आमच्या काही मित्रांसह जहांगीर आर्ट गॅलरीत (तेथील ऑडिटोरियम हॉल मध्ये) चित्रांचे प्रदर्शन दिनांक १ ते ७ ऑगस्ट २०११, करण्याचे योजिले आह, तरी मिपाकर मंडळींनी इष्ट मित्र-मैत्रिणींसह अवश्य भेट द्यावी. आम्ही स्वतः मात्र सध्या पॅरिस मध्ये मुक्काम ठोकुन असल्याने तिथे नसणार....
प्रदर्शन बघितल्यावर प्रतिक्रिया जरूर कळवाव्यात.
चित्रगुप्त
प्रतिक्रिया
22 Jul 2011 - 2:37 pm | पाषाणभेद
मान. रा. रा. चित्रगुप्त,
आपले अभिनंदन. आपला झेंडा तिन्ही लोकी फडको.
प्रदर्शन पाहण्यासाठी येण्याजाण्याचा खर्चासहित जहांगीर आर्ट व पॅरीसचे तिकीटे पाठवून देणे. खाण्यापिण्याचा खर्च आम्ही आमचा करतो. त्याबद्दल काळजी नसावी.
प्रतिक्रियांचा ड्राफ्ट रेडी आहे. त्यात आवश्यक बदल करणे असल्यास अगावू सांगावे.
लोभ असावा ही विनंती.
आपला,
22 Jul 2011 - 12:19 pm | बहुगुणी
ज्यांना ते तिथे जाऊन पहाणं शक्य नाही अशांसाठी काही चित्रे इथेही देता आली तर पहा.
22 Jul 2011 - 12:48 pm | निवेदिता-ताई
आम्हाला तिथे जाउन पहाणे शक्यच नाही...सो कॄपया इथे चित्रे देण्याची कॄपा करावी...
22 Jul 2011 - 12:22 pm | विलासराव
म्हणजे भेट नक्की देउ.
प्रतिक्रिया द्यायला नाय जमायच असा अनुभव आहे.
मी आर्ट गॅलरीत नेहमी जात असतो. पण बर्याचदा ती चित्रे समजतच नाहीत.चित्रकाराला विचारायची तर हिम्मतच होत नाही.
असो.
22 Jul 2011 - 1:16 pm | गणपा
एकदम प्रामाणिक प्रतिसाद आवडला. :)
22 Jul 2011 - 2:26 pm | प्रास
नक्की प्रयत्न केला जाईल.
बादवे,
तुमची लिंकातली चित्र एकदम भारीयेत हो, प्रदर्शनात हीपण असतील का?
(न)चित्रकार