गाडी कोणती घ्यावी

चिप्लुन्कर's picture
चिप्लुन्कर in काथ्याकूट
17 Sep 2011 - 10:33 am
गाभा: 

सध्या मी गाडी घेण्याचा विचार करत आहे. ठाण्यात माझ्या कडे यामाहा एस झेड हि गाडी आहे पण तिची उंची थोडी जास्तच असल्या मुळे मी ती गाडी विकून दुसरी घेण्याचे ठरवले आहे. सध्या मी हिरो होंडा सिडी डिलक्स किंवा बजाज एव्हेन्जर घेण्याचा विचार करत आहे. या दोन्ही गाड्या दोन वेगळ्या प्रकारच्या आहेत तरी मला या दोन्ही गाड्या आवडतात पण यातली नक्की कोणती घेऊ असा प्रश्ना सध्या माझ्या पुढे आहे.
तरी या बद्दल काही मदत किंवा सल्ले मिळाले तर बरे होईल .

आपला चिपळूण कर.

प्रतिक्रिया

ठाण्यात माझ्या कडे यामाहा एस झेड हि गाडी आहे

चायला आधी सांगितल असत तर तुमचीच घेतली असती कि हो..
उगाच नवीन घेतली

चेतन सुभाष गुगळे's picture

17 Sep 2011 - 10:49 am | चेतन सुभाष गुगळे

<< सध्या मी हिरो होंडा सिडी डिलक्स किंवा बजाज एव्हेन्जर घेण्याचा विचार करत आहे. >>

या दोन्हीपेक्षा हिरो होंडाचीच सिडी डॉन जास्त योग्य ठरेल. तत्वत: डिलक्स आणि डॉन मध्ये फारसा फरक नाही. पण जो काही किरकोळ फरक आहे तो पाहता डॉन घेऊन फायदाच होईल. माझ्या भावाकडे एप्रिल २००७ चे मॉडेल आहे आणि आम्ही हे फायदे अनुभवले आहेत.

शिल्पा ब's picture

17 Sep 2011 - 10:56 am | शिल्पा ब

कोणती परवडतेय?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Sep 2011 - 11:07 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चिप्लुन्कर, देखणी आणि रुबाबदार गाडी घ्या राव.
आपले पर्याय पाहता 'बजाज एव्हेन्जर २२०' चांगली दिसते.
होंडा सीडी डिलक्स खूपच शामळू वाटते.

-दिलीप बिरुटे

स्पा's picture

17 Sep 2011 - 11:15 am | स्पा

होंडा सीडी डिलक्स खूपच शामळू वाटते.

अगदी ,अगदी हिरो होंडा सिडी डिलक्स किंवा सिडी डॉन गटणे छाप लोकांसाठी ठीक आहे

(यामा चा मालक ) स्पा

परिकथेतील राजकुमार's picture

17 Sep 2011 - 11:13 am | परिकथेतील राजकुमार

तुम्ही सरळ बैलगाडी किंवा रिक्षा घ्या.

जाता येता आजूबाजूची मुले शाळेत सोडत चला.

आम के आम गुठलीयोंके दाम.

उच्लुन्धर

सिद्धार्थ ४'s picture

17 Sep 2011 - 11:49 am | सिद्धार्थ ४

प रा you are too much. :D

तिमा's picture

17 Sep 2011 - 4:23 pm | तिमा

बैलगाडीला सध्या एक लाखापेक्षा जास्त खर्च येतो.

नितिन थत्ते's picture

17 Sep 2011 - 11:49 am | नितिन थत्ते

बाईक घ्यायची आहे होय?

मला वाटलं गाडी म्हणजे "बीएसए-एसएलआर" घ्यायची आहे.

आदिजोशी's picture

17 Sep 2011 - 2:35 pm | आदिजोशी

पुणेकरांशिवाय जगात कुठलीही माणसं सायकल ला गाडी म्हणत नाहीत

स्पा's picture

17 Sep 2011 - 2:39 pm | स्पा

पुणेकरांशिवाय जगात कुठलीही माणसं सायकल ला गाडी म्हणत नाहीत

आदि भाऊ

__/\__

नितिन थत्ते's picture

17 Sep 2011 - 2:51 pm | नितिन थत्ते

चार वर्ष राहून गेलोय म्हणावं.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Sep 2011 - 10:55 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सायबाच्या देशात सायकलीला पुश बाईक म्हणतात.

शिल्पा ब's picture

21 Sep 2011 - 12:03 am | शिल्पा ब

इग्लंडात जाउन आल्याची झैरात दुसरं कै नै..

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Sep 2011 - 4:09 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

ब्रिटीश फिल्म्स ("हालीवूड" नव्हे!) आणि टीव्ही पाहिला तरी हे समजू शकेल. आणि इंग्लंडच काय, मी वेल्समधेही जाऊन आले आहे, हे म्हैत्ये का तुला?

शिल्पा ब's picture

21 Sep 2011 - 6:08 am | शिल्पा ब

वेल्स इंग्लंडाच्या बाहेर कुठेतरी आहे हे न्हवतं म्हैती...आणि तुम्ही जौन आलात हे आता कळ्ळं हो!!

टवाळ कार्टा's picture

17 Sep 2011 - 8:43 pm | टवाळ कार्टा

किमन शब्दात कमाल अपमान...

तुम्ही पण पुण्याचेच का :)

हिरो होंडा सीडी डिलक्स किंवा हिरो होंडा डॉन अशी कोणतीच गाडी बाजारात सध्या नाही आहे.तशी गाडी घ्यायची झाली तर तुम्हाला हिरो मोटो कॉर्प व होंडा इंडिया कडुन विवीध पार्ट घेवुन बनवावी लागेल.

छत्रपति's picture

17 Sep 2011 - 12:17 pm | छत्रपति

कळ दाबली की चालू होणारी आणि कान पिरगाळला की सुसाट पळणारी कुठलीही घ्या...!!!

एक नंबर आहे ...अ‍ॅव्हरेज आणि लूक्स दोन्ही आहेत

जो मूर्ख मूर्ख आहे तो मूर्ख, मूर्ख नसेल तर,
एका मूर्ख असलेल्या मुर्खाने, दुसऱ्या मूर्ख नसलेल्या
मुर्खाला, जर मूर्ख म्हटले ; तर त्या दोघाही मूर्खांना
मूर्ख ठरवणे, मूर्खपणाचे ठरते

कानडाऊ योगेशु's picture

17 Sep 2011 - 3:59 pm | कानडाऊ योगेशु

लग्न झाले असल्यास वा इतक्यातच होणार असल्यास एखादी फॅमिली बाईक घ्या.(होन्डा अ‍ॅक्टीवा,डिओ इ.इ.)
पुढे त्रास होणार नाही. भाज्या आणणे वा इतर तत्सम कामासाठी फार उपयोगी पडेल.
इतर बाईक वरुन साधी दुधाची पिशवी पण आणताना त्रास होतो.

नाहीतर एकतर बाईक आणुन तरी पस्तवाल अथवा लग्न करुन तरी.!

अनामिक's picture

17 Sep 2011 - 5:15 pm | अनामिक

नाहीतर एकतर बाईक आणुन तरी पस्तवाल अथवा लग्न करुन तरी.!

म्हणजे बाई असो की बाईक, पस्तावल्या जातोच... नाही?

कानडाऊ योगेशु's picture

17 Sep 2011 - 6:00 pm | कानडाऊ योगेशु

तसे नव्हे हो..

जर लग्न करायचे असेल आणि जर चिप्ळुनकरांनी एखादी रोबस्ट अशी "गर्लफेंड" बाईक घेतली तर त्यांना लग्नानंतर कराव्या लागण्यार्या बाजारहाट कामासाठी ती काहीही उपयोगाची नाही.

त्याअर्थाने ते "तसली" बाईक घेऊन व मग लग्न करुन पस्तावतील असे म्हटले होते.

माझीही शॅम्पेन's picture

18 Sep 2011 - 12:11 am | माझीही शॅम्पेन

लग्न झाले असल्यास वा इतक्यातच होणार असल्यास एखादी फॅमिली बाईक घ्या.(होन्डा अ‍ॅक्टीवा,डिओ इ.इ.)
पुढे त्रास होणार नाही. भाज्या आणणे वा इतर तत्सम कामासाठी फार उपयोगी पडेल.

हेच बोलतो

अक्टिवा पेमी शॅम्पेन

अत्रुप्त आत्मा's picture

17 Sep 2011 - 6:16 pm | अत्रुप्त आत्मा

एव्हेंजर २२० चा येक प्राब्लेम हाय?कोनचं बी चाक पंक्चर होउन द्या, बाई(क) जागेवरच बसती...

तुम्ही चिपळूणकर ऐवजी खन्ना, मल्होत्रा, कपूर वगैरे असता, तर हा प्रश्नच तुम्हाला पडला नसता.
बाइक ऐवजी तुम्ही बायको आणली असती, आणि तिच्याबरोबर बाइकच काय, चारचाकी गाडी, फर्निचरसह फ्लॅट, वगैरे वगैरे सर्वच आले असते....
अर्थात या प्रतिसादातून तुम्हाला काही मदत किंवा सल्ला मिळाला नाही, याबद्दल क्षमस्व.

टवाळ कार्टा's picture

17 Sep 2011 - 8:37 pm | टवाळ कार्टा

सुचवलेल्या दोन्ही बाइक्स पुर्णपणे वेगवेगळ्या टाईपच्या आहेत्
बाईकच्या उंचीचा त्रास असेल तर मग खालील पर्यायांचा विचार करा

http://www.bajajauto.com/pulsar/Pulsar/pulsar135.html

http://tvsmotor.in/apache.asp

http://www.bajajauto.com/probiking/home.html

अपाचे चे कोणतेही मोडेल छान आहे आणी वरच्या सगळ्या बाइक उंचीला कमी आहेत

५० फक्त's picture

17 Sep 2011 - 10:41 pm | ५० फक्त

चिपळुणकर, अ‍ॅव्हेंजर २२०, घ्या, पोरगी फिरवणे ते मागे १०० किलोचे पोते बांधुन आणणे दोन्ही साठी उपयोगी आहे, आणि हायवेला तर जाम जाम मजा आहे,

स्कुटरेट घेउ नका, कारण ' अगर आप बिवि से ( अपनि) करते हो प्यार तो अ‍ॅक्टिवा / विगो / अ‍ॅक्सेस / गेला बाजार स्कुटी से कैसे करोगे इन्कार.

रमताराम's picture

20 Sep 2011 - 1:05 am | रमताराम

पोरगी फिरवणे ते मागे १०० किलोचे पोते बांधुन आणणे दोन्ही साठी उपयोगी आहे,
काय तुलना आहे राव, आवडली आपल्याला. आणि या वाक्यातील अंतःसूर पाहता पोरगी फिरवण्याचे आपले दिवस सरले आहेत (पक्षी: मागे पोतेच बांधून नेण्याचे दिवस आले आहेत) असे निरीक्षण नोंदवतो.

आणि हायवेला तर जाम जाम मजा आहे,
पण हायवेला भर वेगात असताना एखादेवेळी एकदम ब्रेक लावला तर पोतं पडेल की तुमचं. की पोतं बांधून ठेवायला बेबी सीट इन्-बिल्ट... आय मिन ऑन्-बिल्ट आहे या गाडीला

राजेंद्र मेहेंदळे's picture

1 Jul 2014 - 1:48 pm | राजेंद्र मेहेंदळे

पोरगी फिरवणे आणि शंभर किलोचे पोते फिरवणे या दोन गोष्टींना ते एकच समजत असावेत :)

या धाग्याला टाइमपास धागा समजू नये

अति महत्वाच्या प्रश्नावर मते मागवली आहेत

टवाळ कार्टा's picture

18 Sep 2011 - 4:48 pm | टवाळ कार्टा

ऑब्जेक्शन मीलॉर्ड... (हा डायलॉग मला असाच ऐकू येतो)

मी ३ गाड्या सुचवल्या होत्या (ज्या कमी उंची असलेल्या लोकांना चालवयला सोप्या आहेत)

पल्सर १३५ (मायलेज आणि स्पीड दोन्ही मस्त आहे)
अपाचे* (कोणतेही मोडेल १६०, RTR-१६०, RTR Fi-१६०, RTR-१८०, RTR-१८० ABS) - स्पीड मस्तच आहे आणि मायलेज ठिकठाक
यामाहा** R-१५, R-१५ २.० (नवीन) (निंजा-२५० परवडत नसेल आणि भन्नाट स्पीड हवा असेल तर ही घ्यावी)
निंजा-२५० (परवडत असेल तर हे घ्या....मुली स्वता मागे मागे येतील ;))

धागा सुरु करताना सुचवलेल्या दोन्ही बाइक्स (एवेन्जेर आणि CD-Don) या पुर्णपणे वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत (किंमत आणि लुक्स)
म्हणुन मी पर्याय सुचवताना फक्त कमी उंचीचाच विचार केला

आता मला हे समजत नाहीये कि मी माझ्या प्रतिसादात काय टवाळ्पणा केला :)

* याचा उच्चार असाच आहे
** हा पर्याय आत्ताच सुचला

एकोणआहेरेतोएवढ्याअतिमह्त्वाच्याधाग्यालाटाइमपाससमजतआहेकाहिकळतेकारेतुम्हालाकायविषयाअणिकायचेष्टाकरताअशाविष्याचीलाजवाटलीपाहिजेतुम्हाला.

चित्रगुप्त's picture

18 Sep 2011 - 1:00 am | चित्रगुप्त

एकोणआहेरेतोएवढ्याअतिमह्त्वाच्याधाग्यालाटाइमपाससमजतआहेकाहिकळतेकारेतुम्हालाकायविषयाअणिकायचेष्टाकरताअशाविष्याचीलाजवाटलीपाहिजेतुम्हाला.....

वावावाफारचआवडलीबुवातुमच्यालेखनाचीहीशैलीआतायापुढीलधागाआम्हीयाशैलीतचलिहिणारहेनक्की.

lakhu risbud's picture

18 Sep 2011 - 1:08 am | lakhu risbud

काय त्या सायकलींच्या मागं लागता राव ? हि आशी येखांदी गाडी घ्या ना.Suzuki Hayabusa

चेतन सुभाष गुगळे's picture

18 Sep 2011 - 1:18 am | चेतन सुभाष गुगळे

ज्युनिअरुद्दीन परलोकवासी झाले अशाच गाडीच्या अपघातात सापडून...

टवाळ कार्टा's picture

18 Sep 2011 - 4:27 pm | टवाळ कार्टा

हो त्याच्याकडे पण हिच होती...मी फोटो बघीतला आहे

कुंदन's picture

18 Sep 2011 - 11:20 pm | कुंदन

गाडी लाख परवडेल हो.
अगदी मर्शिडीझ घेउ , पण पेट्रोल परवडले पायजे ना.

आशु जोग's picture

19 Sep 2011 - 9:38 pm | आशु जोग

काय? आज तुम्ही आय टी वाल्यांना शिव्या घातल्या नाहित? अनिवासिंच्या नावाने खडे फोडले नाहित? ...अरेरे! स्वतःला पुरोगामी कसे म्हणवते तुम्हाला?

--

हे छान आहे
म्हणजे कुणाला तरी शिव्या घातल्याशिवाय
आम्ही कसे पुरोगामी

शाहिर's picture

19 Sep 2011 - 9:41 pm | शाहिर

रीप्लय द्या कि राव ,
हि ता मान्स काय काय बोलु राह्यले ..साम्गू राह्यले....

आनी तुमी काइच बोलेना ...अशाने कसा जमाच गाडीच ,

मी सांगते चिपळूणकर, गाडी अशीच घ्या जी न बंद पडता एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणे माणसे वाहून नेईल. उगा फ्याशन करायला जावू नका. पेट्रोलचे दर वाढले आहेत तसेही.

टवाळ कार्टा's picture

20 Sep 2011 - 10:48 pm | टवाळ कार्टा

मग बैलगाडी घ्या की राव
हा.का.ना.का.
:)

रेवती's picture

21 Sep 2011 - 12:10 am | रेवती

नका हो चिपळूणकर, ट. का. साहेबांचे ऐकू नका.
बैलांच्या वैरणीची प्रश्न उभा राहील आणि आता काय करू म्हणून विचाराल.
आजकाल माणसाला र्‍हायला जागा मिळत नाही तिथं गोठा कुठं बांधाल.
पुन्हा साफसफाई, शेणाच्या गोवर्‍या थापून चिकटवायच्या भिंती कुठनं आणाल?
घरी पाणी विजेवर तापवत असाल तर बंद करून बंब आणि बंबफोड आणून त्यात गोवर्‍या वापरून पाणी तापवावे लागेल तेंव्हा त्या संपतील. या प्रश्नांना तोंड देण्याऐवजी साधी मोटारसायकल (फटफटी) घ्या.

टवाळ कार्टा's picture

22 Sep 2011 - 9:49 am | टवाळ कार्टा

आइशप्पत....एक तीर मे दो निशाने
\m/

टवाळ कार्टा's picture

22 Sep 2011 - 8:11 pm | टवाळ कार्टा

आणि मला साहेब नका म्हणु... आजकाल कोणिही स्वताला साहेब म्हणतो आणि पोस्टरवर फोटो छापतो :)

चिप्लुन्कर's picture

20 Sep 2011 - 10:57 am | चिप्लुन्कर

अवेंजर कडे मत जात आहे पण इंधनाचे भाव पाहता नंतर बरेच जड जाणार असे वाटते

आमच्या ग्रुप मधे २ अव्हेंजर घेतल्या ..क्रुझर पद्ध्ती च्या बाइक मुळे लगेच त्रिप ठरली,
पुणे ते भंडार दरा - कलसू बाइ असे जाय्चे ठरले..एका खेड्यात गाड्या पार्क करुन निघलो ..थंडी आणी पाउस या मुळे कदाचित बॅटरी डाउन झाली ..

अव्हेंजर किक स्टार्ट नाही,, हे तेव्हा जाणवले,
ते धुड ढकलत पळवू न स्टार्ट करावे लागले २ दिवसा च्या ट्रेक नंतर हे भारी पडले..

त्या मुळे विचार करा

आशु जोग's picture

20 Sep 2011 - 9:27 pm | आशु जोग

अव्हेंजर हे हे हे

मग बुलेट घ्या ना

आता बॅटरी स्टार्टही आहे काही मॉडेलला

daredevils99's picture

22 Sep 2011 - 10:33 am | daredevils99

ब्याटरी स्टार्ट? की बटन स्टार्ट?

प्रसाद गोडबोले's picture

1 Jul 2014 - 12:17 pm | प्रसाद गोडबोले

ह्या धाग्यावर सायकल कोणती घावी अशी चर्चा केली तर चालेल का ?

चालेल असे गृहीत धरुन .... *biggrin*

ह्या तीन सायकल शॉर्टलिस्ट केल्या आहेत ... फायर फॉक्स रॅपीड २१ एस ... मॉन्ट्रा रॉक १ ... हर्क्युलस रायदर निओ

http://www.choosemybicycle.com/in/en/compare-bicycles/firefox__rapide-21...

1

2

3

फायरफॉक्स महाग आहे पण मटेरियस सगळं बेस्ट आहे ... मॉन्ट्रा दिसायला तरी लय भारी वाटली ...ह्यातली हर्कुलस रायडर बंद झालीये म्हणे ... डीलरने हर्क्युलस कॅनियन घ्याअसे सुचवले आहे

4

प्लीज अ‍ॅडव्हाईज :)

एस's picture

1 Jul 2014 - 12:51 pm | एस

सायकल मॉनिटरवर मावत नाय्यिये. एवढ्या मोठ्या सायकली घेऊ नका. दुसरी बरी दिसतेय. तीच घ्या. ;-)

प्रसाद गोडबोले's picture

1 Jul 2014 - 1:05 pm | प्रसाद गोडबोले

=))

इमेज टाकताना चुकुन साईझ स्पेसीफाय करायचा राहिला त्यामुले असा घोळ झाला .

पैसा's picture

1 Jul 2014 - 1:34 pm | पैसा

कापून लहान केल्या.

कपिलमुनी's picture

3 Jul 2014 - 3:16 pm | कपिलमुनी

किमती म्हणायच्या का काय !!
सायकलीविषयीच्या बाळबोध कल्पना पुसल्या गेल्या ;)

बहुधा आज काल बँक सुद्धा सायकल लोन देत असतील

बहुधा आज काल बँक सुद्धा सायकल लोन देत असतील

देते, खरेच देते!!! जायंट नामक मोठ्ठी सैकल कुंपिणी भारतात नुकतीच लाँच झालीये. त्यांच्या सैकलींची मिणिमम किंमत रु. २५ हज्जार फक्त! त्यांपैकी काहींवर ईएमाय सुविधाही आहे =))

कपिलमुनी's picture

3 Jul 2014 - 3:38 pm | कपिलमुनी

जुनी पहिली घोडा सायकल आठवली
Atlas

त्यानंतर बीसए एसेलआर आली .. तिच्या बारीक चाकामुळे आणि आर्कषक फ्रेम मुळे छान दिसायची ..आणि वेगाने पळायची .. नंतर हीरोच्या रेंजर ने व्यावसायिक गणिते बदलली.. आणि घोडा सायकल फक्त दुधवाल्यांकडेच राहिली..

सध्या सायकलींगचा ट्रेंड पुन्हा जोर धरतो आहे..
हेल्थ काँशस लोक्स पुन्हा सायकलीकडे वळले आहेत.. आणि सायकलीच्या किंमतीही कॉर्पोरेटला साजेश्या आहेत

बाकी कै म्हणा, घोडा सैकलीची सर या गीअरच्या सैकलींना नाही. घोडा सैकलीवर आरामात एखाद्या घोड्यावर बसल्यागत बसता येतं, सर्वांत भारी म्ह. कॅरेजवर बसता येतं ते बाकी सैकलींचर बाय डेफिनिषणच जमत नै. :(

कपिलमुनी's picture

3 Jul 2014 - 3:55 pm | कपिलमुनी

आम्ही मित्र बरेच मजेशीर प्रकर करायचो ..कोणाला लिफ्ट द्यायची असल्यास त्याने कॅरेज वर बसून 'प्याडेल' मारायचे ..

लहानपणी मधल्या बारवरून पाय पुरायचे नाहीत तेव्हा मधून पाय घालून सायकल चालवायची ..आता ते गेश्चर आठवला तरी हसू येता :)
सायकलला तो डायनामो चा लाईट , हँडलला मऊ आणि झिरमिळ्या असलेले कव्हर ..
आणि मागच्या स्पोक मधे एखदा पुट्ठा अडकवायचा ... फट फट असा आवाज काढत घंटी वाजवत बुंगवत जायचा ..

मधून पाय घालून चालवणे, झालंच तर पैल्यांदा 'हॉपिंग' करत शिकणे, इ. तर लयच खंग्री प्रकार. अपि च कॅरिजवर उलटे बसणे, हँडेल वर करून 'विली' करणे, इ.इ. अनेक जबराट प्रकार. पण शेवटी एखादा कमी गर्दी वाला रूट असावा, आणि त्यावर एखाद्या तत्त्वज्ञाच्या ष्टायलीत कॅरिजवर बसून आरामात इन्फिनिटीची वर्तुळे काढत काढत, संध्याकाळचे आकाश पाहत, विश्वाची चिंता करत सायकल चालवावी हे खरे स्वर्गसुख.

प्रसाद गोडबोले's picture

3 Jul 2014 - 4:18 pm | प्रसाद गोडबोले

असे सगळे अनुभव जरा घासुन पुसुन लिहिलेत तर एखादा मस्त लेख होईल :)

खरे आहे..पाहू कधी मूड लागतो ते. :)

हायर एन्ड सायकलींच्या किमती तेवढ्या प्रमाणात वाढलेल्या नाहियेत. गेल्या पाच वर्षात, साध्या सायकलींच्या किमती तिप्पट होत असताना, ७ गिअरच्या बेसिक सायकलीची किंमत फक्त दिडपट वाढली आहे...

पिलीयन रायडर's picture

3 Jul 2014 - 3:43 pm | पिलीयन रायडर

मोदकला विचारु शकता.. त्याने नुकतीच घेतली आहे आणि त्याचा सायकल नियमित चालवणार्‍यांचा एक ग्रुप सुद्धा आहे..

दाते प्रसाद's picture

4 Jul 2014 - 12:00 pm | दाते प्रसाद

Decathlon

Decathlonची rock rider 5.0 घ्या . लई भारी आहे

या साइटवर रॅलेच्या सायकली दिसतायत. मला वाटलेलं की ती कंपनी बंद झाली आहे.....