नानासाहेब फडणवीसांचे चित्र विकणे आहे

यकु's picture
यकु in जनातलं, मनातलं
1 Jul 2011 - 10:23 am

भारतातील सर्वात महत्त्वाच्या ऐतिहासिक मुत्सद्यांपैकी एक नाना फडणवीसांचे पोट्रेट लंडनच्या सोथबी ऑक्शन हाऊसमध्ये लिलावासाठी ठेवण्यात आले आहे. हे चित्र ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीचा चित्रकार थॉमस सीटनने सन १७७८ मध्ये काढले असल्याची चित्राच्या मागे नोंद आहे.
मूळ नाव बालाजी जनार्दन भानू असलेले नाना फडणवीस हे पेशवाई दरम्यानच्या मराठा साम्राज्यातील एक आघाडीचे मंत्री होते. सन १७७३ मध्ये नारायणराव पेशव्यांचा खून झाल्यानंतर, फडणविसांच्या नेतृत्वाखालील बारभाईचे कारस्थान इतिहासात प्रसिद्ध आहे. ब्रिटीश राजमध्ये मराठा साम्राज्याचे स्वातंत्र्य अबाधित राखणे हे नानासाहेब फडणविसांच्या मुत्सद्देगिरीचे यश मानता येईल. नाना फडणवीस १३ मार्च १८०० रोजी वारले.
त्यांच्या मृत्युनंतर भारताचा तत्कालीन गवर्नर जनरल लॉर्ड रिचर्ड वेलस्लीने नानाबद्दल ""the able minister of Peshwa state, whose upright principles and honourable views and whose zeal for the welfare and prosperity, both of the dominions of his own immediate superiors and of other powers, were so justly celebrated" हे उद्गार काढले होते.

सोथबीने विकायला काढलेले चित्र त्यांच्या संकेतस्थळावरून: http://www.sothebys.com

चित्राची किंमत ७०,००० पौंड अपेक्षित आहे.

बातमी सौजन्य : ईटी

इतिहासबातमी

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

1 Jul 2011 - 10:29 am | चिरोटा

आपले राज्यकर्ते आणतील काय हे चित्र? की परत जात्/कूळ शोधत बसणार?

शिल्पा ब's picture

2 Jul 2011 - 7:38 pm | शिल्पा ब

चित्र छानच आहे पण एका चित्रासाठी एखादा व्यावसायिक एवढी मोठी रक्कम मोजू शकतो त्यामुळे सरकारने (राज्यकर्ते) जनतेचे पैसे चित्र खरेदीसाठी वापरू नयेत. एखाद्या भारतीय वंशाच्या व्यावसायिकाने चित्र घेतले तरी ठीकच नाही का?

चिंतामणी's picture

3 Jul 2011 - 1:49 am | चिंतामणी

तुम्ही लै भारीच आहात.

उत्तर माहीत आहे तरी प्रश्ण विचारत आहात.

चिंतामणी's picture

3 Jul 2011 - 1:49 am | चिंतामणी

तुम्ही लै भारीच आहात.

उत्तर माहीत आहे तरी प्रश्ण विचारत आहात.

llपुण्याचे पेशवेll's picture

1 Jul 2011 - 10:35 am | llपुण्याचे पेशवेll

वा. नानांचे प्रत्यक्ष चित्रं बघून फार छान वाटले. अजून कोणत्या व्यक्तिंची चित्रे आहेत का तिथे?

चित्र चांगलंय पण ७० हजार पाउंड जरा ज्यास्त होतात बुवा.. :)

मालोजीराव's picture

1 Jul 2011 - 11:54 am | मालोजीराव

त्यापेक्षा ७०,००० पौंड गोळा करून त्यातून नानांचा एक छानसा स्मारक बांधुयात पुण्यामध्ये !

- मालोजीराव

योगी९००'s picture

1 Jul 2011 - 12:10 pm | योगी९००

त्यापेक्षा ७०,००० पौंड गोळा करून त्यातून नानांचा एक छानसा स्मारक बांधुयात पुण्यामध्ये !

हो..स्मारक बांधूया....राष्ट्रवादीला नाहीतरी त्यांच्या पुढच्या पिढीची सोय बघीतली पाहिजे..

sagarparadkar's picture

1 Jul 2011 - 12:08 pm | sagarparadkar

एक प्रश्न मनात आलाय तेव्ह्ढा विचारतोय कि पेशवेकालीन साडेतिसरा शहाणा कोणता?

माझ्या लक्षात असलेले अडीच शहाणे असे:

१. सखारामबापू बोकील
२. विठठल सुंदर (त्या काळचा निजामाचा दिवाण)

वरील दोन पूर्ण शहाणे समजले जात कारण ते दरबारी राजकारणातले मुत्सद्दी आणि उत्तम योद्धे होते तर

३. नाना फडणवीस (हे योद्धे नव्हते तर फक्त उत्तम मुत्सद्दी होते, म्हणून अर्धे शहाणे म्हणवले जात)

तिसरा पूर्ण शहाणा कोण हे आठवण्याचा खूप प्रयत्न केला पण नाही आठवत ...

अवांतरः ह्या प्रतिसादावर उपरोधिक, कुचकट किंवा तिरसट किंवा भलतेच काहीतरी प्रतिसाद अपेक्षित नाहीत. तसेच ह्या अवांतराला केंद्रस्थानी ठेवून प्रतिसाद पाठवू नयेत ही विनंती :)

हो हो.. बरी आठवण केलीत... चित्र ज्याला विकत घ्यायचंय तो घेईलच.. पण यानिमित्तानं त्याकाळच्या घटना वाक्यप्रचार यावरची चर्चा इथे अवांतर ठरू नये... साडेतीन शहाण्यांबद्दल मिपावर मागे चर्चा झालीय एकदा.. पण आता नेमका दुवा सापडणार नाही...

राघो भरारी म्हणजे काय? बारभाईच्या कारस्थानाबद्दल कुणी विस्ताराने लिहू शकेल काय? आमचे इंद्रराज पवार साहेब कुठल्या मोहीमेवर आहेत कोण जाणे..

बहुगुणी's picture

2 Jul 2011 - 5:44 pm | बहुगुणी

...मला ठाऊक असलेले उत्तर खरडीत पाठवले आहे.

योगप्रभू's picture

1 Jul 2011 - 12:57 pm | योगप्रभू

नागपूरकर रघुजी भोसल्यांचा कारभारी देवाजीपंत चोरघडे हा तिसरा पूर्ण शहाणा.

राघो-भरारी म्हणजे मला वाटतं राघोबादादांची अटकेपार भरारी.

या संदर्भलेखातूनः

..."काशीबाईपासून बाजीरावास रामचंद्र उर्फ रघुनाथराव, जनार्दन व बाळाजी उर्फ नाना असे ३, तर मस्तानी कडून समशेरबहद्दर उर्फ कृष्णराव असे एकुण ४ पुत्र होते...."

"...बाजीरावाच्या मृत्युनंतर त्याचा मुलगा बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब यास शाहु महाराजांनी पेशवाईची वस्त्रे दिली. नानासाहेबाने पुण्याला खर्‍या अर्थाने शहराचे रुप दिले. सदशिव पेठ, नाना पेठ, शुक्रवार पेठ आणि पर्वती हे नानासाहेबाच्या आज्ञेवरुन बांधेले गेले. शिवाय मुठेवर "लाकडी पुल" त्यानेच बांधुन घेतला. पुण्याला शुद्ध पाण्याचा पुरवठा होत रहावा म्हणुन यानेच "कात्रज" वसवले. नानासाहेबाने खर्‍या अर्थाने मराठे शाहीचा अटकेपार गेलेला सुवर्णकाळ बघितला त्याच बरोबर मराठ्यांना पानिपतचा प्राणांतिक फटका याच्याच करकीर्दीत बसला. व्यवस्थापनाच्या दृष्टिने मात्र नानासाहेबाने आपले काम चोख बजावले. रघुनाथरावाने वयाच्या २३व्या वर्षीच अटकेवर भगवा फडकवला. राघोबाचा राघो-भरारी झाला. .."

साडेतीन शहाण्यांविषयीचा तुम्ही म्हणता तो लेख हा असावा.

बारभाई कारस्थानाविषयी मिळालेली माहिती अशी:

"....पेशव्यांचे कारभारी नाना फडणीस व त्यांचे चुलत भाऊ मोरोबा पेशवे बाळाजी विश्‍वनाथांच्या काळापासून या भानू घराण्याकडे फडणीसीचे काम होते. नाना हे मोठे धूर्त व राजकारण कुशल होते. माधवराव पेशव्यांनी आजारी असताना राज्यांचा कारभार सखाराम बापू व नाना फडणीस यांच्याकडे सोपविला. मोरोबाला तेव्हापासून नानांचा मत्सर वाटू लागला. राघोबांदादांना पेशवे पदावरून दूर करण्यासाठी केलेल्या बारभाई कारस्थानात या तिघांचाही समावेश होता; पण मोरोबा दोन्ही दगडांवर पाय ठेवून होता. पुण्यातील इंग्रज वकील मॉस्टीनच्या पाठिंब्याने मोराबादादानं मराठ्यांच्या सत्तेची सुभे हाती घेण्यासाठी इ.स.1778 मध्ये एक कारस्थान रचले. या कारस्थानाप्रमाणे इंग्रजांच्या आश्रयास असणाऱ्या राघोबास पेशवे पदावर बसवून पेशवे दरबारातील आपले महत्त्व वाढवून घ्यावयाचे असे ते कारस्थान होते. सखाराम बापू, तुकोजी होळकर हे या कारस्थानात सहभागी झाले होते. गोपाळ नाईक तांबवेकर हे आधी पेशव्यांचे पोतदार होते; पण बारभाई कारस्थानात त्यांचे हे पद गेले. पुन्हा पोतदार पद मिळविण्यासाठी गोपाळ नाईक तांबवेकर हे मोराबादादांच्या कारस्थानात सामील झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नानांनी मोरोबांशी करार केला. याप्रमाणे राघोबांऐवजी बाल पेशवा सवाई माधवरावाच्या नावाने मोरोबा व सखाराम बापू यांनी कारभार पाहावा, बाल पेशवा मात्र नानांच्या ताब्यात असावा, असे ठरले. संधी मिळताच नानांनी म्हादजी शिंदेंच्या मदतीने कारस्थान उलटविले. सखाराम बापू, मोरोबा, गोपाळ नाईक तांबवेकर यांना कैद केले. यातील 1778 मध्ये यातील एक मदतनीस गोपाळ नाईक तांबवेकर यांना मंडणगडच्या किल्ल्यावर कैदेत ठेवले होते...."

परिकथेतील राजकुमार's picture

2 Jul 2011 - 7:08 pm | परिकथेतील राजकुमार

आता इकडे कोणी विजय माल्ल्या लक्ष देईल काय ?

बाकी तोवर संबंधितांनी फडणवीस हे पेशव्यांचे मंत्री होते वैग्रेच्या संबंधातले पुरावे गोळा ठेवा म्हणजे झाले. हो, नाहितर उद्या फडणवीस इंग्रजांचे हेर होते असे कोणी शोधून काढायला नको.

जयंत कुलकर्णी's picture

2 Jul 2011 - 7:14 pm | जयंत कुलकर्णी

त्यांना जास्तीत जास्त बीअर पिऊन वाढीव ऊत्पन्नाची हमी पाहिजे तर देता येईल. तसे म्हणाल तर गांधीजींच्या चष्म्यालाही आमचा हातभार लागलेला आहेच.

:-)

अप्पा जोगळेकर's picture

3 Jul 2011 - 5:49 pm | अप्पा जोगळेकर

जर हे चित्र भारतात कोणी परत आणेल तर खूप चांगले होईल.
अत्यंत माहितीपूर्ण प्रतिसाद आणि सदर धागा काढल्याबद्दल यशवंत एकनाथ यांचे आभार.
नाना फडणवीसांच्या निव्वळ वाईट सवयींचेच काय ते प्रोजेक्शन रंगभूमीवर आणून त्यांना सुपर खलनायक बनविणार्या विजय तेंडुलकर या उकिरडे उकरुन काढणार्या गिधाडाचा अतिशय राग येतो.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

9 Jul 2011 - 4:07 am | निनाद मुक्काम प...

टिपू सुलतान ची तलवार विजय माल्याने विकत घेतली व आपल्या राज्यात परत आणली .महाराष्ट्रात जर नाना ह्यांचे चित्र कुणी परत आणले तर त्या व्यक्तीवर बामनगिरी केल्याचा आरोप होईल .

नितिन थत्ते's picture

9 Jul 2011 - 11:18 am | नितिन थत्ते

>>टिपू सुलतान ची तलवार विजय माल्याने विकत घेतली व आपल्या राज्यात परत आणली .महाराष्ट्रात जर नाना ह्यांचे चित्र कुणी परत आणले तर त्या व्यक्तीवर बामनगिरी केल्याचा आरोप होईल .

१. मल्ल्यावर कर्नाटकात टीका झाली अथवा नाही याची काही माहिती देता येईल का?

२. "बामनगिरी केल्याचा आरोप" टाईप प्रतिक्रिया वाचून पुलंच्या 'नागपूरकराची' आठवण येते. सारखं सगळे आपल्या विरोधात आहेत असा 'उगाच' कांगावा दिसून येतो.