मनाच्या खोल गाभार्‍यात

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
29 Sep 2011 - 11:02 am

मनाच्या खोल गाभार्‍यात
गर्भरेशमी भरजरी वातींच्या
सुवर्णदिपांची एक माळ जळतेय
.
त्या चांद्ररुपेरी प्रकाशाची धग देहाच्या
सर्व गात्रातून गरगरतेय
.
काही तुझ्यातील माझ्या स्मरणांच्या अन् काही
माझ्यातील तुझ्या स्मरणांच्या या वाती
.
.
या धगधगणार्‍या वातींवर
निळ्या सुरमयी वार्‍याचा सणसणता आघात
.
विद्ध मनाच्या दग्ध उंबरठ्यावर
एक अवघडलेला पाऊस उरलाय
.
सरता सरता ह्या पावसाने
फक्त दोन वाती जळत्या ठेवल्यात
.
.
जळता जळता जाळणा-या
जाळता जाळता जळणा-या
.
मनाच्या खोल गाभा-यात
खोल खोल खूप आत
दिपांची तमा न बाळगता
तमाशी झगडणार्‍या
ओंजळभर तेलाची लाज राखण्यास
.
मनाच्या खोल गाभा-यात
गर्भरेशमी भरजरी या वाती

|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(२९/०९/२०११)

करुणकवितामुक्तक

प्रतिक्रिया

कवितानागेश's picture

29 Sep 2011 - 11:52 am | कवितानागेश

एक शंका: भर'जरी' वाती जळतात का?

- विज्ञाननिष्ठ माउ ;)

माउ, अगं त्या आठवणींच्या वाती आहेत. अन आठवणीही काही साध्यासुध्या नाहीत! त्या आहेत गर्भरेशमी.. भरजरी...
आता कवी केवळ मराठी आहे म्हणून कापसाच्या का वाती अपेक्षीत आहे तुला? अगं गेले ते दिवस, माझीया प्रियेचे घर म्हणजे एक झोपडे म्हणाण्याच्या कल्पनादारीद्राची.

विश्वेश's picture

2 Oct 2011 - 12:00 am | विश्वेश

विद्ध मनाच्या दग्ध उंबरठ्यावर
एक अवघडलेला पाऊस उरलाय

मस्त !

प्रकाश१११'s picture

3 Oct 2011 - 12:17 am | प्रकाश१११

सरता सरता ह्या पावसाने
फक्त दोन वाती जळत्या ठेवल्यात
.जळता जळता जाळणा-या
जाळता जाळता जळणा-या
.सुरेख..!! आवडली..!!

मदनबाण's picture

3 Oct 2011 - 11:15 am | मदनबाण

छान... :)