आसपास

सन्जोप राव's picture
सन्जोप राव in जे न देखे रवी...
29 May 2008 - 10:12 pm

उघडा खिडक्या, तोडा बेड्या, गर्जुनि शिणले काही
अबोल सत्ता क्रांतीलाही तेंव्हा बधली नाही
पान वेगळे मांडुनि बसता प्यादे घोडे हसले
करु पाहिले दैवत आणिक तर्कट होऊन बसले

गंजकुर्‍हाडी बोलु लागल्या बाह्या सरसावोनी
शुष्कपुष्पही मधेच फुलले सुकता सुकता सुकुनी
पाठ खाजवुनी एकमेकाची तळवे सुजुनी बसले
करु पाहिले दैवत आणिक तर्कट होऊन बसले

जरा चांदोबा, पुल जरासे, ऐसी सजली स्वप्ने
भाषेचे जणु मढे सजवुनी लावा त्याला उटणे
अक्षरशत्रू बनुनी जेंव्हा काव्यगुरु नाचले
करु पाहिले दैवत आणिक तर्कट होऊन बसले

गुलाल फेका, भले बहाद्दर, जिंकलास तू गड्या
जुळले अपुले सूर, पिपाण्या ताशे अन चौघड्या
दुज्या सुरांचे, हाणा त्याला, कोण मध्ये हे घुसले
करु पाहिले दैवत आणिक तर्कट होऊन बसले

जीवन म्हणजे ऐसे तैसे, असे जगावे, तसे जगावे
पूर्वस्मृतींचे काढुनि गहिवर, मी , माझे अन मला म्हणावे
बघता बघता कट्टे सगळे गुत्ते होऊन बसले
करु पाहिले दैवत आणिक तर्कट होऊन बसले

वावरप्रकटन

प्रतिक्रिया

आजानुकर्ण's picture

29 May 2008 - 10:19 pm | आजानुकर्ण

अप्रतिम कविता! सुरेख :)

आपला,
(आनंदित) आजानुकर्ण

बेसनलाडू's picture

30 May 2008 - 1:52 am | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

पूर्वस्मृतींचे काढुनि गहिवर, मी , माझे अन मला म्हणावे
बघता बघता कट्टे सगळे गुत्ते होऊन बसले
करु पाहिले दैवत आणिक तर्कट होऊन बसले

पाठ खाजवुनी एकमेकाची तळवे सुजुनी बसले

भाषेचे जणु मढे सजवुनी लावा त्याला उटणे

या ओळी विशेष भिडल्या.

(हलकट!)बेसनलाडू

कोलबेर's picture

29 May 2008 - 11:16 pm | कोलबेर

रावसाहेब भावना पोहचल्या. तुमच्यातल्या प्रतिभेला तर आम्ही मानतोच त्याची वेगळी दखल घ्यायची गरज नाही.
बर्‍यापैकी सहमतपण आहे. पण इथुन आमचं मन उडून मनोगतावर बसणे मात्र अशक्य आहे ही वस्तुस्थीती आहे. तुम्हाला हे कसंकाय जमतं ते कळत नाही.
असो..

धनंजय's picture

29 May 2008 - 11:34 pm | धनंजय

छानच आहे.

वेगवेगळ्या संकेतस्थळांमधले हेवेदावे मी लक्षपूर्वक अभ्यासलेले नाहीत. पण १००-२०० लोकसंख्येच्या या विश्वात कधी भाऊबंदकी आणि कधी उष्ट्रखरभाव दिसून आलेत, तर फार आश्चर्य वाटू नये. आमच्या कुटुंबातही हे होतेच.

विसोबा खेचर's picture

30 May 2008 - 12:00 am | विसोबा खेचर

वा! कविता छान आहे!

तात्या.

अवांतर -

पट्टे मालकांचे ग़ळ्यात बांधूनी श्वान काही बेचैन झाले
कुणी न विचारी स्वामींच्या दारी, हिंडती इतस्तत: बिचारे!

आले होते नव्या घरी, सहन न झाला मिसळझणझणाट परि
परतुनी गेले मन उडुनी, पुन्हा जुन्या मालकापाशी

शुद्धिचिकित्सकाचा सात्विक पाव तो, नकोसा आता वाटे
मारामार प्रतिसादांच्या हड्डीची, शब्दकोड्यांची मौज न वाटे!

आले पुन्हा परतुनी ते, मिसळ खावया नव्याने
काय भरवसा द्यावा यांचा, असावे सोडिले पुन्हा मालकाने! :)

रावसाहेबांचे काव्य वाचून आम्हालाही वरील दोन ओळी सुचल्या त्या इथे द्याव्यश्या वाटल्या. स्वतंत्रपणे कविता लिहून मिपावर टाकण्याइतपत मोठे कवी आम्ही नाही. दोनच ओळी सुचल्या म्हणून त्या इथे दिल्या! :)

असो, चांगल्या काव्याबद्दल रावसाहेबांचं पुन्हा एकदा अभिनंदन..!

आपला,
(किंचित कवी) तात्या.

कोलबेर's picture

30 May 2008 - 3:48 am | कोलबेर

मारामार प्रतिसादांच्या हड्डीची,

तात्या, हे नक्की कुणाला उद्देशुन?

४०-५० प्रतिसाद काढणे हातचा मळ आहे...अमक्या अमक्या संस्थळावर ४-५ प्रतिसाद आले आमच्या इकडे मात्र ४० प्रतिसाद आले.. कौल लावुन पहा किती प्रतिसादांनी आम्हाला वा!वा! म्हंटले..प्रतिसादांच राजकारण शिकवीन तुला कधीतरी...
असली विधाने रावसाहेबांनी केलेली तरी पहाण्यात नाही.

म्हणजे ह्या ओळींचा रोख आणखी कुणावर आहे.. कुणावर बरे??

(प्रश्नांकित) कोलबेर

सन्जोप राव's picture

30 May 2008 - 6:42 am | सन्जोप राव

ओळी चांगल्या आणि अर्थपूर्ण आहेत. वृत्तात वगैरे बसत नाहीत, पण 'अर्थ महत्वाचा, भाषा दुय्यम' या वटहुकुमानुसारच चालले आहे. अधिक प्रयत्न करत रहा, कधीतरी जमेल.
अवांतरः 'इनो' चा खप अचानक वाढला अशी बातमी आहे.
सन्जोप राव

मुक्तसुनीत's picture

30 May 2008 - 2:19 am | मुक्तसुनीत

प्रस्तुत कवितेमधल्या काव्यगुणाची वगैरे चर्चा फजूल आहे हे वेगळे सांगायला नकोच. आपल्या संस्थळावर केलेले हे एक विधान आहे. कवितेचा विषय जिव्हाळ्याचा आहे त्यामुळे प्रतिक्रिया दिल्याशिवाय रहावत नाही. महत्वाच्या विषयावर बोलावेसे वाटले तर आपल्या भीड , भिती या गोष्टींवर मात करून बोलणे केव्हाही श्रेयस्कर ; या भूमिकेतून लिहीत आहे.

कवितेमधे निश्चित वक्रोक्ती आहे आणि लेट्स् फेस इट् , ती वर्मावर प्रहार करणारी आहे. कुणाही मिपाकराला वाचताना वेदना होतील त्या मलाही झाल्याच. शेवटी आपल्याला प्रिय वाटणार्‍या गोष्टीवरची टीका कुणाला सहन होणार आहे ?

पण मला हेही जाणवले की, संजोपरावांना जर या आपल्या संस्थळाबद्दल कळकळ वाटत नसती तर त्यांनी ही कविता इथे टाकली असती काय ? ज्या गोष्टी चुकीच्या दिशेने चालल्या आहेत असे एखाद्याला वाटते तेव्हा त्यांच्याबद्दल बोलणे तेव्हाच होते जेव्हा ती गोष्ट सुधारावी असे वाटते ! संजोपरावांनी अंगिकारलेल्या मार्गाबद्दल त्यांची मानगूट एकवेळ धरता येईल ; पण त्यांच्या हेतूंबद्दल शंका घेणे चुकीचे होईल.

कवितेमधे काही गंभीर वाटतील अशा गोष्टी निर्देशित केल्या गेल्या आहेत. आणीबाणीच्या वातावरणामधे त्यांच्याबद्दल चर्चा करणे अशक्य आहे; पण त्यांचा विचार व्हावा असे, एक हितचिंतक म्हणून कळकळीने सांगावेसे वाटते.

कोलबेर's picture

30 May 2008 - 3:42 am | कोलबेर

उत्कृष्ट प्रतिसाद. वरच्या जवळपास सगळ्याच मुद्द्यांशी सहमत.

आजानुकर्ण's picture

30 May 2008 - 1:20 pm | आजानुकर्ण

कोलबेरशेठ आणि मुक्तसुनीत यांच्याशी सहमत

आपला,
(सहमत) आजानुकर्ण

फटू's picture

30 May 2008 - 7:08 am | फटू

राव साहेबांना मिपा बद्दल आपुलकी नसती तर त्यानी ही कविता मिपा वर टाकलीच नसती....

बाकी कविता खूपच छान आहे....

पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

विसोबा खेचर's picture

30 May 2008 - 7:09 am | विसोबा खेचर

ज्या गोष्टी चुकीच्या दिशेने चालल्या आहेत असे एखाद्याला वाटते तेव्हा त्यांच्याबद्दल बोलणे तेव्हाच होते जेव्हा ती गोष्ट सुधारावी असे वाटते !

कवितेमधे काही गंभीर वाटतील अशा गोष्टी निर्देशित केल्या गेल्या आहेत. आणीबाणीच्या वातावरणामधे त्यांच्याबद्दल चर्चा करणे अशक्य आहे; पण त्यांचा विचार व्हावा असे, एक हितचिंतक म्हणून कळकळीने सांगावेसे वाटते.

आणिबाणीच्या वातावरणात चर्चा करणे अशक्य असले तरी आम्हाला व्य नि पाठवून कळवणे तर आपल्याला शक्य आहे ना? (नाही, म्हणजे मिपाची इतकी काळजी असेल तर!)

मुक्तराव, काय बरं मारे असं गंभीर चाललं आहे मिपावर ते आम्हाला तरी कळू द्या! :)

आम्ही आमचे पोटापाण्याचे उद्योगधंदे सांभाळून आमच्याकडून जितक्या चांगल्या रितीने मिपा चालवता येईल तितक्या चांगल्या रितीने ते चालवत आहोतच. यापेक्षा अधिक काही करणं आम्हाला शक्य नाही. पुढे मर्जी नियतीची! मिपाचं जे काय व्हायचं असेल ते होईल! मिपाच्या यशापयाशाचं खापर माथी मिरवायला हा तात्या समर्थ आहे!

तात्या.

अरुण मनोहर's picture

30 May 2008 - 7:42 am | अरुण मनोहर

तात्यांना आमचा पूर्ण पाठींबा.
मिसळपाव चटकदार बनवण्यात तात्यांचा "संजीव कपूर"चा हाथभार आहे.
ज्यांना दहीभात भेंड्याची भाजी नेहमी खायला आवडते आणि मिरचीचे खाणे पचत नाही, त्यांनी दुसर्‍्या हटेलात जावे की. आम्ही पण सटी सामाशी सात्वीक खायला जातोच.
---> खवय्या.

पिवळा डांबिस's picture

30 May 2008 - 8:33 am | पिवळा डांबिस

महत्वाच्या विषयावर बोलावेसे वाटले तर आपल्या भीड , भिती या गोष्टींवर मात करून बोलणे केव्हाही श्रेयस्कर
मुक्तसुनीतजी, आजवर या वादापासून आम्ही अलिप्त राहिलो होतो. पण आता तुम्हीच आवाहन केलंय म्हणून स्पष्टच बोलतो.....
आम्हाला नमोगत आणि मिपा यावरच्या वादात काहीही इन्टरेस्ट नाही. आय जस्ट डोन्ट गिव्ह अ डॅम!!
आम्ही मिपाचे आहोत आणि इथून हाकलल्यापर्यंत मिपाचे राहू....

जर या आपल्या संस्थळाबद्दल कळकळ वाटत नसती तर त्यांनी ही कविता इथे टाकली असती काय ?...हेतूंबद्दल शंका घेणे चुकीचे होईल.
आर यू किडिंग मी? तुम्ही आम्हाला काय मूर्ख समजता की आंधळे?
प्रस्तुत लेखकाचा "ईनो" बद्द्लचा प्रतिसाद वाचा. तो विधायक आहे असे वाटते तुम्हांला? हा अपवाद आहे असे तुम्ही म्हणाल. पण आम्ही अजुनही "वारा सरणे..हिमवादळे" वगैरे विसरलेलो नाही. या आय्.डी. धारकाची मिपावरची जर "वाटचाल" पाहिली तर नुसता सभासद म्हणून वावरणे ही भूमिका दिसत नाही. त्यात काहीतरी व्हेस्टेड इंटरेस्ट वा पर्सनल अजेंडा असल्यासारखा स्पष्ट दिसतो...
मी या आयडी धारकाची मिपावरची सर्व वाटचाल मुद्दाम अभ्यासली. सगळे मिपाकर प्रत्येक धाग्यावर प्रतिक्रिया देत नाहीत याचा अर्थ ते सगळे धागे वाचत नाहीत असे नव्हे!....

ते मरू दे, पण मला एक गोष्ट कळत नाही की प्रस्तुत आयडी धारक सगळीकडे मतांच्या पिंका टाकीत जातात. आमची त्याविषयी काहीच तक्रार नाही कारण मिपावर प्रत्येकाला पिंक टाकण्याचा अधिकार आहे हे आम्ही मानतो. पण आम्हांला असे आढळले आहे की त्यांनी पिंक टाकली रे टाकली की तुम्ही सारवासारवीचे तस्त घेऊन धावता की त्यांची पिंक किती विधायक आहे हे सांगण्यासाठी! हा काय चमत्कार आहे? इथेच नाही तर तुम्ही अन्यत्र ही तसे केले आहे. आम्हाला हे गौडबंगाल उलगडत नाही. हे एकाच माणसाचे दोन आय डी आहेत काय? नसतील तर तुमचे काय लागेबांधे आहेत हो ते एकदा स्वच्छ सांगून टाका म्हणजे "त्यांच्या" प्रतिक्रियेनंतर ती विधायक कशी आहे ते समजावणार्‍या "तुमच्या" प्रतिक्रियेची आम्ही प्रतिक्षा करू.....

आमची प्रस्तुत मूळ लेखकांविषयी काही तक्रार नाही. कारण एकदा व्हेस्टेड इन्टरेस्ट आहेत हे कळल्यानंतर वाद घालण्यात काहीच अर्थ नाही. पण तुमच्या मतांना आम्ही किंमत देतो (त्यांच्या नाही!), तेंव्हा तुम्हीच आम्हाला सांगा आम्ही वर जे म्हटले त्यात काही चूक आहे काय?

असा हा प्रतिसाद दिल्याबद्द्ल सरपंच बहुतेक आमचे सभासदत्व रद्द करतील. पण पर्वा नाही, जिथे मनातले स्पष्ट पणे बोलता येत नाही तिथे राहूनतरी काय उपयोग?

आपलाच सस्नेही,
पिवळा डांबिस

सरपंच's picture

30 May 2008 - 8:43 am | सरपंच

आम्ही मिपाचे आहोत आणि इथून हाकलल्यापर्यंत मिपाचे राहू....

अरे डांबिसा, तुला कोण हाकलेल लेका? तू तर सगळ्या मिपावल्यांचा फेमस डांबिसकाका! :)

शिवाय तू नांवाप्रमाणे पक्का डांबिसही आहेस आणि मिपाला तर डांबिस मंडळींची नेहमीच आवश्यकता आहे! :)

या आय्.डी. धारकाची मिपावरची जर "वाटचाल" पाहिली तर नुसता सभासद म्हणून वावरणे ही भूमिका दिसत नाही. त्यात काहीतरी व्हेस्टेड इंटरेस्ट वा पर्सनल अजेंडा असल्यासारखा स्पष्ट दिसतो...

अगदी योग्य मुद्दा मांडला आहेस रे डांबिसा!

असो, काही मंडळींना 'तात्या' आणि 'मिसळपाव' हे प्रकरण काही म्हण्जे काही केल्या पचतच नाही त्याला काय इलाज? आणि अपचन अगदी अनावर झालं की इथे येऊन मनसोक्त हागून जायच! दुसरं काय? :)

पण आम्हांला असे आढळले आहे की त्यांनी पिंक टाकली रे टाकली की तुम्ही सारवासारवीचे तस्त घेऊन धावता की त्यांची पिंक किती विधायक आहे हे सांगण्यासाठी! हा काय चमत्कार आहे? इथेच नाही तर तुम्ही अन्यत्र ही तसे केले आहे. आम्हाला हे गौडबंगाल उलगडत नाही.

हम्म! या बाबतीत मुक्तरावांचा खुलासा वाचायला आवडेल! आमचा मुक्तराव तसा भला माणूस, परंतु काही वेळेला उगीच काही लोकांपुढे दडपून जातो! :)

आम्हाला हे गौडबंगाल उलगडत नाही. हे एकाच माणसाचे दोन आय डी आहेत काय?

नाही रे डांबिसा, या बाबतीत मात्र आम्ही मुक्तराव हा कंप्लीट वेगळा माणूस आहे असा निर्वाळा देऊ इच्छितो. कारण आम्ही त्याच्याशी फोनवर एकदा बोललो आहोत.

आमची प्रस्तुत मूळ लेखकांविषयी काही तक्रार नाही. कारण एकदा व्हेस्टेड इन्टरेस्ट आहेत हे कळल्यानंतर वाद घालण्यात काहीच अर्थ नाही.

अगदी खरं! आम्हीही यापुढे हेच करायचं ठरवलं आहे, पूर्वीही अनेकदा तसं ठरवलं होतं! पण जळ्ळा आमचा स्वभावही पक्का भिकारचोट अन् भांडायची खुमखुमी असलेला, त्यामुळे गप्प बसवत नाही. परंतु यापुढे अनुल्लेखाने मारायची मनोगती कला हा तात्याही साध्य करेल, त्याला ते फारसं जड नाही! :)

असा हा प्रतिसाद दिल्याबद्द्ल सरपंच बहुतेक आमचे सभासदत्व रद्द करतील. पण पर्वा नाही, जिथे मनातले स्पष्ट पणे बोलता येत नाही तिथे राहूनतरी काय उपयोग?

अरे बाबा डांबिसा, कोण तुझं सभासदत्व रद्द करायला निघाला आहे? मिपाबद्दल खरी कळकळ कुणाला आहे आणि पोटदुखी कुणाला आहे हे समजण्याइतकी आम्हीही थोडीफार जिंदगी बघितली आहे! तेव्हा रहा इथेच निवांत! मिपा तुझंच आहे! :)

तात्या.

मुक्तसुनीत's picture

30 May 2008 - 6:27 pm | मुक्तसुनीत

पण आम्हांला असे आढळले आहे की त्यांनी पिंक टाकली रे टाकली की तुम्ही सारवासारवीचे तस्त घेऊन धावता की त्यांची पिंक किती विधायक आहे हे सांगण्यासाठी! हा काय चमत्कार आहे? इथेच नाही तर तुम्ही अन्यत्र ही तसे केले आहे. आम्हाला हे गौडबंगाल उलगडत नाही. हे एकाच माणसाचे दोन आय डी आहेत काय? नसतील तर तुमचे काय लागेबांधे आहेत हो ते एकदा स्वच्छ सांगून टाका म्हणजे "त्यांच्या" प्रतिक्रियेनंतर ती विधायक कशी आहे ते समजावणार्‍या "तुमच्या" प्रतिक्रियेची आम्ही प्रतिक्षा करू.....

पिवळा डांबिस यांचे लिखाण एरवी आवडते असे मी कित्येक वेळा लिहीले आहे. यावेळी त्यानी आपल्या ललितगुणाचा वापर चुकीच्या ठिकाणी केला आहे. "पिंकांच्या मागे तस्त घेऊन फिरणे" ही उपमा पेजोरेटीव्ह आहे (मराठी शब्द माहीत नाही. ) , ती केवळ निंदाव्यंजक नसून सरळसरळ हीन दर्जाचा अपमान करणारी आहे. मी त्यांचा - या विधानापुरता - धि:कार करतो. त्यानी आपल्या विवेकाला स्मरून अशी भाषा असणारी विधाने मागे घ्यावीत.

पिवळा डांबिस's picture

31 May 2008 - 8:30 pm | पिवळा डांबिस

श्री. मुक्तसुनीतजी,
सर्वप्रथम हा वेगळ्या व्यक्तीचा आयडी असल्याचे निश्चित झाल्याने आनंद व्यक्त करतो.

यावेळी त्यानी आपल्या ललितगुणाचा वापर चुकीच्या ठिकाणी केला आहे. "पिंकांच्या मागे तस्त घेऊन फिरणे" ही उपमा पेजोरेटीव्ह आहे (मराठी शब्द माहीत नाही. ) , ती केवळ निंदाव्यंजक नसून सरळसरळ हीन दर्जाचा अपमान करणारी आहे. मी त्यांचा - या विधानापुरता - धि:कार करतो.
आता कळलं उपरोधिक, वक्रोक्तिपूर्ण टीका झाली की कसं वाटतं ते? आम्ही तर आमच्या उपमेत एकही असभ्य वा बीभत्स शब्द वापरलेला नाही. तरीही तुम्हाला ती झोंबली. आणि सहाजिकच आहे, ज्याला टोचतं त्यालाच वेदना होतात. अशा वेळी त्याला जर कुणी वक्रोक्तीकडे दुर्लक्ष कर आणि त्या वेदनेत काही विधायक शोध असे सांगितले तर वेदना वाढतात.

पिवळा डांबिस यांचे लिखाण एरवी आवडते असे मी कित्येक वेळा लिहीले आहे.
आभारी आहे. आम्हालाही तुमचे लिखाण एरवी आवडते. काव्यासारखा कठीण साहित्यप्रकार तुम्ही उत्तम रीतीने हाताळता. आमच्या सारखं गद्य लिहीणं त्यामानाने सोपं! आम्ही केलेली टीका याच अपेक्षाभंगापोटी होती की अरे एरवी हा माणूस इतकं चांगलं लिहितो तर मग याच मुद्द्यावर पुनःपुनः असं का लिहितो? पहिल्यांदा वाचलं तेंव्हा आम्ही दुर्लक्ष केलं पण पुनरावृत्ती झाल्याने लिहावं लागलं.

त्यानी आपल्या विवेकाला स्मरून अशी भाषा असणारी विधाने मागे घ्यावीत.
आम्ही वर्णन केलेलं बिहेव्हिअर असत्य असतं तर आम्ही आमचं विधान जरूर (आनंदाने) मागे घेतलं असतं. किंबहुना दुर्दैवाने असं बिहेव्हिअर एकापेक्षा जास्त वेळा झालेलं आहे याची खात्री करून घेऊनच आम्ही ते इथे मांडलं होतं. तेंव्हा आम्ही असत्य विधान केलेलं नसल्याने ते मागे घेऊ शकत नाही.
हां, आम्ही आमच्या विवेकाला स्मरून आणि यापूर्वीच्या तुमच्या लिखाणाचा चाहता म्हणून तुम्हाला झालेल्या यातनांबद्द्ल खेद जरूर व्यक्त करतो.

सद्यपरिस्थितीत हा वाद मागे पडून आपण सर्व मिपाकर पुढे चालायला लागलो तर बरं. बाकी तुमची मर्जी.

आपला,
पिवळा डांबिस

कोलबेर's picture

31 May 2008 - 9:22 am | कोलबेर

चला भिडेवर मात करायचीच आहे तर सगळेच करूया. साचलेल्या पाण्याला वाट करुन दिलेली केव्हाही बरी!

डांबीस काका, वयाने,अनुभवाने, ज्ञानाने तुम्ही खूप मोठे असलात तरी संजोप राव आणि तात्या अभ्यंकर ह्या प्रकरणासाठी तुम्ही (निदान 'पिवळा डांबिस' हा आयडी) खूपच नवखे आहात.

ज्या संजोप रावांची इथली वाटचाल काढून तुम्ही अभ्यासलीत त्यामध्ये तुम्हाला 'पिंजरा' हे परिक्षण दिसले नाही??

मी संजोप राव आणि तात्या अभ्यंकर ह्यापै़की कुणालाही प्रत्यक्षात भेटलो नाही पण संजोप रावांनी हे परिक्षण केवळ तात्यांच्या आग्रहास्तव खास मिसळपाववर लिहिले आहे हे मला माझ्या इथल्या अभ्यासातुनच (?) कळले! तुम्हाला कळले नाही?? तुम्ही ह्या आयडीचा अभ्यास वगैरे केलात तरी ही गोष्ट कशी काय बुवा तुमच्य नजरेतुन सुटली? रावसाहेबांची लेखन प्रतिभा बघता त्यांना अनेकदा बर्‍याच गोष्टींवर लिहण्याचा बर्‍याच जणांनी आग्रह करताना पाहिले आहे पण (माझ्या अभ्यासा नुसार!) रावसाहेबांनी खास डिमांडवर लिहीलेला हा एकमेव लेख आहे. तोही तात्यांच्या आग्राहावर आणि मिसळपाववर?

संजोप रावांच्या प्रत्येक भुमिकेशी मी सहमत नाही. पण तसेच आपल्या लेखावर वा! वा! चे कीती प्रतिसाद आले ह्यावर (हुरळून जाऊन?) परखड मत देणार्‍यांना 'आंधळे' म्हणून हिणवणार्‍या तुमच्याशीही सहमत नाही. पण तरीही संजोपराव किंवा पिवळा डांबीस ह्या आयडीतून काहीही लिहिले गेले की इथे आल्या आल्या पहिल्यांदा ते वाचतो!
ह्यात काहीही चमत्कार नसुन दोन्ही आयडींमधून येणारी लेखन प्रतिभा आहे.

असो..मनापासून वाटले ते लिहीले! सरपंच हा प्रतिसाद किंवा माझा आयडी उडवतील का? असली निरर्थक काळजी मी तरी करणार नाही.
तुमच्या पर्यंत प्रामाणिक भावना पोहोचाव्यात इतकीच काळजी!!

डिस्क्लेमर : ह्या प्रतिसादातुन मी रावसाबांची बाजू घेत आहे असे वाटून कोलबेर हा त्यांचाच आयडी आहे असल्या निष्कर्षापर्यंत पोहोचणार्‍यांनी सरपंच/ज.डायर ह्यांच्या कडून आमचा आमचा आयपी ऍड्रेस चेक करुन घ्यावा.

पिवळा डांबिस's picture

31 May 2008 - 10:33 am | पिवळा डांबिस

डांबीस काका, वयाने,अनुभवाने, ज्ञानाने तुम्ही खूप मोठे असलात तरी संजोप राव आणि तात्या अभ्यंकर ह्या प्रकरणासाठी तुम्ही (निदान 'पिवळा डांबिस' हा आयडी) खूपच नवखे आहात.
पूर्णपणे मान्य! पण त्याबरोबरच त्या वादाची माहिती घेण्यात आम्हाला अजिबात इंटरेस्ट नाही हेही आम्ही स्पष्ट केले आहे. आमची प्रतिक्रिया ही श्री. संजोप रावांनी मिपावर (आणि मिपावरच फक्त) लिहिलेल्या प्रतिक्रीयांसंबंधीच आहे. आम्ही तसेही स्पष्ट केले आहे.

तुम्हाला 'पिंजरा' हे परिक्षण दिसले नाही??
जरूर दिसले. आम्हाला तरी तीस वर्षांपूर्वी लागून गेलेल्या सिनेमाच्या परीक्षणाचे प्रयोजन कळले नाही. जसे काही आजवर पिंजरावर परीक्षण कुणी लिहिलेलेच नाही. किंवा श्री. संजोपरावांनी काही नवीन लिहिले आहे. आम्हांला तुमचे वय माहीत नाही पण पिंजरा जेंव्हा (नव्याने) लागला लेंव्हा आम्ही वर्तमानपत्र वाचण्याच्या वयाचे होतो. तेंव्हा ट्र्स्ट मी, आम्ही अशी बरीच परीक्षणे वाचली आहेत...

संजोप रावांनी हे परिक्षण केवळ तात्यांच्या आग्रहास्तव खास मिसळपाववर लिहिले आहे हे मला माझ्या इथल्या अभ्यासातुनच (?) कळले! तुम्हाला कळले नाही??
समजा ते जरी त्यांनी तात्याच्या अगदी खास आग्रहावरून लिहिले असेल तरी त्यामुळे त्यांना इतरत्र प्रतिक्रियेच्या ऑफेनसिव्ह पिंका टाकायचा अधिकार कसा प्राप्त होतो? आम्ही "ईनो' आणि "वारा सरणे- हिमवादळॅ" या प्रतिक्रियांविषयी बोलत आहोत. या प्रतिक्रिया विधायक आहेत असे तुम्हाला म्हणायचे आहे काय?
कोलबेरसाहेब, मिपाविषयी आमच्या मनात एक श्रद्धा आहे. तात्याने हा प्रवाहाच्या विरूद्ध पोहत, स्वतःच्या खिशाला खार लावून, जो उपक्रम (उपक्रम साईट नव्हे) चालवला आहे तो यशस्वी व्हावा अशी आमची इच्छा आहे. श्री संजोप रावांविषयी आमचं वैयक्तिक काहीच भांडण नाही. त्यांनी चांगल्या हेतूने इथे दर्जेदार लिखाण प्रसिद्ध करावं अशीच आमची इच्छा आहे. तात्यानेही त्यांचे अनेकदा जाहीर स्वागत केल्याचे आम्ही वाचले आहे, तुम्हीही वाचले असेल.
ज्यांना मिपा आवडत नाही (मला मान्य आहे की असेही लोक असू शकतील!) त्यांना मिपावर लिहिलंच माहिजे अशी काही सक्ती असल्याचं आमच्यातरी वाचनात नाही. असे असतांनाही जर कोणी मिपावर या साईटला अवमानकारक काही लिहिलं तर आम्ही त्यांचं स्वागत हारतुर्‍यांनी करावं अशी तुमची अपेक्षा आहे का? मग तो (तुमच्या दृष्टीने) कितीही मोठा माणूस असो...

कोलबेर हा त्यांचाच आयडी आहे असल्या निष्कर्षापर्यंत पोहोचणार्‍यांनी सरपंच/ज.डायर ह्यांच्या कडून आमचा आमचा आयपी ऍड्रेस चेक करुन घ्यावा.
आम्हाला "कोलबेर' हा त्यांवाच आयडी आहे असे मुळीच वाटत नाही कारण याच आयडीने पॅटंटेड व्हर्सेस जेनेरीक ड्रग्जवर आमच्याशी अतिशय मौलिक चर्चा केलेली आहे. रावांना ते जमले असते असे वाटत नाही. कोलबेर, तुमच्या मताविषयी आम्हाला आदरच आहे.

पण तसेच आपल्या लेखावर वा! वा! चे कीती प्रतिसाद आले ह्यावर (हुरळून जाऊन?) परखड मत देणार्‍यांना 'आंधळे' म्हणून हिणवणार्‍या तुमच्याशीही सहमत नाही.
आपल्या याही मताचा आम्ही आदर करतो. आम्ही स्वतःला ललित लेखक मुळीच समजत नाही. जी काय चार-दोन अक्षरे आम्ही जुळवली ती तात्याच्या आग्रहाखातर इथे प्रसिद्ध केली. आम्ही फक्त ही एक "फॅक्ट" नजरेला आणली होती की ज्यांना गावितमास्तर आवडलेला नाही त्या लोकांपेक्षा ज्यांना तो आवडलेला आहे त्यांची संख्या अनेकपटींनी अधिक आहे. तुम्ही ही फॅक्ट आजही नाकारू शकता काय?
गंमत अशी आहे की तुम्ही काही लोकांच्या मताला इतरांपेक्षा जास्त महत्व देऊ इच्छिता. ऍज इफ सम आर मोअर इक्वल! मला ते मान्य नाही. मिपावर फक्त काही जणांनाच इतरांपेक्षा साहित्यातील जास्त कळतं आणि इतरांना नाही यावर आमचा विश्वास नाही.
असो. मला वाटतं या विषयावर मी खूप लिहिलं. माझी भूमिका मला वाटतं मी पुरेशी स्पष्ट केली आहे. तेंव्हा माझ्या दृष्टीने हा विषय इथेच संपला. तुम्हाला जर पटत नसेल तर आमची मतं आमच्याजवळ आणि तुमची तुमच्याजवळ! लेटस ऍग्री टू डिसऍग्री!

आपला,
पिवळा डांबिस

कोलबेर's picture

31 May 2008 - 10:52 am | कोलबेर

आम्हाला तरी तीस वर्षांपूर्वी लागून गेलेल्या सिनेमाच्या परीक्षणाचे प्रयोजन कळले नाही. जसे काही आजवर पिंजरावर परीक्षण कुणी लिहिलेलेच नाही. किंवा श्री. संजोपरावांनी काही नवीन लिहिले आहे. आम्हांला तुमचे वय माहीत नाही पण पिंजरा जेंव्हा (नव्याने) लागला लेंव्हा आम्ही वर्तमानपत्र वाचण्याच्या वयाचे होतो. तेंव्हा ट्र्स्ट मी, आम्ही अशी बरीच परीक्षणे वाचली आहेत...

त्या परिक्षणाचा दर्जा काय होता किंवा ते कुणाला किती आवडले हा मुद्दाच नाही आहे. (मागे ह्यावर तुमच्याच एका प्रतिसादाला मी सहमती देणारा प्रतिसाद देखिल दिला होता)

मूख्य मुद्दा आहे की हे परिक्षण त्यांनी तात्यांच्या आग्रहावरुन लिहिले होते. (निदान तात्यांनी तसा आग्रह केलेला तरी पाहण्यात आहे!) ह्यातुन इतकेच अंडरलाईन करायचे आहे की इथले संजोपारावांचे लेखन हे निव्वळ तात्यांचा आणि पर्यायाने मिसळपावचा राग राग करण्यासाठी नाही.

समजा ते जरी त्यांनी तात्याच्या अगदी खास आग्रहावरून लिहिले असेल तरी त्यामुळे त्यांना इतरत्र प्रतिक्रियेच्या ऑफेनसिव्ह पिंका टाकायचा अधिकार कसा प्राप्त होतो?

एक्झॅक्टली...जसेकी प्रसंगी त्यांनी थोडी कठोर टीका केली म्हणून त्यांना मिसळपावचे व्हिलन ठरवण्याचा अधिकार प्राप्त होत नाही तसा!!
हाच तर मुद्दा मला 'पिंजर्‍या'तुन अधोरेखित करायचा होता.

आम्ही फक्त ही एक "फॅक्ट" नजरेला आणली होती की ज्यांना गावितमास्तर आवडलेला नाही त्या लोकांपेक्षा ज्यांना तो आवडलेला आहे त्यांची संख्या अनेकपटींनी अधिक आहे. तुम्ही ही फॅक्ट आजही नाकारू शकता काय?

ती फॅक्ट आम्हीच काय लिहिता वाचता येणारा कुणीही नाकरू शकत नाही..पण म्हणून एखाद्याने थोडा निराळा सूर लावला तर तो देखिल आंधळा ठरत नाही इतकेच. पब्लिकने डोक्यावर घेउन नाचणे हा गुणवत्तेचा एकमेव निकष नाही हे तुम्हाला सांगण्याइतकी माझी पात्रता नाही.

तुम्हाला जर पटत नसेल तर आमची मतं आमच्याजवळ आणि तुमची तुमच्याजवळ! लेटस ऍग्री टू डिसऍग्री!

'ऍग्री टू डिसऍग्री' हा तर कोणत्याही सार्वजनिक संकेतस्थळाचा आत्मा आहे असे मी मानतो. वरील प्रतिसादात काही प्रश्नार्थक वाक्ये आल्याने हा लहान तोंडी मोठा घास!

विजुभाऊ's picture

31 May 2008 - 12:38 pm | विजुभाऊ

कोणी काय बोलावे काय लिहावे हे ज्याचे त्याने ठरवावे. पण मुद्दाम म्हणुन एखादा असभ्य अश्लील खरे तर हिडीस शब्द माथी मारत असेल तर त्याला विरोधही करायचा नाही?

एखाद्या लिखाणावर / प्रतिक्रियेवर विरोधी प्रतिक्रिया आली की सभत्येच्या सगळ्या मर्यादा सोडुन हिडीस काव्य पंक्ती लिहीणे याला बुद्धीवैभव म्हणायचे की विकृती ?

जसेकी प्रसंगी त्यांनी थोडी कठोर टीका केली म्हणून त्यांना मिसळपावचे व्हिलन ठरवण्याचा अधिकार प्राप्त होत नाही तसा!!

टीका करावी .....पण आयमाय **न टाकावी / मासीक पाळी असले शब्द टीकेपेक्षा लेखकाच्या हरपलेल्या मनस्थितीचे वास्तव दाखवते.
या असल्या शेवाळी शेंबुडलेल्या बाष्कळपणाला जर कोणी थोडी कठोर टीका म्हणत असेल तर तुमचे स्वतःला जी एं चे पाईक समजणारे तथाकथीत हीरो आणि त्यांचे वकील काय पात्रतेचे आहेत हे वेगळे सांगायला नकोच.
असो...... असले हीरो डोक्यावर नाचवणारे स्वयंभू समिक्षक आणि स्वयंभू इतिहासकार यांची त्या संस्थळावर विचारपूस करणारे भरपूर आहेत. त्यांचे हीरो त्याना लखलाभ.
चांगल्याला चांगले म्हणणे आणि वाईटाला वाईट म्हणणे हे मिपाच्या सदस्यांचे रोखठोक वागणे कायम असेच राहील

आणिबाणीचा शासनकर्ता's picture

31 May 2008 - 4:02 pm | आणिबाणीचा शासनकर्ता

असले हीरो डोक्यावर नाचवणारे स्वयंभू समिक्षक आणि स्वयंभू इतिहासकार यांची त्या संस्थळावर विचारपूस करणारे भरपूर आहेत.

कोणाचीही कारणाशिवाय विचारपूस करण्याचा मिपाचा मनोदय नाही आणि सदस्यांचाही नसावा. एखाद्या लेखाला प्रतिसाद दिले जातात ते त्या लेखापुरते मर्यादित आहेत का एवढेच पहावे. उगीच सर्वत्र विनाकारण लोकांना त्रास देण्याचे कारण नाही. मिपावरील वातावरण विनाकारण विचारपूस करणारे न राहता खेळीमेळीचे रहावे.

चांगल्याला चांगले म्हणणे आणि वाईटाला वाईट म्हणणे हे मिपाच्या सदस्यांचे रोखठोक वागणे कायम असेच राहील

चांगल्याला चांगले म्हणताना आणि वाईटाला वाईट म्हणताना एखाद्याची पाठ धरून तो विषय संपल्यावरही सतत त्रास देत राहणार्‍या सदस्यांना मिपाबद्दल प्रेम नाही असे आम्ही धरून चालतो. मिपावर अनेक व्यक्ती येतात त्यापैकी प्रत्येकाची मते आपल्याला पटायला हवीत असे नाही. ज्यांची मते आपल्याला पटत नाहीत त्यांना सतत त्रास देण्याचा उद्योग मिपाला पसंत नाही.

मिपाच्या ज्या सदस्येला तुम्ही विनाकारण प्रत्येक चर्चेत ओढत असता तिने याबाबत तक्रार केली आहे. तरी, यावेळेस फक्त समज देण्यात येत आहे पुढील वेळेस तेढ वाढवणारे असे प्रतिसाद सरळ उडवून दिले जातील याची खात्री बाळगावी.

जनरल डायर

कोलबेर's picture

31 May 2008 - 8:36 pm | कोलबेर

धन्यवाद डायर साहेब. मुक्तरावांनी म्हंटल्या प्रमाणे सार्वजनिक संकेतस्थळावर वावरण्यासाठी काही विवेक लागतो जो विजुभाऊ ह्या आयडीतुन लिहणार्‍या माणसाला नाही हे आजकाल काही प्रतिसादांमधून दिसू आले आहे. वरील प्रतिसादामध्ये तर त्याची हद्द झाली आहे. ह्यावर त्याच पातळीवर जाऊर कुणीतरी प्रत्युत्तर देण्याआधी हा प्रतिसाद उडवुन टाकावा ही विनंती. मिसळपावला खरा धोका असे विवेक सोडून लेखन करणार्‍यांचा आहे.

विसोबा खेचर's picture

31 May 2008 - 12:52 pm | विसोबा खेचर

समजा ते जरी त्यांनी तात्याच्या अगदी खास आग्रहावरून लिहिले असेल तरी

त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहेच आणि त्यांच्या त्या लेखाला मनापसून दादही दिली आहे.

तरी त्यामुळे त्यांना इतरत्र प्रतिक्रियेच्या ऑफेनसिव्ह पिंका टाकायचा अधिकार कसा प्राप्त होतो?

अगदी खरं! दर वेळेला आपण कुणीतरी फार शहाणे आहोत आणि बाकीचे चुत्ये आहेत असंच समजूनच ते नेहमी लिहीत असतात. जरा कधी कुठे मनमोकळं लेखन नाही की कुणाशी मनमोकळा संवाद नाही! तो नसला तर नसू दे, त्या बाबत काहीच सक्ति नाही. असतो एखाद्याचा स्वभाव जात्याच भिकारचोट आणि संकुचित मनोवृत्तीचा! परंतु याचा अर्थ सतत तिरकस लेखन, तात्याला किंवा मिपाला सतत झोडू पाहणारे प्रतिसाद असा होत नाही/नसावा!

कोलबेरसाहेब, मिपाविषयी आमच्या मनात एक श्रद्धा आहे. तात्याने हा प्रवाहाच्या विरूद्ध पोहत, स्वतःच्या खिशाला खार लावून, जो उपक्रम (उपक्रम साईट नव्हे) चालवला आहे तो यशस्वी व्हावा अशी आमची इच्छा आहे.

जाऊ दे रे डांबिसा, तू कशाला कुणाला माझी बाजू घेऊन समजावतो आहेस? शेवटी मॅच्युरिटी काऊंट्स! प्रत्येक वयाची एक समज असते त्यानुसारच कोलबेरने प्रतिसाद दिला आहे!

ज्यांना मिपा आवडत नाही (मला मान्य आहे की असेही लोक असू शकतील!) त्यांना मिपावर लिहिलंच माहिजे अशी काही सक्ती असल्याचं आमच्यातरी वाचनात नाही.

मुळीच सक्ति नाही. परंतु गंमत म्हणजे ज्यांना मिपा आवडत नाही तेच इथे येऊन अगदी हौशीहौशीने मिपाच्या विरोधात सतत काहीतरी लिहीत असतात याची गंमत वाटते! अस्तित्वाच्या लढाईकरता केवळ विरोध करत राहणे हाच मार्ग काही वेळेला उरतो! संजोपचंही तेच झालं! तात्याच्या आणि मिपाच्या विरोधात लिहिल्यामुळेच आपण अधिक प्रकाशात येऊ असंच त्याला नेहमी वाटत राहीलं आणि तेच तो बर्‍याचदा करत राहिला! याचं अगदी ताजं उदाहरण म्हणजे त्याची ही कविता! मिपावरच येऊन मिपालाच जोडे मारणारी ही कविता मिपावर टाकायचं वास्तविक काय कारण होतं बरं? अगदी नेमकं कारण? 'बघा! मी कसे जोडे मारले आहेत, 'बघा मी किती मोठा कवी आहे!' हाच आतला आवाज या कवितेतनं ऐकू येतो ना? अरे आहेस ना मोठा कवी? मग कविता लिहिण्याकरता जगातले सगळे विषय संपले? तात्याला आणि मिपाला जोडे मारणे, यातूनच फक्त कवीत्व सिद्ध होतं का? कुणाला तरी सतत जोडे मारून, सतत काहीतरी तिरकस आणि स्वत:ला फार शहाणे समजून लिहिल्यामुळेच साहित्यिक अभिव्यक्ति करता येते का? 'वर्तूळ' नावाचा अप्रतिम लेख लिहिणारा हाच संजोप का? असा कधितरी प्रश्न पडतो आणि वाईट वाटतं! की आता स्वत:च्या त्या प्रतिभेवर विश्वास उरला नसल्यामुळे फक्त विरोध करत राहणे, गरळ ओकत राहणे हेच काही मार्ग अस्तित्व टिकवण्याकरता शिल्लक राहिले आहेत? वाईट वाटतं खूप!

आणि तसं नसेल तर उत्तम साहित्यिक अभिव्यक्ति करणारे लेख इतरत्र आणि जोडे हाणण्याकरता मात्र मिपा असा काही हिडन अजेंडा आहे? मला तर तोच दिसतो आहे! (अर्थात, पिंजराचं परिक्षण हा त्याला एकमेव अपवाद आहे हे मीही मान्य करतो! अगदी खुल्या दिलाने!)

असो.. झाली इतकी चर्चा पुरे झाली रे डांबिसा! आपलं मिपा कसं आहे, काय आहे हे येणारा काळच ठरवील. आणि ज्यांना मिपाला फक्त शिव्या द्यायच्या आहेत त्यांना त्या अगदी मनसोक्त देऊ देत असंच शेवटी म्हणावंसं वाटतं!

तात्या.

पिवळा डांबिस's picture

31 May 2008 - 8:35 pm | पिवळा डांबिस

असो.. झाली इतकी चर्चा पुरे झाली रे डांबिसा! आपलं मिपा कसं आहे, काय आहे हे येणारा काळच ठरवील.
पूर्ण सहमत आहे.
या विषयावर आता आमचाही,
'सीताकांतस्मरण जयजयराम!!"
:)

कोलबेर's picture

31 May 2008 - 9:16 pm | कोलबेर

कोलबेरसाहेब, मिपाविषयी आमच्या मनात एक श्रद्धा आहे. तात्याने हा प्रवाहाच्या विरूद्ध पोहत, स्वतःच्या खिशाला खार लावून, जो उपक्रम (उपक्रम साईट नव्हे) चालवला आहे तो यशस्वी व्हावा अशी आमची इच्छा आहे.

तात्या मनोगतावरील उणीवा काढल्यावर अगदी असेच प्रतिसाद बघायला मिळायचे! .. "कुणीतरी आपल्या खिशातील द्रव्य खर्च करुन कार्यबाहुल्यातुन वेळ काढून हे संस्थळ चालावते आहे".. असे शब्द असायचे इतकेच ;) इथेही तेच बघुन गंमत वाटली.
असो..सैतानाशी लढताना स्वतः सैतान न बनण्याची काळजी घेणे फार अवघड असते अश्या आशयाचे एक इंग्रजी वचन आहे. सैतानाच्याजागी प्रशासक हा शब्द टाकला की हेच वचन मराठीतही चपखल बसेल. :)

शेवटी मॅच्युरिटी काऊंट्स! प्रत्येक वयाची एक समज असते त्यानुसारच कोलबेरने प्रतिसाद दिला आहे!

मान्य! पण तुम्ही तुमच्या वयाच्या समजेनुसार कधी लिहीणार? 'तुमचीच लाल' म्हणणार्‍यांच्या जयजयकारात तटस्थ नजरा गमावुन बसू नका इतकेच वाटते. वरती अजानुकर्णाचा प्रतिसाद उडावुन लावलात पण विजुभाऊंचा मात्र तसाच ठेवलात...सैतानाशी लढताना स्वतः सैतान न बनण्याची काळजी घेणे फार अवघड असते!!

व्यक्ति तितक्या प्रकृती. प्रत्येक व्यक्तीत गुण दोष असतात. अवगुण दाखवले तरी गुण देखील निश्चीत आहेत व त्या गुणांच्या आधारे अवगुणांकडे दुर्लक्ष करता येते. अत्यंत गर्विष्ठ, व स्वताला सर्वज्ञान झाले आहे असा स्वभाव असला तरी त्या गुरु शिष्याला समावुन [गरज नसताना] घेतोच ना आम्ही मिपाकर.

तात्याला मनोगतावर वावर भावला नाही म्हणून हिमतीवर मिसळपाव काढले. एक "जान" असलेले नवे संकेतस्थळ उभे राहीले. आता हे सत्य जितक्या लवकर पचवाल तितक्या लवकर तुमचे "इनो" व्यसन सुटेल.

शुभेच्छा! लवकर बरे व्हा!!

नाना फडणवीस's picture

30 May 2008 - 8:16 am | नाना फडणवीस

स्वतःच्या उच्च काव्यात्मक प्रतिभेचा वापर, दुसर्‍याच्या अंगणात जाऊन थुंकण्यासाठी करणे हे गैर नव्हे काय?

एखाद्या गोष्टीबद्दल मनात चांगल्या भावना असतील तर त्या व्यक्त करण्याची अनेक चांगली माध्यमे आहेत. मिपाला "सुधरवण्याचा" विडा जर कोणी उचललाच असेल तर त्यासाठी याहून चांगले पर्याय निश्चित उपलब्ध आहेत. आणि ते स्वतःला फार शहाणे समजणार्‍या या संजोपरावाला माहित नाहीत असे कुणी समजू नये.

पण जर आपला उद्देशच मिपावर वाईट गोष्टी घडाव्यात असा असेल तरच हे लेखन संभवते.

त्यामुळे काव्याला दाद देणार्‍या मंडळींना आमचे हे सांगणे की या कवितेमागील जळफळाट त्यांनी ध्यानात घ्यावा.

मिसळपाव स्थापन झाल्यापासून अनेकांना कंड सुटली आहे, आग आग होते आहे.

त्यांच्या मूळव्याधीच्या त्या वेदनांवर असले काव्यात्मक "कैलास जीवन" बोटावर घेऊन तेथे चोळत बसणे, याशिवाय ते काही करू शकत नाहीत. त्यामुळे असल्या जळफळाटातून निर्माण झालेल्या मूळव्याधी काव्यांना प्रतिभेचे निकष लावून गौरवण्यासारखे त्यात नाही.

नाना फडणवीस

फटू's picture

30 May 2008 - 8:54 am | फटू

हा वाद इतका गहन आहे ???

वरचे सगळे प्रतिसाद वाचल्यानन्तर का कोण जाणे पण मनोगतावर एक चक्कर मारावीशी वाटली... आणि काय आश्चर्य... किती तरी लेख, कविता अशा आढ्ळल्या ज्या मिपावर सुद्धा प्रकाशित झाल्या आहेत... आम्हीही पुर्वी मनोगतावर लिहायचो... पण पुर्वी म्हणजे आम्हाला मिपा बद्दल काहीच माहीती नव्हते तेव्हा... आम्हाला नाही आठवत आम्ही मिपाचे सदस्य झाल्यानन्तर मनोगतावर कधी लिहिलं आहे...

असो. सच्च्या मिपाकराना एव्हधच सांगावंसं वाटतं... मिपाची सर दुस~या कुठल्याच संकेतस्थळाला नाही हे तर जगजाहीर आहे... मग कशाला वाद घालत बसता... जावू द्या ना...

पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 May 2008 - 10:22 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काल कविता वाचल्यावर आम्हाला ती क्रांतीब्रींतीच्या ढाच्याची कविता वाटली. पण पहिल्या झटक्यात कविता कळत नाही, म्हणुन दुस-यांदा कविता वाचायला गेलो तर तिथे ढाक-बहीरीचा गड उतरता, उतरता लाडक्या शिष्याची प्रतिक्रिया आलीच होती. अशा अर्जंट प्रतिक्रियावर तर आमचे विशेष लक्ष असते. त्यात काही विशेष नाही. हल्ली काही समिकरणे लक्षात येऊ नये इतके आम्ही खूळे नक्कीच नाही.

प्रतिभावंताने काव्याचा उपयोग कसा करावा हे कोणीही कोणाला सांगू नये. पण इतकी निराशा येण्याचे कारण आम्हाला काही समजले नाही. या पुर्वीची आपली कविता वाचण्यासाठी आम्हीही आपल्या लेखन अनुमतीच्या धोरणाच्या संस्थळावर कविता वाचून गेलो.कविताही आवडलीही होती. आपले तेथील सदस्यांवर असलेले वजन पाहता, आपल्या लेखनावर ( कसेही असले तरी ) फुले उधळणा-यांची संख्या कमी नाही. तेव्हा इथे काही उत्तम कविता आपण टाकू शकला असता. पण आपल्याला तसे करायचेच नसल्यामुळे तो प्रश्नही उरत नाही, असे वाटते.

अर्थात आपण या संस्थळावर काय लिहावे हा आपला प्रश्न . काय लिहिले, कसे लिहिले, त्याच्या आस्वादाबरोबर त्याचा उद्देश आणि योग्य समाचार घेण्याची ताकद आमच्यात नसली तरी, ती ताकद एकाच माणसात आहे, त्यांच्या पाठीशी आम्ही सतत असतो, आहोतच. तेव्हा एका दर्जेदार लेखकाने अशा भानगडीत पडावे याचे मात्र वाईट वाटत आहे, इतकेच सांगावे वाटते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आम्हाला नमोगत आणि मिपा यावरच्या वादात काहीही इन्टरेस्ट नाही. आय जस्ट डोन्ट गिव्ह अ डॅम!!
डांबिस भाय एकदम बरोबर.....माझ ही अगदी हेच म्हणण आहे.....
प्रस्तुत लेखकाचा "ईनो" बद्द्लचा प्रतिसाद वाचा. तो विधायक आहे असे वाटते तुम्हांला? हा अपवाद आहे असे तुम्ही म्हणाल. पण आम्ही अजुनही "वारा सरणे..हिमवादळे" वगैरे विसरलेलो नाही.
आमच्या ही ते लक्षात आहे बरोबर !!!!!
या आय्.डी. धारकाची मिपावरची जर "वाटचाल" पाहिली तर नुसता सभासद म्हणून वावरणे ही भूमिका दिसत नाही.
मलाही आधी हाच संशय होता आणि आता मात्र खात्री पटली.....
मिपाला "सुधरवण्याचा" विडा जर कोणी उचललाच असेल तर त्यासाठी याहून चांगले पर्याय निश्चित उपलब्ध आहेत. आणि ते स्वतःला फार शहाणे समजणार्‍या या संजोपरावाला माहित नाहीत असे कुणी समजू नये.
पण जर आपला उद्देशच मिपावर वाईट गोष्टी घडाव्यात असा असेल तरच हे लेखन संभवते.

त्यांचे हे लेखन मिपा चे वातावरण बिघडवु पाहते आहे...हे मात्र खर
त्यामुळे काव्याला दाद देणार्‍या मंडळींना आमचे हे सांगणे की या कवितेमागील जळफळाट त्यांनी ध्यानात घ्यावा.
मिसळपाव स्थापन झाल्यापासून अनेकांना कंड सुटली आहे, आग आग होते आहे.

नाना अगदी योग्य बोललात पहा.....
तात्या अशा लोकांचा योग्य वेळीच समाचार घेतला पाहिजे !!!!!

कृपया मिपा करांनी अशा लेखना बद्दल जागरुक राहुन त्यात कोणत्याही पद्दतीने भाग न घ्यावा ही नम्र विनंती....

(मिपा प्रेमी)
मदनबाण.....

लेखकाच्या प्रतिभेबद्दल कुशंका नाही पण आपण जेथे वावरतो तेथेच थुंकणे असभ्य पणाच आहे.
'माणसाने शेंबूड व्हावे, मासिक पाळी व्हावे, ज्यानेत्याने आपापली आयमाय **न टाकावी किंवा "वारा सरणे..हिमवादळे" वगैरे ही भाषा कोणत्या सभ्य पणात बसते विचार ते लिहाणाराने करायचा आहे.
नागव्याने नाचणे लहान मुलाना चांगले दिसते. मोठे त्याची नक्कल करायला गेले की ते हिडीस /बिभत्स दिसते.
कधी अधुन मधुन येवुन मिपावर असला बिभत्सपणा करणे किंवा "वारा सरणे..हिमवादळे" असले हिडीस बरळणे ,काहीही कारण काढुन वादंग निर्माण करणे यातच लेखकाला इंटरेस्ट असावा असेच वाटते.
बटबटीत आणि हिडीस लिहिणे स्वतःच्या लेखनावर कोणी काही वेगळी प्रतिक्रिया दिली की त्याला कंपूगिरीकरत गलीच्छ गरळ भाषेत ठोकुन काढणे हाच ज्यांचा उद्देश असेल तर त्याना अनुल्लेखाने मारणेच योग्य ठरेल.
डुकराशी कुस्ती करायची तर आपण घाण होतोच पण त्याही पेक्षा जास्त वाईटम्हणेजे डुकराला तेच आवडते.
हेच खरे.
आमचे जालावरचे लेखन मिपा पासुन सुरु झाले.आम्हाला नमोगत आणि मिपा यावरच्या वादात काहीही इन्टरेस्ट नाही.
संजोपरावांनी अंगिकारलेल्या मार्गाबद्दल त्यांची मानगूट एकवेळ धरता येईल ; पण त्यांच्या हेतूंबद्दल शंका घेणे चुकीचे होईल
त्यांचे नक्की हेतु काय आहेत ते उघड आहेत. त्याबद्दल आमच्या मनात शंका नाही
बाकी मुक्तसुनीतरावांचे त्यांच्याशी काय गुळपीठ आहे ते अनाकलनीय आहे. जर ते दोन वेगळे इसम असतील तर बहुधा मिपावर एकमेकांचे परमनन्ट पाठराखीण म्हणुन वागत असतील. नवराबायकोतही हे नाते इतके "दो जिस्म एक जान" असे नसते.
कलीयुगातला हा एक चमत्कारच मानायला हवा.
'इनो' चा खप अचानक वाढला अशी बातमी आहे. हे इनो ची गरज असणारालाच कळु शकते
ज्याचे जळते त्यालाच कळते तसे...ज्याला जळजळते त्यालाच असे काही कळते हेच खरे.

छोटा डॉन's picture

30 May 2008 - 12:12 pm | छोटा डॉन

मान्यवर लेखकाच्या आत्तापर्यंतच्या लेखांचे व साहित्याचे आम्ही काही काळापुर्वी पंखे होतो पण सद्य परिस्थीती अशी बदलली आहे की मलाच कळेना की "असे का ?"
असो त्यांना जर त्यातच मोठेपणा वाटत असेल तर तो लखलाभ होवो !!!

बाकी आधी चाललेल्या "सुदलेखनाच्या चर्चांमध्ये" आम्ही काडीमात्र रस घेतला नाही कारण मुळात उद्देशच अर्थशुन्य आहे. शेवटी चर्चा ज्या मार्गाने गेल्या त्या वाचुन काही जणांनी आपला "अहंभाव" गोंजारण्याचे हौस फेडली हाच निष्कर्श निघतो कारण अजुन दुसरे काही निष्पन्न झालेच नाही ....
पण त्यानंतर अजिबत अपेक्षा नसताना ह्या अर्थाची कविता आली मग मात्र प्रतिसाद देणे गरजेचे बनले ...
कमीत कमी मला तरी ह्या कवितेचा उद्देश [ फार फार तर सौम्य भाषेत अर्थ म्हणू ] हा मुक्तसुनीत ने म्हटल्याप्रमाणे "कवितेमधे निश्चित वक्रोक्ती आहे आणि लेट्स् फेस इट् , ती वर्मावर प्रहार करणारी आहे. कुणाही मिपाकराला वाचताना वेदना होतील त्या मलाही झाल्याच. शेवटी आपल्याला प्रिय वाटणार्‍या गोष्टीवरची टीका कुणाला सहन होणार आहे ?". म्हणून उत्तर द्यायचा खटाटोप ...

पान वेगळे मांडुनि बसता प्यादे घोडे हसले
करु पाहिले दैवत आणिक तर्कट होऊन बसले

लै भारी, हीच अपेक्षा होती. बरं बाबा, सुदे आम्ही प्यादी , घोडी, मर्कट का आणखी काही पण "दैवताचे तर्कट झाल्याचा महान निष्कर्श कसा निघाला ?". जरा कुणी समजावुन सांगेल का ?
जर आता हे निष्पन्न झालेच आहे तर आपल्या मते "तर्कट" असलेल्या ह्या संस्थवर अशा अर्थपुर्ण चर्चा करणे ह्याला काय अर्थ ? हां आता जर आपला "अहंपणा" गोंजारायचा असेल तर मग त्याला पर्याय नाही ...

पाठ खाजवुनी एकमेकाची तळवे सुजुनी बसले
करु पाहिले दैवत आणिक तर्कट होऊन बसले

वा वा , पण ही सवय कुठली हे काहींच्या लक्षात आलेच नाही दिसतय. असो, झोपलेल्याला उठवणे शक्य आहे पण ज्याने सोंग घेतले आहे त्याबाबतील आम्हीच काय कोणीही हतबल होऊ शकतो ...
बाकी ते "प्रतिसादाचे राजकारण" आम्हाला नवे नाही. पण एक मुद्दा मला सांगावा वाटतो की असे राजकारण व प्रशासकीय अनुमतीची ह्या गोष्टीला मिपावर स्थान नाही.
उलट अशा काही अनावश्यक लेखांमुळे व त्यावरील तेवढ्याच अनावश्यक प्रतिसादामुळे इथले वातावरण बिघडत आहे हे लोकाम्च्या का लक्षात येत नाही ? यामुळे मिपावर मनमोकळेपणाने लिहणरे व प्रतिसाद देणारे यांची गोची होत आहे याचे तरी भान ठेवायला हवे. ही मंडळी [ आता जर नावे लिहली तर आमच्यावर "कंपुबाजीचा" आरोप करायला मोकळे ] आता ह्यामुळे वैतागली आहेत हे योग्य वेळी समजणे आवश्यक आहे.
मिपा हे एक जिवंत संस्थळ आहे आणि बहुतेक सर्व सभासद दिलदार पणे लिहतात व त्याला प्रतिसाद पण तसेच पडतात, कोणी स्वता काहीही न लिहायचे व्रत अंगे बाणून लोकांच्या "फालतू सुदलेखनाच्या चुकां" चा किस पाडत नाही ही आमच्यासाठी अभिमनाची गोष्ट आहे.

बाकी ते "इनो" च्या खपाचे आम्ही बघू पण मागणी लक्षात घेता त्याचा काळाबाजार होणार नाही ह्याची काळजी "खप वाढला"असे ज्यांच्या लक्षात आले त्यांनी घ्यावी.

पण जर आपला उद्देशच मिपावर वाईट गोष्टी घडाव्यात असा असेल तरच हे लेखन संभवते.
त्यामुळे काव्याला दाद देणार्‍या मंडळींना आमचे हे सांगणे की या कवितेमागील जळफळाट त्यांनी ध्यानात घ्यावा.
मिसळपाव स्थापन झाल्यापासून अनेकांना कंड सुटली आहे, आग आग होते आहे.
त्यांच्या मूळव्याधीच्या त्या वेदनांवर असले काव्यात्मक "कैलास जीवन" बोटावर घेऊन तेथे चोळत बसणे, याशिवाय ते काही करू शकत नाहीत. त्यामुळे असल्या जळफळाटातून निर्माण झालेल्या मूळव्याधी काव्यांना प्रतिभेचे निकष लावून गौरवण्यासारखे त्यात नाही.

बाकी या बाबतीत "नानांशी" सहमत ...

बाकी बिरुटेसरांनी म्हटल्यप्रमाणे "संस्थळावर काय लिहावे हा आपला प्रश्न . काय लिहिले, कसे लिहिले, त्याच्या आस्वादाबरोबर त्याचा उद्देश आणि योग्य समाचार घेण्याची ताकद आमच्यात नसली तरी, ती ताकद एकाच माणसात आहे, त्यांच्या पाठीशी आम्ही सतत असतो, आहोतच. तेव्हा एका दर्जेदार लेखकाने अशा भानगडीत पडावे याचे मात्र वाईट वाटत आहे, इतकेच सांगावे वाटते"

असो. गेट वेल सून !!!

संजोपरावांच्या लिखाणाचा पंखा पण कट्टर मिपाकर - छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

प्राजु's picture

30 May 2008 - 12:51 pm | प्राजु

गुड...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मन's picture

30 May 2008 - 1:19 pm | मन

१००००% सहमत.

आणखी काहि बोलण्यासारखं नाहिये आमच्याकडे.
फक्त एक प्रश्नः-
(तुमचं नमोगत आवडतं ना तुम्हाला, जा ना मग तिकडे आणी बसा खुशाल.
पण इथं येउन , जे चाललयं चांगलं त्यात कशाला मोडता घालताय?)

आपलाच,
मनोबा

विसोबा खेचर's picture

30 May 2008 - 1:26 pm | विसोबा खेचर

मनोगती संजूबाबाच्या कवितेची दखल आमच्या मिपापरिवाराने अगदी यथास्थितपणे घेतली याचे बरे वाटले! :)

वा!, सुंदर!, अप्रतिम कविता! असे म्हणून आनंदित झालेले मिपाच्या अस्तन्यातले छुपे मनोगती कोण हेही या निमित्ताने पुन्हा एकदा कळले याचा आनंद वाटला! :)

असो, सर्व मनोगतींचं आमच्या मिपा परिवारात खुल्या दिलानं स्वागत! :)

आपला,
(मिपाकर!) तात्या.

छोटा डॉन's picture

30 May 2008 - 1:40 pm | छोटा डॉन

मुळ मुद्दा असा आहे की "कोण कुठले आहे, कोणाची पाठ खाजवून कोणाचे तळवे सुजले, प्रतिसादाचे राजकारण, सभ्य / असभ्य पातळीचा तौलानीक अभ्यास " यासारख्या व इतर अशाच गोष्टींमध्ये आम्हाला काडीइतका इंटरेस्ट नाही व आम्हाला तो असण्याची अपेक्षा सुद्धा नाही.

आम्ही आपले आपल्या आनंदात , नशेत [ मग त्याला कुणी गुत्ता का म्हणेना ] मिपावर वावरत असतो व हे स्थळ "जिवंत" राखण्याचा प्रयत्न करत असतो. आम्ही कधी "दुसरीकडे" कुणाच्याही वाटेला गेलो नाही मग असे असताना ती गोष्ट "इथे" व्हावी याची अपेक्षा आम्ही का करावी ? जर ती घडत असेल तर गप्प का बसावे ?

सच्च्या मिपाकराना एव्हधच सांगावंसं वाटतं... मिपाची सर दुसर्‍या कुठल्याच संकेतस्थळाला नाही हे तर जगजाहीर आहे... आपण आपली आनंदाने मीठ-भाकरी खात असतो व जो अतिथी येतो त्याला ताटातली अर्धी भाकरी काढून देतो पण जर समोरुन "आपल्याच अन्नात माती कालवायचा प्रकार घडत" असेल तर गप्प राहू नका....

बाकी इतर कुठल्या अनावश्यक वादात आम्हाला काडीमात्र रस नाही...

कट्टर मिपाकर छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

विसोबा खेचर's picture

30 May 2008 - 2:03 pm | विसोबा खेचर

आपण आपली आनंदाने मीठ-भाकरी खात असतो व जो अतिथी येतो त्याला ताटातली अर्धी भाकरी काढून देतो पण जर समोरुन "आपल्याच अन्नात माती कालवायचा प्रकार घडत" असेल तर गप्प राहू नका....

है शाब्बास रे छोट्या डॉना! अगदी योग्य बोललास... :)

काही बलाढ्य संस्थळांच्या पित्त्यांना मिपामुळे सतत इतकं का अस्वस्थ का वाटत असतं हेच काही कळत नाही बुवा! :)

अवांतर - इनोचा खप अचानक वाढला की कमी झाला याबद्दल आम्हाला काहीच बातमी नाही. कारण आम्हाला ते कधी घ्यायचीच वेळ येत नाही! इनोची ज्यांना वारंवार गरज लागते ती मंडळी बहुदा इनोच्या स्टॉक डिलरच्या किंवा एजंटांच्या भोवती घुटमळून खपासंबंधी बातम्या काढत असावेत म्हणजे वेळीच ष्टॉक करून ठेवायला बरं! मिपाडिटी (म्हण्जे मिपाची ऍसिडिटी बर्र का मंडळी!) झाल्यावर उगाच धावाधाव नको! :)

असो..आमच्याकरता आम्ही हा विषय आता संपवत आहोत. बाकी चालू द्या...

तात्या.

मनस्वी's picture

30 May 2008 - 2:14 pm | मनस्वी

हे म्हणजे चांगल्या नांदणार्‍या घरात पाहुणचार घेण्यापेक्षा कुरापती काढून काड्या लावण्याचे काम झाले!
असो. आम्हाला त्याने काडीमात्र फरक पडत नाही.
कारण आम्ही इथे तत्त्वज्ञान वाचायला अन् पाजळायला कधी येतच नाही मुळी!
आपण किती प्रकांडपंडित आहोत हे सिद्ध करण्याची किंवा भासवण्याची गरज पण वाटत नाही.
आम्ही ४ टाळकी (आता १००० +) येतो, विचारांचे आदानप्रदान करतो आणि आमच्या घरात मनसोक्त बागडतो.
ऑलरेडी रस काढलेल्या ऊसाच्या चोथ्याचा रस काढण्यात अगदी इतका म्हणजे इतका इंटरेस्ट असेल.. अहो तर खुशाल काढा की.. इथे कोणी तुम्हाला काहीही म्हणणार नाही! पण तो रस इथे कुणाला पाजायचा आग्रह धरु नका बाबा.. आम्हाला नाही आवडत!

मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

प्रियाली's picture

30 May 2008 - 2:56 pm | प्रियाली

निरिक्षण :

१. आता मधुबाला, ओ पी नय्यर, मदन मोहन किंवा कोणत्यातरी एखाद्या जुन्या चित्रपट कलाकारावर वाचल्यावर टिपे गाळली नाहीत तरी हळहळ वाटण्याजोगा पण सुंदर लेख येणार किंवा सिंहासनचे परिक्षण! मग इथले पिडा, सहज, बिरूटे, तात्या वगैरी जुनी (वयाने) मंडळी त्या हळहळीत विरघळणार.

२. पिरंगुट आधीच झाल्याने आता कलंगुटच्या बंगल्यात मिपा संमेलन भरणार. त्यात डॉन, मन, मदनबाण, तात्या* इ. नवी (वयाने आणि अनुभवाने) मंडळी बाटली-जेवणात विरघळणार.

३. मिपाच्या पहिल्या वाढदिवशी इथल्या सर्व मंडळींना गुदगुल्या करेल असा एक लेख येणार आणि मग हे वरचे प्रतिसाद आम्ही दिले होते हो! पण त्यावेळी गोष्ट वेगळी होती. इतक्या प्रचंड प्रतिभेला आम्ही काहीबाही बोललो हा आमचा करंटेपणा या हळहळ कम गुदगुल्यांत मनस्वी आदी सगळया मंडळींची अस्वस्थता जन्माला येऊन नष्ट होणार.

सारांशः

मग काय होणार, काही नाही, पुढचा पिच्चर रिलीज होईपर्यंत जय आणि विरू दोस्तीच्या आणाभाका घेणार. एकमेकांच्या मनात "चंचीप्रवेश" करणार आणि पुढचा चित्रपट रिलीज झाला की...पुढच्या चित्रपटाचे नाव असेल - ये रे माझ्या मागल्या!

४. आमच्यासारखे काही अशा चर्चांत पूर्वी भाग घेतलेले आणि फारसा संबंध नसलेले आमच्यासारखे हक्का-बक्का राहणार. सांभाळ हो प्राजु

अनुमान :

मिपा असो की मनोगत, माणूस सर्वत्र सारखाच असतो. एखाद्याला आपला समुदाय (कल्ट) बनवण्यासाठी वेगवेगळ्या गिमिक्सची गरज लागते. सदर लेखकाची इश्टाईल आता आम्हाला माहित आहे.

या रोजच्या नाटकांना, संधी आणि ताटातूट, स्त्रियांची मासिक पाळी आणि मराठी साहित्य आणि वरील कविता वगैरे विषयांना सरावलेली

आपली (प्रशिक्षित)
प्रियाली.

* तसं मला वयाने मोठं कोण लहान कोण ते माहित नाही पण तात्या नं. ४ सोडून सर्वत्र असणार.

सहज's picture

30 May 2008 - 3:05 pm | सहज

तात्या व संजोपराव दोघांनी मिळुन आम्हा सगळ्यांना वेड्यात [म्हणजे अजुन काय वेगळे नका विचारु] काढायला केलेला हा बनाव तर नव्हे.

तात्या, रावसाहेब उत्तर द्या. तुम्ही एकत्र चियर्स करत असता हे कळले म्हणुन विचारतोय.

नाही एकमेकांच्या उरावर बसुन नंतर गळाभेटी करणारे पोहोचलेले राजकारणी लई पाहीलेत. :-)

(माहीतगार) आजानुकर्णा काय म्हणतोस? :-)

विसोबा खेचर's picture

30 May 2008 - 4:39 pm | विसोबा खेचर

तात्या व संजोपराव दोघांनी मिळुन आम्हा सगळ्यांना वेड्यात [म्हणजे अजुन काय वेगळे नका विचारु] काढायला केलेला हा बनाव तर नव्हे.

अरे नाही रे बाबा! आम्ही कुठलाही बनाव केलेला नाही!

हां, यापूर्वी मी स्वत:हून अनेकदा झालं गेलं विसरून जाऊन संजोपशी दोस्तीचा हात पुढे केलेला आहे परंतु त्याची तात्याविषयीची आणि मिपाविषयीची जळजळ थांबतच नाही आणि तो पुन्हा पुन्हा काहीतरी गरळ ओकून ठेवतो!

असो, प्रियालीनेही योग्यच लिहिले आहे. कारणं यापूर्वी अनेकदा असं झालेलं आहे. परंतु आता यापुढे नाही! प्रियाली म्हणते तसं लिहिलाच जरी अगदी त्यांनी एखादा सुंदर लेख, तर एक वाचक म्हणून केवळ एखाददोन शब्दात बरावाईट अभिप्राय द्यायचं काम करीन परंतु याच्या गळ्यात गळे घालायला यापुढे कधीही जाणार नाही! आत्तापर्यंत गेलो ही चूकच झाली आणि तीच प्रियालीने दाखवून दिली आहे. अगदी पूर्वी मनोगतावर असल्यापासूनच हा माणूस माझ्यावर पेश्शल खार खाऊन आहे. का ते माहीत नाही!

असो..

नो डाऊट, हा माणूस केव्हा केव्हा खूप छान लिहितो परंतु हा माणूस मानसिकदृष्ट्या आजारी आहे हीच गोष्ट खरी आहे. त्याला तात्याचा आणि पर्यायाने मिसळपावाचा फोबियाच आहे. त्याला या आजारातून लवकर आराम पडावा हीच प्रार्थना!

हा माणूस माझ्या मनातनं उतरला, अगदी कायमचा!

असो, झाल्याप्रकाराबद्दल 'वाईट वाटतं!' इतकंच म्हणेन...!

तात्या.

मनस्वी's picture

30 May 2008 - 4:19 pm | मनस्वी

प्रियालीताई
परखड, विश्लेषणपूर्ण अन् स्पष्ट मत मांडल्याबद्दल धन्यवाद.
थेट नावे घेउन त्या-त्या व्यक्तींना त्या-त्या कॅटॅगरीत बसविण्याआधी अजून थोडा अभ्यास करायला हवा होतास.

मनस्वी
"इतक्या प्रचंड प्रतिभेला आम्ही काहीबाही बोललो हा आमचा करंटेपणा या हळहळ कम गुदगुल्या."

प्रियाली's picture

30 May 2008 - 5:07 pm | प्रियाली

थेट नावे घेउन त्या-त्या व्यक्तींना त्या-त्या कॅटॅगरीत बसविण्याआधी अजून थोडा अभ्यास करायला हवा होतास.

त्या मूळ प्रतिसादात एक वाक्य घाईत अर्धवट राहिलं ते असं -

तात्या नं ४ सोडून कोणत्याही कॅटेगरीत बसू शकतात, कॅटेगरी हा शब्द माझा नाही. बाकीच्यांची नावे सहज आणि केवळ उदाहरणादाखल घेतली आहेत. ती म्हणजे तिच माणसे त्या त्या कॅटेगरीत बसतील असे नाही तरी ज्यांनी त्यांनी आपापल्या कॅटेगर्‍या निवडाव्यात किंवा आपण त्यात नाही असे समजून घ्यावे.

असो.

मनस्वी's picture

30 May 2008 - 5:11 pm | मनस्वी

समजून घेतले :)
परत घाईघाईत काहीतरी अर्धवट लिहित जाउ नकोस.

मनस्वी

अमोल केळकर's picture

30 May 2008 - 2:59 pm | अमोल केळकर

३. मिपाच्या पहिल्या वाढदिवशी ____
केंव्हा असतोहो? मिपाचा वाढदिवस. जरा आमच्या सारख्या नवीन सभासदास माहिती मिळाली तर बरं होईल.
आपला
( अनेक गोष्टी नवीन समजलेला) केळकर

प्रियाली's picture

30 May 2008 - 3:53 pm | प्रियाली

गणेशचतुर्थीला असतो.

मन's picture

30 May 2008 - 3:56 pm | मन

छान!
म्हणजे मग गंपती बाप्पा त्या दिवशी काही येड्यांना सुबुद्धी देतील अशी आशा करायला हरकत नाही.
(आणि त्यांना भरपुर "इनो"चा प्रसादही खिरापत म्हणुन द्यावा असा आमचा विचार आहे.
फारच लक्ष असतं ह्या लोकांचं इनो च्या रेट वर.)

आपलाच,
मनोबा

विजुभाऊ's picture

30 May 2008 - 3:19 pm | विजुभाऊ

या रोजच्या नाटकांना, संधी आणि ताटातूट, स्त्रियांची मासिक पाळी आणि मराठी साहित्य वगैरे विषयांना सरावलेली

वा ........बरे वाटले वाचुन...........हे वर नमूद केलेले असले शब्द या लेखकाचा हातखंडा. ते लेखकराव कोठे लिहीत असतात ते सर्वानाच ठाऊक आहे........हिडीस ,गलिच्छ लिहिले की त्यामुळे लेखन क्रान्ती होते हा आमचा अपसमज नाही.
"पिंजरा" चित्रपटाचे तीस वर्षानन्तर परिक्षण लिहिणारे कोण हे सर्वानाच माहीत आहे.
इथले काही लोक एकत्र येतात. गप्पागोष्टी करतात. त्यांची मैत्री होते. मिपा ला कल्ट म्हणत असतील तर त्या कल्टचे आम्ही अनुयायी आहोत हे आनन्दाने सांगु. मनमोकळे लिहिणे हे गिमिक मानले जात असेल तर मनमोकळेपणा हा मिपाचा प्राण आहे.
एखाद्या प्रतिसादचा राग आला म्हणुन मिपा वर लेखनच करणार नाही म्हणुन शपथा घेणारे कोण आहेत हेही लोकाना माहीत आहेत.
आम्ही मिपा कर जसे आहोत तसे आम्ही एकमेकांमुळे घडलेले आहोत. कोण्या ईतर संस्थळाच्या मेम्बरांमुळे नाही
या असल्या प्रतिसादांमुळे मिपावर हल्ली वादळे येत नाहीत. की मिपाकरांत झोडाझोडी होत नाही.

एकमेकाना आदराने प्रेमाने बोलावतो . उगाच इतराना कमअसल्ल म्हणुन हिणवत नाही. हाच काय तो मिपाकरांचा दोष.
आम्ही सारे अस्सल मिपाकर आहोत. मिपावरचे आमचे लिखाण येतच रहाणार. आपपल्या मकदुराप्रमाणे प्रतिसाद देत रहाणार.
वयाने लहानमोठे कसेका असू.......एकमेकांची विचारपूस करणार
:::::::::एक अस्सल मिपाकर विजुभाऊ

राजे's picture

30 May 2008 - 3:39 pm | राजे (not verified)

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

नाना फडणवीस's picture

30 May 2008 - 4:04 pm | नाना फडणवीस

अहो राजे,

त्यांना फुले नकोत, कैलास जीवन द्या. त्याची गरज आहे. फुले का तिथे लावता येतील?

नाना फडणवीस

चित्रा's picture

30 May 2008 - 6:36 pm | चित्रा

"कविता" म्हणून चांगलीच आहे. पण आत्ता लिहीण्याचे प्रयोजन कळले नाही.
मिपा जसे रोज असते तसेच खेळकरपणाने चाललेले आहे. काही विशेष कविता करण्यासारखे घडले आहे असे वाटले नाही.

"दुज्या सुरांचे, हाणा त्याला, कोण मध्ये हे घुसले" हे मिपावर विशेष झाले आहे असे वाटत नाही, उलट इतरत्र झालेले पाहिले आहे.

बाकी हे नेहमीचेच. चालू द्या. असल्या विषयांवरचा माझा हा शेवटचा प्रतिसाद.

धमाल मुलगा's picture

1 Jun 2008 - 9:08 pm | धमाल मुलगा

तसं काव्यातलं आपल्याला फार काही कळत नाहीच, पण छान वाटतेय ही कविता :)
अर्थात सन्जोपरावांच्या सिध्दहस्त लेखणीतून उतरलेली कोणतीही साहित्यकृती नक्कीच सरस असते असे आमचे निरिक्षण आहे, त्यामुळे तिच्या दर्जाविषयी प्रश्नच उद्भवत नाही...उच्चच असणार !

पण पुन्हा वाचली आणि आशयगर्भ उमगला. राग्....राग नाही आला...वाईट वाटलं !
सन्जोपराव उत्तम लेखक आहेतच, वादच नाही. आम्हाला साहित्यातला सा देखील लावता येत नाही, आणि सन्जोपराव म्हणजे साहित्यचंद्रच जणू आमच्यासाठी!
तरीही लहान तोंडी मोठा घास घेऊन विचारतो, माफ करा, पण...........
का...का असे करावेसे वाटले ? का सन्जोपराव?
अहो, तुमच्या लेखांवर इथं मिपावर देखील उड्या पडतात...लोक आवडीने वाचतात. हां आता आमच्यासारख्या तद्दन टवाळांसारख्या 'मासेस' ला सोडलं एकवेळ तरी 'क्लास' वाले कित्येक वाचक आहेतच ना मिपावर?
अहो, मग त्यांच्यावर असा अन्याय का? त्यांनादेखील ही दुषणे लागू पडतातच की! मिपाचे सदस्य ह्या नात्याने.
बाकी, आपलं कोणतं लेखन कुठे प्रकाशीत करावं हा नक्कीच ज्याचा-त्यचा प्रश्न आहे. पण इतरत्र उत्तमोत्तम साहित्य सादर करुन मिपावर मात्र एखाद्याच्या अंगणात येऊन त्यालाच शिव्या देण्यासारखा हा प्रकार वाटतो मला (व्यक्तिगत मत!)
एक आदर आहे तुमच्याबद्द्ल आम्हा सर्वांच्या मनात! हे असं अति-अतिसर्वसामान्यासारखं वागून का त्याला धक्का लावताय शेठ?
मान्य आहे, प्रत्येक माणूस आपल्या भाव-भावनांच्या कल्लोळात बुडालेला असतो, कधी त्या भावनांचा जोर वाढल्यावर भावनेच्या आहारी जाऊन माणूस असं काहीबाही करतो. शेवटी माणूस हा माणूस असतो, देव नव्हे! आम्हीही एकमेकांना शिव्या देतोच की! सगळेच करतात असे. पण कोणि फक्त शिव्या देण्यापुरता नक्कीच इथं येत नाही हो.
एकंदरीत मिपाच्या खेळकर कौटुंबिक वातावरणात विष कालवल्यासारखं वाटतंय हे असं वागणं :(

पाठ खाजवुनी एकमेकाची तळवे सुजुनी बसले

असेल बुवा तसेही. कोणी एव्हढा विचार केलाय? मिपा हे घर आणि मिपाचे गावकरी हे कुटुंब असं एकदा स्विकारल्यावर आपल्या घरातल्या एखाद्यावर कोणी राळ उडवली तर त्याच्या बाजुने बोललं तर हे असं असाव? आश्चर्य आहे बॉ !
मग इतरत्र जे चालतं ते काय असतं? 'तू माझ्या साडीला छान म्हणालास तरच मी तुझ्या शर्टाला नावाजेन' अशी परिस्थिती निदान मिपावर तरी नक्कीच नाहीये ना हो रावसाहेब?

दुज्या सुरांचे, हाणा त्याला, कोण मध्ये हे घुसले

हे कुठे घडत नाही ? थोड्याफार प्रमाणात ते सगळीकडेच घडतं ना? मग? निदान मिपावर चाळणी तरी नसते...आपल्याला हवं तेच निवडून सर्वत्र 'गुडी गुडी फील' आणण्यासाठी!

बघता बघता कट्टे सगळे गुत्ते होऊन बसले

साहेब....ही फक्त सुरुवात आहे..कट्टे भरण्याची...आगे आगे देखो होता है क्या....
आम्ही बालिश आहोत...मूढही आहो...आम्ही आपल्या परीने कट्टे भरवले...एक कट्टा तर भर दुपारी वाडेश्वरला झाला..खुद्द पुण्यात. प्राजुताई साक्षीला आहेच. तो बरा नाही दिसला..आणि त्यालाही कोणा गुत्ते म्हणणार्‍याची उपस्थिती नाही दिसली बुवा?

आणी गुत्त्यावर असतात ती भांडणे, शिवीगाळ, आणि बिभत्सपणा...
पुण्यातल्या पहिल्या कट्ट्यावर ॐकारच्या गज़ला, चित्तरशेठच्या गज़ला, डॉ.प्रसाद दाढ्यांच्या आवाजातली सदाबहार गाणी ह्यांचा विसर पडला की काळ्या चष्म्यामुळे दिसलंच नाही?
मिपाचा छापिल अंक काढण्याबद्द्ल झालेली चर्चाही आपल्यास माहित नसेलसं नाही वाटत मला! ह्या गोष्टी गुत्त्यांवर होत नसतात सरकार!!!!!!

असो!
कमीजास्त बोललो असेन तर मिपाचं शेंडेफळ समजुन माफ करा! तुम्हीही मिपाकर आहातच की :) मग घरातल्या लहानांना सांभाळून घेणं मोठ्यांनाच जमतं नै ?
पायरी सोडून बोललो असेन तर चुक पोटात घाला...पण अश्याप्रकारचे हिडीस प्रकार करुन इथलं वातावरण कृपया बिघडवू न्का!

आपला कृपाभिलाषी
- ध मा ल.

शरुबाबा's picture

2 Jun 2008 - 1:44 pm | शरुबाबा

आवाज कोणाचा , फक्त तात्याचाच आणी मिसळपाव चा

एक मी.पा. चा चाहता
शरुबाबा