भासा सूद्धी

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जे न देखे रवी...
29 May 2008 - 3:04 pm

भासा सुद्धी चे हे कैसे कैसे चाळे चालले आहेत सध्या संस्थालावर ?

लळीतांचा सुकाळु तेथ आनंदाचा दुष्काळु....
घालोन येकमेकांच्या गळ्यात गळु ....
आनन्दे वोरडोनी अक्कल पाजळु...
दुसर्‍याते असूद्ध म्हणोनी त्याते बहुत घोळु
ऐसे शेवाळु हिरवाळु आम्ही बरळु
लोका येई पोटाते गोळु
आम्ही इये मराठीचे भासा वळु
ऐसी मनोगते रोजच खेळु.........
कपाळा हात लावोन बसे विजुभाऊ साधाभोळु...

संस्कृतीप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

चेतन's picture

29 May 2008 - 3:14 pm | चेतन

आनन्दे वोरडोनी अक्कल पाजळु...
दुसर्‍याते असूद्ध म्हणोनी त्याते बहुत घोळु

हे मस्तं :W

बोला संथ विजुभाऊ महाराजांचा विजय असो (हं.घ्या.)

साधाभोळु चेतन :T

अन्जलि's picture

29 May 2008 - 3:20 pm | अन्जलि

विजुभाउ अहो काय मस्त लिहिलेत अगदि बरोबर वर्नन केले आहे. सद्या मिपावर हेच चालले आहे.

राजे's picture

29 May 2008 - 3:32 pm | राजे (not verified)


ऐसी मनोगते रोजच खेळु.........
कपाळा हात लावोन बसे विजुभाऊ साधाभोळु...

जबरा !!!!!!!!!!!!!!
क्या बात है |
=)) =D>

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

ऋचा's picture

29 May 2008 - 3:40 pm | ऋचा

=)) =))
=))
=))
=))

खालील प्रश्नांची उत्तरे द्या (किंवा नका देउ कसेही ;) )

१. तुम्हाला फ्रिजमधली गारेगार बिअर अन डुक्कर रिक्षाचा प्रवास आवडतो का ?
२. आज तुम्हाला क्रेडिट कार्ड वालीचा फोन आला होता का ? (हा प्रश्न तुम्ही कोणत्या अर्थाने वाचला?)
३. तुम्ही विडी का ओढता ? कळकळ, सामाजिक जाणिव की देशप्रेम ...

मनस्वी's picture

29 May 2008 - 4:10 pm | मनस्वी

मस्तच की अगदी!

१. तुम्हाला फ्रिजमधली गारेगार बिअर अन डुक्कर रिक्षाचा प्रवास आवडतो का ?
-- फ्रिज नाही आणि डुक्कर रिक्षेने प्रवास केलेला नाही, त्यामुळे आवडते / नाही आवडत सांगु शकणार नाही.

२. आज तुम्हाला क्रेडिट कार्ड वालीचा फोन आला होता का ? (हा प्रश्न तुम्ही कोणत्या अर्थाने वाचला?)
-- फोनच नाहीये.

३. तुम्ही विडी का ओढता ? कळकळ, सामाजिक जाणिव की देशप्रेम ...
-- विरंगुळा, व्यवहारचातुर्य, सामाजिक बांधिलकी, दूरदृष्टी, समाज प्रबोधन, मेंदूचे जडत्व .. अजुन काय शब्दबंबाळ शब्द असतील ते..

लोका येई पोटाते गोळु
आम्हाला नका छळु

मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

'तारिफ' हा शब्द मूळ फारसी भाषेतून आला आहे काय?

आनंदयात्री's picture

29 May 2008 - 4:19 pm | आनंदयात्री

>>लोका येई पोटाते गोळु
>>आम्हाला नका छळु

नका छळु - नका छळु

लोका येई पोटाते गोळु
आम्हाला नका छळु
भासासुद्दीचा खेळु
अन संस्कृतचे गळु
नका छळु - नका छळु || धृ ||

>>दूरदृष्टी, समाज प्रबोधन, मेंदूचे जडत्व .. अजुन काय शब्दबंबाळ शब्द असतील ते..

अर्रारारा =)) .. बेक्कार =)) =))

--------------------------
'भाषाशुद्धी' हा शब्द संस्कृतप्रचुर वाटतो .. आम्ही वापरणार नाही यात पण आम्हाला सर्वसामान्य लोकांच्या मुस्काटदाबीचा छुपा प्रयत्न दिसतो ...
निषेध - निषेध - निषेध !

मन's picture

29 May 2008 - 4:02 pm | मन

इजु भौ....
मानलं बॉस तुला...
=))
=))
=)) =D>

आपलाच,
मनोबा

मन's picture

29 May 2008 - 4:03 pm | मन

इजु भौ....
मानलं बॉस तुला...
=))
=))
=)) =D>

आपलाच,
(बावळु आणि सावळु)मनोबा

ऋचा's picture

29 May 2008 - 4:27 pm | ऋचा

१. तुम्हाला फ्रिजमधली गारेगार बिअर अन डुक्कर रिक्षाचा प्रवास आवडतो का ?
-- बिअर पित नाही डुक्कर रीक्षात कमी माणस असतील तर बरा वाटतो प्रवास
२. आज तुम्हाला क्रेडिट कार्ड वालीचा फोन आला होता का ? (हा प्रश्न तुम्ही कोणत्या अर्थाने वाचला?)
--?????????????

विजुभाऊ's picture

29 May 2008 - 6:52 pm | विजुभाऊ

आज तुम्हाला क्रेडिट कार्ड वालीचा फोन आला होता का ? (हा प्रश्न तुम्ही कोणत्या अर्थाने वाचला?)
क्रेडीट कार्ड वालीचा नाही पण क्रेडीटकार्ड सुग्रीवाचा फोन आला होता ( हा प्रश्न आम्ही या अर्थाने वाचला)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 May 2008 - 5:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्या प्रतिभेला अडवूच नका. कधी बखर, कधी स्वप्नप्रवास, आणि आज विजूभौचे भाषाशुद्धीचे धवळे !!!

आनंदाचे दुष्काळु, गळ्यात गळु, अक्कल पाजळु, बहुत घोळु, हिरवाळु, बरळु, पोटाते गोळु, मराठीचे भासा वळु , आणि साधाभोळू या शब्दांनी ह. ह. पु. वा. झाली. :)

अवांतर : महानुभाव साहित्याचे भाषावैभवच॑ वेगळे आहे. श्री चक्रधरांच्या परिभ्रमनाचा आवाका फार मोठा होता ते स्वतः गुजराती असूनही ते उत्तम 'म-हाटी ' बोलत असत, असे म्हणतात.

आजानुकर्ण's picture

29 May 2008 - 5:31 pm | आजानुकर्ण

हहपुवा विजुभौ. =))

आपला,
(हसरा) आजानुकर्ण

महानुभाव साहित्यातील 'संस्कृत भाषा ही मराठीची आई नसून सासू आहे' हे सिद्ध करणारी काही निवडक मराठी वाक्ये देण्याचा विचार आहे ;)

आपला,
(मानभावी) आजानुकर्ण

मदनबाण's picture

29 May 2008 - 6:19 pm | मदनबाण

व्वा,,,विजुभाऊ व्वा......!!!!!! *****

ह्या शुद्दीचा खेळु
मिपा वर चालु
हे आंबोळु काढ
बर आता कंदिलु.....
होईल बर गेमु
लिहणार्‍याचा नक्कीच..
मदन विनवी संत तात्यासी,
आवरावे आता अशा लेखकांसी
योग्य कलम लावुनी !!!!!

कृ.स.ह.घ्या....ही वि..

(मिपा प्रेमी)
मदनबाण.....

ऋषिकेश's picture

29 May 2008 - 6:21 pm | ऋषिकेश

.................विजुभाऊ साधाभोळु.. !!
लई फर्मास राव!!! मानलं तुमाला

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

शितल's picture

29 May 2008 - 6:25 pm | शितल

वीजुभाऊ तुमची "ळु" युक्त रचना आवडली
खतरा लिहिली आहे.

आंबोळी's picture

29 May 2008 - 7:33 pm | आंबोळी

नका संस्कृतासि कुरवाळु
बरे अमुचे अरबी-फारसीचे गळु
मिसळपाववर उडवुन देउ गोंधळु
बरळती नमोगती वळु

(लाविती कंदीलु)आंबोळु

वरदा's picture

29 May 2008 - 8:07 pm | वरदा

मस्त आहे हे एकदम्....विजुभाऊ लगे रहो.....
मदनबाण सह्ही बरं का!
आंबोळी दादा करेक्ट बोल्लात एकदम....

वरदा's picture

29 May 2008 - 8:09 pm | वरदा

हे सगळं का होतय निळु निळु?

यशोधरा's picture

29 May 2008 - 9:51 pm | यशोधरा

जबरी!!! हापिसमधे वाचलं आधी आणि भसकन् हसले!! पुढच्या वेळी डिस्क्लेमर देत जा...

लिखाणाच्या सुरुवातीला द्या मात्र!!

=))

मन's picture

30 May 2008 - 12:47 am | मन

नाय तर काय, स्वतः शीच खो खो करुन हसत सुटलोय.

आपलाच,
मनोबा

बेसनलाडू's picture

30 May 2008 - 1:54 am | बेसनलाडू

शेवाळु हिरवाळु वळु विशेषच आवडले.
(वळु)बेसनलाडू

विजुभाऊ's picture

30 May 2008 - 11:35 am | विजुभाऊ

डिस्क्लेमर ...हे लिखाण जरा गांभिर्याने घ्यावे......तुम्हाला हे लिखाण वाचताना जर कोणा ईनो घेणार्‍याची / इतिहास लिहाणारांची आठवण झाली तर तो निव्वळ योगायोग समजु नये. कारण ...
ये जालमंडळु ऐसे मळमळु
असती येकेक ईये संस्थळु
वाढवुनी दंगा मग
पाय काढता हळुहळु.....
जोड्याने हाणता सोयरे
रडती ते मुळुमुळु

दुसर्‍या एका खंडात याचे स्पष्टीकरण महाराज देतात की जे हत्ते काळाचे ठायी...............पुढचे काही दिसत नाही
तरीही आपण सांभळोनी घ्यावे. मिपा ओसरी हल्ल्कल्लोळी करुनी रहावे.

शब्दाते शब्द जोडोनी
त्याते काव्य म्हणीतले
शिणुमांच्या जहीराती ,
सोबत शिव्याही घेवोनी
रचीले काव्य मनोगताने
ठेविले मिपावरी
जळजळीसाठी......

मिपा भ. प. विजुभाऊ सातारकर बुवा

धमाल मुलगा's picture

3 Jun 2008 - 12:42 pm | धमाल मुलगा

आयळु....हे..आपलं..आयला,
हे विजुभाऊ काय प्रकरण तरी काय आहे नक्की? कुठुन कुठेपर्यंत धाव आहे ह्यांच्या डोक्याची?

आपल्या प्रतिभेला अडवूच नका. कधी बखर, कधी स्वप्नप्रवास, आणि आज विजूभौचे भाषाशुद्धीचे धवळे !!!

बिरुटेसरांशी १००००% सहमत :)

अवांतर : महानुभाव साहित्याचे भाषावैभवच॑ वेगळे आहे. श्री चक्रधरांच्या परिभ्रमनाचा आवाका फार मोठा होता ते स्वतः गुजराती असूनही ते उत्तम 'म-हाटी ' बोलत असत, असे म्हणतात.

च्यामारी, ख्ररं की काय सर?
हम्म्म्...विजुभाऊ, काय मग, काय विचार आहे? मिपानुभव पंथ काढताय काय ;)

ऐसे शेवाळु हिरवाळु आम्ही बरळु
लोका येई पोटाते गोळु

=)) =)) =))

आम्ही इये मराठीचे भासा वळु
ऐसी मनोगते रोजच खेळु.........

अग्गग्गग्गग्ग...... बेक्कार ! एकदम ठाण्ण्ण्ण्ण्ण्ण.................

कपाळा हात लावोन बसे विजुभाऊ साधाभोळु...

ही:हॉ:हॉ:.... लय भारी !!!!

मदनदा आणि कंदिळु, लयच भारी रे :)
ज ह ब ह र्‍या !!!!!

- (गंडलेला) ध मा ळु !

विजुभाऊ's picture

4 Jun 2008 - 10:09 am | विजुभाऊ

जिंदादील प्रतिसाद दिलेल्या सर्वांना धन्यवाद
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत