[कथा एका यशोगाथेची]

चिरोटा's picture
चिरोटा in जनातलं, मनातलं
20 Jun 2011 - 8:02 pm

स्फूर्ती-http://www.misalpav.com/node/18334 (जयनीत ह्यांची माफी मागून)
त्याला नेहमी पासूनच खूप खूप मोठं होण्याची इच्छा होती, पहिले त्यानी छोट्या कंपनीत धडपड करून बघितली, पण जमलं नाही. मग विप्रो,ईन्फी मध्ये खटपट करून बघितली, पण त्याच्या programs ना कोणी programs म्हणेना, आणि design ला ही दाद मिळेना. स्वतः शिवाय कधी दुसरा विचारच केला नसल्या मुळे testing पण करता येईना.
मग प्रोजेक्ट मॅनेजमेन्टमध्ये हातपाय चालवून बघितले. CMMi,PMP वगैरे भानगडी त्याला कधी पटल्याच नाहीत, त्याला स्वतःलाच CEO व्हायचे होते. मॅनेजर्सशी लढण्यात त्याला आपली बुद्धी घालवायची नव्हती. प्रोजेक्ट यशस्वी झालेच तर त्याच्या जीवनाचे प्रोजेक्ट यशस्वी व्हायला हवे होते, उगाच सिस्टिम प्रोगॅमिंग करण्याचा त्याच पिंड नव्हता.
त्याने वेगवेगळ्या कंपन्यांत काम केले, वेगवेगळ्या प्रोजेक्टसमध्ये प्रयत्न करून बघितले पण संधी मिळेना.
मग अचानक एकदा तो एका निराश क्षणी तो बॉडी शॉपरकडे गेला अन तिथे त्याला स्वतःचा शोध लागला. त्याला मोठं होण्याचा नवा मार्ग सापडला अन एकदम सारं बदललं. त्या कंपनीचे किती अन काय भलं झालं कुणास ठाऊक? पण त्याच्या जीवनात मात्र क्रांती झाली. इथल्या साठी त्याच्या जवळ जन्मजात योग्यता होतीच. एकट्या ने संघर्ष करणे किती कठीण असते हे त्यानी अनुभवले होते. यशस्वी व्हायचं तर बॉडी शॉपरचे पाठबळ हवंच हे त्याला कळून चुकले होते. अन इरेला पेटून त्याने मागच्या सगळ्या अपयशा चा अनुभव इथे पणाला लावला अन इथे त्याची अपेक्षे पेक्षा भरभर प्रगती झाली. काही वर्षातच सारं बदललं. मग मात्र त्याला माफ करा हं आता त्यांना! कधीही मागे वळून बघावं लागलं नाही. आता सगळं सुरळीत सुरु आहे. आता ग्रीन कार्डपण मिळालेय. दोन चार प्रोजेक्ट्स नेहमी खिशात असतात. आजकाल ते निरनिराळ्या कंपन्यांच्या मिटिंग्समध्ये असतात. इंडस्ट्रीज असोसिअशन, चेंबर ऑफ कॉमर्स सारख्या संस्थां मध्ये नवीन प्रोग्रॅमर्सना मार्गदर्शन करतात. विविध सॉफ्ट्वयेर आर्किटेक्चर्स संमेलनात गंभीर विचार मांडतात आणि नवोदित सॉफ्ट्वेयर आर्किटेक्ट्सना प्रोत्साहन देतात. आता त्यांचे काही संशोधन पेपर्स ही प्रकाशित झाले आहेत. आत्म चरित्र लिहिण्याचा विचार ही त्यांच्या मनात घोळतोय, पण सध्याच नाही कारण त्यांना काही सॉफ्ट्वेयर कंपन्यांकडून ऑफर आहे, पण कोणत्या कंपनीत जायचे ह्याबद्दल अजून निर्णय अजून त्यांनी गुलदस्त्यातच ठेवलाय. आजवर कंपन्यांनी त्यांना खूप झूलवलं आहे. आता ते झुलववणार आहेत.

विडंबनलेख

प्रतिक्रिया

कानडाऊ योगेशु's picture

20 Jun 2011 - 10:46 pm | कानडाऊ योगेशु

मूळ लेख दोन्-चार वाक्यांपेक्षा जास्त वाचु शकलो नाही.विडंबन मात्र पूर्ण वाचले.

सगळे काही कळले.:D
हे नक्की कोणाबद्दल लिहिले आहे ते ही सांगायची गरज नाही. ;)

- नाडीवापर

सुहास..'s picture

21 Jun 2011 - 10:23 am | सुहास..

=))

बेक्कार !

जयनीत's picture

22 Jun 2011 - 2:03 pm | जयनीत

छान विडंबन आहे. सगळीकडे मातीच्याच चुली आहेत तर. मी राजकारणा बद्दल लिहिले होते. विषय साधाच आहे शॉर्ट कटच राजमार्ग झालाय. पण पुढे डेड एन्ड असतो पण तिथ पर्यन्त ही कुणी पोहचत नाही. मग अपयशालाही यश मानायची चैन करता येते. मझ्या लिखणाचा विषय तुम्हालाही कुठे तरी भिडला तर! छान रिलेट केलेत.