मिसळपाव डॉट कॉमच्या सर्व सन्माननीय सभासदांना सप्रेम नमस्कार वि वि,
भाषाशास्त्र, भाषाशुद्धी, भाषेचा विकास, भाषेचे व्याकरण, शुद्धलेखन व त्याचे नियम, संस्कृतचा मराठी भाषेवर कसा प्रभाव आहे, इत्यादी विषयांवर मिसळपाव डॉट कॉम ह्या संकेतस्थळावर आजपासून लेख व प्रतिसादाच्या रुपात काहीही लिहिण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.
मिसळपाव डॉट कॉमला सर्व भाषंबद्दल अत्यंत आदरच आहे परंतु प्रत्येक संकेतस्थळाची काही घोरणे असतात व त्यानुसारच वरील वटहुकूम आम्ही जारी करत आहोत. सबब, सर्व सभासदांना अशी नम्र परंतु आग्रहाची विनंती की त्यांनी वरील वटहुकुमाचा आदर करावा आणि त्याचे कसोशीने पालन करावे. जे कुणी सभासद यापुढे उपरोक्त मुद्द्यांवर काहीही लिहिताना आढळतील त्यांचे लेखन कोणतीही पूर्वसूचना न देता येथून काढून टाकण्यात येईल, हे लक्षात घेऊनच लिहिण्याचे कष्ट करावेत.
वरील भाषाशास्त्र, भाषाशुद्धी इत्यादी मुद्द्यांचे निमित्त काढून काही सभासद ह्या संकेतस्थळावर मुद्दाम वादंग माजवू पाहात आहेत असे लक्षात आल्यामुळे हा वटहुकूम अनिश्चित काळाकरता जारी करण्यात आलेला आहे.
लेख, कथा, व्यक्तिचित्र, काव्य, रसग्रहण, अनुवाद, इत्यादी ललित लेखनास मिसळपाववर मुळीच मज्जाव नाही व ते जसे आहे तसेच अबाधितपणे सुरूच राहील! किंबहुना, येथे असेच लेखन अधिआधिक व्हावे असेच धोरण आहे.
-- जनरल डायर.
प्रतिक्रिया
29 May 2008 - 6:39 pm | नि३
जो वटहुकूम मेरे आका(जनरल डायर)
---नितिन.
(पैसाच सर्व काही नसते . हे वाक्य म्हनण्यासाठी आधी तुमच्याकडे भक्कम पैसा असावा लागतो.)
29 May 2008 - 6:40 pm | ऋषिकेश
सकारण वटहुकुम वाचून आनंद झाला :) पालन होईल!
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
29 May 2008 - 7:11 pm | मन
सुटलो एकदाचा त्या भाषिक हाणामारितुन.
धन्यु श्री डायर
आपलाच,
मनोबा
29 May 2008 - 7:50 pm | विकास
बाकी मिसळपाव सारख्या मराठी संकेतस्थळाला "जनरल डायर" सारखा परभाषिक सेनानी का लागतो? :)) असा चर्चा विषय चालू शकेल का? (ह.घ्या.)
29 May 2008 - 7:53 pm | चतुरंग
जनरल (असलेला) डायर! ;)
चतुरंग
29 May 2008 - 8:42 pm | प्रियाली
सोडवलंत बॉ एकदाचं या संस्कृताची टिमकी वाजवणार्या सोकॉल्ड संस्कृतज्ज्ञांपासून. ;)
29 May 2008 - 8:52 pm | विकास
सोडवलंत बॉ एकदाचं या संस्कृताची टिमकी वाजवणार्या सोकॉल्ड संस्कृतज्ज्ञांपासून आणि त्यांच्या विरोधकांपासून पण :-)
29 May 2008 - 8:40 pm | धोंडोपंत
वटहुकूमाचे मनापासून स्वागत.
भाषा समृद्ध आणि संपन्न व्हावी अशी आमची इच्छा आहे. ती नियमांच्या कोळीष्टकातून बाहेर पडल्याशिवाय शक्य नाही.
उर्दूचा विकास झाला कारण तिने अनेक गोष्टी स्वतःमध्ये सामावून घेतल्या. आम्ही आमच्याच धोतराच्या निर्या कुरवाळत बसलो म्हणून आमची भाषा संकुचित राहिली. असो.
वटहुकूमाचे पुन्हा एकदा स्वागत. आमच्याकडून पालन होईल हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
आपला,
(शिस्तबद्ध) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
29 May 2008 - 9:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वटहुकूमाचे जड अंतकरणाने स्वागत आहे. मराठी भाषेच्या आईचा दर्जा एखाद्या पुंगट भाषेकडे जात असेल तर आपलं कंट्रोल जातं राव :) म्हणुनच आम्हाला तिचे कुळ शोधायचा मोक्कार नाद लागलाय. जाऊ द्या, या निमित्ताने काही दिवस पुस्तके उचकावी, वाचावी लागणार नाही याचा आनंद आहे.
आम्हालाही इतर भाषेबद्दल आदरच आहे, आपल्या धोरणात ती भाषा, अन् तिचं ते कौतुक बसत नाही, इतकचे आम्हाला म्हणायचे आहे. ;)
29 May 2008 - 9:10 pm | आजानुकर्ण
वटहुकूम (हा देखील साला म्लेंच्छ शब्द!) आमच्याकडून पाळला जाईल याची आम्ही खात्री देत आहोत.
आपला,
(सदस्य) आजानुकर्ण