सोडुनी गेलास जिथे....

शा॑तेच कारट's picture
शा॑तेच कारट in जे न देखे रवी...
31 May 2008 - 4:08 pm

सोडुनी गेलास जिथे..मी तिथेच आहे अजुनी!
परतीचा मार्ग न दिसे तुला.. हे कळत नसे मज अजुनी!!

मी वेडी पाहते तुला.. जागे असुनी स्वप्नी!
शब्दहि ना पोह्चे तिथे..तु जवळ उभा दिसुनी!!

जाणते व्यथा मी तुझी रे..मज जाणुन घे तुही!
एकच प्रश्न उरी जाहला..एकच प्रश्न उरी जाहला...
तु सोडुनी गेलास जिथे ..मी तिथेच उभी का अजुनी??

कविताअनुभव

प्रतिक्रिया

चेतन's picture

31 May 2008 - 5:16 pm | चेतन

मस्त जमलयं

पुढिल लेखनास शुभेच्छा

अजुन उभाच चेतन

शा॑तेच कारट's picture

1 Jun 2008 - 1:19 am | शा॑तेच कारट

धन्यवाद!!
अजून नक्की प्रयत्न करेन!!

विसोबा खेचर's picture

31 May 2008 - 6:42 pm | विसोबा खेचर

मिपावर मनापासून स्वागत!

येऊ द्या अजूनही...

तात्या.

फटू's picture

31 May 2008 - 8:44 pm | फटू

सोडुनी गेलास जिथे..मी तिथेच आहे अजुनी!
परतीचा मार्ग न दिसे तुला.. हे कळत नसे मज अजुनी!!

खुप छान लिहीलं आहे... पुढ्च्या काव्याची वाट पाह्तोय...

पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

शा॑तेच कारट's picture

1 Jun 2008 - 1:21 am | शा॑तेच कारट

धन्यवाद!!
अजून नक्की प्रयत्न करेन!!

शितल's picture

1 Jun 2008 - 1:47 am | शितल

छान काव्य रचना, अजुन लिहा वाचायला आवडेल.

मन's picture

1 Jun 2008 - 1:55 am | मन

मस्त कविता.
त्यातही
तु सोडुनी गेलास जिथे ..मी तिथेच उभी का अजुनी??
हे सर्वात मस्त.

आपलाच,
मनोबा