अन... हात तुझा हातात.

झंम्प्या's picture
झंम्प्या in जे न देखे रवी...
27 Jun 2011 - 6:46 pm

उधाणलेला समुद्र, बेफान लाटा,
गार वारा, अन... अन... हात तुझा हातात.

पौर्णिमेची रात्र,
खिडकीखाली नक्षत्रांचा सडा
पायी घेऊन उभा पारिजात,
मंत्रमुग्ध सुगंध, अन... अन... हात तुझा हातात.

पावसाची रिपरिप, अंगावर कोसळणाऱ्या सरी
अथांग भिजलेलो मी, अन... अन... हात तुझा हातात

थकलेला जीव, खोलीभर अंधार.
एकटेपणाची बोचरी जाणीव,
अन... अन... हात तुझा हातात

घाबरलेलो मी, बिथर्लेलो मी,
कुशीत डोकं ठेऊन रडणारा मी,
अन... अन... हात तुझा हातात

बागेत खेळणारी आपली छकुली,
दुडक्या चालीने दवडणारी ती,
कौतुकाने पाहणारा मी,
अन... अन... हात तुझा हातात

निवांत संध्याकाळ, मावळतीचा दिनकर,
गोंगाट सुद्धा वाटावा श्वासोश्वास,
अन... अन... हात तुझा हातात

संपलेला प्रवास, थकलेली गात्र,
अशक्त शरीर, मिटणारे डोळे,
अन... अन... हात तुझा हातात

शृंगारकविता

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

27 Jun 2011 - 10:40 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

आवडला.... प्रवास... हात हातात घेऊन केलेला!!

कविता अप्रतिम ...
मनापासुन आवडली

फक्त
थकलेला जीव, खोलीभर अंधार.
एकटेपणाची बोचरी जाणीव,
अन... अन... हात तुझा हातात

हे कळाले नाहि

आयुष्यात कधीकधी गर्दीतसुद्धा एकटेपणाची जाणीव एक जाणीव होते. त्या वेळी एक बकालपणा समोर उभा ठाकतो, माहित असत कि हे क्षणिक आहे. आणि हि वेळ लवकर सरून जाईन, पण त्या क्षणी, तुम्हाला जी एकटेपणाची जाणीव होते, ती जाणीव मला व्यक्त करायची होती, अशा वेळी तुमच्या हळव्या मनाला कोणाच्या तरी आधाराची गरज भासते..... "आपल्या" व्यक्तीकडून.

परिकथेतील राजकुमार's picture

28 Jun 2011 - 12:13 pm | परिकथेतील राजकुमार

आयुष्यात कधीकधी गर्दीतसुद्धा एकटेपणाची जाणीव एक जाणीव होते. त्या वेळी एक बकालपणा समोर उभा ठाकतो, माहित असत कि हे क्षणिक आहे.

तुम्हाला भकासपणा म्हणायचे आहे का?

गर्दीत सुद्धा एकटेपणा आणि बकालपणा फक्त 'सुलभ' मध्येच जाणवतो सहसा.

बुधवारची रात्र,
मिपावरती अवांतराचा सडा
डूख धरुन उभा मिपाद्वेष्ट,
ग्लेनफिडिचचा सुगंध, अन... अन... किबोर्ड तुझ्या हातात.

हे कसे वाटते ? ;)

अत्रुप्त आत्मा's picture

28 Jun 2011 - 11:29 am | अत्रुप्त आत्मा

एकदम मस्त...ह्रुदयस्पर्शी...खुप छान...

कविता वाचल्यावर,अगदी जवळचं माणुस भेटल्या सारखं वाटल बघा...असच लिहित रहा...

विजुभाऊ's picture

28 Jun 2011 - 11:53 am | विजुभाऊ

वावा ट्वीटर ट्वीटर ट्वीटर ट्वीटर ट्वीटर ट्वीटर ट्वीटर ट्वीटर