हायकू -

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
28 Jun 2011 - 12:19 am

आकाशी पक्षी
उडतात मजेत
शिकारी खिन्न

हाती लपली
चार फुले चाफ्याची
शीळ वाऱ्याची

निजरूपाचे
कुतूहल बाळाचे
आरसा खूष

पुढे दगड
पडलेले रग्गड
मी का शहाणा

उत्सुक डोळे
पिंडापाशी कावळे
मोकळा आत्मा

कवितामुक्तक

प्रतिक्रिया

हायकू, मस्त जमले आहेत एकदम

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

28 Jun 2011 - 11:04 am | मिसळलेला काव्यप्रेमी

उत्सुक डोळे
पिंडापाशी कावळे
मोकळा आत्मा

सुंदर!! रचायला फार कठीण पण दिसायला सोपा वाटणारा हा प्रकार!!
तुमच्या काव्यप्रतिभेला सलाम!!

झंम्प्या's picture

28 Jun 2011 - 9:28 pm | झंम्प्या

छान वाट्ली आपली कवीता...
मस्त जमलीय...

धनंजय's picture

29 Jun 2011 - 12:31 am | धनंजय

५-७-५ बंधन पाळलेले दिसते. मराठीमध्ये हायकू रचणारे क्वचितच हे बंधन पाळतात.

आर्या१२३'s picture

29 Jun 2011 - 4:17 pm | आर्या१२३

मस्त मस्त!!
छान जमलय हायकु!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Jun 2011 - 5:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उत्सुक डोळे
पिंडापाशी कावळे
मोकळा आत्मा

-दिलीप बिरुटे