब्दप्रयोग यांच्यातली तफावत आता अधिक समजली.
छिद्रान्वेष : "हा प्रवास", "हे शीड", "ही वल्गना", "ही पाउले" ; या सर्व ठिकाणी सारखे सारखे निर्देशक "हा/ही/हे" इतकेसे आवडले नाहीत. सारखा-सारखा निर्देश भद्दा वाटतो आहे. आणि त्याहूनही वाईट म्हणजे वृत्तासाठी घेतलेला भरीचा शब्द वाटत आहे. आता हा भरीचा नसून प्रत्येक ठिकाणी शब्दशः निर्देश अर्थासाठी आवश्यक आहे, असे कोणी म्हणू शकतो. मी स्वतः असे म्हणून कविता समजून घ्यायचा प्रयत्न केला. परंतु प्रयत्न फसला.
16 Oct 2011 - 9:09 pm | मनिष
आवडली! :-)
16 Oct 2011 - 9:57 pm | शैलेन्द्र
"उद्दाम शुष्क पर्णे झाकोळती मला का?
उत्स्फूर्त वादळांचे जपलेत श्वास अजुनी!"
खुपच छान... फार आवडली..
16 Oct 2011 - 10:05 pm | प्रशांत
ही पाउले खुणेची नेती मला कुठेशी?
कुठल्या मुशाफिराचा रस्त्यास भास अजुनी
16 Oct 2011 - 10:17 pm | प्रकाश१११
खूप सुंदर ..!!
16 Oct 2011 - 10:30 pm | मन१
आठवी ते दहावीदरम्यान आरती प्रभू आणि बी ह्यांच्या चिंतनात्मक कविता ह्याच धाटणीच्या होत्या.
त्यांची आठवण झाली. एरव्ही कविता वाचन नसतच; पण ही वाचून मुद्दाम प्रतिक्रिया द्यावीशी वाटली.
गंमत म्हणजे मनोगतावरही फार फार वर्षांनंतर चक्कर टाकली मागच्या आठवड्यात तेव्हा शीर्षकाशी जशाला तशा जुळनार्या ओळी http://www.manogat.com/node/22431 इथे सापडल्या होत्या.
फक्त त्या कवितेतला भाव अगदिच वेगळा, आशावादी वाटतो. आणि ह्या कवितेतला मात्र काहिसा भ्रमित, विचारमग्न प्रकारचा.
(
ठेचाळलो तरी मी नाही उदास अजुनी
हा कोणत्या दिशेचा आहे प्रवास अजुनी
ह्या त्या ओळी ज्या शीर्षकाशी सही सही एकसारख्या दिसतात.
)
18 Oct 2011 - 12:48 pm | विजुभाऊ
मनराव
कविवर तुम्ही वांङ्मय चोरीचा आरोप करीत आहात.
शब्द कोशात तर सर्वच शब्द असतात. एखाद्या वाक्यात शब्दांचा क्रम जसाच्यातस्सा आला म्हणून शब्द चोरी होत नाही.
मला भूक लागली हे प्रत्येक मूल याच शब्दात व्यक्त करते म्हणून त्याच्यावर शब्द चोरीचा हीन आणि हिडीस आरोप करणे ही तौहीन होते. ;)
असो. सल्तनेतील रय्यतेला खविंदाना काही सांगायचे असल्यास परवानगी लागते.
फक्त खविंदांचा जै जै कार असो हेच शब्द उच्चारत्ता येतील
16 Oct 2011 - 10:29 pm | अत्रुप्त आत्मा
ही पाउले खुणेची नेती मला कुठेशी?
कुठल्या मुशाफिराचा रस्त्यास भास अजुनी........................ :-)
16 Oct 2011 - 10:30 pm | शिल्पा ब
मस्त कविता आहे. समजली अन आवडली.
16 Oct 2011 - 10:33 pm | आत्मशून्य
.
16 Oct 2011 - 11:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ही पाउले खुणेची नेती मला कुठेशी?
कुठल्या मुशाफिराचा रस्त्यास भास अजुनी
व्वा....!
-दिलीप बिरुटे
17 Oct 2011 - 1:55 am | सुहास झेले
वाह वाह... उत्तम रचना !!
17 Oct 2011 - 5:53 am | सन्जोप राव
उत्तम रचना.
मौनाचे पर्व सरले, किंचीत घाव भरले
स्मरते तरी अजूनी , होतो उदास अजुनी
17 Oct 2011 - 9:43 am | प्यारे१
>>>उद्दाम शुष्क पर्णे झाकोळती मला का?
उत्स्फूर्त वादळांचे जपलेत श्वास अजुनी! <<<
तो ये है आपकी जिंदादिली का राझ... ;)
17 Oct 2011 - 9:53 am | ऋषिकेश
वा! रचना आवडली!
17 Oct 2011 - 10:59 am | मिसळलेला काव्यप्रेमी
सुंदर रचना!! खुप आवडली.
17 Oct 2011 - 12:09 pm | अमोल केळकर
सुंदर रचना :)
अमोल केळकर
17 Oct 2011 - 12:17 pm | परिकथेतील राजकुमार
च्यायला कविता आहे होय !
मला वाटले बालकोडी किंवा झबल्याचे फटू आहेत.
17 Oct 2011 - 12:48 pm | बिपिन कार्यकर्ते
वा!
17 Oct 2011 - 1:06 pm | राघव
सगळेच शेर सुंदर! रचना खूप आवडली. :)
राघव
17 Oct 2011 - 1:32 pm | मेघवेडा
असेच म्हणतो.
मस्त रचना.
17 Oct 2011 - 7:23 pm | प्रभो
मस्त रचना.
17 Oct 2011 - 1:58 pm | वाहीदा
तुमच्या कवितेचे जे मूळ स्फूर्तीस्थान http://www.manogat.com/node/22431 आहे त्यांना तुम्ही श्रेय द्यायला किंवा त्यांचा नुसता उल्लेख तुम्ही करायला येथे काहीच हरकत नाही.. बरोबर ना ? पण ते तुम्ही टाळले :-(
आहे प्रवास अजुनी
ठेचाळलो तरी मी नाही उदास अजुनी
हा कोणत्या दिशेचा आहे प्रवास अजुनी
विसरून प्रेम पहिले जगणे मला न जमले
धोका दिला तरीही मज तू हवास अजुनी
वृध्दाश्रमात दिसले चैतन्य आपुलेपण
कोमेजल्या फुलांना आहे सुवास अजुनी
दसर्यास पारध्यांनी शस्त्रास पूजिले पण
आक्रोश सावजांचा नकळे कुणास अजुनी
विसरून सर्व जावे समजावले मला मी
पण काचतात धागे माझ्या जीवास अजुनी
क्षितिजास गाठण्याला उडतोय मी कधीचा
थकण्यास वेळ नाही माझ्या परास अजुनी
साठीत खूप ग़ज़ला श्रंगार काव्य लिहितो
मी मोजलेच नाही माझ्या वयास अजुनी
शोधात आपुल्यांच्या आयुष्य खर्च केले
दु:खी कुणी न माझ्या दिसले शवास अजुनी
परकाच वाटलो मी "निशिकांत" का जगाला?
जगणे तृणासवे ना जमले दवास अजुनी
-- निशिकांत देशपांडे
17 Oct 2011 - 3:18 pm | प्यारे१
>>>>साठीत खूप ग़ज़ला श्रंगार काव्य लिहितो
मी मोजलेच नाही माझ्या वयास अजुनी<<<<
विसरले असतील वयोमानानुसार :P
आपा,
समजून घ्या. ;)
17 Oct 2011 - 3:23 pm | परिकथेतील राजकुमार
गुर्जी हा कोणत्या दिशेचा आहे प्रवास ??
ज्या ठिकाणी व्यास, वाल्मिकी आणि कालिदासांच्या तोडीचे लेखक लिखाण करतात तिथे तुम्ही हे असे करावे.
दुर्दैव !!
17 Oct 2011 - 3:31 pm | मन१
मी वरच्या प्रतिसादात मनोगतावर अशीच एक कविता असल्याचा उल्लेख केलाय.
तुमच्या प्रतिसादाचे जे मूळ स्फूर्तीस्थान http://www.misalpav.com/node/19430#comment-346593 आहे त्यांना तुम्ही श्रेय द्यायला किंवा त्यांचा नुसता उल्लेख तुम्ही करायला येथे काहीच हरकत नाही.. बरोबर ना ? पण ते तुम्हीही ते टाळले. :(
17 Oct 2011 - 3:44 pm | वाहीदा
मनोबा, मी तुझा प्रवास पाहीला नाही रे ;-)
निशिकांत देशपांडे यांची कविता वाचली होती आधी म्हणून सरळ प्रतिसाद दिला
असो आता तुला ही श्रेय देते,
मनोबा अन माझ्या वाचनानुसार मुळ कवि निशिकांत देशपांडे यांना श्री, श्री घासकडवि यांनी श्रेय द्यायला हवे होते
17 Oct 2011 - 4:57 pm | सविता
You too, Brutus?
17 Oct 2011 - 5:33 pm | राजेश घासकडवी
'हा कोणत्या दिशेचा आहे प्रवास अजुनी' ही ओळ या दोन गझलांमध्ये सामायिक आहे. आणि त्याला कारण आहे. मायबोलीवर डॉ. कैलासराव गायकवाड हे तरहीसाठी ओळ सुचवतात. ती ओळ मतल्यामध्ये दुसरी ओळ येईल अशा पद्धतीने प्रत्येकाने स्वतंत्र गझल लिहायची असते. अनेक जण आपापल्या गझलांतून त्याच ओळीच्या वेगवेगळ्या भावांची अभिव्यक्ती करतात. 'हा कोणत्या दिशेचा' हे गूगलवर शोधल्यास अशी वेगवेगळी उदाहरणं सापडतात. प्राजुताईंनी देखील हीच ओळ घेऊन वेगळी, अतिशय छान गझल लिहिलेली आहे.
त्यामुळे यात कोणी कोणाला श्रेय देण्याघेण्याचा प्रश्नच येत नाही.
17 Oct 2011 - 5:51 pm | परिकथेतील राजकुमार
अशा प्रगल्भ संस्थळावर हा खुलासा पटण्याजोगा नाही.
वाल्याचा वाल्मिकी झाला, म्हणून तुम्हाला सूट मिळेल असे नाही. ह्या तुमच्या कृत्यामुळे सदर संस्थळावरील सन्माननीय सदस्यांना* आणि ते सन्माननीय सदस्य ज्यांच्या गुडबुकात आहेत अशा अधिकारी व्यक्तींना मानसीक त्रास झाल्याचे आम्हाला खेदाने नमूद करावेसे वाटत आहे.
*सन्माननीय सदस्यांची व्याख्या इतरत्र प्रकाशित.
17 Oct 2011 - 7:16 pm | राजेश घासकडवी
सन्माननीय सदस्य, अधिकारी व त्यांची गुडबुकं हा अत्यंत पवित्र मामला आहे. अशा गोष्टींची जाहीर चर्चा करून तुम्ही खोडसाळपणा करत आहात हे आमच्या लक्षात येत नाही का? याला खाजवून खरूज काढणे असं म्हटलं जातं. अशा चिखलफेकीच्या प्रयत्नाबद्दल तुम्हाला एखाद्या चतुष्पाद प्राण्याची उपमा द्यावी असं आमच्या मनात सारखं घोळत आहे.
जास्त वटवट केलीत तर प्रथम खोडी काढण्याबद्दल तुमच्यावर आठ दिवसांची बंदी घालून ती दहा दिवस राबवण्यात येईल, सांगून ठेवतो.
18 Oct 2011 - 11:03 am | परिकथेतील राजकुमार
तुम्ही यंदा हिरव्या देशात दिवाळी कार्यक्रमात 'आया आया बॉडीगार्ड' ह्या गाण्यावर नृत्य करणार आहात ह्याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही आम्हाला सतत दमात घ्यावे.
'खाजवून खरूज काढणे, चतुष्पाद प्राणी' असले असंसदीय शब्द अशा निर्मळ ठिकाणी टाईपताना तुमचा किबोर्ड फुटला कसा नाही ? ह्यापुढे तुम्ही योग्य ती काळजी घ्याल अशी अपेक्षा ठेवतो. अन्यथा तुम्हाला आमच्या गुडबुकात ठेवावे का नाही ह्याचा विचार करावा लागेल. तसेच तुमच्यासाठी ह्यापुढे आम्ही तुमच्या विरोधकांच्या खवत जौन त्यांना दमदाटी देखील करणार नाही ह्याची नोंद घ्यावी.
19 Oct 2011 - 5:13 pm | राजेश घासकडवी
या अशा गोष्टी तुम्हाला अनकंफर्टेबल करत असतील तर मिपा सोडून जा असंच म्हणेन. आणि काय हो, चतुष्पाद प्राणी म्हणणं असांसदीय का वाटतं? विष्णूचा दुसरा अवतार वराह होता. वराहाला जर तुम्ही गलिच्छ, ओंगळ समजत असाल तर तो विष्णूचा अपमान होईल आणि आमच्या भावना दुखावल्या जातील, सांगून ठेवतोय. गणपतीचं वाहन कुठचे!
आणि आम्हाला दमदाटी केलीत तर तुम्हाला ब्र देखील काढता येणार नाही अशी व्यवस्था करेन.
17 Oct 2011 - 5:56 pm | श्रावण मोडक
हे अपेक्षीत होते.
मन1 यांनी दोन्ही कवितांतील एक फरक नोंदवला होता, त्याकडे नीट पाहिले असते तरी आक्षेपकर्त्यांना घाईबाज मतप्रदर्शन करून नामुष्की पत्करावी लागली नसती. एक प्रयत्न तर फक्त स्कोअर सेटल करण्याचाच दिसला.
आता, कैलास गायकवाड यांच्या कल्पनेतली ओळ घेतल्याचे श्रेय का दिले नाही, असेही म्हटले जाईल. तो अगदी ज्याची त्याची समज, आकलन असा विषय असला तरीही, तसे झाल्याने फक्त अवांतर वाद असेच स्वरूप याला प्राप्त होईल.
या संस्थळाचे संपादक यासंदर्भात काही भूमिका बजावू शकतात.
पण राजेश, इथं परत तुम्ही गुगल करायला का सांगताय? असे गुगल करून, प्रक्रिया समजून न घेता, त्यातल्या प्रत्येक निकालावर श्रेयवाद सुरू व्हायचा ना... ;)
17 Oct 2011 - 6:06 pm | मेघवेडा
तंतोतंत. एवढे आणि एवढ्याशीच सहमत. तरही गझल बराच प्रसिद्ध प्रकार आहे. आणि छान जमलाय हो घासकडवी.
17 Oct 2011 - 6:19 pm | परिकथेतील राजकुमार
पण मुळात 'श्री. घासकडवी ह्यांचेच लिखाण हे अवांतर वाद वाढवण्यासाठी असते' असे आम्ही काही सन्माननीय सदस्यांनी बोललेले ऐकले आहे आणि लिहीलेले वाचले आहे.
अधिक उजेड सन्माननीय लोक पाडतीलच.
17 Oct 2011 - 6:41 pm | श्रावण मोडक
उजेड पडायचा तेव्हा पडो. तोवर आपण अंधारात चर्चा करू. कसे? कधी येऊ? ;)
20 Oct 2011 - 4:36 pm | बिपिन कार्यकर्ते
श्रावण यु टू? ;)
20 Oct 2011 - 7:12 pm | चतुरंग
अंधारात बसून "काही नोंदी... कशाबशाच" तर तुम्ही कोण हो विचारणारे? ;)
-रंगा
17 Oct 2011 - 6:37 pm | वाहीदा
आम्ही काहीही नामुष्की पत्करली नाही ..
खरेतर,
घासुंची बाजू सावरायला आलेला प्रतिसादही अपेक्षीतच नाही का ?
हेच जर सर्व सामान्य सदस्याकडून झाले असते तर ? अन संस्थाळावरील कायदे हे सर्वांना सारखेच असावे.
आम्ही लहान मान्य , प्रस्थापितांविरोधात कसे जाऊ शकतो नाही का?
असो ज्याची त्याची जाण समज आकलन ...
17 Oct 2011 - 7:10 pm | श्रावण मोडक
चांगलं आहे. नामुष्की पत्करली हे माझे मत आहे, ते तुम्ही केव्हाही निकालात काढू शकता.
त्यांची बाजू भक्कम आहे. ती सावरण्याची गरज नाही, इतके जे झाले ते स्वयंस्पष्ट आहे. तरीही तुमच्या या मताचा आदर करतो.
कायदे सारखेच आहेत, असे मला वाटते. संपादक आणि सल्लागार अधिक बोलतील. थोडे आत डोकावून पहा. कायदे कसे आहेत हे तर नीट लक्षात येईलच, आणखीही काही लक्षात येईल.
जरूर जा. पाठिंबा आहे. घाई करू नका. तसे केले तर ते लहान तोंडी मोठा घास ठरते.
आपल्या मतांचा आदर करतो.
एकूणच, व्यक्तीगणीक मतांचा आदर असल्याने येथेच थांबतो. वरकड टाकण्याची तुम्हाला संधी आहे.
17 Oct 2011 - 7:17 pm | सुहास..
घासुंची बाजू सावरायला आलेला प्रतिसादही अपेक्षीतच नाही का ? >>.
झोंबायचे तिथे झोंबले असे आडुन्-आडुन तर म्हणायचे तर नाही ना ;)
अजुन दोन चार राहिले आहेत प्रतिसादक :)
17 Oct 2011 - 2:02 pm | सुहास..
सेम हियर ! ;)
17 Oct 2011 - 7:00 pm | गणपा
एवढे चांगले काव्य रचले आहे त्याचा आस्वाद घ्यायचा सोडुन नसती भांडण कसली उकरुन काढता रे?
एक कविता म्हणुन आवडली. :)
17 Oct 2011 - 7:10 pm | विकास
एवढे चांगले काव्य रचले आहे त्याचा आस्वाद घ्यायचा सोडुन नसती भांडण कसली उकरुन काढता रे?
एक कविता म्हणुन आवडली.
गणपाभाऊंशी सहमत.
17 Oct 2011 - 7:12 pm | पैसा
या संभ्रमाला उत्तर म्हणून माधव जुलियन यांची एक जुनी कविता आठवली.
कायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला,
थांबला तो संपला|
धावत्याला शक्ति येई आणि रस्ता सापडे,
भ्रांत तुम्हा का पडे||
आपलं आयुष्य म्हणजे एक प्रवास, त्याचं शेवटंचं ठिकाण येईपर्यंत चालत रहाणं भाग आहे. तेव्हा, "चरैवेति, चरैवेति।"
17 Oct 2011 - 7:58 pm | चतुरंग
आमची दाद इथेही वाचता येईल! ;)
-रंगा
17 Oct 2011 - 8:04 pm | ढब्बू पैसा
रचना उत्तम. खालच्या ओळी खूपच आवडल्या.
जियो! :)
17 Oct 2011 - 8:41 pm | गणेशा
अप्रतिम
17 Oct 2011 - 8:41 pm | गणेशा
अप्रतिम
17 Oct 2011 - 8:52 pm | मुक्तसुनीत
घासकडवी यांनी खालील रचनांचे श्रेय द्यायला हवे आहे अशी मी मागणी करतो : तोवर या कवितेचा आस्वाद निर्मळ मनाने मला घेता येणार नाही असं मला खेदाने नमूद करावसं वाटतं.
"अजुनि या विजनातही ..." विंदा करंदीकर
"तरुण आहे रात्र अजुनि" - सुरेश भट
"अजुनि रुसून आहे" - अनिल
"बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात"
17 Oct 2011 - 8:59 pm | Nile
माझ्या नावातला नी वापरल्याचे श्रेय कधी मिळणार?
17 Oct 2011 - 9:04 pm | मुक्तसुनीत
नायल्या. तो दीर्घ नी आहे. दीर्घ "नी"च्या आसपास जाऊ नये याची मी काळजी घेतो. विशेषतः घासकडवींच्या संदर्भात हा विषय स्फोटक आहे.
17 Oct 2011 - 9:13 pm | राजेश घासकडवी
माझ्या कवितेत मी दीर्घ 'नी' वापरला आहे. तुम्ही दिलेल्या शब्दांमध्ये ऱ्हस्व 'नि' आहे. तेव्हा हा मुद्दा गैरलागू आहे. उगाच आक्षेप घेण्यापूर्वी विचार करु'नी' आक्षेप घ्यावा ही विनंती
17 Oct 2011 - 9:36 pm | मुक्तसुनीत
कृपया माझ्या उपरोक्त प्रतिसादातले सर्व "अजुनि" या शब्दाचे उल्लेख "अजूनी" असे वाचावेत.
थोडक्यात, प्रश्न र्हस्व किंवा दीर्घाचा नसून, येनकेनप्रकारेण तुमच्या काव्याच्या श्रेयापासून तुम्हाला बेदखल करावे असा माझा हेतू होता. या मागील भावना समजून घ्याव्यात. धन्यवाद.
18 Oct 2011 - 10:56 am | परिकथेतील राजकुमार
श्री. मुक्तसुनीत सर हे इतके दिवस मला सेन्सीबल वाटले होते.
पण..
असो...
18 Oct 2011 - 12:09 pm | सोत्रि
_/\__/\__/\_
:)
- (सेन्सीबल) सोकाजी
18 Oct 2011 - 5:07 pm | राजेश घासकडवी
त्यांची सेन्सिबिलिटी संपल्यामुळे ते आता "ब्र " काढण्याची देखील हिंमत करत नाहीत, असं तेच परवा सांगत होते.
18 Oct 2011 - 5:52 pm | परिकथेतील राजकुमार
बरोबर आहे त्याचे.
उद्या त्यांनी "ब्र" काढला रे काढला की लगेच तुम्ही "ब्र" ज्वलन करायला धावाल.
18 Oct 2011 - 6:58 pm | मुक्तसुनीत
माझी व्यक्तिगत मते कानामात्रेचाही फरक न करता इथे उधृत केली जात आहेत याबद्दल मी आभारी आहे.
19 Oct 2011 - 11:12 am | प्यारे१
>>>उद्या त्यांनी "ब्र" काढला रे काढला की लगेच तुम्ही "ब्र" ज्वलन करायला धावाल.
स्वतःच्या मुखावाटे काढतात की आणखी कसे? ;)
19 Oct 2011 - 12:19 pm | सुहास..
हा हा हा !
19 Oct 2011 - 8:02 pm | राजेश घासकडवी
त्यांनी स्वतःच्या मुखावाटेच काढलं. इतर कुठून कुठून काढण्याचा अनुभव तुम्हाला असेल तर सांगा, म्हणजे माहितीची देवाणघेवाण होईल.
19 Oct 2011 - 8:58 pm | आत्मशून्य
:)
19 Oct 2011 - 8:55 pm | मुक्तसुनीत
स्वतःच्या मुखावाटे काढतात की आणखी कसे? Wink
प्रश्न माझ्या संदर्भात आहे म्हणून याचा विचार करणे क्रमप्राप्त आहे. माझ्या अल्पमतीला प्रश्न नीटसा कळला नाही. प्रश्नानंतरची स्मायली आणि त्यावर आलेला हास्यवाचक प्रतिसाद त्या प्रश्नात काहीतरी गूढ व्यंगात्मक अर्थ आहे असं सुचवीत आहेत. परंतु अशी गूढलिखिते आम्हांस कशी कळावी. असो.
20 Oct 2011 - 4:42 pm | बिपिन कार्यकर्ते
<कोकणी अॅक्सेंट> अँ! किंतें रें!! आंकांशींचीं अंधोंरेंखिंतें वांचंणांरें तुंम्हीं, यंवंडीं सांधीं गूंढंलिंखिंतें वांचंतां यें नां तुंमांसं?
20 Oct 2011 - 6:20 pm | परिकथेतील राजकुमार
< /कोकणी अॅक्सेंट >
टॅग बंद करायला आलो होतो.
बाकी तुमची काढ घाल चालू द्या.
18 Oct 2011 - 12:57 pm | विजुभाऊ
कवितेचे लेखक ( की कवि ? कवि हे नाव पुण्यात कर्वे पथावर कुठल्याशा प्राध्यापक महोदयांचे भेटण्याचे ठिकाण आहे असे ऐकिवात आहे.) हे भौतिक शास्त्राचे तज्ञ आहेत.
सेन्सीबल हे कोणत्या प्रकारचे बल आहे याचा खुलासा इथले पराकोटीचे जाणकार करतील का?
सेन्सिबल हे बल न्युटन च्या कोणत्या नियमात बसते. तसेच या बलाला मोजण्यासाठी कोणते एकक उपयोगात आणतात.