मी बिनधास्त बोलू लागलो त्यांची भाषा..!!

प्रकाश१११'s picture
प्रकाश१११ in जे न देखे रवी...
28 Aug 2011 - 10:19 am

[परदेशात आल्यावर काही मराठी मुलांशी ओळखी
झाल्या .भाषेवरून गमती जमती झाल्या. त्यावरून हे सुचले ]

येथे आल्यावर एक झाले
मी बिनधास्त बोलू लागलो त्यांची भाषा
थोडी थोडी लाज होती
पण लवकरच निर्लज्ज झालो
तोंडातल्या तोंडात घोळत
मी पण बोलू लागलो
नुसते लिहिता येत होते
बोलणे म्हणजे गणित होते
प्रमेया पेक्षा रायडर कठीण असते [!!]
तसेच बोलणे अवघड होते
असेच शप्पत मला वाटत होते

सरळ सरळ शब्द त्याना समजत नव्हते
नि लुळे पांगळे शब्द मला बम्पर टाकीत होते
राजू रामुशी बोलणे जरा अवघड होते
माझ्या बोलण्यातले The किंवा An शोधीत होते
माझ्या देशी भावंडाशी बोलणे जरा अवघड होते

परदेशी बॉब बरोबर बोलणे मला तरी सोपे वाटत होते
हाय बॉब केले की बॉब मस्त हसायचा
माझ्या शब्दातील The किंवा An न शोधता हात मिळवायचा ...!
मी माझे शब्द लुळे पांगळे करून
ओठाच्या चम्बुतून सोडायचो
बॉब हाय करून हसायचा
आणि माझी तारीफ करायचा

बॉब आणि रोंनीचे शब्द मी उचलले आहेत
मस्त शब्द लुळे करून मी बोलतो आहे
बायको बरोबर फिरताना कधी बॉब भेटतो
कधी ..रॉनी .!
मी मस्त शब्द लुळे पांगळे करून
त्यांच्याशी बोलत असतो
माझे लुळे शब्द बायको बघत असते
बोबच्या चेहऱ्यावरचे स्मित बघून
बायको नवलाने माझ्याकडे बघत बसते ........!

येथे आल्यावर एक झाले
मी बिनधास्त बोलू लागलो त्यांची भाषा
थोडी थोडी लाज होती
पण लवकरच निर्लज्ज झालो .
नि मस्त बम्पर टाकू लागलो ..!!

हास्यकविता

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

28 Aug 2011 - 12:19 pm | मदनबाण

छानच ! :)

छान कविता...

नविन असताना हे अनुभव सार्‍यांनाच येतात... आपल्याकडे भ ची भाषा असते, तर त्यांच्याकडे फ ची ;)

साती's picture

30 Aug 2011 - 12:15 am | साती

कविता आवडली.
तर्खडकरी व्याकरणाचा विचार न करता फाडफाड बिंधास्त बोला.

चाल क बि.एन's picture

3 Sep 2011 - 2:18 pm | चाल क बि.एन

कविता आवडलि
अचुक विश्लेशन