संततधार

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
2 Aug 2011 - 9:05 am

त्या कुंद पहाटे झडली संततधार
मेघात विखुरले मन माझे चौफेर
आषाढघनांचे धुके; नाचरे मोर
उंचावुन माना शोधे चंद्र चकोर

सागर भरती लाटेवर फेस विभोर
रेतीवर रांगे ओघळात हिंदोळ
अंधारनभाचे ओणवले झाकोळ
वार्‍यात मातला अश्वबळाचा जोर

चहुओर सैल मग का मनभर हा घोळ
थेंबात थेंब दुथडीत अवखळे लोळ
झिंगूनहि नाही कुठे लागला मेळ
मृगजळ्स्वप्नांचा भातुकलीत समेळ

.....................अज्ञात

शृंगारकरुणकविता

प्रतिक्रिया

गणेशा's picture

2 Aug 2011 - 7:35 pm | गणेशा

अप्रतिम कविता .. आवडली एकदम.

आषाढघन शब्द वाचुन खुप छान वाटले..

असेच लिहित रहा... वाचत आहे...

पाषाणभेद's picture

3 Aug 2011 - 1:47 pm | पाषाणभेद

सुंदर कविता

चित्रा's picture

7 Aug 2011 - 4:22 am | चित्रा

चित्रदर्शी कविता.

पहिली दोन कडवी अधिक आवडली.