([ज्योतिष] दिनांक १ जुलै २०११ रोजीचे अभद्र प्रोडक्शन रिलिज)

धन्या's picture
धन्या in जनातलं, मनातलं
20 Jun 2011 - 10:07 am

दिनांक १ जुलै २०११ रोजी हिंजवडी आयटी पार्कात फेज २ मध्ये प्रोडक्शन रिलिज होत असून हे प्रोडक्शन रिलिज क्लायंट, प्रोजेक्ट मॅनेजर आणि डेवलपमेंट टीम बरोबर केंद्र योग करते. त्यात क्लायंट बरोबर होणारा केंद्रयोग अत्यंत तीव्र स्वरुपाचा आहे. याशिवाय हे प्रोडक्शन रिलिज पोस्ट डिप्लॉयमेंट सपोर्ट टीम बरोबर प्रतियुती करते. थोडक्यात प्रोडक्शन रिलिजमुळे बॄहच्चौकोन ही भौमितिक रचना तयार झाली असल्याने हे प्रोडक्शन रिलिज एकंदर "अभद्र" असेच म्हणावे लागेल.

इंफ्रास्ट्रक्चर डाऊन होणे, क्वालिटी टीमने अडथळे आणणे, एखादया डेवलपरनेच जाणून बुजून बग ठेवून घातपात करणे, क्वचित प्रोजेक्ट मॅनेजरक्षोभ, किंवा पुण्यामध्ये जोरदार पाऊस झाल्याच्या बातम्या या प्रोडक्शन रिलिजच्या पुढेमागे १ आठवडा संभवतात. पुढे नावे दिलेल्या डेवलपर्सना हे प्रोडक्शन रिलिज विशेष त्रासदायक जाण्याची शक्यता आहे.

अधिक वाचण्यासाठी येथे भेट दया - http://vaayzed-programmers.blogspot.com/2011/06/blog-post_20.html

नॉन आयटी वाचक क्षंमस्व.

विडंबनप्रतिसाद

प्रतिक्रिया

नरेशकुमार's picture

20 Jun 2011 - 10:26 am | नरेशकुमार

अधिक वाचण्यासाठी येथे भेट दया - http://vaayzed-programmers.blogspot.com/2011/06/blog-post_20.html
.
ब्लोग उघडत नाहीये. नीट लींक पेस्ट करा.

असाच लेख जस्ट आत्ताच थोड्या वेळापुर्वि कुठेतरी वाचल्यासारखा वाटतो.

धन्या's picture

20 Jun 2011 - 10:38 am | धन्या

ब्लोग उघडत नाहीये. नीट लींक पेस्ट करा.

जाऊ दया...

"अभद्र" बॄहच्चौकोन भौमितिक रचनेचे परीणाम १ आठवडयाच्या ऐवजी २ आठवडे आधी दिसायला लागले आहेत. कालाची अचुकता वर्तवण्यात आमची थोडी चुकच झाली. पण होणारे परीणाम मात्र अचूक वर्तवले आहेत.

आम्ही आमच्या भाकितात म्हटलेच होते की इंफ्रास्ट्रक्चर डाऊन होणे...

मीमाको's picture

20 Jun 2011 - 10:46 am | मीमाको

लय भारी!!!
जाणून बुजून बग ठेवून घातपात करणे...

चिरोटा's picture

20 Jun 2011 - 10:50 am | चिरोटा

हा हा. मस्तच.
http://vaayzed-programmers.blogspot.com/ हि लिंक उघडली

प्यारे१'s picture

20 Jun 2011 - 10:52 am | प्यारे१

>>>>नॉन आयटी वाचक क्षंमस्व.
हा पंक्तिप्रपंच का आला? अभद्र रिलिजचे परिणाम असतील तर ते सारखेच व्हायला हवेत. धवांचा तीव्र णिषेढ...

बाकी तीव्रता मोजण्याचे काय युनिट आहे?
आणि हो... (येस्स वी आर... व्हाय आर वी? ;))
नकुंना वाय्झेड ब्लॉग उघडत नाहीये. त्यांना उघडून द्या.

चिरोटा's picture

20 Jun 2011 - 11:19 am | चिरोटा

अहो ध्नाजीराव, जरा जपून लिवा की. काय लिहिलय ब्लॉगात हे ?

I work as Software Engineer in Hinjwadi. we are now in production release.and majority of bugs are assigned to me. I hate that.
Yes, in the beginning i screwed up little bit. But i did my work and went succesfully to Pre-Production also.

धन्या's picture

20 Jun 2011 - 12:15 pm | धन्या

दुसर्‍या कुणीतरी बनवलेली आहे...
त्यांचा उत्साह जरा जास्तच झाला आहे. पण बिल आता आमच्या नावावर फाटणार असं दिसतंय :)

प्रीत-मोहर's picture

20 Jun 2011 - 11:41 am | प्रीत-मोहर

हाहा मस्तच

५० फक्त's picture

20 Jun 2011 - 12:08 pm | ५० फक्त

मस्त ओ धवा.

विदेश's picture

20 Jun 2011 - 1:17 pm | विदेश

अभद्र प्रोडक्शन रिलीज निमित्त सर्व 'नोन-आय-टी' वाचकांना शुभेच्छा !

राजेश घासकडवी's picture

20 Jun 2011 - 5:40 pm | राजेश घासकडवी

किंवा पुण्यामध्ये जोरदार पाऊस झाल्याच्या बातम्या या प्रोडक्शन रिलिजच्या पुढेमागे १ आठवडा संभवतात.

हे मस्तच. पुण्यात जून जुलैत पावसाची भाकित करण्याइतका तुमच्या होराशास्त्रावर तुमचा विश्वास आहे हे बघून आदराने नतमस्तक झालो.

आत्मशून्य's picture

20 Jun 2011 - 6:50 pm | आत्मशून्य

:) आतापर्यंत हा विचारच केला न्हवता. ह्या सर्व गोंधळात एच.आर. वक्री होऊन काय फलनिर्देष देइल यावरती विवेचन विस्तृतपणे येऊद्याच.

- जूजूत्सूक.

मूकवाचक's picture

20 Jun 2011 - 8:00 pm | मूकवाचक

ऑनसाईट असणे हा 'नीचभन्ग राजयोग'च आहे. ऑनसाईट असताना एरवी वक्री असणारे एच. आर, अ‍ॅडमिन वगैरे ग्रह अस्तन्गत तर प्रोजेक्ट मॅनेजर, टीम लीड वगैरे सतत षडाष्टकात असणारे ग्रह निर्बळी होतात.

सूड's picture

20 Jun 2011 - 8:05 pm | सूड

वाह वाह !! क्या कहीं !!

स्मिता.'s picture

20 Jun 2011 - 10:17 pm | स्मिता.

धनाजीराव सध्या एकदम फॉर्मात आहेत. एकावर एक षटकार ठोकत आहेत.

पुण्यामध्ये जोरदार पाऊस झाल्याच्या बातम्या या प्रोडक्शन रिलिजच्या पुढेमागे १ आठवडा संभवतात.

हे लई भारी!!

आंबोळी's picture

21 Jun 2011 - 9:36 pm | आंबोळी

हा हा हा मस्तच...
तुमच्यात आम्हाला मिपावरचे एक विमा एजण्ट दिसले...