परवा मी एक खूप छान लेख वाचला. "व्यवस्थापन/नेतृत्व/ऑर्गनायझेशन कल्चर" आदि विषयांतर्गत येणारा असा हा लेख होता. त्याचा थोडक्यात गोषवारा पुढीलप्रमाणे -
प्रत्येकाकडे बोलण्यासारख्या काही गोष्टी असतात, प्रत्येकालाच मते असतात. ऑफीसमध्ये देखील "वर्क कल्चर" अगदी संपूर्ण आदर्श कोणालाच वाटत नसते. काही बदल सुचवावेसे वाटत असतातच. पण बहुसंख्य लोक हे आपले मत गुलदस्त्यात ठेवतात, बोलून दाखवत नाहीत. भीती, संकोच, भीड अनेक कारणे त्यापाठी असतात त्याचबरोबर "सवय" हेदेखील कारण असते. पण हेच लोक काही चूक झाली की मात्र लगेच पुढे सरसावतात आणि पुटपुटतात - "मला वाटलं होतच." ...... अरे मग तू आधी का नाही बोललास? पण नाही.
एका सर्व्हेमध्ये मोठ्या कंपनीच्या वरीष्ठ पदावरच्या अधिकार्यांची जेव्हा मुलाखत घेतली तेव्हा त्यांनी हेच सांगीतलं की - आम्ही या "मला माहीत होतं / मला वाटलच होतं / मला शंका होतीच" सिंड्रोमला अगदी कंटाळून गेलो आहोत. तुमचे मत कामाच्या ठीकाणी नीर्भीडपणे मांडणे हे खूप महत्वाचे असते. मग ते बरोबर आहे की चूकीचे ते पुढची पायरी. पण शब्द गिळू नका ... स्पीक इट आऊट!! कारण तुमचे मत कदचित अतिशय मौल्यवान असूही शकेल. आणि जरी ते तसे नसले तरी कंपनी कल्चर, कंपनीची जडणघडण होण्यात त्याचा हातभार लागू शकेल.
अंतर्मुख लोकांकरता मिसळपाव आदि फोरम्सचा त्या दृष्टीने खूप फायदा होत असावा. मला तरी १००% झाला. आपले मत मांडायची, प्रतिक्रिया द्यायची सवय लागली.तत्पूर्वी मला प्रतिक्रिया देणे तितकेसे महत्वचे वाटत नसे किंबहुना इतर लोक "माईंड रीडर्स" आहेत अशा गैरसमजातच जणू मी वावरत असे. पण सतत प्रतिक्रिया देवाणघेवाणीमुळे सकारात्मक बदल घडला.
प्रतिक्रिया
14 Jul 2011 - 8:29 pm | नितिन थत्ते
मनोगत आवडले.
15 Jul 2011 - 11:44 am | परिकथेतील राजकुमार
थत्ते चाचांशी सहमत. (प्रतिक्रियेशी सहमत. स्वाक्षरीशी नाही)
मनमोकळ्या गप्पा आवडल्या ग.
हा हा हा. फरक म्हणजे काय सांगायचा आमची शुचि मामी एकदम भांडायला वैग्रेच शिकली ;) ईट क जवाब पत्थर.
बाकी 'बाँबस्फोट चालतील पण त्यावरचे धागे आवरा' अशी वेळ आलेली असताना तुझे वेगळ्या विषयावरचे लिखाण आवडून गेले एकदम.
15 Jul 2011 - 2:33 pm | विश्वनाथ मेहेंदळे
>>बाकी 'बाँबस्फोट चालतील पण त्यावरचे धागे आवरा' अशी वेळ आलेली असताना ...
असहमत. १०० धागे चालतील पण अजून एकही बाँबस्फोट नको. "परदु:ख शीतल" असे म्हणतात ते उगीच नाही.
15 Jul 2011 - 2:45 pm | परिकथेतील राजकुमार
विनोद समजला नाहीये का समजुन घ्यायचा नाहिये ? :)
आणि प्लिज प्लिज 'विनोदासाठी सुद्धा अशी वाक्ये नकोत' किंवा 'तुम्हाला काय कळणार त्यात हानी झालेल्यांच्या भावना' अशा टायपातले स्पष्टीकरण तर अज्जिबात नको.
इथे गेले दोन दिवस उगा मगरीचे अश्रु गाळणारे किती पाण्यात आहेत ते सगळ्यांना माहिती आहे.
14 Jul 2011 - 8:45 pm | अप्पा जोगळेकर
जर वादाचा मुद्दा कामाशी ऑफिसच्या कामाशी निगडीत असेल म्हणजे विशिष्ट काम करण्यासाठी वापरले जाणारे लॉजिक/तंत्रज्ञान/टूल तर बेधडकपणे आपले मत मांडावे मग स्मोर साहेब असूंदेत किंवा सीईओ.
जर वादाचा मुद्दा ऑफिसमधले अंतर्गत राजकारण, मराठी/ अमराठी वाद, हिंदू/मुसलमान, हिंदुत्व अशा वांझ विषयांशी संबंधित असेल तर सरळ तोंडाला कुलुप घालावे असे मत आहे.
14 Jul 2011 - 8:55 pm | चिरोटा
हा सिड्रोम तयार होवू न देणे हे ह्या 'वरिष्ठ' अधिकार्यांचे कर्तव्य असते. कंपनीत Free thinking/discussion वाढवणे हे leadership चे काम आहे. 'सांगितले आहे तेवढे कर/ पुढचे पुढे बघू/त्याची काळजी तू नको करूस' अशा प्रकारची वक्तव्ये वरिष्ठांकडून अनेक वेळा होतात. आशियायी देशांत हे कल्चर जास्त प्रमाणात दिसते. कामाच्या स्वरुपावरही हे अवलंबून असते.
14 Jul 2011 - 9:23 pm | शुचि
मान्य! वरीष्ठ अधिकार्याने पुढाकार घेतला तरच खालचे लोक बोलू शकतात.
पण बरेचदा पाहीलं आहे की वरीष्ठ अधिकारी ऐकवयास उत्सुक असतो पण आपले सहकारी मात्र तोंडाला कुलूप घालून निमूटपणे पडेल तेवढच काम करतात. बरं आपण जरा "उस्फूर्तपणे" (प्रोअॅक्टीव्हली) काही बोलू धजलो की यांची नेत्रपल्लवी सुरु होते. अर्थात कितीही नाही परीणाम होऊ द्यायचा म्हटलं तरी परीणाम सहकार्यांच्या देहबोलीचा परीणाम होतोच.
उस्फूर्त = स्पाँटेनिअस हे माहीत आहे. पण मला प्रोअॅक्टीव्ह हा शब्दच वापरायचा आहे.
14 Jul 2011 - 10:43 pm | सचिन जाधव
हे सर्व SITUATION वर DEPEND असत.तुम्हाला काय्,कधी,कुटे बोलायचय हे सर्व वेळेवर DEPEND असत.
14 Jul 2011 - 11:11 pm | आत्मशून्य
आपली विनोद्बूध्दी भन्नाट आहे, याचा प्रत्यय आपण आत्मविश्वासाला हेल्दी अहंकार असे नामकरण करताना फार सूंदरपणे दिला होता, अर्थात मी फक्त हे मत मांडलयं. बाकी लेखातल्या बहूतांश मूद्यांशी बराच सहमत.
14 Jul 2011 - 11:21 pm | स्वानन्द
त्यात विनोद काय होता ते कळले नाही.
15 Jul 2011 - 12:13 am | सोत्रि
+१
हेच म्हणतो
15 Jul 2011 - 12:36 pm | गणेशा
मी एक सुत्र बर्याचदा वापरतो ..
प्रत्येकाच्या मतांचा आदर करा.. आपल्या मतांचा आदर त्यातच असतो..
बस्स .. मग ऑफिस असो.. सोशल नेटवर्क असो. सामाजिक असो वा आणखिन काही.. सगळीकडे हे सुत्र वापरुन बघा.
पुढच्याचे मत आपल्याला पटत नसले तरी सयंमाने आपण ते ऐकुन घ्या... भले त्यावर आपले बाणेदार मत असले तरी परखड बोला.. निदान पुढच्याचे ऐकुन घेतल्यामुळॅ तो ही आपले ऐकुन घेतोच..
बाकी येणारे परिनाम हे त्या परिस्थीवर आणि द्रुष्टिकोनावर अवलंबुन असतात
15 Jul 2011 - 12:46 pm | एक तारा
आणि मि पा वर नवीन असल्यामुळे अजुन तरी बहिर्मुख झालेलो नाही, पण हिच अपेक्षा आहे. अंतर्मुख होण्यात तोटाच आहे हे मात्र खरे. याचसोबत लोक काय म्हणतील हा पण मोठा प्रश्न असतो. आणि माझे मत कोणाला नाही आवडले तर, आणि माझी ईज्जतच निघाली तर असंही वाटू शकते.
आणि आपण म्हटल्याप्रमाणे मिसळपाव आदि फोरम्सचा त्या दृष्टीने खूप फायदा होतो असं मलाही वाटतं. पण अश्या फोरम्सवर जर आयडेंटिटी लपवुन प्रतिक्रीया दिल्या जात असेल तर व्यक्तिमत्व विकासाच्या द्रुष्टीने त्याचा फारसा काही फायदा होतो असं मला नाही वाटत.
15 Jul 2011 - 6:27 pm | शुचि
१००% फायदा होईल. हळूहळू आपल्याला आपल्यात फरक जाणवेल. संवाद चालू ठेवा.
16 Jul 2011 - 1:18 pm | सौप्र
>>तुमचे मत कामाच्या ठीकाणी नीर्भीडपणे मांडणे हे खूप महत्वाचे असते. मग ते बरोबर आहे की चूकीचे ते पुढची पायरी. पण शब्द गिळू नका ... स्पीक इट आऊट!! कारण तुमचे मत कदचित अतिशय मौल्यवान असूही शकेल. आणि जरी ते तसे नसले तरी कंपनी कल्चर, कंपनीची जडणघडण होण्यात त्याचा हातभार लागू शकेल.>>
शुचि, हे अगदी बरोबर पण हे कंपनी कंपनी आणि मुख्यतः तुमच्या वरिष्ठांवर अवलंबून असते. स्पष्ट आणि निर्भीड पणे बोलण्याचे काही उलट परिणामही (म्हणजे माझ्याप्रति वरीष्ठांचे वागणे बदलणे वगैरे) मी अनुभवले आहे. अर्थात त्यामुळे मी काही बदललो नाही. किमान कामाच्या ठीकाणी तरी.
बाकी लेखन आवडले.
17 Jul 2011 - 12:50 pm | जयनीत
जनातलं अन मनातलं ह्यात फार फार असतो कधी कधी.