गेटवे -मुखपृष्ठ आणि मनोगत

प्रकाश बाळ जोशी's picture
प्रकाश बाळ जोशी in जनातलं, मनातलं
13 Aug 2011 - 5:12 pm

मुंबईत आलो त्यावेळी पेन आणि पेन्सील दोन्ही बरोबर घेऊन आलो. सर्वच गोष्टी नवीन होत्या.घराबाहेर पडल्यावर असंख्य प्रकारचा जीवन संघर्ष बघायला मिळतो. मुंबई महानगर मायाबाजार आहे. त्यात सत्य काय आणि आभास कोणता हे कळणं जवळजवळ अशक्यच आहे.
पत्रकारिता करत असल्यामुळे मुंबईच्या कानाकोपर्‍यात फिरण्याची संधी मिळाली.प्रत्येक वेळेला वेगळा रंग ,वेगळा आशय जाणवला. तो लिहीणं शक्य नव्हतं .त्यामुळे ज्या काही गोष्टी ,व्यक्ती, प्रसंग अतिशय प्रकर्षाने जाणवले ते त्यावेळी लिहून ठेवले.ते शब्दांचे पुंजके होते. त्याला आकार नव्हता.काही वेळी तर आशय सुध्दा नव्हता.
लिहिता लिहिता लेखणी स्तब्ध व्हायची आणि जे शब्दात मांडता येत नव्हते ते अलगदपणे चित्रांच्या माध्यमातनं कागदावर अवतरायचं. चित्र म्हणणं सुध्दा अतिशयोक्ती वाटेल अशा केवळ काही ठळक रेषाच कागदावर आलेल्या असायच्या. शब्द केव्हा थांबत आणि रेषा केव्हा सुरु होते हे कळायचंसुध्दा नाही.
हे सगळं टिपण करत राहीलो .पण ते स्वतःपुरतच मर्यादित होतं . पण त्यातही सातत्य होतं. तसं पाहिलं तर मुंबई रोजच बदलत असते.नवीन लोक येतात.अगदी स्टेशनच्या बाहेर उभं राहून पाहिल्यास रोज काही ना काही बदल दिसल्याशिवाय रहात नाही.
लेखणी आणि पेन्सील यांच्या सहाय्याने जे काही दिसलं ,जाणवलं आणि शब्दांकीत करावसं वाटलं ते करीत गेलो.
त्यामुळे आधी लेख लिहीला आणि मग त्यासाठी चित्र काढले असं कधी घडलं नाही.शब्द आणि चित्रं एकाच झपाट्यात कागदावर उतरली.खरं तर माझ्या मनात शब्द संपून रेखाटण केव्हा तयार झालं याची जाणीवही झाली नाही.शब्द एका माळेतून ओघळावेत तसे कागदावर उतरले आणि त्यातूनच पुढे रेषा तयार होत गेली.
तसा चित्रकलेचा माझा काही अभ्यास नाही,पण समजायला लागल्यापासून रेषा,तिचा वेग ,वळण यांच्या प्रेमात पडलोय.तसं पाहिलं तर मराठीत रेखाचित्र ही एक स्वतंत्र विकसीत झालेली पण सध्या कुठंतरी थांबलेली कला आहे.दिवाळी अंकात केवळ कथा लेखांना पूरक चित्र कढून त्याचा अंक सजविण्यापुरता उपयोग करणे एव्हढ्यावरच हा प्रकार थांबत नाही तर कलात्मक रेखाचित्रकारांसाठी खास पान राखून ठेवण्यात येतं.
या छोट्या लेखांसोबत आलेल्या या रेषांचा रेखाचित्रांशी जवळचा संबंध आहे.खरं तर कपिल पाटील मागे लागल्यामुळे हा सगळा शब्दरेषांचा खेळ गेटवे नावाच्या स्तंभातून प्रसिध्द झाला.नाही तर तो माझ्या पोतडीत तसाच बंदिस्त राहिला असता.

वाङ्मयविचार

प्रतिक्रिया

बहुगुणी's picture

13 Aug 2011 - 5:28 pm | बहुगुणी

लेखमाला सुरू झाली तर! पुढील भागांची वाट पहातोय. हे मनोगत आवडलं हे वे. सां. न ल.

शुचि's picture

13 Aug 2011 - 6:48 pm | शुचि

असेच.

जयंत कुलकर्णी's picture

13 Aug 2011 - 5:58 pm | जयंत कुलकर्णी

सुंदर अतिसुंदर !

प्रदीप's picture

13 Aug 2011 - 8:09 pm | प्रदीप

आपल्या अनुभवांविषयी, तसेच आपण जी जी निरीक्षणे केलीत त्यांविषयी येथेही लिहावे अशी विनंती करतो,

'गेटवे' हा स्तंभ कुठल्या दैनिकात/ नियतकालीकात होता/ आहे, ह्याविषयी उलगडा व्हावा.

डॉ.श्रीराम दिवटे's picture

13 Aug 2011 - 8:34 pm | डॉ.श्रीराम दिवटे

येऊ द्या. पाहून घेऊ, वाचून टाकू.

प्रास's picture

13 Aug 2011 - 10:16 pm | प्रास

हेच म्हणतो.....

:-)