कोजागिरी पौर्णिमा

भक्ति's picture
भक्ति in जनातलं, मनातलं
14 Oct 2011 - 3:20 pm

"को जागर्ति ... को जागर्ति ??" असे विचारत येणाऱ्या लक्ष्मीची पाऊले हलकेच आभाळभर रेखून जातात चांदण्यांची नक्षी... अन काळोख भरल्या मनाला एक नवीन उमेद ... नव्या स्वप्नाची.. नव्या दिवसाची ..नव्या वर्षाच्या समृद्ध भविष्याची ... लक्ष्मीची चंचल पाऊले ऐकायला जागे राहणाऱ्या आशादायी मनुजाची ...

कोजागिरी पौर्णिमा ...
पूर्ण चंद्राचे कौतुक आणि उत्सव चांदण्यांचा ...
मोत्यासारख्या लख्ख प्रकाशात न्हायलेल्या रातीचा...
कुटुंबीय, आप्त अन मित्रांसोबत हसत खेळत गप्पा मारत केलेल्या जागरणाचा ...
शुभ्र चांदण्यात चंद्राला दाखवलेल्या दुधाच्या नैवेद्याचा ..
आणि सगळ्यांसोबत घालवलेल्या या तास दोन तासाच्या मैफिलीचा ....
सोबत सुरेल आठवणीतल्या कवितांची ... भेंड्या लाऊन म्हटलेल्या चांदण्या रात्रीच्या गाण्यांची ..
पेटी वरल्या एखाद्या सुरावटीची अन ... उत्स्फूर्त अश्या टाळ्यांची सुद्धा...

....

पण.. अशी ही पहिलीच कोजागिरी नाही का...
दूर... एकांतात... आपल्या माणसांपासून दूर वेगळ्याच शहरात ...
आपल्याच आभाळात फुलून आलेल्या या पूर्ण चंद्राचे ..शरद पौर्णिमेचे कौतुक फक्त मनातल्या मनात...
आभाळ तेच... चांदणे तेच... चंद्र ही तोच... अन पौर्णिमा ही तीच..
पण घर... आपली गच्ची... आपली माणसे... अन कोजागिरीचा सोहळा ... हे सगळेच दूर...
फोन वर शुभेच्छा देता घेताना... वरकरणी हसून एखादा smily वाक्यात पेरताना ... स्वत:ला समजावणीचा सूर स्वत:चाच...
पण अंतर्यामी कोजागिरीची साद का अपूर्ण... का मनातल्या भावनांचे सावट या शुभ्र चांदण्यावर ही पडलेले..

हम तो है परदेस मे ...देस मे निकला होगा चांद...
अपने रात की छत पर कितना तनहा होगा चांद... !!!

शब्दसुरांच्या चांदण्याची अशी बरसात करून..कालच काळाच्या पुढे निघून गेलेले जगजीतजी यांची आठवण आल्याशिवाय ही रात्र सरत नाहीये.. गीत - गझलांची ही कोजागिरी मात्र पुढच्या कित्येक पिढ्यांवर अशीच बरसत राहील हे नक्की..
जगजीतजी...तुम्हाला चांदण्यांचीच श्रद्धांजली !!!

- भक्ती आजगावकर
http://swarnim-sakhi.blogspot.com/2011/10/blog-post.html

मुक्तकआस्वाद

प्रतिक्रिया

अविनाशकुलकर्णी's picture

14 Oct 2011 - 3:31 pm | अविनाशकुलकर्णी

मुक्तक छान आहे ....

देर से आये
मगर दुरुस्त आये..

जागु's picture

14 Oct 2011 - 3:39 pm | जागु

शब्दांनी गुंफलेली श्रद्धांजली.

निवेदिता-ताई's picture

14 Oct 2011 - 4:28 pm | निवेदिता-ताई

असेच म्हणते...

अविनाशकुलकर्णी's picture

14 Oct 2011 - 3:45 pm | अविनाशकुलकर्णी

श्रद्धांजली......
अवघड आहे

शुचि's picture

14 Oct 2011 - 6:46 pm | शुचि

मुक्तक आवडले.

स्वतन्त्र's picture

14 Oct 2011 - 8:36 pm | स्वतन्त्र

आपल्या माणसांची आठवण झाली.

मन१'s picture

14 Oct 2011 - 9:39 pm | मन१

चांदण्यात ह्या कोजागिरिच्या जालावर भिजलो मी.
मुक्तकदुग्धाच्या धारेत... थिजलो मी.
.
.
.
.
थोडक्यात...
मुक्तक आवडले.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

14 Oct 2011 - 10:44 pm | निनाद मुक्काम प...

भक्ती
अगदी खरे
कोजागिरी आणी गच्चीवरील मैफेल ( मुंबईतील माफक थंडी )
जुन्या आठवणी झाल्या .मुक्तक आवडले..

भक्ति's picture

15 Oct 2011 - 2:04 pm | भक्ति

धन्यवाद!!

do take time to explore blog. :)