Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by चिप्लुन्कर on Sat, 09/17/2011 - 10:33
सध्या मी गाडी घेण्याचा विचार करत आहे. ठाण्यात माझ्या कडे यामाहा एस झेड हि गाडी आहे पण तिची उंची थोडी जास्तच असल्या मुळे मी ती गाडी विकून दुसरी घेण्याचे ठरवले आहे. सध्या मी हिरो होंडा सिडी डिलक्स किंवा बजाज एव्हेन्जर घेण्याचा विचार करत आहे. या दोन्ही गाड्या दोन वेगळ्या प्रकारच्या आहेत तरी मला या दोन्ही गाड्या आवडतात पण यातली नक्की कोणती घेऊ असा प्रश्ना सध्या माझ्या पुढे आहे. तरी या बद्दल काही मदत किंवा सल्ले मिळाले तर बरे होईल . आपला चिपळूण कर.
  • Log in or register to post comments
  • 17648 views

प्रतिक्रिया

Submitted by स्पा on Sat, 09/17/2011 - 10:45

Permalink

ठाण्यात माझ्या कडे यामाहा एस

ठाण्यात माझ्या कडे यामाहा एस झेड हि गाडी आहे चायला आधी सांगितल असत तर तुमचीच घेतली असती कि हो.. उगाच नवीन घेतली
  • Log in or register to post comments

Submitted by चेतन सुभाष गुगळे on Sat, 09/17/2011 - 10:49

Permalink

पर्यायात थोडा बदल सूचवितो

<< सध्या मी हिरो होंडा सिडी डिलक्स किंवा बजाज एव्हेन्जर घेण्याचा विचार करत आहे. >> या दोन्हीपेक्षा हिरो होंडाचीच सिडी डॉन जास्त योग्य ठरेल. तत्वत: डिलक्स आणि डॉन मध्ये फारसा फरक नाही. पण जो काही किरकोळ फरक आहे तो पाहता डॉन घेऊन फायदाच होईल. माझ्या भावाकडे एप्रिल २००७ चे मॉडेल आहे आणि आम्ही हे फायदे अनुभवले आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Sat, 09/17/2011 - 10:56

Permalink

कोणती परवडतेय?

कोणती परवडतेय?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sat, 09/17/2011 - 11:07

Permalink

चिप्लुन्कर, देखणी आणि

चिप्लुन्कर, देखणी आणि रुबाबदार गाडी घ्या राव. आपले पर्याय पाहता 'बजाज एव्हेन्जर २२०' चांगली दिसते. होंडा सीडी डिलक्स खूपच शामळू वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Sat, 09/17/2011 - 11:15

In reply to चिप्लुन्कर, देखणी आणि by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

+१

होंडा सीडी डिलक्स खूपच शामळू वाटते. अगदी ,अगदी हिरो होंडा सिडी डिलक्स किंवा सिडी डॉन गटणे छाप लोकांसाठी ठीक आहे (यामा चा मालक ) स्पा
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Sat, 09/17/2011 - 11:13

Permalink

कशाला ?

तुम्ही सरळ बैलगाडी किंवा रिक्षा घ्या. जाता येता आजूबाजूची मुले शाळेत सोडत चला. आम के आम गुठलीयोंके दाम. उच्लुन्धर
  • Log in or register to post comments

Submitted by सिद्धार्थ ४ on Sat, 09/17/2011 - 11:49

In reply to कशाला ? by परिकथेतील राजकुमार

Permalink

:)

प रा you are too much. :D
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on Sat, 09/17/2011 - 16:23

In reply to कशाला ? by परिकथेतील राजकुमार

Permalink

बैलगाडी

बैलगाडीला सध्या एक लाखापेक्षा जास्त खर्च येतो.
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Sat, 09/17/2011 - 11:49

Permalink

अरेच्चा

बाईक घ्यायची आहे होय? मला वाटलं गाडी म्हणजे "बीएसए-एसएलआर" घ्यायची आहे. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by आदिजोशी on Sat, 09/17/2011 - 14:35

In reply to अरेच्चा by नितिन थत्ते

Permalink

थत्ते चाचा

पुणेकरांशिवाय जगात कुठलीही माणसं सायकल ला गाडी म्हणत नाहीत
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Sat, 09/17/2011 - 14:39

In reply to थत्ते चाचा by आदिजोशी

Permalink

ठ्या ठ्या ठ्या

पुणेकरांशिवाय जगात कुठलीही माणसं सायकल ला गाडी म्हणत नाहीत Image removed.Image removed.Image removed. आदि भाऊ __/\__
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Sat, 09/17/2011 - 14:51

In reply to थत्ते चाचा by आदिजोशी

Permalink

चार वर्ष राहून गेलोय म्हणावं.

चार वर्ष राहून गेलोय म्हणावं.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Tue, 09/20/2011 - 22:55

In reply to चार वर्ष राहून गेलोय म्हणावं. by नितिन थत्ते

Permalink

सायबाच्या देशात सायकलीला पुश

सायबाच्या देशात सायकलीला पुश बाईक म्हणतात.
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Wed, 09/21/2011 - 00:03

In reply to सायबाच्या देशात सायकलीला पुश by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

इग्लंडात जाउन आल्याची झैरात

इग्लंडात जाउन आल्याची झैरात दुसरं कै नै..
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Wed, 09/21/2011 - 04:09

In reply to इग्लंडात जाउन आल्याची झैरात by शिल्पा ब

Permalink

तसे नव्हे गो!

ब्रिटीश फिल्म्स ("हालीवूड" नव्हे!) आणि टीव्ही पाहिला तरी हे समजू शकेल. आणि इंग्लंडच काय, मी वेल्समधेही जाऊन आले आहे, हे म्हैत्ये का तुला?
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Wed, 09/21/2011 - 06:08

In reply to तसे नव्हे गो! by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

वेल्स इंग्लंडाच्या बाहेर

वेल्स इंग्लंडाच्या बाहेर कुठेतरी आहे हे न्हवतं म्हैती...आणि तुम्ही जौन आलात हे आता कळ्ळं हो!!
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Sat, 09/17/2011 - 20:43

In reply to थत्ते चाचा by आदिजोशी

Permalink

किमन शब्दात कमाल

किमन शब्दात कमाल अपमान... तुम्ही पण पुण्याचेच का :)
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Sat, 09/17/2011 - 11:57

Permalink

चिप्लुन्कर आधी गाड्यांची नावे नीट बघा

हिरो होंडा सीडी डिलक्स किंवा हिरो होंडा डॉन अशी कोणतीच गाडी बाजारात सध्या नाही आहे.तशी गाडी घ्यायची झाली तर तुम्हाला हिरो मोटो कॉर्प व होंडा इंडिया कडुन विवीध पार्ट घेवुन बनवावी लागेल.
  • Log in or register to post comments

Submitted by चिप्लुन्कर on Sat, 09/17/2011 - 12:07

In reply to चिप्लुन्कर आधी गाड्यांची नावे नीट बघा by वेताळ

Permalink

हे पहा

http://www.heromotocorp.com/hero_admin/data_content/product_ebrochure/hero_cddeluxe_ebrouchure.pdf
  • Log in or register to post comments

Submitted by छत्रपति on Sat, 09/17/2011 - 12:17

Permalink

गाडी घ्यायचीये???

कळ दाबली की चालू होणारी आणि कान पिरगाळला की सुसाट पळणारी कुठलीही घ्या...!!!
  • Log in or register to post comments

Submitted by शाहिर on Sat, 09/17/2011 - 14:20

Permalink

कमि उंचीची अपाचे आर टी आर घ्या

एक नंबर आहे ...अ‍ॅव्हरेज आणि लूक्स दोन्ही आहेत
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Sat, 09/17/2011 - 23:57

In reply to कमि उंचीची अपाचे आर टी आर घ्या by शाहिर

Permalink

जो मूर्ख मूर्ख आहे तो मूर्ख,

जो मूर्ख मूर्ख आहे तो मूर्ख, मूर्ख नसेल तर, एका मूर्ख असलेल्या मुर्खाने, दुसऱ्या मूर्ख नसलेल्या मुर्खाला, जर मूर्ख म्हटले ; तर त्या दोघाही मूर्खांना मूर्ख ठरवणे, मूर्खपणाचे ठरते
  • Log in or register to post comments

Submitted by कानडाऊ योगेशु on Sat, 09/17/2011 - 15:59

Permalink

लग्न झाले असल्यास वा इतक्यातच

लग्न झाले असल्यास वा इतक्यातच होणार असल्यास एखादी फॅमिली बाईक घ्या.(होन्डा अ‍ॅक्टीवा,डिओ इ.इ.) पुढे त्रास होणार नाही. भाज्या आणणे वा इतर तत्सम कामासाठी फार उपयोगी पडेल. इतर बाईक वरुन साधी दुधाची पिशवी पण आणताना त्रास होतो. नाहीतर एकतर बाईक आणुन तरी पस्तवाल अथवा लग्न करुन तरी.!
  • Log in or register to post comments

Submitted by अनामिक on Sat, 09/17/2011 - 17:15

In reply to लग्न झाले असल्यास वा इतक्यातच by कानडाऊ योगेशु

Permalink

नाहीतर एकतर बाईक आणुन तरी

नाहीतर एकतर बाईक आणुन तरी पस्तवाल अथवा लग्न करुन तरी.! म्हणजे बाई असो की बाईक, पस्तावल्या जातोच... नाही?
  • Log in or register to post comments

Submitted by कानडाऊ योगेशु on Sat, 09/17/2011 - 18:00

In reply to नाहीतर एकतर बाईक आणुन तरी by अनामिक

Permalink

तसे नव्हे हो.. जर लग्न करायचे

तसे नव्हे हो.. जर लग्न करायचे असेल आणि जर चिप्ळुनकरांनी एखादी रोबस्ट अशी "गर्लफेंड" बाईक घेतली तर त्यांना लग्नानंतर कराव्या लागण्यार्या बाजारहाट कामासाठी ती काहीही उपयोगाची नाही. त्याअर्थाने ते "तसली" बाईक घेऊन व मग लग्न करुन पस्तावतील असे म्हटले होते.
  • Log in or register to post comments

Submitted by माझीही शॅम्पेन on Sun, 09/18/2011 - 00:11

In reply to लग्न झाले असल्यास वा इतक्यातच by कानडाऊ योगेशु

Permalink

लग्न झाले असल्यास वा इतक्यातच

लग्न झाले असल्यास वा इतक्यातच होणार असल्यास एखादी फॅमिली बाईक घ्या.(होन्डा अ‍ॅक्टीवा,डिओ इ.इ.) पुढे त्रास होणार नाही. भाज्या आणणे वा इतर तत्सम कामासाठी फार उपयोगी पडेल.
हेच बोलतो अक्टिवा पेमी शॅम्पेन
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Sat, 09/17/2011 - 18:16

Permalink

एव्हेंजर २२० चा येक प्राब्लेम

एव्हेंजर २२० चा येक प्राब्लेम हाय?कोनचं बी चाक पंक्चर होउन द्या, बाई(क) जागेवरच बसती...
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Sat, 09/17/2011 - 20:14

Permalink

चिपळूणकर ऐवजी खन्ना, मल्होत्रा, कपूर वगैरे असता तर...

तुम्ही चिपळूणकर ऐवजी खन्ना, मल्होत्रा, कपूर वगैरे असता, तर हा प्रश्नच तुम्हाला पडला नसता. बाइक ऐवजी तुम्ही बायको आणली असती, आणि तिच्याबरोबर बाइकच काय, चारचाकी गाडी, फर्निचरसह फ्लॅट, वगैरे वगैरे सर्वच आले असते.... अर्थात या प्रतिसादातून तुम्हाला काही मदत किंवा सल्ला मिळाला नाही, याबद्दल क्षमस्व.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Sat, 09/17/2011 - 20:37

Permalink

:)

सुचवलेल्या दोन्ही बाइक्स पुर्णपणे वेगवेगळ्या टाईपच्या आहेत् बाईकच्या उंचीचा त्रास असेल तर मग खालील पर्यायांचा विचार करा http://www.bajajauto.com/pulsar/Pulsar/pulsar135.html http://tvsmotor.in/apache.asp http://www.bajajauto.com/probiking/home.html अपाचे चे कोणतेही मोडेल छान आहे आणी वरच्या सगळ्या बाइक उंचीला कमी आहेत
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Sat, 09/17/2011 - 22:41

Permalink

चिपळुणकर, अ‍ॅव्हेंजर २२०,

चिपळुणकर, अ‍ॅव्हेंजर २२०, घ्या, पोरगी फिरवणे ते मागे १०० किलोचे पोते बांधुन आणणे दोन्ही साठी उपयोगी आहे, आणि हायवेला तर जाम जाम मजा आहे, स्कुटरेट घेउ नका, कारण ' अगर आप बिवि से ( अपनि) करते हो प्यार तो अ‍ॅक्टिवा / विगो / अ‍ॅक्सेस / गेला बाजार स्कुटी से कैसे करोगे इन्कार.
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Tue, 09/20/2011 - 01:05

In reply to चिपळुणकर, अ‍ॅव्हेंजर २२०, by ५० फक्त

Permalink

आं

पोरगी फिरवणे ते मागे १०० किलोचे पोते बांधुन आणणे दोन्ही साठी उपयोगी आहे, काय तुलना आहे राव, आवडली आपल्याला. आणि या वाक्यातील अंतःसूर पाहता पोरगी फिरवण्याचे आपले दिवस सरले आहेत (पक्षी: मागे पोतेच बांधून नेण्याचे दिवस आले आहेत) असे निरीक्षण नोंदवतो. आणि हायवेला तर जाम जाम मजा आहे, पण हायवेला भर वेगात असताना एखादेवेळी एकदम ब्रेक लावला तर पोतं पडेल की तुमचं. की पोतं बांधून ठेवायला बेबी सीट इन्-बिल्ट... आय मिन ऑन्-बिल्ट आहे या गाडीला
  • Log in or register to post comments

Submitted by राजेंद्र मेहेंदळे on Tue, 07/01/2014 - 13:48

In reply to आं by रमताराम

Permalink

मला वाटते

पोरगी फिरवणे आणि शंभर किलोचे पोते फिरवणे या दोन गोष्टींना ते एकच समजत असावेत :)
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Sat, 09/17/2011 - 22:55

Permalink

या धाग्याला टाइमपास धागा समजू

या धाग्याला टाइमपास धागा समजू नये अति महत्वाच्या प्रश्नावर मते मागवली आहेत
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Sun, 09/18/2011 - 16:48

In reply to या धाग्याला टाइमपास धागा समजू by आशु जोग

Permalink

ऑब्जेक्शन मीलॉर्ड...

ऑब्जेक्शन मीलॉर्ड... (हा डायलॉग मला असाच ऐकू येतो) मी ३ गाड्या सुचवल्या होत्या (ज्या कमी उंची असलेल्या लोकांना चालवयला सोप्या आहेत) पल्सर १३५ (मायलेज आणि स्पीड दोन्ही मस्त आहे) अपाचे* (कोणतेही मोडेल १६०, RTR-१६०, RTR Fi-१६०, RTR-१८०, RTR-१८० ABS) - स्पीड मस्तच आहे आणि मायलेज ठिकठाक यामाहा** R-१५, R-१५ २.० (नवीन) (निंजा-२५० परवडत नसेल आणि भन्नाट स्पीड हवा असेल तर ही घ्यावी) निंजा-२५० (परवडत असेल तर हे घ्या....मुली स्वता मागे मागे येतील ;)) धागा सुरु करताना सुचवलेल्या दोन्ही बाइक्स (एवेन्जेर आणि CD-Don) या पुर्णपणे वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत (किंमत आणि लुक्स) म्हणुन मी पर्याय सुचवताना फक्त कमी उंचीचाच विचार केला आता मला हे समजत नाहीये कि मी माझ्या प्रतिसादात काय टवाळ्पणा केला :) * याचा उच्चार असाच आहे ** हा पर्याय आत्ताच सुचला
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Sat, 09/17/2011 - 23:43

Permalink

एकोणआहेरेतोएवढ्याअतिमह्त्वाच्

एकोणआहेरेतोएवढ्याअतिमह्त्वाच्याधाग्यालाटाइमपाससमजतआहेकाहिकळतेकारेतुम्हालाकायविषयाअणिकायचेष्टाकरताअशाविष्याचीलाजवाटलीपाहिजेतुम्हाला.
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Sun, 09/18/2011 - 01:00

Permalink

वावावा

एकोणआहेरेतोएवढ्याअतिमह्त्वाच्याधाग्यालाटाइमपाससमजतआहेकाहिकळतेकारेतुम्हालाकायविषयाअणिकायचेष्टाकरताअशाविष्याचीलाजवाटलीपाहिजेतुम्हाला..... वावावाफारचआवडलीबुवातुमच्यालेखनाचीहीशैलीआतायापुढीलधागाआम्हीयाशैलीतचलिहिणारहेनक्की.
  • Log in or register to post comments

Submitted by lakhu risbud on Sun, 09/18/2011 - 01:08

Permalink

काय त्या सायकलींच्या

काय त्या सायकलींच्या मागं लागता राव ? हि आशी येखांदी गाडी घ्या ना.Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by चेतन सुभाष गुगळे on Sun, 09/18/2011 - 01:18

In reply to काय त्या सायकलींच्या by lakhu risbud

Permalink

ज्युनिअरुद्दीन परलोकवासी झाले

ज्युनिअरुद्दीन परलोकवासी झाले अशाच गाडीच्या अपघातात सापडून...
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Sun, 09/18/2011 - 16:27

In reply to ज्युनिअरुद्दीन परलोकवासी झाले by चेतन सुभाष गुगळे

Permalink

हो त्याच्याकडे पण हिच

हो त्याच्याकडे पण हिच होती...मी फोटो बघीतला आहे
  • Log in or register to post comments

Submitted by कुंदन on Sun, 09/18/2011 - 23:20

Permalink

गाडी लाख

गाडी लाख परवडेल हो. अगदी मर्शिडीझ घेउ , पण पेट्रोल परवडले पायजे ना.
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Mon, 09/19/2011 - 21:38

In reply to गाडी लाख by कुंदन

Permalink

काय? आज तुम्ही आय टी

काय? आज तुम्ही आय टी वाल्यांना शिव्या घातल्या नाहित? अनिवासिंच्या नावाने खडे फोडले नाहित? ...अरेरे! स्वतःला पुरोगामी कसे म्हणवते तुम्हाला? -- हे छान आहे म्हणजे कुणाला तरी शिव्या घातल्याशिवाय आम्ही कसे पुरोगामी
  • Log in or register to post comments

Submitted by शाहिर on Mon, 09/19/2011 - 21:41

Permalink

चिप्लुन्कर

रीप्लय द्या कि राव , हि ता मान्स काय काय बोलु राह्यले ..साम्गू राह्यले.... आनी तुमी काइच बोलेना ...अशाने कसा जमाच गाडीच ,
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Tue, 09/20/2011 - 01:48

Permalink

मी सांगते चिपळूणकर, गाडी अशीच

मी सांगते चिपळूणकर, गाडी अशीच घ्या जी न बंद पडता एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणे माणसे वाहून नेईल. उगा फ्याशन करायला जावू नका. पेट्रोलचे दर वाढले आहेत तसेही.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Tue, 09/20/2011 - 22:48

In reply to मी सांगते चिपळूणकर, गाडी अशीच by रेवती

Permalink

मग बैलगाडी घ्या की

मग बैलगाडी घ्या की राव हा.का.ना.का. :)
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Wed, 09/21/2011 - 00:10

In reply to मग बैलगाडी घ्या की by टवाळ कार्टा

Permalink

नका हो चिपळूणकर, ट. का.

नका हो चिपळूणकर, ट. का. साहेबांचे ऐकू नका. बैलांच्या वैरणीची प्रश्न उभा राहील आणि आता काय करू म्हणून विचाराल. आजकाल माणसाला र्‍हायला जागा मिळत नाही तिथं गोठा कुठं बांधाल. पुन्हा साफसफाई, शेणाच्या गोवर्‍या थापून चिकटवायच्या भिंती कुठनं आणाल? घरी पाणी विजेवर तापवत असाल तर बंद करून बंब आणि बंबफोड आणून त्यात गोवर्‍या वापरून पाणी तापवावे लागेल तेंव्हा त्या संपतील. या प्रश्नांना तोंड देण्याऐवजी साधी मोटारसायकल (फटफटी) घ्या.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on गुरुवार, 09/22/2011 - 09:49

In reply to नका हो चिपळूणकर, ट. का. by रेवती

Permalink

आइशप्पत....एक तीर मे दो

आइशप्पत....एक तीर मे दो निशाने \m/
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on गुरुवार, 09/22/2011 - 20:11

In reply to नका हो चिपळूणकर, ट. का. by रेवती

Permalink

आणि मला साहेब नका म्हणु...

आणि मला साहेब नका म्हणु... आजकाल कोणिही स्वताला साहेब म्हणतो आणि पोस्टरवर फोटो छापतो :)
  • Log in or register to post comments

Submitted by चिप्लुन्कर on Tue, 09/20/2011 - 10:57

Permalink

अवेंजर

अवेंजर कडे मत जात आहे पण इंधनाचे भाव पाहता नंतर बरेच जड जाणार असे वाटते
  • Log in or register to post comments

Submitted by शाहिर on Tue, 09/20/2011 - 14:35

In reply to अवेंजर by चिप्लुन्कर

Permalink

अव्हेंजर ची गम्मत सांगतो,

आमच्या ग्रुप मधे २ अव्हेंजर घेतल्या ..क्रुझर पद्ध्ती च्या बाइक मुळे लगेच त्रिप ठरली, पुणे ते भंडार दरा - कलसू बाइ असे जाय्चे ठरले..एका खेड्यात गाड्या पार्क करुन निघलो ..थंडी आणी पाउस या मुळे कदाचित बॅटरी डाउन झाली .. अव्हेंजर किक स्टार्ट नाही,, हे तेव्हा जाणवले, ते धुड ढकलत पळवू न स्टार्ट करावे लागले २ दिवसा च्या ट्रेक नंतर हे भारी पडले.. त्या मुळे विचार करा
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Tue, 09/20/2011 - 21:27

Permalink

अव्हेंजर हे हे हे मग बुलेट

अव्हेंजर हे हे हे मग बुलेट घ्या ना आता बॅटरी स्टार्टही आहे काही मॉडेलला
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com