Get this widget | Track details | eSnips Social DNA
त्याला समुद्र दिसला कि तो त्याच्याकडे ओढला जातो.
लाटांमधे घुसुन त्यांच्या अवाढव्य लोंढ्याला,
तो आपले हात पसरुन थोपवण्याचा प्रयत्न करतो.
त्या लाटा, त्याच्या कडे पाहुन नक्किच हसत असतिल...
प्रत्येक लाटेने त्याला अस्मान दाखविल्या नंतरही तो,
पुन्हा पुढच्या लाटेला प्रतिकार करण्यासाठी उभा असतो.
तो कधीच जिंकणार नाही, हे त्याला कळत नाही का?
त्याला माहित असणारच...
त्या दोघांसाठी अस्तित्वाचे अस्तित्व अर्थपुर्ण असण्यातच आहे.
स्वभावच तो...
नाहिच बदलणार, त्याचाही अन त्या लाटेचाही...