माझ्या बागेतील फुले.

ज्योति प्रकाश's picture
ज्योति प्रकाश in कलादालन
20 Jul 2011 - 1:37 pm

आषाढी एकादशी झाली.वारकर्यांप्रमाणे फुलांनीही पंढरीची वारी संपवून आता फुलायला सुरुवात केली.
आमच्या बागेत सध्या कवठी चाफा,ब्रह्मकमळ्,कमळ्,जास्वंद ही फुले फुलायला लागली.त्याचे काही फोटो
देत आहे.
१)हा कवठीचाफा.

2)ही देवपुजेसाठी काढलेली कवठीचाफ्याची फुले.

3)हे ब्रह्मकमळ्.दोन दिवसामध्ये एकूण ८८ फुले फुलली होती.झाड फुलांनी भरून गेलं होतं.माझ्याकडे मोठा कॅमेरा
नसल्यामुळे पुर्ण झाडाचा फोटो काढता आला नाही.

४)हे जांभळ्या रंगाचे कमळ.

5)हे जास्वंदाचे फुल.

कला

प्रतिक्रिया

कवठीचाफा मस्तच !! हे झाड कुंडीत लावता येऊ शकतं का ?? म्हणजे नीट वाढ होते का कुंडीत ??

ज्योति प्रकाश's picture

20 Jul 2011 - 3:22 pm | ज्योति प्रकाश

कुंडीत हे झाड कधी पाहिलं नाही,कारण हे झाड बर्यापैकी मोठं होतं.

एक तारा's picture

20 Jul 2011 - 1:55 pm | एक तारा

काय प्रकार आहे? मी तरी आज पहील्यांदाच ऐकतोय. आणि पुण्यात कुठे मिळू शकेल काय?

ज्योति प्रकाश's picture

20 Jul 2011 - 3:24 pm | ज्योति प्रकाश

पुण्यात मिळतं कि नाही माहित नाही,एखाद्या नर्सरीत विचारून पहा.

ब्रह्मकमळ एकदम आवडलं, झ़क्कास

सुधांशु कवठीचाफ्याच झाड छोट असेपर्यंत कुंडीत चालत. मोठ झाल्यावर ते कुंडीतुन काढून जमिनीत लावाव लागत. मोठी कुंडी किंवा बालदीच ह्यायची मोठी म्हणजे बरेच दिवस त्यात ठेवता येत.

दीप्स's picture

20 Jul 2011 - 5:14 pm | दीप्स

अतिशय सुंदर फोटो आहेत. तुमचा बाग खूप मोठा आहेका? आणि अजून किती प्रकारची फुले आहेत तुमच्या बागेत. नवनवीन फुलांचे असेच फोटो टाकत जा.

अत्रुप्त आत्मा's picture

20 Jul 2011 - 6:52 pm | अत्रुप्त आत्मा

मस्तच... कवठी चाफा...काय क्लासिक वास असतो याचा...त्याच्या एकुण रंगरुपावरुन मी लहानपणी त्याला व्हेनीला आईस्क्रीम चाफा म्हणायचो..त्याची आठवण झाली

पंगा's picture

21 Jul 2011 - 7:27 am | पंगा

आम्ही ''जन्मानी'' मराठी नसुन,

याचा नेमका अर्थ कळला नाही. म्हणजे आपण ज्या कुटुंबात जन्मलात ते कुटुंब मराठी नसून गुजराती, मद्राशी, भय्या, बिहारी किंवा अन्य अमराठी आहे, असे सुचवायचे आहे का? (आडनावावरून तर तसे वाटत नाही!) की आपला जन्म महाराष्ट्राबाहेर झाला हे सांगायचे आहे?

मराठीत ''आमचा'' जन्म झालेला आहे....

हे पार डोक्यावरून गेले. मराठीत एखाद्याचा जन्म कसा होतो? आपल्या जन्माचा दाखला आपण (किंवा खरे तर आपल्या पालकांनी किंवा ज्यांनी कोणी जन्मदाखल्याचा अर्ज केला त्यांनी) मराठीत करवून घेतला आहे, असे म्हणायचे आहे का?

मग तसे स्पष्ट बोला की राव!

निवेदिता-ताई's picture

22 Jul 2011 - 7:04 am | निवेदिता-ताई

अतिशय सुंदर ग

चित्रा's picture

22 Jul 2011 - 9:22 pm | चित्रा

यातील दर्दीं, जाणकार लोकांना एक प्रश्न - आजकाल कवठीचाफा, सोनटक्के, तेरडे इ. फुले नर्सरी किंवा बाजारांमध्ये दिसतात का?

एक तारा's picture

27 Jul 2011 - 3:38 pm | एक तारा

पण मी एकदा (recently) तेरडा पाहिला होता एका नर्सरीत. कवठीचाफा कसा दिसतो ते माहित नाहि त्यामुळे पाहिला का ते माहित नाहि. सोनटक्का आहे वाटतं माझ्याकडे.