✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गाडी कोणती घ्यावी

च
चिप्लुन्कर यांनी
Sat, 09/17/2011 - 10:33  ·  लेख
लेख
सध्या मी गाडी घेण्याचा विचार करत आहे. ठाण्यात माझ्या कडे यामाहा एस झेड हि गाडी आहे पण तिची उंची थोडी जास्तच असल्या मुळे मी ती गाडी विकून दुसरी घेण्याचे ठरवले आहे. सध्या मी हिरो होंडा सिडी डिलक्स किंवा बजाज एव्हेन्जर घेण्याचा विचार करत आहे. या दोन्ही गाड्या दोन वेगळ्या प्रकारच्या आहेत तरी मला या दोन्ही गाड्या आवडतात पण यातली नक्की कोणती घेऊ असा प्रश्ना सध्या माझ्या पुढे आहे. तरी या बद्दल काही मदत किंवा सल्ले मिळाले तर बरे होईल . आपला चिपळूण कर.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
17648 वाचन

💬 प्रतिसाद (67)

प्रतिक्रिया

ठाण्यात माझ्या कडे यामाहा एस

स्पा
Sat, 09/17/2011 - 10:45 नवीन
ठाण्यात माझ्या कडे यामाहा एस झेड हि गाडी आहे चायला आधी सांगितल असत तर तुमचीच घेतली असती कि हो.. उगाच नवीन घेतली
  • Log in or register to post comments

पर्यायात थोडा बदल सूचवितो

चेतन सुभाष गुगळे
Sat, 09/17/2011 - 10:49 नवीन
<< सध्या मी हिरो होंडा सिडी डिलक्स किंवा बजाज एव्हेन्जर घेण्याचा विचार करत आहे. >> या दोन्हीपेक्षा हिरो होंडाचीच सिडी डॉन जास्त योग्य ठरेल. तत्वत: डिलक्स आणि डॉन मध्ये फारसा फरक नाही. पण जो काही किरकोळ फरक आहे तो पाहता डॉन घेऊन फायदाच होईल. माझ्या भावाकडे एप्रिल २००७ चे मॉडेल आहे आणि आम्ही हे फायदे अनुभवले आहेत.
  • Log in or register to post comments

कोणती परवडतेय?

शिल्पा ब
Sat, 09/17/2011 - 10:56 नवीन
कोणती परवडतेय?
  • Log in or register to post comments

चिप्लुन्कर, देखणी आणि

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 09/17/2011 - 11:07 नवीन
चिप्लुन्कर, देखणी आणि रुबाबदार गाडी घ्या राव. आपले पर्याय पाहता 'बजाज एव्हेन्जर २२०' चांगली दिसते. होंडा सीडी डिलक्स खूपच शामळू वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

+१

स्पा
Sat, 09/17/2011 - 11:15 नवीन
होंडा सीडी डिलक्स खूपच शामळू वाटते. अगदी ,अगदी हिरो होंडा सिडी डिलक्स किंवा सिडी डॉन गटणे छाप लोकांसाठी ठीक आहे (यामा चा मालक ) स्पा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कशाला ?

परिकथेतील राजकुमार
Sat, 09/17/2011 - 11:13 नवीन
तुम्ही सरळ बैलगाडी किंवा रिक्षा घ्या. जाता येता आजूबाजूची मुले शाळेत सोडत चला. आम के आम गुठलीयोंके दाम. उच्लुन्धर
  • Log in or register to post comments

:)

सिद्धार्थ ४
Sat, 09/17/2011 - 11:49 नवीन
प रा you are too much. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

बैलगाडी

तिमा
Sat, 09/17/2011 - 16:23 नवीन
बैलगाडीला सध्या एक लाखापेक्षा जास्त खर्च येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

अरेच्चा

नितिन थत्ते
Sat, 09/17/2011 - 11:49 नवीन
बाईक घ्यायची आहे होय? मला वाटलं गाडी म्हणजे "बीएसए-एसएलआर" घ्यायची आहे. Image removed.
  • Log in or register to post comments

थत्ते चाचा

आदिजोशी
Sat, 09/17/2011 - 14:35 नवीन
पुणेकरांशिवाय जगात कुठलीही माणसं सायकल ला गाडी म्हणत नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

ठ्या ठ्या ठ्या

स्पा
Sat, 09/17/2011 - 14:39 नवीन
पुणेकरांशिवाय जगात कुठलीही माणसं सायकल ला गाडी म्हणत नाहीत Image removed.Image removed.Image removed. आदि भाऊ __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

चार वर्ष राहून गेलोय म्हणावं.

नितिन थत्ते
Sat, 09/17/2011 - 14:51 नवीन
चार वर्ष राहून गेलोय म्हणावं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

सायबाच्या देशात सायकलीला पुश

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 09/20/2011 - 22:55 नवीन
सायबाच्या देशात सायकलीला पुश बाईक म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

इग्लंडात जाउन आल्याची झैरात

शिल्पा ब
Wed, 09/21/2011 - 00:03 नवीन
इग्लंडात जाउन आल्याची झैरात दुसरं कै नै..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

तसे नव्हे गो!

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 09/21/2011 - 04:09 नवीन
ब्रिटीश फिल्म्स ("हालीवूड" नव्हे!) आणि टीव्ही पाहिला तरी हे समजू शकेल. आणि इंग्लंडच काय, मी वेल्समधेही जाऊन आले आहे, हे म्हैत्ये का तुला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

वेल्स इंग्लंडाच्या बाहेर

शिल्पा ब
Wed, 09/21/2011 - 06:08 नवीन
वेल्स इंग्लंडाच्या बाहेर कुठेतरी आहे हे न्हवतं म्हैती...आणि तुम्ही जौन आलात हे आता कळ्ळं हो!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

किमन शब्दात कमाल

टवाळ कार्टा
Sat, 09/17/2011 - 20:43 नवीन
किमन शब्दात कमाल अपमान... तुम्ही पण पुण्याचेच का :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

चिप्लुन्कर आधी गाड्यांची नावे नीट बघा

वेताळ
Sat, 09/17/2011 - 11:57 नवीन
हिरो होंडा सीडी डिलक्स किंवा हिरो होंडा डॉन अशी कोणतीच गाडी बाजारात सध्या नाही आहे.तशी गाडी घ्यायची झाली तर तुम्हाला हिरो मोटो कॉर्प व होंडा इंडिया कडुन विवीध पार्ट घेवुन बनवावी लागेल.
  • Log in or register to post comments

हे पहा

चिप्लुन्कर
Sat, 09/17/2011 - 12:07 नवीन
http://www.heromotocorp.com/hero_admin/data_content/product_ebrochure/hero_cddeluxe_ebrouchure.pdf
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

गाडी घ्यायचीये???

छत्रपति
Sat, 09/17/2011 - 12:17 नवीन
कळ दाबली की चालू होणारी आणि कान पिरगाळला की सुसाट पळणारी कुठलीही घ्या...!!!
  • Log in or register to post comments

कमि उंचीची अपाचे आर टी आर घ्या

शाहिर
Sat, 09/17/2011 - 14:20 नवीन
एक नंबर आहे ...अ‍ॅव्हरेज आणि लूक्स दोन्ही आहेत
  • Log in or register to post comments

जो मूर्ख मूर्ख आहे तो मूर्ख,

आशु जोग
Sat, 09/17/2011 - 23:57 नवीन
जो मूर्ख मूर्ख आहे तो मूर्ख, मूर्ख नसेल तर, एका मूर्ख असलेल्या मुर्खाने, दुसऱ्या मूर्ख नसलेल्या मुर्खाला, जर मूर्ख म्हटले ; तर त्या दोघाही मूर्खांना मूर्ख ठरवणे, मूर्खपणाचे ठरते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहिर

लग्न झाले असल्यास वा इतक्यातच

कानडाऊ योगेशु
Sat, 09/17/2011 - 15:59 नवीन
लग्न झाले असल्यास वा इतक्यातच होणार असल्यास एखादी फॅमिली बाईक घ्या.(होन्डा अ‍ॅक्टीवा,डिओ इ.इ.) पुढे त्रास होणार नाही. भाज्या आणणे वा इतर तत्सम कामासाठी फार उपयोगी पडेल. इतर बाईक वरुन साधी दुधाची पिशवी पण आणताना त्रास होतो. नाहीतर एकतर बाईक आणुन तरी पस्तवाल अथवा लग्न करुन तरी.!
  • Log in or register to post comments

नाहीतर एकतर बाईक आणुन तरी

अनामिक
Sat, 09/17/2011 - 17:15 नवीन
नाहीतर एकतर बाईक आणुन तरी पस्तवाल अथवा लग्न करुन तरी.! म्हणजे बाई असो की बाईक, पस्तावल्या जातोच... नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

तसे नव्हे हो.. जर लग्न करायचे

कानडाऊ योगेशु
Sat, 09/17/2011 - 18:00 नवीन
तसे नव्हे हो.. जर लग्न करायचे असेल आणि जर चिप्ळुनकरांनी एखादी रोबस्ट अशी "गर्लफेंड" बाईक घेतली तर त्यांना लग्नानंतर कराव्या लागण्यार्या बाजारहाट कामासाठी ती काहीही उपयोगाची नाही. त्याअर्थाने ते "तसली" बाईक घेऊन व मग लग्न करुन पस्तावतील असे म्हटले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक

लग्न झाले असल्यास वा इतक्यातच

माझीही शॅम्पेन
Sun, 09/18/2011 - 00:11 नवीन
लग्न झाले असल्यास वा इतक्यातच होणार असल्यास एखादी फॅमिली बाईक घ्या.(होन्डा अ‍ॅक्टीवा,डिओ इ.इ.) पुढे त्रास होणार नाही. भाज्या आणणे वा इतर तत्सम कामासाठी फार उपयोगी पडेल.
हेच बोलतो अक्टिवा पेमी शॅम्पेन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

एव्हेंजर २२० चा येक प्राब्लेम

अत्रुप्त आत्मा
Sat, 09/17/2011 - 18:16 नवीन
एव्हेंजर २२० चा येक प्राब्लेम हाय?कोनचं बी चाक पंक्चर होउन द्या, बाई(क) जागेवरच बसती...
  • Log in or register to post comments

चिपळूणकर ऐवजी खन्ना, मल्होत्रा, कपूर वगैरे असता तर...

चित्रगुप्त
Sat, 09/17/2011 - 20:14 नवीन
तुम्ही चिपळूणकर ऐवजी खन्ना, मल्होत्रा, कपूर वगैरे असता, तर हा प्रश्नच तुम्हाला पडला नसता. बाइक ऐवजी तुम्ही बायको आणली असती, आणि तिच्याबरोबर बाइकच काय, चारचाकी गाडी, फर्निचरसह फ्लॅट, वगैरे वगैरे सर्वच आले असते.... अर्थात या प्रतिसादातून तुम्हाला काही मदत किंवा सल्ला मिळाला नाही, याबद्दल क्षमस्व.
  • Log in or register to post comments

:)

टवाळ कार्टा
Sat, 09/17/2011 - 20:37 नवीन
सुचवलेल्या दोन्ही बाइक्स पुर्णपणे वेगवेगळ्या टाईपच्या आहेत् बाईकच्या उंचीचा त्रास असेल तर मग खालील पर्यायांचा विचार करा http://www.bajajauto.com/pulsar/Pulsar/pulsar135.html http://tvsmotor.in/apache.asp http://www.bajajauto.com/probiking/home.html अपाचे चे कोणतेही मोडेल छान आहे आणी वरच्या सगळ्या बाइक उंचीला कमी आहेत
  • Log in or register to post comments

चिपळुणकर, अ‍ॅव्हेंजर २२०,

५० फक्त
Sat, 09/17/2011 - 22:41 नवीन
चिपळुणकर, अ‍ॅव्हेंजर २२०, घ्या, पोरगी फिरवणे ते मागे १०० किलोचे पोते बांधुन आणणे दोन्ही साठी उपयोगी आहे, आणि हायवेला तर जाम जाम मजा आहे, स्कुटरेट घेउ नका, कारण ' अगर आप बिवि से ( अपनि) करते हो प्यार तो अ‍ॅक्टिवा / विगो / अ‍ॅक्सेस / गेला बाजार स्कुटी से कैसे करोगे इन्कार.
  • Log in or register to post comments

आं

रमताराम
Tue, 09/20/2011 - 01:05 नवीन
पोरगी फिरवणे ते मागे १०० किलोचे पोते बांधुन आणणे दोन्ही साठी उपयोगी आहे, काय तुलना आहे राव, आवडली आपल्याला. आणि या वाक्यातील अंतःसूर पाहता पोरगी फिरवण्याचे आपले दिवस सरले आहेत (पक्षी: मागे पोतेच बांधून नेण्याचे दिवस आले आहेत) असे निरीक्षण नोंदवतो. आणि हायवेला तर जाम जाम मजा आहे, पण हायवेला भर वेगात असताना एखादेवेळी एकदम ब्रेक लावला तर पोतं पडेल की तुमचं. की पोतं बांधून ठेवायला बेबी सीट इन्-बिल्ट... आय मिन ऑन्-बिल्ट आहे या गाडीला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

मला वाटते

राजेंद्र मेहेंदळे
Tue, 07/01/2014 - 13:48 नवीन
पोरगी फिरवणे आणि शंभर किलोचे पोते फिरवणे या दोन गोष्टींना ते एकच समजत असावेत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

या धाग्याला टाइमपास धागा समजू

आशु जोग
Sat, 09/17/2011 - 22:55 नवीन
या धाग्याला टाइमपास धागा समजू नये अति महत्वाच्या प्रश्नावर मते मागवली आहेत
  • Log in or register to post comments

ऑब्जेक्शन मीलॉर्ड...

टवाळ कार्टा
Sun, 09/18/2011 - 16:48 नवीन
ऑब्जेक्शन मीलॉर्ड... (हा डायलॉग मला असाच ऐकू येतो) मी ३ गाड्या सुचवल्या होत्या (ज्या कमी उंची असलेल्या लोकांना चालवयला सोप्या आहेत) पल्सर १३५ (मायलेज आणि स्पीड दोन्ही मस्त आहे) अपाचे* (कोणतेही मोडेल १६०, RTR-१६०, RTR Fi-१६०, RTR-१८०, RTR-१८० ABS) - स्पीड मस्तच आहे आणि मायलेज ठिकठाक यामाहा** R-१५, R-१५ २.० (नवीन) (निंजा-२५० परवडत नसेल आणि भन्नाट स्पीड हवा असेल तर ही घ्यावी) निंजा-२५० (परवडत असेल तर हे घ्या....मुली स्वता मागे मागे येतील ;)) धागा सुरु करताना सुचवलेल्या दोन्ही बाइक्स (एवेन्जेर आणि CD-Don) या पुर्णपणे वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत (किंमत आणि लुक्स) म्हणुन मी पर्याय सुचवताना फक्त कमी उंचीचाच विचार केला आता मला हे समजत नाहीये कि मी माझ्या प्रतिसादात काय टवाळ्पणा केला :) * याचा उच्चार असाच आहे ** हा पर्याय आत्ताच सुचला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

एकोणआहेरेतोएवढ्याअतिमह्त्वाच्

५० फक्त
Sat, 09/17/2011 - 23:43 नवीन
एकोणआहेरेतोएवढ्याअतिमह्त्वाच्याधाग्यालाटाइमपाससमजतआहेकाहिकळतेकारेतुम्हालाकायविषयाअणिकायचेष्टाकरताअशाविष्याचीलाजवाटलीपाहिजेतुम्हाला.
  • Log in or register to post comments

वावावा

चित्रगुप्त
Sun, 09/18/2011 - 01:00 नवीन
एकोणआहेरेतोएवढ्याअतिमह्त्वाच्याधाग्यालाटाइमपाससमजतआहेकाहिकळतेकारेतुम्हालाकायविषयाअणिकायचेष्टाकरताअशाविष्याचीलाजवाटलीपाहिजेतुम्हाला..... वावावाफारचआवडलीबुवातुमच्यालेखनाचीहीशैलीआतायापुढीलधागाआम्हीयाशैलीतचलिहिणारहेनक्की.
  • Log in or register to post comments

काय त्या सायकलींच्या

lakhu risbud
Sun, 09/18/2011 - 01:08 नवीन
काय त्या सायकलींच्या मागं लागता राव ? हि आशी येखांदी गाडी घ्या ना.Image removed.
  • Log in or register to post comments

ज्युनिअरुद्दीन परलोकवासी झाले

चेतन सुभाष गुगळे
Sun, 09/18/2011 - 01:18 नवीन
ज्युनिअरुद्दीन परलोकवासी झाले अशाच गाडीच्या अपघातात सापडून...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: lakhu risbud

हो त्याच्याकडे पण हिच

टवाळ कार्टा
Sun, 09/18/2011 - 16:27 नवीन
हो त्याच्याकडे पण हिच होती...मी फोटो बघीतला आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

गाडी लाख

कुंदन
Sun, 09/18/2011 - 23:20 नवीन
गाडी लाख परवडेल हो. अगदी मर्शिडीझ घेउ , पण पेट्रोल परवडले पायजे ना.
  • Log in or register to post comments

काय? आज तुम्ही आय टी

आशु जोग
Mon, 09/19/2011 - 21:38 नवीन
काय? आज तुम्ही आय टी वाल्यांना शिव्या घातल्या नाहित? अनिवासिंच्या नावाने खडे फोडले नाहित? ...अरेरे! स्वतःला पुरोगामी कसे म्हणवते तुम्हाला? -- हे छान आहे म्हणजे कुणाला तरी शिव्या घातल्याशिवाय आम्ही कसे पुरोगामी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

चिप्लुन्कर

शाहिर
Mon, 09/19/2011 - 21:41 नवीन
रीप्लय द्या कि राव , हि ता मान्स काय काय बोलु राह्यले ..साम्गू राह्यले.... आनी तुमी काइच बोलेना ...अशाने कसा जमाच गाडीच ,
  • Log in or register to post comments

मी सांगते चिपळूणकर, गाडी अशीच

रेवती
Tue, 09/20/2011 - 01:48 नवीन
मी सांगते चिपळूणकर, गाडी अशीच घ्या जी न बंद पडता एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणे माणसे वाहून नेईल. उगा फ्याशन करायला जावू नका. पेट्रोलचे दर वाढले आहेत तसेही.
  • Log in or register to post comments

मग बैलगाडी घ्या की

टवाळ कार्टा
Tue, 09/20/2011 - 22:48 नवीन
मग बैलगाडी घ्या की राव हा.का.ना.का. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

नका हो चिपळूणकर, ट. का.

रेवती
Wed, 09/21/2011 - 00:10 नवीन
नका हो चिपळूणकर, ट. का. साहेबांचे ऐकू नका. बैलांच्या वैरणीची प्रश्न उभा राहील आणि आता काय करू म्हणून विचाराल. आजकाल माणसाला र्‍हायला जागा मिळत नाही तिथं गोठा कुठं बांधाल. पुन्हा साफसफाई, शेणाच्या गोवर्‍या थापून चिकटवायच्या भिंती कुठनं आणाल? घरी पाणी विजेवर तापवत असाल तर बंद करून बंब आणि बंबफोड आणून त्यात गोवर्‍या वापरून पाणी तापवावे लागेल तेंव्हा त्या संपतील. या प्रश्नांना तोंड देण्याऐवजी साधी मोटारसायकल (फटफटी) घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

आइशप्पत....एक तीर मे दो

टवाळ कार्टा
गुरुवार, 09/22/2011 - 09:49 नवीन
आइशप्पत....एक तीर मे दो निशाने \m/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

आणि मला साहेब नका म्हणु...

टवाळ कार्टा
गुरुवार, 09/22/2011 - 20:11 नवीन
आणि मला साहेब नका म्हणु... आजकाल कोणिही स्वताला साहेब म्हणतो आणि पोस्टरवर फोटो छापतो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

अवेंजर

चिप्लुन्कर
Tue, 09/20/2011 - 10:57 नवीन
अवेंजर कडे मत जात आहे पण इंधनाचे भाव पाहता नंतर बरेच जड जाणार असे वाटते
  • Log in or register to post comments

अव्हेंजर ची गम्मत सांगतो,

शाहिर
Tue, 09/20/2011 - 14:35 नवीन
आमच्या ग्रुप मधे २ अव्हेंजर घेतल्या ..क्रुझर पद्ध्ती च्या बाइक मुळे लगेच त्रिप ठरली, पुणे ते भंडार दरा - कलसू बाइ असे जाय्चे ठरले..एका खेड्यात गाड्या पार्क करुन निघलो ..थंडी आणी पाउस या मुळे कदाचित बॅटरी डाउन झाली .. अव्हेंजर किक स्टार्ट नाही,, हे तेव्हा जाणवले, ते धुड ढकलत पळवू न स्टार्ट करावे लागले २ दिवसा च्या ट्रेक नंतर हे भारी पडले.. त्या मुळे विचार करा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिप्लुन्कर

अव्हेंजर हे हे हे मग बुलेट

आशु जोग
Tue, 09/20/2011 - 21:27 नवीन
अव्हेंजर हे हे हे मग बुलेट घ्या ना आता बॅटरी स्टार्टही आहे काही मॉडेलला
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा