प्रियेच्या भेटी

पुष्कराज's picture
पुष्कराज in जे न देखे रवी...
31 May 2008 - 7:13 pm

प्रियेच्या भेटी चांद्ण्या उन्हात
प्रेमाचे घरटे काटेरी वनात

कट्यांनासुद्धा गुलाबाची सय
वेडाची ओढ वेडच वय

तारका हाती जागल्या राती
वारयाचा आलाप भैरवी गाती

दूर किनारी पहाट उभी
खेळूदे चांद्ण निवांत नभी

कविताआस्वाद

प्रतिक्रिया

मन's picture

31 May 2008 - 8:19 pm | मन

मस्तच!
आवडलं बुवा आपल्याला.

आपलाच,
मनोबा

विसोबा खेचर's picture

1 Jun 2008 - 12:00 am | विसोबा खेचर

दूर किनारी पहाट उभी
खेळूदे चांद्ण निवांत नभी

वा छान!

फटू's picture

1 Jun 2008 - 12:19 am | फटू

दूर किनारी पहाट उभी
खेळूदे चांद्ण निवांत नभी

आपण तर अगदी पंखा झालो आहोत तुमचा... अजुन येवुद्यात...

पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...