देहदशा

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
22 Aug 2011 - 1:09 pm

ओठांवर मुकेच नांव तुझे
पापणीत दडल्या आठवणी
हृदयात रमलरत गहन तळे
कांठावर गहिवरते पाणी

वाटेत मावळे देहदशा
भेटे स्वप्नी तरिही कोणी
रंध्रांत घोर आणीबाणी
दाटून दग्ध वाग्विलासिनी

रममाण रमण तन मन ध्यानी
जन्मात जन्म झाले आणी
पायांत शृंखला जडलेल्या
चाललो एकला अनवाणी

...................अज्ञात

शृंगारकरुणकविता