आज श्री. श्रीकृष्ण सामंत यांचा वाढदिवस

सुधीर काळे's picture
सुधीर काळे in जनातलं, मनातलं
14 Aug 2011 - 10:20 am

आज आपले एकेकाळचे वयोवृद्ध-ज्ञानवृद्ध सहसभासद (अजूनही सभासद आहेत?) श्री श्रीकृष्ण सामंत यांचा वाढदिवस! त्यांना त्याबद्दल शुभेच्छा आणि त्यांचे अभिष्टचिंतन!
त्यांनी इथे संपर्क साधल्यास आनंद वाटेल.
शुभचिंतक,
सुधीर काळे

राहणीप्रकटन

प्रतिक्रिया

शैलेन्द्र's picture

14 Aug 2011 - 10:53 am | शैलेन्द्र

काकांना शुभेच्छा.. त्यांना निरामय दिर्घारोग्य लाभो ही प्रार्थना..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Aug 2011 - 11:03 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सामंत साहेबांनी, मिपावर नियमित लिहावं असं मला नेहमीच वाटलं आहे. लहान-लहान कथेतून तात्पर्याच्या अनेक गोष्टी त्यांच्या फेरफटका मारणा-या लेखनातून वाचायला मिळाले आहे. मिपाच्या सुरुवातीच्या काळानंतर त्याच्या लेखनावर अनेक प्रतिसाद आलेत. कधी-कधी तर लेखनावर प्रतिसाद आलेच नाहीत त्याची तमा त्यांनी बाळगली नाही. नियमित लिहित राहीले. आणि अचानक त्यांना काही कारणाने वाटायला लागले असावे की मिपा माझ्यासाठी नाही. आणि त्यांनी मिपावर लिहिणं सोडलं. (माझा अंदाज)

सर्वच क्षेत्रातील लहान-थोर मराठी माणसं मिपावर असावीत असं ज्यांना ज्यांना वाटतं त्यापेकी मीही एक. गेल्या वर्षी सामंत साहेबांना मिपावर लिहायला या असं मी म्हटलं होतं त्यांचा स्पष्ट नकार नव्हता मात्र आपलं कृष्ण उवाच ठीक आहे, असा त्यांच्या बोलण्याचा आशय होता. असो, ज्यांचा ज्यांचा सामतंसाहेबांशी परिचय आहे, त्यांनी त्यांनी पुन्हा एकदा आपलं मिपा आता पूर्वीपेक्षा अधिक समजदार* झालंय तेव्हा पुन्हा लिहायला या असं प्रेमळ साकडं घालायला हरकत नाही. मी तर पुन्हा एकदा त्यांना विनंती करुन पाहणार आहेच.

बहुतेक मागील वर्षी असाच एक धागा आला होता. तेव्हा त्या धाग्याची लिंक मी त्यांना दिली होती त्या धाग्यातील सहजराव यांचा प्रतिसाद त्यांना वास्तवाला धरुन असा वाटला होता असे त्यांनी म्हटल्याचे आठवते. आता धागा आणि प्रतिसाद शोधायचा कंटाळा आला आहे.

सामंत साहेबांचा ब्लॉग कृष्ण उवाच इथे वाचायला मिळेल.

-दिलीप बिरुटे

शैलेन्द्र's picture

14 Aug 2011 - 11:35 am | शैलेन्द्र

प्रतीसाद आवडला..

सावंतकाकांचे लेखन न आवडणारा एक वर्ग मीपावर होता आणि आहे, पण आपल्याला न आवडणार्‍या लेखांकडे/ शैलीकडे दुर्लक्ष करुन पुढे जाण्याचा समंजसपणा बरेच जण दाखवतात(काहींनी त्यावेळी नाही दाखवला). टिका करावी, पण बोचकारु नये, खास करुन, हौशा- नवशा- गवश्यांसाठीच स्थापण झालेल्या आंतरजालीय संस्थळावर नेहमीच एका दर्जाचे लेखन येइल अशी अपेक्षा करणे वेडेपणाचे आहे..

कधीकधी, लेखक घडत असताना सुरवातीचा माल कच्चा निघतो.. आपण चांगल वेचत पुढे सरकणे हेच आपल्या हाती असतं..

प्रियाली's picture

14 Aug 2011 - 5:51 pm | प्रियाली

सावंत नाही सामंत!

सामंत हे स्वतंत्र आडनाव असून सावंतांशी त्यांचा फारसा संबंध नाही.

बाकी, सामंत यांना दीर्घायुष्य लाभो.

शैलेन्द्र's picture

15 Aug 2011 - 12:50 am | शैलेन्द्र

टायपो!!!!

दोन्ही वेगळी आडनाव आहेत, व दोन्हीत फरक आहे, हे मलाही माहीत आहे..

अप्पा जोगळेकर's picture

14 Aug 2011 - 1:17 pm | अप्पा जोगळेकर

वाढदिवसाच्या शुभेच्छा.

सामंतकाकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
त्यांनी पुन्हा मिपावर यावं असं वाटतच आहे.
पण मागच्यावर्षी दुसर्‍या एका ज्येष्ठ महिला सदस्यांनी लिहिलेल्या लेखातील क्षुल्लक चुका काढून तरूणांनी जो मोठेपण दाखवला त्यानंतर त्या पुन्हा आल्या नाहीत. मी पुन्हा एकदा विनंती करते की ज्येष्ठ्यांच्या अनुभव कथनासाठी स्वतंत्र विभाग करावा म्हणजे ज्यांना वाचायचे असेल तेच फक्त तिथे येतील. कोणतेही फालतू प्रतिसाद खपवून घेतले जाऊ नयेत. सामंतकाकांची अनेकदा चेष्टा झाली होती. आपल्याला लेखन आवडले नसेल तर प्रतिसाद न देणे इष्ट पण खिल्ली उडवण्याइतके आपण समवयस्क नसतो आणि महान तर नसतोच नसतो.

या निमित्ताने त्यांनी मिपावर पुन्हा एकदा येऊन लेखन करावे असे वाटते.

-रंगा

विकास's picture

15 Aug 2011 - 9:25 am | विकास

असेच म्हणतो!

सामंतकाकांना मनःपूर्वक शुभेच्छा!