कान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली
अरे कान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली
निट जपून वाढ माझी फाटकी रे झोळी ||धृ||
सकाळीच उठले मी अजाणतेपणी
काय घडेल दिसभर नव्हते ध्यानी
पोट नाही भरले जरी न्याहरी केली
कान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली ||१||
पंचपक्वांन्न आहे सोबतीला शिरापुरी
भरलेलं ताट आले समोर दुपारी
किती खावे किती नको झाले त्यावेळी
कान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली ||२||
कधीतरी आराम मिळो ह्या पोटाला
संध्यासमय जवळ हा आला
पाषाणगवळण तुझ्या चरणी लीन झाली
कान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली ||३||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
३०/०७/२०११
प्रतिक्रिया
1 Aug 2011 - 4:18 am | इंटरनेटस्नेही
चांगली कविता, कीप ईत अप, पाभे!
1 Aug 2011 - 9:20 am | मदनबाण
लगे रहो दफोराव... :)
2 Aug 2011 - 8:22 pm | गणेशा
कविता छान नेहमीप्रमाणे..
अवांतर : ते आपल्या लोकनाट्याचे पुढचे भाग कवा येणार आहेत ?