किती सोपे असते ना
ADD AS FRIEND ...!! .. करणे
नुसते क्लिक केले की मित्र होणे
कुठला कोण मी ..?
पण पटकन तुमचा मित्र होऊन जाईल
तुमच्या मनाच्या खिडकीतून
हळूच मी डोकावेन
छानसे चांदणे होऊन
छानसा प्रकाश फुलवीन
तुमच्या हसण्यात मित्र होईन
तुमच्या दु:खात मी धीर देईन
किती सोपे आहे ना
ADD AS FRIEND ...!! .. करणे ..?
नुसते क्लिक केलेकी फ्रेंड होणे ..?
मी भामटा असेन
लबाड असेन ...
छान असेन ...
कसाही असेन ...!
मी तर शब्द होऊन तुम्हाला भेटेन
शब्द होऊन तुमच्याशी बोलेन
एखाद्या कवितेतून तुमच्या मनात फुलेन
तुम्ही शब्दातूनच
माझे चित्र तयार करणार
तुम्हाला हवे तसे
तेवढी मुभा बिलकुल आहे तुम्हाला
माझे नाव दिसले
की तुम्हाला माझी आठवण येईल
माझे चित्र तुमच्या मनात तयार असेल
तुम्हाला हवे तसे [!]
तुमच्यां शब्दातूनच माझे चित्र मला दिसेल
तुमचे शब्द म्हणजे माझा आरसा असेल
माझे चित्र मात्र निरनिराळे असतील
प्रत्येकाचा आरसा निराळा
जसा आरसा तसे रूप
किती सोपे असतेना
मित्र म्हणून एड करणे
कोणी तुम्हाला ह्यालाव केले तर ..?
तुम्हाला कोणी थ्यांकू म्हणाला तर ..??
तुमच्या सुखात कोणी हसला
दुखात कोणी ढग होऊन बरसला
तेव्हा ......
कधी मी तुमच्या मनात दिसलो
तर मला छान वाटेल
नुसते असे मला वाटले तर
माझे मन मस्त झुलेल
मग करतायना मला तुमचा मित्र
नुसते क्लिक करायचे
नि मित्र व्हायचे
किती सोपे असते ना हे सगळे क्लिक करणे ....
मला दिसतेय येथूनच तुमचे बोट
तुम्ही मित्र म्हणून स्वीकार करताय
कोणी तरी विचार करतोय काय करावे ..?
क्लिक करू का नको ..?
what to do ..?
कारण ..? माझेच प्रतिबिंब तुमचे असेल
माझीही मनस्थिती तुमच्या सारखीच असेन
तुम्ही क्लिक करा ..नका करू
तुम्ही माझे मित्र आहात
मी पण ..!
एवढे पक्के लक्षात ठेवा .....!!!
प्रतिक्रिया
9 Sep 2011 - 11:59 pm | पाषाणभेद
खरे आहे पकाकाका.
याच अर्थाने आजच डॉ. दिवटेंनी येथे असंच लिवलंय.
10 Sep 2011 - 12:20 am | आत्मशून्य
ADD AS FRIEND ...!! केल्यावर राया मला अनफ्रेंडकरू नका असेही म्हणावे लागू शकते.