छेडूनी धुंद ओली , हळवी तुझी विराणी ,
मी मागतो पुन्हा का, फिरुनी नवी निशाणी.
पावूस चांदन्यांचा भिजवून काल गेला,
ग्रीष्मात मोगरयाने फसवून वार केला,
हे जाणुनी पुन्हा का, मनमोर गात गाणी,
होतो अतृप्त जरी मी अव्यक्त खंत होती ,
निशब्द वेदना ही मुरली निवांत होती ,
का छेडली पुन्हा तू, ती रागिणी दिवाणी ,
अव्यक्त भावनांचे मी गूढ गीत गातो,
स्वरमेळ ना तयाला तो तुझ्यातुनी वाहतो,
ओठांत गुंफुनी माझ्या दे आता नवी कहाणी..
प्रतिक्रिया
3 Sep 2011 - 8:14 pm | मदनबाण
छान...
6 Sep 2011 - 12:48 am | पाषाणभेद
हळूवार काव्य
6 Sep 2011 - 2:57 am | राजेश घासकडवी
छान भावगीत.
ही ओळ छानच.
मात्र परिणामकारक भावगीतासाठी आवश्यक गेयता शेवटच्या कडव्यात कमी आहे. विशेषतः शेवटच्या दोन ओळीत मात्रा वाढलेल्या आहेत. त्याऐवजी हे कसं वाटतं?
स्वरमेळ ना तया तो तूझ्यातुनी वहातो
ओठांत गुंफुनी दे माझ्या नवी कहाणी..
6 Sep 2011 - 8:55 am | शैलेन्द्र
हे जास्त चांगल वाटतय खरं.. तुमच्या परवानगीने बदल करुन घेतो.