आज सकाळी सकाळी सौंदर्यं यांची ही गाथा वाचली आणि आम्हाला ही आता तयारी करावी लागणार याची जाणीव झाली.
आली माझ्या घरी ही गटारी
सर्व पेयांची झाली तयारी
मस्त रात्रही,धूंद वास हा,मी तर पेग भरावे
दर वर्षी रे,वेग वेगळी घेऊन मी पहावे
कीक जोरात बसे,काडी ओठी घुसे
दोस्त लोकांची मैफल न्यारी
आली माझ्या घरी ही गटारी !!!
विदेशी मारता नको असता,भानही हरपून गेले
तंगडी बुर्जी पापड आणून, जेवण भरपूर केले
हर्ष दाटे उरी, मित्र आले घरी
आज बनली चिकन तंदुरी
आली माझ्या घरी ही गटारी !!!
अमोल केळकर
--------------------------------------