विदुषक

अभिजीत राजवाडे's picture
अभिजीत राजवाडे in जे न देखे रवी...
22 Aug 2011 - 8:40 am

बदल होतोय कित्येक दशक होत आहे
अनुभवांचे लेणे आता विदुषक होत आहे.

कळले हे कि "काळाचा महिमा अगाध",
मद्याचा प्यालाही मानाचा चषक होत आहे

आंधळ्या राजाची ही आंधळी प्रजा आहे
चक्क मुकाही इथे उदघोषक होत आहे

तिला हि सवय अन त्याला सवय आहे
नजरेने ठार करणे बेलाशक होत आहे

नम्र मांजरी माना झुकवत आहे आता
घंटा गळ्यात बांधणारा मुषक होत आहे

कवितागझल

प्रतिक्रिया

खूप अर्थपुर्ण कविता. छानच. आवडली.

कन्सेप्ट चांगली आहे पण निम्ननिर्दिष्ट ओळींत एकवचन / अनेकवचन चांगलेच गंडले आहे.

मद्याचे प्यालेही मानाचे चषक होत आहे

आणि

घंटा गळ्यात बांधणारे मुषक होत आहे

सहज टाळण्याजोगे.

अत्रुप्त आत्मा's picture

22 Aug 2011 - 3:54 pm | अत्रुप्त आत्मा

भट्टी जरा नीट जमायला हवी होती....

अभिजीत राजवाडे's picture

23 Aug 2011 - 2:34 am | अभिजीत राजवाडे

गवि,
सुचनेनुसार बदल करण्याचा प्रयत्न केला आहे.
कळावे,

गवि's picture

23 Aug 2011 - 3:35 am | गवि

zakaas... Great..

धनंजय's picture

23 Aug 2011 - 3:42 am | धनंजय

काही कल्पना आवडल्या :

आंधळ्या राजाची ही आंधळी प्रजा आहे
चक्क मुकाही इथे उदघोषक होत आहे

इथे एक शंका :

अनुभवांचे लेणे आता विदुषक होत आहे.

येथे "लेणे" म्हणजे अजिंठ्याच्या लेण्यातले लेणे, की सौभाग्याच्या लेण्यातले लेणे? कुठल्याही अर्थाने समजायला कठिण जाते आहे.

"विदूषक" म्हणजे ओंगळ-हास्यास्पद म्हणायचे असावे. गंमतशीर विदूषक नसावा असे वाटते.

गणेशा's picture

23 Aug 2011 - 4:03 pm | गणेशा

बदल होतोय कित्येक दशक होत आहे
अनुभवांचे लेणे आता विदुषक होत आहे.

कळले हे कि "काळाचा महिमा अगाध",
मद्याचा प्यालाही मानाचा चषक होत आहे

कविता आवडली..