चष्मावाला, गायवाला

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
2 Sep 2011 - 5:20 pm

काय म्हणताहात मंडळी
कसा काय चाल्ल्लाय तुमचा गणेशोत्सव?
हो. हो. हो.
नियम माहीत आहे मला.
आधी आपले सांगा
मग विचारा.
...........................................................................................................................................................
आदला दिवस
"जरा शेजार्‍यांना चपलांचा त्रास होणार नाही हे बघा हो. कळ सोसा म्हणावे पाच दिवस."
मोदकाच्या दिवशी जेवायला बोलव.
"ते तर बोलवणारच आहे. पण तु आधीच सांगुन ठेव. आणि जरा नम्र पणे. आपली गरज आहे"
चालेल.
"आणि तु सुट्टी घे. आणि हो. तो मिक्सर बिघडलाय. ओवर लोड झाला असेल. लगेच पाहीजे. उद्या देतो म्हटले तर चालणार नाही. तुझा आवाज काढ"
अर्ध्या तासात आणतो.
"पाण्याचा त्रास होईल सारखे वाटते"
दोन तासात टँकर आणीन. काहीही काळजी करु नकोस.
"आलेल्या पाहूण्याकडे शिक्षणाबद्दल विषय काढायचा नाही".
काहीही बोलणार नाही बस्स. पण मी गप्प बसुन काही फायदा आहे का? तेच विषय काढणार.
"शक्य तो विषय बदल"
चालेल.
...........................................................................................................................................................

१ ला दिवस

रात्री १२ वाजता.
हातात दुध पाकाचा पेला.
"छान साजरा झाला १ला दिवस. जेवण खुपच आवडले सर्वांना. देठ्याची रांदय आणि इडली तर संपुन गेली एका फटक्यात. सर्वांना काळजी होती. कसे होणार एवढ्याश्या जागेत. पण काहीही गोंधळ न होता सर्व काही व्यवस्थित झाले. मोठ्या घरातुन (१००० फुट) छोट्या घराचे टेन्शन मोठ्याच्या चेहेर्‍यावर दिसत होते. पण पाने उठल्यावर अगद भावुक झाला. गायवाल्याच्या मस्तकावरचा चाफा मला दिला. मी गायवाल्याला मागच्या वर्षी आमंत्रण दिले होते. अगदी गालावरुन हाथ फिरवुन. बघा ऐकले त्याने माझे. नाहीतर मार्च मधे जुन्या घरची गॅलरी पडायचे काय कारण? आणि एवढ्या पावसाळ्यात काहीच झाले नाही इमारतीला. तु कपाटे काढुन पाच दिवसात वार्ड रोब केला नसतात तर मात्र पंचाईत झाली असती. चिंटू मोदक लहानांना खुप आवडले. सर्व लहानांबरोबर व्यवस्थित खेळले आपला रावसाहेब. एवढा खुलला होता ना. मुर्ती ची सजावट किती छान केलीय ना मोठ्याने. मुर्ती पण अगदी शांत आहे. चष्मावाल्याला रोज सकाळी बघते ना. त्या मानाने वेगळीच आहे. चष्मावाला खोडकर आणि व्रात्य दिसतो. गायवाला अगदी धीरगंभीर. उद्या सकाळी आई येतेय. माझे लग्न झाल्यावर पहील्यांदाच. वल वल ला लागण्यार्‍या सर्व भाज्या घेउन येणार आहे. तु सहसा गोड खात नाहीस. आज दुसरा पेला. एवढा मस्त झालाय का?"

अप्रतिम. गेल्या दोन दिवसात ५ तासाच्या वर झोपली नाहीयेस. शांत झोप. उद्या बोलु.
...........................................................................................................................................................थोडक्यात आय अ‍ॅम बिइंग गुड बॉय फॉर नेक्स्ट फाइव डेज. चष्मावाल्याच्या कृपेने गाय वाला घरी आला आहे.
चष्मावाला: प्रभादेवी चा सिद्धीविनायक.
गायवाला: आमच्या घरचा बाप्पा.

संस्कृतीप्रकटन

प्रतिक्रिया

रेवती's picture

2 Sep 2011 - 7:14 pm | रेवती

नवरा बायको मधला संवाद समजला.
तुमच्या लेखनामध्ये पदार्थांचे उल्लेख येतात.
सौ. काकू सुगरण असल्याचा मला अनुभव आहे.
आता मागच्या लेखातली ती कालिकत इडली किंवा इथे उल्लेखलेले देठ्यांचे रांदय हे प्रकार आम्ही कधी ऐकलेले नाहीत. कृत्या द्या की त्यांच्या!
वल वल ला लागण्यार्‍या सर्व भाज्या
हा काय प्रकार आहे.

खाली चष्मावाला आणि गायवाला दिलं नसतं तर काय कळलं नसतं.