.
.
.
प्रेरणा
आज ओळख करून घेऊ, भारतात जन्मलेल्या पण जागतिक झालेल्या संघटनेची. सर्व हिंदूंना एकत्र आणणारी विश्व हिंदू परिषद.
इतिहासात पाहिले असता, महात्मा गांधींच्या खुनानंतर हिंदुत्ववादी लोकांना भारतात तोंड दाखवायला जागा उरली नाही. त्यांची अवस्था दारूण होऊ लागली होती. तसेच सर्वसामान्य हिंदू घटनेत समावेश केलेल्या पुरोगामी तरतुदींकडे आकृष्ट होऊ लागला होता. पुराणमतवादी हिंदुत्ववाद्यांना असलेला हा सर्वात मोठा धोका टाळण्यासाठी नेहरूंच्या मृत्यूनंतर लवकरच स्वामी चिन्मयानंद यांनी विश्व हिंदू परिषदेची स्थापना पवई मुंबई येथे १९६४ मध्ये केली.
ही संस्था हिंदू लोकांचे संघटन करण्याचे काम करते. रा स्व संघाची ही एक शाखा आहे असेही म्हणता येईल. हिंदू मूल्यांचे संरक्षण, संवर्धन आणि प्रसार करण्याचे काम या संस्थेमार्फत केले जाते.
सुमारे १९८० पर्यंत भारतीय हिंदूंना एकत्र करण्याचे काम या संस्थेने केले. नंतर या संस्थेचा उत्कर्ष सुरू झाला आणि ही संस्था अमेरिकेपर्यंत पोहोचली. आता ही संस्था जगभरातील एक प्रमुख हिंदूत्ववादी संस्था बनली आहे. अयोध्येमध्ये या संस्थेने एक भले मोठे मंदिर बांधण्याचे गाजर दाखवल्याने ती बर्याच हिंदुत्ववादी बांधवांच्या आदरास पात्र झाली आहे. सध्या अमेरिकेतील व परदेशांतील हिंदु जमातीला एकत्र करण्याचे पवित्र कार्य चालले आहे.
विश्व हिंदु परिषदेचे कार्यकर्ते साध्या वेशात राहतात. ते जवळ कोणतेही इतर साधन बाळगत नाहीत. त्यांचा मुक्काम आपापल्या घरांमध्येच असतो. ते हिंदुत्वाचे शिक्षण देतात.
संस्थेतर्फे अधूनमधून संतांचा मेळावा म्हणजेच धर्म संसद आयोजित केला जातो. याला मोठा प्रतिसाद लाभतो.
ही संस्था रा स्व संघाची शाखा असली आणि तिचे नेते भाजप या पक्षात सहभागी असली तरी रा स्व संघाच्या जवाबदारी झटकण्याच्या प्रवृतीमुळे ही संस्था कोणत्याही अतिरेकी घटनेत सहभागी नसल्याचा दावा करते.
तसेच या संस्थेतून आलेले कार्यकर्ते दहशतवादी कृत्ये करीत असल्याची शक्यताही नोंदवली जाते. पण या संस्थेच्या सरकारी यंत्रणेत शिरलेल्या हस्तकांमुळे तिचा हिंसाचाराशी कोणताही संबंध नसल्याचे आजवर म्हटले गेले आहे.
.
.
.
.
सावधां दक्ष
प्रतिक्रिया
27 Jun 2011 - 2:42 pm | सहज
चच्चा संघीष्ट की अलकैदीष्ट??
27 Jun 2011 - 2:45 pm | श्रावण मोडक
चला... चाचांना कसले तरी का होईना 'इष्ट' म्हटले गेले तर... ;)
27 Jun 2011 - 2:48 pm | सहज
'इष्ट'मनकलर के जमाने के सुपरहिट!!
27 Jun 2011 - 2:53 pm | श्रावण मोडक
सहमत!
27 Jun 2011 - 2:47 pm | नितिन थत्ते
कालपर्यंत कम्युनिष्ट समजत होता ना ?
27 Jun 2011 - 2:50 pm | सहज
विकेट काढलीत!!
थत्ते चच्चा - भारताचे पहीलेवहीले लोकपाल
27 Jun 2011 - 2:54 pm | श्रावण मोडक
'कम्युनिष्ट'च ते. 'दूसरा' टाकण्यात पटाईत! ;) मग सहज विकेट पडतातच. ;)
27 Jun 2011 - 3:07 pm | सहज
मग काय नितिन सेन म्हणायचे की नितिन रॉय? बादवे बुकर की मेगॅसेसे मिळाला म्हणे चच्चांना?
27 Jun 2011 - 3:32 pm | श्रावण मोडक
'सेन' या शब्दाला माझी हरकत नाही. तुम्हाला सिंग तर म्हणायचे नाही ना?
27 Jun 2011 - 4:09 pm | नितिन थत्ते
मॅगेसेसे मिळाला म्हणजे आता लोकपाल कोण ते मी ठरवणार :)
27 Jun 2011 - 5:44 pm | श्रावण मोडक
पुन्हा एक दूसरा! :)
27 Jun 2011 - 5:04 pm | llपुण्याचे पेशवेll
इन्सेन.
27 Jun 2011 - 8:09 pm | आनंदयात्री
>>इन्सेन
नित सायलेंट धरु ;)
27 Jun 2011 - 2:52 pm | प्रास
कम्युनिष्टांमधलेच
१. संघिष्ट २. अलकैदिष्ट आणि ३. अनिष्ट
असे भेद सांगण्यात येतात......
ह. घ्या. :-)
27 Jun 2011 - 2:47 pm | सुनील
छ्या! मिसळ दिवसेंदिवस जास्तच चटकदार होऊ लागली आहे!
"समतोल" प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत!
27 Jun 2011 - 2:49 pm | वपाडाव
प्रविण तोगडीया यांना मानाचा मुजरा....
27 Jun 2011 - 2:56 pm | llपुण्याचे पेशवेll
||वद जाऊ कुणाला शरण, करील जो 'वरण' संकटांचे||
बर्याच दिवसात वरण भात खाल्ला नाही. शेवटी बामण वर्णाच्या वरणाची चव काही न्यारीच.
27 Jun 2011 - 2:53 pm | विनायक प्रभू
जे आयला.
एक 'डागचिक' पण क्रिप्टीक लेख टाकावा की काय?
27 Jun 2011 - 3:23 pm | परिकथेतील राजकुमार
काही का असेना थत्ते चाचा 'मोकळे' झाले हे महत्वाचे.
अवांतर :- हे लेखन सलिम-जावेद च्या धर्तीवर विजु-नितिन असे केले गेले असते तर एकदम सुप्पर डूप्पर हिट झाले असते ;)
27 Jun 2011 - 4:38 pm | चेतन
थत्ते चाचा खुन की वध हो....... ;)
सुप्पर डूप्पर हिट करण्यासाठी ही प्रतिक्रीया महत्वाची आहे.
(माथेफिरु) चेतन
अवांतरः अपेक्षित विडंबन
27 Jun 2011 - 4:50 pm | नितिन थत्ते
जौंद्या.... दोन्ही नको.
आपण त्यांनी स्वतः वापरलेला ऑथेण्टिक "हत्या" हाच शब्द वापरू.
27 Jun 2011 - 5:14 pm | चेतन
हत्या का...? बरं बरं सॉरी शक्तिमान
शिख 'हत्या'कांडानंतर स्वतःला सेक्युलर म्हणवणारी तकलादु जमात म्हणुन एक विडंबन सुचतयं
पण जाउद्या संपादकानां कशाला त्रास ;)
चेतन
27 Jun 2011 - 8:11 pm | आनंदयात्री
>>शिख 'हत्या'कांडानंतर स्वतःला सेक्युलर म्हणवणारी तकलादु जमात
हत्याकांड !!! छे छे .. तो तर काँग्रेसी अभिव्यक्तीचा एक उत्स्फुर्त हुंकार होता !!
29 Jun 2011 - 12:40 am | विश्वनाथ मेहेंदळे
हो ना. आता मोठ्ठा वृक्ष कोसळला तर जमिनीला हादरे बसणारच.
27 Jun 2011 - 4:59 pm | अत्रुप्त आत्मा
व्वाहवा छान हो...अगदी...नगदी विडंबन आहे हे....ह्हे ह्हे ह्हे....ह्हा ह्हा ह्हा...मजा आली..लीहीत रहा...
27 Jun 2011 - 5:07 pm | चिरोटा
मस्त विडंबन.
भारतिय मग तो हिंदु असो वा मुस्लिम, कार्य पवित्र आहे सिद्ध करण्यासाठी अमेरिकेचा स्टॅम्प लागतोच असे दिसतय.
27 Jun 2011 - 5:51 pm | राजेश घासकडवी
'मुस्लीम हिंदूंच्या चालीरीतींकडे आकृष्ट झाले', 'हे लोक साध्या वेशात राहातात' वगैरे मूळ लेखातली वाक्यं वाचून हसून हसून पुरेवाट झाली होती.
पण इतकी माफक चेष्टा चालेल बहुधा. नाही उडायचा हा धागा.
27 Jun 2011 - 6:21 pm | मृत्युन्जय
थत्ते चाचांचे वाक्य
पण या संस्थेच्या सरकारी यंत्रणेत शिरलेल्या हस्तकांमुळे तिचा हिंसाचाराशी कोणताही संबंध नसल्याचे आजवर म्हटले गेले आहे.
मूळ लेखातील वाक्य
पण या संस्थेचा हिंसाचाराशी कोणताही संबंध आजवर सिद्ध झालेला नाही.
थत्ते चाचा विडंबन पाडतानाही स्वतःचा हिडन अजेंडा पुढे सरकवतात हे बघुन अंमळ मौज वाटली.
27 Jun 2011 - 6:30 pm | धमाल मुलगा
असे आमचे पष्ट मत.
मुळ लेखातल्या गंभीरतेचा पोत विडंबनात पुरेसा उतरत नाही.
अशा वाक्यांमुळं निखळ विडंबनाचा आनंद मिळत नाही. केवळ तिसर्या लक्षावरील शरसंधानासाठी दुसर्या गोष्टीचा फायदा पहिल्यांदा घेण्याचा प्रयत्न वाटतो.
अर्थात, एकुणातच फार वाचन, मनन, चिंतन आणि अभ्यास नसल्याने आमचे मत हे योग्य असेलच ह्याची खात्री देता येत नाही. गरज पडल्यास जाणकार, अभ्यासू आणि सक्रिय महाजनांनीच ते योग्य त्या कसोट्यांवर घासून वर्गिकृत करावे असे नमुद करतो. :D
27 Jun 2011 - 6:53 pm | विकास
सध्या अमेरिकेतील व परदेशांतील हिंदु जमातीला एकत्र करण्याचे पवित्र कार्य चालले आहे.
या निमित्ताने काँग्रेसच्या सागरपार (पण फक्त अमेरीकाच दाखवणार्या) शाखेची आठवण झाली. ;)
काँग्रेसचे कार्यकर्ते समाजकार्यात मग्न असलेल्याने त्यांना वरील संकेतस्थळ अजून पूर्ण करायला वेळ मिळालेला दिसत नाही. :-) बाकी चित्र पहात असताना "भारतीय काँग्रेस स्टार्ट्स विथ गांधी अँड एन्डस विथ गांधी" असा निष्कर्ष निघतो. तसेच विदेशी नागरीकांचे आपल्याला वावडे नसल्याने काँग्रेसच्या जन्माआधीचे वॉशिंग्टन-जेफरसन-लिंकन यांना काँग्रेसचे मरणोत्तर सन्मानीय सभासदत्व बहाल केलेले दिसतेयं!
बाकी आता मला देखील यातून प्रेरणा मिळून, " काँग्रेसजनांना एकत्र ठेवणारी सत्ता" असा काहीसा लेख लिहावासा वाटत आहे. ;)
27 Jun 2011 - 7:01 pm | धमाल मुलगा
आम्ही जातो..आमुच्या गावा...आमुचा टाटा घ्यावा!
27 Jun 2011 - 7:19 pm | मृत्युन्जय
तुमचा अभ्यास महान आहे.
27 Jun 2011 - 8:05 pm | विकास
तुमचा अभ्यास महान आहे.
हे मला उद्देशून आहे असे वाटले म्हणून थोडे स्पष्टीकरण देतो. गांधीजींनी एकदा अभ्यासाच्या (स्टडीच्या) संदर्भात म्हणाले होते, "I intend to make a careful study of my own religion and, as far as I can, of other religions as well."
आता "रिलीजन" या शब्दाचा डिक्शनरी अर्थातला एक अर्थ, "the body of persons adhering to a particular set of beliefs and practices" असा देखील आहे. म्हणजे त्यात केवळ देव-धर्म लागते असे नाही. कुठलेही बिलीफ आणि त्यासाठीची प्रॅक्टीस हे करणारा समुदाय असावा इतकेच... म्हणून सत्ता मिळवण्यासाठी ऐक्य हवे असे "बिलीफ" आणि त्यासाठी कॉमन "प्रॅक्टीस" असलेल्या रीलीजनचा मी देखील (गांधीजींची) प्रेरणा घेऊन आपल्या कुवतीप्रमाणे अभ्यास करायचा प्रयत्न करत असतो. ;)
27 Jun 2011 - 8:21 pm | आत्मशून्य
.
27 Jun 2011 - 8:56 pm | जयंत कुलकर्णी
///काँग्रेसचे कार्यकर्ते समाजकार्यात मग्न असलेल्याने त्यांना वरील संकेतस्थळ अजून पूर्ण करायला वेळ मिळालेला दिसत नाही. बाकी चित्र पहात असताना "भारतीय काँग्रेस स्टार्ट्स विथ गांधी अँड एन्डस विथ गांधी" असा निष्कर्ष निघतो. तसेच विदेशी नागरीकांचे आपल्याला वावडे नसल्याने काँग्रेसच्या जन्माआधीचे वॉशिंग्टन-जेफरसन-लिंकन यांना काँग्रेसचे मरणोत्तर सन्मानीय सभासदत्व बहाल केलेले दिसतेयं!///
असहमत !
टिळक, पटेल, शास्त्री या हरकाम्यांची चित्रे अजून टाकायची आहेत. पण ती राजपूत्रानंतर.
दुसर्या वाक्याशीही असहमत. तसे असते तर शेवटी आपल्या लाडक्या सोनियांचे चित्र पाहिजे होते. काँग्रेसच्या अंतःसाठी तरी त्यांना श्रेय द्याल का नाही ?
मरणोत्तर सभासदस्व.....:-)
"आपल्या हिटलिस्टवर कोणकोण आहे प्रत्येकी १० नावे सांगा.?" असा धागा काढायचा विचार करतोय. :-)
27 Jun 2011 - 9:22 pm | विकास
टिळक, पटेल, शास्त्री या हरकाम्यांची चित्रे अजून टाकायची आहेत.
टिळकः जयंतराव टिळकांबद्दल बोलत आहात का त्यांचे सुपुत्र दिपक टिळक का त्यांचे सुपुत्र (कसबामधून तिकीट मिळालेले) रोहीत टिळकांबद्दल बोलत आहात?
पटेलः तुम्हाला नक्की चिमणभाई पटेल म्हणायचे असेल
शास्त्री: अनिल शास्त्री का? त्यांचे काही खरे नाही म्हणा...रामलीला वरील काँग्रेसलीलावर टिका केली आहे ते...
बाकी आम्हाला कुठलेही टिळक, पटेल, शास्त्री माहीत नाहीत! ;)
27 Jun 2011 - 8:33 pm | सुधीर काळे
हिंदूंना एकत्र आणण्याचे, त्यांच्यात एकी निर्माण करण्याचे संपूर्ण श्रेय काँग्रेस पक्षालाच द्यायला हवे.
27 Jun 2011 - 8:38 pm | धमाल मुलगा
आमेऽऽन!
27 Jun 2011 - 8:42 pm | विकास
+१
:-)
27 Jun 2011 - 11:01 pm | सुधीर काळे
संयुक्त राष्ट्र संघटनेने 'मोदींच्या गुजराथ' राज्याला सावजनिक सेवा क्षेत्रातील पारदर्शकता, जबाबदार वागणूक आणि तात्काळ कारवाई करण्याच्या क्षमतेबद्दल जागतिक दुसरे पारितोषिक दिले. ही माहिती माझे बडोद्याला रहाणार्या एका स्नेह्यांनी मला दिली. याबद्दल श्री. नरेंद्र मोदी यांचे हार्दिक अभिनंदन!

बादवे, याची चर्चा 'मिपा'वर झाली का?
"हा बातमी मी इथे कां दिली बॉ" हे मात्र विचारू नका हं!
28 Jun 2011 - 4:36 am | शिल्पा ब
मोदींचे हाबिनंदनच हो.
पण सध्या मिपा समाज हा ब्राह्मण समाज तसेच संपूर्ण हिंदू आणि ख्रिस्चन समाज इतरांवर कसा वाईट्ट्ट परिणाम करतेय हे इतरांना समजून सांगण्यात बिज्जी आहे. त्यामुळे मोदींकडे नंतर बघू. काय हो अ जात शत्रू आणि अस्मा फकीर? बात सच्ची का नाय?
28 Jun 2011 - 5:25 pm | अजातशत्रु
शि ल्पाब ताई तुमी बी योक धागा काडा कि,
तुमच्या तर्हेने समजून सांगाया वाईच,बगूया तरी तुमचं ग्यान मंग बगू काय व्हतं ते :)
अवांतर : हे अस्मा फकीर कोण आहेत?
मला इथले आंसमा शख्स हे माहित आहेत.
अतिअवांतर: तुम्ही माझे स्पष्ट नाव (फोड करुन का होइना ) घेतले आहे तो मी वैयक्तिक प्रतिसाद समजून तुम्हाला वैयक्तिक उत्तर दिले आहे चालेल ना? नाहितर सॉरी हं,
नाहि तुमच्या वैयक्तिक प्रतिसादा संदर्भातल्या व्याख्या कधि बदलतील याचा काही नेम नसतो,
म्हणून आपली अगोदरच काळजी घेतोय.
जाताजाता : हे मी वर काय लिहीलेय ते समजले ना? :)
मी छोट्टे छोट्टे प्रतिसादही देऊ शकतो ( अटि लागू)
29 Jun 2011 - 7:02 am | शिल्पा ब
विद्वाsssss न !!! बाकी आम्हाला ढ न म्हणता दोन ओळी तुम्हाला लिहायला सुचल्या हेच काय कमी आहे?
<<<नाहि तुमच्या वैयक्तिक प्रतिसादा संदर्भातल्या व्याख्या कधि बदलतील याचा काही नेम नसतो,
हे सुद्धा इतर सगळ्या गोष्टींसारखंच स्वतःच ठरवलं वाटतं!! आता विद्वानच म्हंटल्यावर काय बॉ!!
29 Jun 2011 - 2:20 pm | अजातशत्रु
तुम्ही जाताजाता वाचले नाही काय?
आता याचा प्रत्यय येणे हे क्रमपात्रच झाले आहे.
असं स्वतःच ठरवत नाही,
तुम्ही लगेच, मी वैयक्तिक पातळीवर घसरलो असे बोलायचा चान्स घेता म्हणून ती काळजी.:)
28 Jun 2011 - 7:25 am | आत्मशून्य
यावर मिपावर चर्चा झाल्याचे मला स्मरत नाही, असल्यास धागा द्यावा.
28 Jun 2011 - 5:03 pm | अजातशत्रु
देस मेरा रंगरेज ये बाबू...
घाट घाट यहाँ घटता जादू ,
राई पहाड़ है, कंकड़ शंकर,
बात है छोटी बड़ा पतंगड़
इंडिया सर ये चीज़ धुरंधर
रंग रंगीला परजा तंतर
भारत में कुछ भी हो सकता हे ! :)
28 Jun 2011 - 8:01 am | आंसमा शख्स
विडंबन चांगले जमले आहे.
पण सत्य निराळे आहे.
29 Jun 2011 - 1:51 pm | अजातशत्रु
पुढचा धागा कधी?
28 Jun 2011 - 11:26 am | विजुभाऊ
ही संस्था रा स्व संघाची शाखा असली आणि तिचे नेते भाजप या पक्षात सहभागी असली तरी रा स्व संघाच्या जवाबदारी झटकण्याच्या प्रवृतीमुळे ही संस्था कोणत्याही अतिरेकी घटनेत सहभागी नसल्याचा दावा करते.
थत्ते एका दगडात किती पक्षी माराल हो.
रा स्व संघाचे लोक बजरंग दल,विश्व हिंदु परीषद, भाजप , अभाविप वगैरे संघटनांचे कार्य चालवत असले तरीही संघाचा या संघटनांशीकाहीही संबम्ध नाही. वरील सर्व संघटनांचे महत्वाचे कार्यालयीन संघाच्या कार्यालयातून ठरवले जात असल्याची काही लोकाना शंका आहे तरीही हा नेहमीच योगायोग असतो.
संघ अशा कोणत्याच घटनांशी संदर्भीत नसतो. बाबरी मशीदी च्या जागेत राम मंदीर बांधण्याच्या घटने मागे संघाचा काहीही संबन्ध नाही. तसेच इंदीरा गांधीनी ज्या जनसंघ ( दीपक..... दीपक) या सम्घटनेच्या कार्यकत्यांना तुरुंगात डांबले होते त्या संघटनेशी देखील संघाचा काहीही संबन्ध नाही.
महात्मा गांधींचा खूनी नथुराम गोडसेशी देखील संघाचा काहीही सम्बन्ध नाही.
काँग्रेस सरकारचा भ्रष्टाचार उघड करताना भ्रष्टचारी कर्नाटक मुख्यमंत्र्याना पाठीशी घालणार्या भाजप शी संघाचा काहीच संबन्ध नाही.
भाजप ही संघाची शाखा नाही दोन्ही ठीकाणी कार्यकर्ते एकच आहेत हा निव्वळ योगायोग समजावा
28 Jun 2011 - 12:16 pm | आंसमा शख्स
सत्य सांगणारा फार चांगला प्रतिसाद दिला- धन्यवाद.
तुम्ही चांगले लिहिले आहे.
हाच खरा चेहरा आहे. बाकी सर्व झूट आहे हे लक्षात आलेच होते.
29 Jun 2011 - 5:31 pm | अन्या दातार
चुकीची कामे केली तर तो खरा चेहरा आणि चांगली कामे केली की खोटा चेहरा का? चांगला न्याय आहे!
28 Jun 2011 - 11:29 am | विजुभाऊ
अवांतर : श्री विकासजी
तुम्ही येथे प्रकाशीत केलेली छायाचित्रे ही जर आंतरजालावरून घेतली असतील तर त्याचा तसा स्पष्ट उल्लेख करावा.
28 Jun 2011 - 4:44 pm | विकास
मी दिलेली छायाचित्रे ही काढलेली नव्हती तसे कुणाला वाटले असेल आणि भावना दुखावल्या गेल्या असल्या तर (उ.दा. सोनीयाजी, राहूलजी का नाहीत वगैरे वगैरे वरून) क्षमस्व.
बाकी त्या छायाचित्राचा दुवा दिला त्या प्रतिसादाच्या खालच्याच ओळीत दिला होता. मात्र सोनीया का नाहीत असा गैरसमज राहू नये म्हणून खालील चित्रफितीत अवश्य बघावी. सुरवातीस जरी निवेदकाने "सोणिया गांधी" म्हणले असले तरी त्याला लोकप्रिय नेत्या सोनीयाजींचेच नाव घेयचे होते. त्यांच्याबरोबर याच संस्थेच्या व्यासपिठावर मा. प्रणव मुखर्जी, मा. वायलर रवी, मा. करण सिंग, भारताचे राजदूत वगैरे पण उपस्थित होते.
मला फक्त उत्सुकता आहे, की सागरपार काँग्रेसकडून मायदेशच्या काँग्रेसला आर्थिक मदत कशी होते ते. याबद्दल जर आपल्याला अथवा मा. थत्त्यांना काही माहिती असली तर ती येथे अवश्य द्यावीत ही विनंती.
28 Jun 2011 - 5:12 pm | परिकथेतील राजकुमार
मा.थत्त्यांना म्हणजे माहात्मा थत्त्यांना का?
दुरात्मा परा
28 Jun 2011 - 5:39 pm | नितिन थत्ते
>>सागरपार काँग्रेसकडून मायदेशच्या काँग्रेसला आर्थिक मदत कशी होते ते.
बाहेरून आर्थिक मदत? मी तर आजवर ऐकत आलो की काँग्रेसवाले देशातला पैसा बाहेर नेतात......
28 Jun 2011 - 7:21 pm | विकास
बाहेरून आर्थिक मदत? मी तर आजवर ऐकत आलो की काँग्रेसवाले देशातला पैसा बाहेर नेतात......
बरोबर माहीत आहे की तुम्हाला! पण असं बघा, देशाबाहेर पैसा काढायला केलेली मदत देखील "आर्थिक मदत" च आहे ना!
29 Jun 2011 - 8:26 pm | नितिन थत्ते
>>बरोबर माहीत आहे की तुम्हाला
ते तुमच्यासारख्या लोकांकडूनच सारखं सारखं सांगितलं जायचं. पण आता तुम्ही उलट म्हणताय तर समजूया की नसतील जात काँग्रेसवाल्यांकडून स्वित्झर्लंडमध्ये पैसे. ;)
29 Jun 2011 - 1:49 pm | अजातशत्रु
सोनिया बैनी जर स्वतःच्या पदरचा पक्षाचा झेंडा जरी विकत घेतला असेल,
तर ती काँग्रेसला बाहेरून झालेली आर्थिक मदतच आहे, ;)
( माहिती स्त्रोत - मान.शरदचंद्ररावजी पवार,भाजपा, अलीकडचा रामदेव बाबा)
( सागरतीरी )
29 Jun 2011 - 6:43 pm | शाहिर
प्रस्तुत धागा विडंबन आहे हे काही जण सोयीस्कर रीत्या विसरलेले आहेत
29 Jun 2011 - 7:51 pm | विकास
कंस वापरले म्हणून विडंबन असे म्हणायचे आहे का? आता कंस ह्या शब्दाचे मराठीत देखील दोन अर्थ आहेत, त्यातील एक विशेषनाम आहे ;) पण ते वापरून हा प्रश्न विचारलेला नाही!
मला वाटते विडंबन म्हणजे अतिशयोक्तीपूर्ण लेखन.
मा. थत्त्यांनी येथे जाहीर करावे की त्यांनी जे काही या कंस वापरून दिलेल्या मथळ्याच्या लेखात लिहीले आहे ते त्यांनी अतिशयोक्तीपूर्ण लिहीले आहे, पक्षी: वास्तवास धरून नाही, म्हणजे कुणाचा गैरसमज होणार नाही अथवा सोयीस्कररीत्या विसरणे होणार नाही.
जर त्यांनी गप्प रहायचे ठरवले तर त्यांच्या दृष्टीने हे विडंबन नव्हते असा समज करून घेऊया.
29 Jun 2011 - 8:31 pm | नितिन थत्ते
>>मला वाटते विडंबन म्हणजे अतिशयोक्तीपूर्ण लेखन.
मी अतिशयोक्ती म्हणून लिहिलेले नाही. तसेही विडंबन याचा अर्थ अतिशयोक्तीपूर्ण लेखन असा होत नसावा.
>>मा. थत्त्यांनी येथे जाहीर करावे की त्यांनी जे काही या कंस वापरून दिलेल्या मथळ्याच्या लेखात लिहीले आहे ते त्यांनी अतिशयोक्तीपूर्ण लिहीले आहे, पक्षी: वास्तवास धरून नाही, म्हणजे कुणाचा गैरसमज होणार नाही अथवा सोयीस्कररीत्या विसरणे होणार नाही.
मी जे लिहिले आहे ते (टु द बेस्ट ऑफ माय नॉलेज) वास्तवास धरून आहे असे येथे जाहीर करतो.
29 Jun 2011 - 9:38 pm | विकास
मी जे लिहिले आहे ते (टु द बेस्ट ऑफ माय नॉलेज) वास्तवास धरून आहे असे येथे जाहीर करतो.
"टू द बेस्ट ऑफ माय नॉलेज" या स्पष्टओक्तीबद्दल धन्यवाद!
ही चर्चा आपण गांभिर्यानेच चालू केली आहे हे आता स्पष्ट झाले त्यामुळे आता इतर कुणाला त्यावरील प्रतिक्रीया म्हणजे सोयीचा गैरसमज / विसर वाटू नये. :-)
29 Jun 2011 - 11:24 pm | नर्मदेतला गोटा
छान माहीती दिलीत
आपण