तंबाखू

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
21 Jun 2011 - 4:17 pm

०===तंबाखू===०

ओठ बरेचदा बदलतो
पण तंबाखू सुटत नाही
डावीकडचा फाटलाय
हे,उजवीकडच्याला पटत नाही

तोंडही जुन्या चाळीसारखं
तंबाखू म्हणजे बिह्राडकरु
ओठांसारख्या मोकळ्या खोल्या
ईकडे भरु का तिकडे भरु?

भाडेकरुंचं प्रेमही अजीब..
रहायला चालते कुठचीही खोली
एकीकडचा उडाला चुना..
की लगेच दुसरीकडे रहायची बोली

दारुवाल्यांना म्हणतात तळिराम
त्यांचा सगळा साजच मोठा..
आंम्हालाही म्हणावं मळिराम
आमचा तर फक्त कार्यक्रमच छोटा

आंम्हा दोघांची एकच गल्ली
त्यांना झाकुन आंम्हाला काढा
त्यांचा आहे एक्सप्रेस हायवे
आंम्ही पितो लोणावळ्यात सोडा

रस्ता वेगवेगळा असला तरी
वाट आमची एक आहे
त्यांचा अंड्याचा.....तर
आमचा साधा केक आहे

तरी आंम्हाला सगळे म्हणतात
अहो घाण असतं ते...सोडा..
च्यायला...यांना काय माहित
हे गाढव आहे..की..घोडा?

व्यसन ही एक व्रुत्ती आहे
तीला बांध घालता येत नाही
ते म्हाताय्रा सारखं आहे हो,
काठीशिवाय चालता येत नाही

हा वेढा सुटत नाही..पण,
लवकरच मी फोडणार आहे
खरचं सांगतो...उद्या पासून...
मी तंबाखू सोडणार आहे.

पराग दिवेकर...

हास्यकविता

प्रतिक्रिया

JAGOMOHANPYARE's picture

21 Jun 2011 - 5:43 pm | JAGOMOHANPYARE

मळिराम :)

आंबोळी's picture

21 Jun 2011 - 9:24 pm | आंबोळी

मळिराम.... लै आवडले....
पहिली ४ कडवी छान जमलीत... शेवटची ४ जरा गंडल्यासारखी वाटतात...

तात्याच्या प्रतिक्रीयेच्या प्रतिक्षेत.....
आंबोळी

राजेश घासकडवी's picture

21 Jun 2011 - 9:31 pm | राजेश घासकडवी

बिऱ्हाडकरू, मळिराम, चुना उडणं वगैरे कल्पना फक्कीसारख्या जमल्या आहेत. शेवटच्या दोनतीन कडव्यांत मात्र थोडी वहावल्यासारखी वाटली.

यातून तुम्हाला खरोखरच व्यसन सोडण्याचा संकल्प व्यक्त करायचा असेल तर त्याबद्दल शुभेच्छा.

अत्रुप्त आत्मा's picture

21 Jun 2011 - 9:57 pm | अत्रुप्त आत्मा

शेवटची ४ कडवी तशी वाटतात,कारण तिथून थोडं तत्वज्ञान बाहेर डोकावतय.त्यात कवीता सुटल्यासारखी वाटली, तरी विषय धरुन ठेवलेला आहे.

पप्पु अंकल's picture

22 Jun 2011 - 8:10 pm | पप्पु अंकल

कृष्ण चालले वैकुंठाला राधा विनवी पकडुन बाही
इथे तमाखु खाउन घ्या हो तिथे कन्हेय्या तमाखु नाही

अत्रुप्त आत्मा's picture

22 Jun 2011 - 8:58 pm | अत्रुप्त आत्मा

पप्पु पास हो गया....

आप हमारे हो हम आपके है...थेंक्यु वन्स अगेन

स्पंदना's picture

3 Dec 2012 - 3:47 pm | स्पंदना

प्रत्येक ओळीला टाळ्या.

llपुण्याचे पेशवेll's picture

3 Dec 2012 - 4:04 pm | llपुण्याचे पेशवेll

झक्कास क्लासिक. तंबाखूची रसाळ पोथी ही गदिमांची कविता आठवली. :)

सस्नेह's picture

3 Dec 2012 - 4:23 pm | सस्नेह

'पिंक' प्रतिभेला __/\__ !

हारुन शेख's picture

3 Dec 2012 - 5:09 pm | हारुन शेख

कृष्ण चालले वैकुंठाला
राधा विनवी पकडून बाही
इथे तंबाखू खाऊन घे रे
तिथे कन्हैय्या तंबाखू नाही

परिकथेतील राजकुमार's picture

3 Dec 2012 - 5:15 pm | परिकथेतील राजकुमार

तमाखू .. तमाखू

हारुन शेख's picture

3 Dec 2012 - 5:18 pm | हारुन शेख

'पानवाला' आत्ता पुन्हा काढून ऐकले. चूक मान्य. धन्यवाद .

परिकथेतील राजकुमार's picture

3 Dec 2012 - 5:21 pm | परिकथेतील राजकुमार

'तमाखू' मध्ये जी लय आणि मजा आहे तो साला 'तंबाखू'त नाही. म्हणून प्रतिसादवलो. :)

ओळीओळीतून ती चुन्याची आग, तो दारूचा सुगंध, ते गुटख्याचे प्याकेट्स, इ.इ. आठवून उन्मनी अवस्थेत गेलो एकदम. आत्मूदा तू असंच लिहीरे नेहमी !!!! ;) :D

अत्रुप्त आत्मा's picture

3 Dec 2012 - 6:29 pm | अत्रुप्त आत्मा

@आत्मूदा तू असंच लिहीरे नेहमी !!!! >>> =)) हलकट http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif

ह भ प's picture

3 Dec 2012 - 6:12 pm | ह भ प

तंबाखूला कुठेतरी 'चैतन्यचूर्ण' म्हटल्याचे स्मरणात आहे..
कविता वाचून, उत्सुकतेपोटी चौथीमधे एकदा तंबाखू खाल्ल्याचे आठवते. चक्कर + उलटी असा काहिसा प्रकार झाला होता..

लीलाधर's picture

3 Dec 2012 - 6:56 pm | लीलाधर

ज्याने मांज्याला आपलं धाग्याला पून्हा एकदा चूना लावून वर काढलेन?
अरे आत्मा होरपळला असेल की जरा विचार करा की त्याचा काहीतरी :-P

किसन शिंदे's picture

3 Dec 2012 - 7:01 pm | किसन शिंदे

बुवांची हि कविता नजरेखालून सुटली होती, बरं झालं आज वाचायला मिळाली.

मग तंबाखू सोडली का नाही शेवटी?

गणामास्तर's picture

3 Dec 2012 - 8:32 pm | गणामास्तर

इथे बुवांनी वल्लीला नेहमीचा पेटंट प्रतिसाद दिलाय असे समजले गेले आहे.. ;)
बाकी बुवा कविता आजचं पहिल्यांदा वाचली..एकदम आवडेश.

अत्रुप्त आत्मा's picture

3 Dec 2012 - 10:14 pm | अत्रुप्त आत्मा

@मग तंबाखू सोडली का नाही शेवटी?>>>अगोबा...तुंम्ही माहित असलेल्या गोष्टी मुद्दाम विचारणार... दुष्ट... ;-) तरिही सांगतो...५ महिने झाले,अजुनही तंबाखू खाल्ली नाही...आणी अता तर इच्छाही होत नाही. :-)

प्यारे१'s picture

3 Dec 2012 - 10:26 pm | प्यारे१

>>> गवि मोड

आत कुठेतरी इच्छा शिल्लक असली की आपण असे महिने मोजतो... मी गेले पाच महिने तंबाखू रहित आयुष्य जगत आहे एवढंच म्हणू शकतो. आणि म्हणून ..............

अत्रुप्त आत्मा's picture

3 Dec 2012 - 10:58 pm | अत्रुप्त आत्मा

@>>> गवि मोड>>> गवि मोडचा अत्यंत दुधखुळेपणानी काढलेला अर्थ आहे हा,,,,, अर्थात खुद्द गवि बोलतिलच...

@आत कुठेतरी इच्छा शिल्लक असली >>> हे हे हे... ही इच्छा प्रत्येक व्यसनी माणसात शेवटच्या श्वासापर्यंत शिल्लक असते... त्यामुळे आपल्यात ती नाही,आणी तुमच्यात आहे,असल्या अविर्भावात बोलू नका...आपणंही आमचे थोरले आणी थोराड व्यसनी बंधू(च) आहात :-p

@आत कुठेतरी इच्छा शिल्लक असली की आपण* असे महिने मोजतो... >>> अत्यंत गाढवपणानी केलेलं निरिक्षण आहे हे...कारण आषाढात कोणत्यातरी दिवशी मी तंबाखु खायचा बंद झालो,ते अजुन खाल्ली नाही..म्हनजे हे महिने मीहुन मुद्दाम मोजले नव्हते, वल्लीनी तसं जाहिर विचारल्यामुळे मला फक्त सांगावं लागलं इतकच.

@ मी गेले पाच महिने तंबाखू रहित आयुष्य जगत आहे एवढंच म्हणू शकतो. आणि म्हणून ..............>>> असं मी म्हणणार नाही...कदापिही म्हणणार नाही,,, तंबाखू विरहितता ही एक अत्यंत साधी फुटकळ घटना आहे. व्यसनी माणसाच्या बाबतीत,व्यसन थांबल्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत व्यसन केलं नाही,हीच घटना सगळ्यात मोठ्ठी असते. वाईट गोष्टी थांबल्याचे दाखले काढत आपण फिरत असता, हे मिपा जाहिर आहे.. ही आमची सवयच नव्हे... कारण आमचा प्रॉब्लेम आमची थांबत नाही, हा नसून आमची परत सुरू होते... हा आहे,,, आणी हे आंम्ही चांगलच ओळखून आहोत...

प्यारे१'s picture

4 Dec 2012 - 3:19 pm | प्यारे१

अलेलेलेलेलेले....
लाग आला बालाला??????????
उगी उगी नको ललू!

अ.आ. ने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर म्हणून तो कालावधी सांगितला आहे. याचा अर्थ तो दिवस / महिने मोजत असेलच असं नाही. व्यसनमुक्ती या शब्दापेक्षा व्यसनरहितता हा शब्द बरोबर आहे आणि वन डे अ‍ॅट अ टाईम,- आजचा दिवस फक्त- या विचारपद्धतीनेच व्यसनाच्या गंभीर दुष्परिणामांपासून दूर रहावं लागतं.

मद्यापेक्षा किंवा अन्य काही व्यसनांपेक्षा निकोटीनचं व्यसन जास्त "अ‍ॅडिक्टिव्ह" आहे. त्याचा रिलॅप्स रेट खूप जास्त आहे. त्याचा डिपेन्डन्स (अवलंबित्व), रेझिस्टन्स (अवरोध?!) हे इतर कोणत्याही व्यसनापेक्षा बरेच जास्त आणि त्यामुळे लवकर प्रमाण वाढवत नेणारे आहेत. त्याचे आरोग्यावर दुष्परिणाम तुलनेत अनेकपट जास्त आहेत.

त्यातल्यात्यात तपकीर ओढणे या प्रकाराने कमीतकमी थेट एक्स्पोजर होतं. त्यामुळे तुलनेत दुष्परिणाम कमी असतात. पण चघळण्याने तोंडाचा कॅन्सर होण्याचे महाप्रचंड चान्सेस असतातच. प. महाराष्ट्रात गुटख्याचं व्यसन इतकं सामान्य आहे की माझ्या कॉलेजात आसपास तोंड न उघडता येणारी (जबडा लॉक झालेली) मुलं अगदी सहज दिसायची. किमान दहा ते पंधरा समवयस्क कॉलेजात येणार्‍यां मुलांना तोंडाचा / जिभेचा / गालफडाचा कॅन्सर झालेला होता.
सिगरेट ओढणं ही त्याहूनही भयानक पायरी. इथे तर इतरांनाही ते एक्स्पोजर होतं. बाप सिगरेट ओढत असेल तर लहान मुलांना आयुष्यभर श्वसनाचे विकार जडू शकतात. (मुलांपासून दूर ओढली तरी त्यांच्या शरीरावर निकोटीनचे कणस्वरुप अंश जमतात आणि ते पोरांच्या श्वासावाटे आत जातात.)

अशा कारणांनी तंबाखूपासून सुटका करुन घेणे आणि जमेल तितके महिने / वर्षे त्यापासून दूर राहणे कधीही अभिनंदनास्पद आहे. रोज तंबाखू खाण्या / ओढण्यापेक्षा ते कितीतरी चांगलं.

हे जमणं तंबाखूच्या बाबतीत महाकठीण आहे. पण शेवटी मनुष्याचं मानसिक बळ किती ताकदीचं असेल याचा घाऊक अंदाज आपण काढू शकत नाही. तंबाखूही दहा वर्षांहून जास्त सोडलेली तुरळक उदाहरणं ऐकण्यात आहेत.

मोदक's picture

4 Dec 2012 - 9:23 pm | मोदक

गवि, एक शंका.

"सिगरेट ओढणं ही त्याहूनही भयानक पायरी" म्हणजे नक्की कोणत्या अंगाने. व्यसनी माणसाला होणार्‍या त्रासाच्या दॄष्टीने की त्याला होणार्‍या त्रासासोबत आजूबाजूला होणार्‍या लोकांच्या त्रासालाही जमेस धरून त्रासाची तीव्रता वाढण्याच्या दॄष्टीने..?(कोलॅटरलर डॅमेज..?)

कारण तंबाखू खाणे आणि सिगरेट ओढणे यांपैकी तंबाखू खाण्याने शरीरामध्ये थेट जाणारा निकोटीनचा डोस जास्त हानी करतो आणि सिगरेटमुळे जाणारे धूरस्वरूपातले निकोटीन तुलनेने कमी हानी करते असे काही असेल असे वाटते.

>>>रेझिस्टन्स (अवरोध?!) = प्रतिकार. (?)

माझ्यामते दोन्ही लेव्हल्सवर.

"निकोटीन" हा मूळ मुख्य घटक जितका घातक आहे त्यापेक्षा कित्येकपट जास्त घातक अन्य निरुपयोगी (???!!!) पदार्थ सिगरेटच्या धुरातून फुप्फुसांत जातात. बाहेरुन येणारे बरेचसे कण आतपर्यंत पोहोचू नयेत म्हणून शरीराने केलेलं नाक आणि खालच्या श्वसनमार्गातलं प्रोटेक्शन या धुरातल्या घटकांनी काही काळानंतर नष्ट होऊन सर्वच कचरा आत पोचायला लागतो.

टार, काजळी आणि इतर (बहुधा काही शेकड्यात असावेत) इतके इतरच धूरजन्य घटक / वाफा / पार्टिकल्स ही बायप्रॉडक्ट म्हणून आत जातात,ज्यांचा तंबाखूच्या "किक" किंवा समाधानाशी संबंध नसतो. ते पदार्थ निकोटीनपेक्षा कितीतरी जास्त घातक परिणाम करतात.

खुद्द निकोटीन पुरेसं घातक आहेच.. विशेषतः हृदयविकार (रक्तवाहिन्यांची लवचिकता नष्ट होऊन). . प्रत्येकवेळी प्राणघातक परिणामच असतो असं नव्हे, पण शरीराला ऑक्सिजन न लाभणं, आणि सीओपीडी (श्वसनाच्या कपॅसिटीला मर्यादा पडल्यामुळे होणारे असंख्य त्रास.. जवळजवळ जीवघेणे किंवा आयुष्य कष्टदायक करणारे) हे त्रासही कमी नाहीत.

आणि समोरच्या निरोगी मनुष्यालाही उत्सर्जित धुराचा त्रास होणं हेही त्या भयानकतेमधे मोजलेलं आहे.

बाकी तंबाखू चघळणं आणि धुरावाटे ओढणं याची तुलना दोन तुल्यबळ भीषण गोष्टींसारखी आहे कारण एकूण निकोटीनची अ‍ॅडिक्शन पॉवर इतर बर्‍याचश्या व्यसनांपेक्षा जास्त आहे. विकीपीडित म्हटलं तरी चालेल पण हा चार्ट बघणं माहितीपूर्ण ठरेल. बाकी दुष्परिणाम विकीपीडियातून लिहीलेले नसून घरातल्याच दोन मृत्यूंवरुन लिहीले आहेत.

चार्टमधील उभा अक्ष पहावा (अ‍ॅडिक्शन पोटेन्शियल)

A

अत्रुप्त आत्मा's picture

4 Dec 2012 - 9:53 pm | अत्रुप्त आत्मा

@वन डे अ‍ॅट अ टाईम,- आजचा दिवस फक्त- या विचारपद्धतीनेच व्यसनाच्या गंभीर दुष्परिणामांपासून दूर रहावं लागतं.>>> करेक्ट गवि करेक्ट... मी ह्याच प्रोग्रॅमवर चालतोय,,, निकोटीन अ‍ॅनॉनिमसचं ते ब्रीद वाक्य आहे. :-)

अभ्या..'s picture

4 Dec 2012 - 12:09 am | अभ्या..

तंबाखू विरहितता ही एक अत्यंत साधी फुटकळ घटना आहे.

आणि आसल्या फुटकळ गोष्टींकडे बघायला आम्हाला वेळ नाही.
गुर्जी काय नसते हो घाण वगैरे. :)
ह्यांना काय कळायचे स़काळचे प्रॉब्लेम? ;)
घ्या तुम्ही बिनधास्त. चांगला दुधातला चुना हाय. काय पोळत बिळत नाही. :)

याच अनुषंगाने सध्या वर आलेल्या या धाग्यात मिपावरच्या डॉ. प्रसाद दाढे आणि भडकमकर मास्तर या दोन प्रख्यात दंततज्ञांनी दिलेला हा आणि हा सल्लाही जरूर वाचावा.

इथे मिसळपाव वरच मी या आधी एका तंबाखूवरील कवितेला प्रत्युत्तर म्हणून लिहिलेल्या काही ओळी आठवल्या त्या परत देतो आहे (मूळ धागा आता दिसत नाही) [‘अडगळ‘ या नावाने आंतर्जालावर लिखाण करणार्‍या कवींनी एक विनोदाच्या अंगाने जाणारी गुटख्याला आणि इतर व्यसनांना उद्धेशून, कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या ‘माझ्या गोव्याच्या भुमीत‘ या कवितेवर आधारित एक कविता लिहिली होती, तिला लिहिलेलं हे उत्तर होतं.]

माझ्या गुटख्याच्या पुडीत
रात्र सकाळी जागते
पोखरून हे शरीर
वर व्याजही मागते

एक दोनच बिडीत
लागे केवढी ती धाप
घर निघाले मोडीत
दुरावले मायबाप

गेले आयुष्य मातीत
पान-तंबाखूचे ठेले
झाले लिंपण चुन्याचे,
दाढेआड दु:ख गळे.

वीसा-वीसाच्या नोटेत
वाहे वारूणीचा वारू
कुठे भागली तहान
आता कुणा हाक मारु?

गेला जन्म हा बुडीत
बसे काळजाला मार
कसा छातीचा रोग हा
रया बिघडली पार

किती सांगू, कुणा कुणा
अरे नको रे व्यसने
काही क्षणांचे हे वेड
उधळून टाकी जिणे

हारुन शेख's picture

4 Dec 2012 - 4:26 am | हारुन शेख

छान काव्य. थोडे थोडे बहिणाबाईंसारखे.

अत्रुप्त आत्मा साहेब, तुमच त्रिवार अभिनंदन तंम्बाखु सोडल्याबद्दल.
तुमच्या पासुन प्रेरणा घेऊन बाकीच्या लोकांनी जे ही व्यसन करत असतील त्यानीही हि व्यसन लवकरात लवकर सोडावीत ही गणराया चरणी माझी कळकळीची विनंती.

स्पा's picture

6 Dec 2012 - 3:41 pm | स्पा

निश साहेब
काहींना नेहमी फाटक्या तोंडानेच बोलायचं व्यसन असत .
आणि वर ते "जित्याची खोड " वेग्रे म्हणून त्या विकृतीच समर्थनही करतात .
दुसरा कसा वाईट , मीच कसा " लई शाना " हे सतत दाखवून देतात .पराकोटीचा अभिमान (बर लायकी काडीची नाही )
दुसर्यांना विकृत म्हणण्यासाठी , तर स्पेशल कट्टे करतात , अहाहा काय ती सज्जन्गिरी

असो..
बहुत काय बोलणे

प्यारे१'s picture

6 Dec 2012 - 4:21 pm | प्यारे१

शांत गदाधारी भीम शांत....!

स्पा's picture

4 Dec 2012 - 3:33 pm | स्पा

छान
मस्त जमलीये गझल

मालोजीराव's picture

4 Dec 2012 - 3:40 pm | मालोजीराव

अ. प्र. ति. म

tambakhu

माझ्या तर्फे पुस्तक भेट !

- 'बिडी जलयले जिगरसे जिया' मधल्या बिडी चा चाहता मालोजी

ज्ञानोबाचे पैजार's picture

4 Dec 2012 - 4:12 pm | ज्ञानोबाचे पैजार

गुरुजींची ही कविता नजरेतुन सुटली होती. कविता म्हणुन मस्तच जमलीय.
तंबाखु सोडल्या बद्दल गुरुजींचे अभिनंदन.
पैजारबुवा,

सुधीर मुतालीक's picture

6 Dec 2012 - 2:31 pm | सुधीर मुतालीक

अहो, बाकी सगळं सोडा, पण तंबाखु सोडू नका. मायला जो तो उटतो आणि आमच्या पोटापान्यावं घसरतो. सगळ्यानी तंबाक बंद केली तर आमी निप्पाणंच्या लोकानी खायचं काय ? आमच्या पोराबोळांनी कराचं काय ? आमचे बाबु आन्ना ! वय पंच्याऐशी !! रोज दोन बिडी बंडल मारल्याशिवाय झोपत न्हाइत. गल्लीतलीच नाजरे आजी ! तीन वेळा तंबाकची राकुंडी लावती, दिसातनं. एकवेळ भाकर नाय मोडाची पन दातवन लावल्याबिगर तिजं चालनार न्हाय. कसला आलाय कान्सर अन कसलं काय. आमच्या पोटावं पाय नगा आनु राव !!

परिकथेतील राजकुमार's picture

6 Dec 2012 - 2:59 pm | परिकथेतील राजकुमार

व्यसन नक्की कशाला म्हणावे हा एक खरा प्रश्नच आहे.

आपले तर बॉ 'करायचे तर दणक्यात करायचे' असे मत आहे. उगाच 'हे केल्याने ते होईल का, ते केल्याने हे होईल का' असले विचार करायचेच नाहीत. स्वतःवरती संयम असला की सगळे जमते.

अत्रुप्त आत्मा's picture

6 Dec 2012 - 3:21 pm | अत्रुप्त आत्मा

@स्वतःवरती संयम असला की सगळे जमते. >>> तुमचा संयम सदोहरण स्पष्ट कराल काय??? :-)

परिकथेतील राजकुमार's picture

6 Dec 2012 - 3:35 pm | परिकथेतील राजकुमार

पुण्यात असताना अक्षरशः रोज माझी कावेरी वारी चालू असायचीच. तुमच्या लक्षात असेल तर, काही महिन्यांपूर्वी मी तुम्हा सगळ्यांना अत्रे हॉल पाशी भेटलो होतो, पण कट्ट्याचे निमंत्रण नाकारून मी कावेरीची वाट धरली होती. आज मला गुजरातला येऊन १५ दिवस होत आहेत. दरुच काय, दारुची बाटली देखील दृष्टीस पडलेली नाही. इथे फारसे काम वैग्रे सध्यातरी नाही, मोकळा वेळ देखील पुष्कळ आहे पण असे असताना देखील मला कधी दारुची निकद / गरज वैग्रे बिलकुल भासलेली नाही. हान 'आठवण पण येत नाही' वैग्रे खोटे मी सांगणार नाही, पण मला त्याने फरक देखील पडलेला नाही हे नक्की.

आमचे एक मेडीकल स्टोअर वाले मित्र आहेत. त्यांना दिवसाला कमीत कमी २० माणिकचंद खायची सवय. माणिकचंद वरती बंदी आली. 'उगा कुठे दारोदार शोधत हिंडायचे भिकार्‍यासारखे?' असे उदगार काढत साहेबांनी सरळ खाणेच बंद केले. त्याला देखील काही विशेष फरक पडला नाही. आता एक महिना होत आला, कोणी आणलीच तर हा आवडीने खातो, पण कुठे मिळेल? मला आणून देतो का? हे प्रश्न बिलकुल बंद.

अर्थात इथे कुठेही मला कुठल्याही व्यसनाचे समर्थन करायचे नाही. पण मिळाली तरी छान छान आणि नाही मिळाली तरी अडत नाही असे धोरण असले की काय वांदा नसतो.

अत्रुप्त आत्मा's picture

6 Dec 2012 - 3:47 pm | अत्रुप्त आत्मा

!@पण मिळाली तरी छान छान आणि नाही मिळाली तरी अडत नाही असे धोरण असले की काय वांदा नसतो.>>> पटले... आपला संयम आहे खरच...!

मदनबाण's picture

6 Dec 2012 - 10:25 pm | मदनबाण

कविता आवडली ! :)
प्रतिसाद सुद्धा आवडले ! :)