नुकत्याच शिकागो येथे भरणार्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या १५ अधिवेशनानिमित्त काढलेला श्री दीपलक्ष्मी आंतरराष्ट्रीय ( ऑगस्ट २०११) चा अंक हातात आला.
आणि नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे तो अथ तो इती वाचून काढला. अंक वाचताना एक समाधान मिळाले त्याचबरोबर थोडा अपेक्षा भंगदेखील झाला.
अंक आंतररष्ट्रीय आहे ही एक उत्सुकता होतीच . भारताबाहेरील मराठी लोक काय लिहीत असतील या बद्दल कुतुहल होते.
नाना पाटेकर , गिरीश कुबेर , अनंत सामंत सुप्रीया विनोद( सुप्रीया मतकरी) यांच्या लेखांची रेलचेल होती.
अंकातील लेख सुंदर आहेच. सुप्रीया विनोद ( सुप्रीया मतकरी) यानी रत्नाकर मतकरी यंच्या बद्दल लिहीलेल्या लेख हा या अंकाचे वैशिष्ठ्य . संमेलनाचे प्रमुख पाहुणे रत्नाकर मतकरी यांचा एक शिस्तशीर व्यक्ती , साहित्यीक या सोबतच मुलांवर वेगवेगळे संस्कार घडवणारा बाप अशा वेगवेगळ्या नात्यानी घेतलेला एका कन्येच्या नजरेतून घेतलेला परामर्ष असा हा लेख आहे. रत्नाकर मतकरी या वेगळ्या नजरेतून बघायला मिळतात.
गिरीष कुबेरानी घेतलेली अनिल काकोडकरांची मुलाखत ही खरेच वाचण्याजोगी आहे. ( मात्र ही नव्याने घेतलेली मुलाखत नसून जुनीच मुलाखत पुन्हा छापली आहे) ध्रुव अणु भट्टी आकारात आणणारा मानुस कसा आहे हे गिरीष कुबेरानी खुबीने दाखवून दिले आहे.
तीच गोष्ट अनंत सामंतानी घेतलेली रीम लागुंची मुलाखतीची ; रीमा या अभिनेत्रीतील वेगळेपण जाणवून द्यायची अनंत सामंतांची हातोटी मानायलाच हवी.
नाना पाटेकरानी मोहन तोंडवळकरांवर लिहीलेला लेख हा व्यक्तीचित्रणातील एक वेगळा नमुना आहे
इथुनच दृष्ट काढते हा निलीमा बोरवणकरांचा लेख सर्वात वेगळा वाटला. अमेरीकेत असणार्या मुलांच्या भारतातील पालकांचे अनुभव आहेत मनोहर तरी गमते उदास असे काहीसे अनुभव आपल्या आसपास भेटतात.
य आंकात सर्वार्थाने वेगळे असे तीन लेख आहेत. वेगळे या अर्थाने की लेखक अमेरीकेत स्थायीक आहे.
नंदन होडावडेकर यानी कोलोराडो नदीच्या पठारावरील अमेरीकन इंडीयन्स चे केलेले चित्रण. ही माहिती मराठी वाचकांसमोर प्रथमच मांडली जात असावी.
धनंजय वैद्य यानी स्वतःतील "गे" पणाचा शोध कसा लागला या बद्दल लिहीले आहे " कोणार्कच्या मंदीरातील शिल्पे" या लेखात. त्याच्याच शब्दात सांगायचे तर "आजवर कुलूप लावलेले एक दालन माझ्या मनात उघडलं .त्या खीडकीतून जगाकडे बघायचा एक नवीन दृष्टीकोन मिळाला"
प्राजक्ता पटवर्धन यांचा " ऐ दिली नादान " या गान्यावरील लेख हा वाचलाच पाहिजे. एका सुंदर गाण्याचा आस्वाद नव्याने घेतला आहे.
श्री दीपलक्ष्मीचे अंक नेहमीच उत्तम असतात. उत्तम लेखांची मेजवानी असते.
अंतरराष्ट्रीय अंक म्हणून य आंकाकडून काही विशेष अपेक्षा होत्या . मात्र त्या बाबतीत फारच निराशा झाली. लेख उत्तम आहेत मात्र बर्याच लेखांत काही नवे मिळत नाही.
अनंत सामंत , गिरीष कुबेर , नाना पाटेकर , अशी दमदार नावे लेखाकांच्या यादीत आहेत
अनील काकोडकर , शोभा डे ,रीमा लागू , मोहन तोंडवळकर, अशोक हांडे इत्यादी यशस्वीतांची व्यक्तीचित्र मुलाखती आहेत . मात्र ही नावे वाचून अंक वाचायला घेतला तर अपेक्षाभम्ग होतो
रीमा लागुंची मुलाखत पंधरा वर्षांपूर्वीच्या दिवाळी अंकातून घेतली गेली आहे.
नाना पाटेकरांचा लेख हा हा मोहन तोम्डवळकरांच्या गौरवग्रंथातून घेतलेला आहे.
शोभा डे यांच्या मुलाखतीत काहीच वेगळे नवे सापडत नाही.
अंकाची मांडणी आंतरराष्ट्रीय वगैरे अजिबात वाटत नाही. यातील फोट्लो वगैरे अगदीच बाळबोध पणे मांडले आहेत. सगळीकडे कृष्ण धवल फोटो का वापरले आहेत ते अनाकलनीय आहे. काही फोटो तर एखाद्या स्वस्तातल्या झेरॉक्स मशीवर छापले असावेत किंवा ब्लॉक वापरले असावेत इतके धूसर फोटो आहेत.(उदा. अशोक हांडे चा पोस्टरचा फोटो) अपवाद रत्नाकर मतकरींचे रेखा चित्र.
मुख पृष्ठ देखील आकर्षक वाटत नाही. त्यावरील बालगंधर्व चित्रपटातील नटाचा फोटो . हरीश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटातील दृष्ये या चित्रांचा आतील मजकुराशी काहीही संबन्ध नाही.
श्री दीपलक्ष्मी चा हा आंतरराष्ट्रीय अंक एक अंक म्हणूनही विस्कळीत वाटतो.
प्रतिक्रिया
8 Aug 2011 - 10:52 pm | शुचि
कुठे वाचायला मिळेल?
9 Aug 2011 - 5:44 am | गणा मास्तर
ऑनलाईन मिळेल का अंक?