सांग किती झेलू तूझा हा गोड गुन्हा
माझ्या पुढे बसूनी, थोडं गाली हसूनी
काय करतेस ग तू खाणाखूणा
सांग किती झेलू तूझा हा गोड गुन्हा ||धृ||
समोरासमोर आहेत आपली दोघांची घरे
बाल्कनीत उभे राहणे इतरांना दिसते सारे
हातवारे नको करू, नजरेने नको काही बोलू
शंका येईल तूझ्या बॉडीबिल्डर मोठ्या भावाला ||१||
काल क्लासला का ग नाही आलीस?
लेक्चर इन्फरमेटीव्ह मीस केलेस
आयएमपी क्वेश्शन मार्क मी केले ते;
नोटबूक घेण्याचा करते तू बहाणा
सांग किती झेलू तूझा हा गोड गुन्हा ||२||
कितीतरी वेळा झालं हे तूला सांगून
बरे दिसत नाही चारचौघात असलं वागणं
नको बोलू गर्दीत, जावू एका बागेत
थोडी तरी कळ काढ, बोलतो मी पुन्हा पुन्हा ||३||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
०५/०९/२०११
प्रतिक्रिया
5 Sep 2011 - 2:43 pm | चित्रगुप्त
हीच का ती ? छान आहे .

5 Sep 2011 - 11:48 pm | अत्रुप्त आत्मा
लय भारी चित्रपुप्त साहेब,लय भारी.... :-)
अप्सरा आली,बाल्कनी मधुनी खाली ;-)
ओठांना लाली, मोहक त्या हलचाली
ही...झुकली वाकली,नजर टाकली
कोणं दिसे भवताली?...अप्सरा आली...
6 Sep 2011 - 8:25 am | सख्या
लय भारी
6 Sep 2011 - 2:25 am | प्रकाश१११
पाषाण भेद -
माझ्या पुढे बसूनी, थोडं गाली हसूनी
काय करतेस ग तू खाणाखूणा
सांग किती झेलू तूझा हा गोड गुन्हा ||धृ||
छान गुन्हा !!
6 Sep 2011 - 3:42 pm | चित्रगुप्त
माझ्या पुढे बसूनी, थोडं गाली हसूनी
.jpg?m=1307459256)
काय करतेस ग तू खाणाखूणा
सांग किती झेलू तूझा हा गोड गुन्हा
6 Sep 2011 - 12:50 pm | jaypal
पाषाणा लै भारी रे असेच गुन्हे करीत रहा

6 Sep 2011 - 4:42 pm | परिकथेतील राजकुमार
इस बार कुछ जम्या नही रे दगडाफोड्या.