मोहोर

नगरीनिरंजन's picture
नगरीनिरंजन in जे न देखे रवी...
19 Jun 2011 - 8:26 am

नियतीच्या सहस्त्रभुजांत अजस्त्र विक्राळ जोर आहे
विधीलिखितावर अटळपणाची उमटलेली मोहोर आहे

टेबलाशी, खुर्चीत एकेक खिडकीशी बसला चोर आहे
उपोषणांवर वांझपणाची उमटलेली मोहोर आहे

आग्रा कधी अमृतसर कधी मोहाली कधी लाहोर आहे
मूक थडग्यांवर अहिंसेची उमटलेली मोहोर आहे

जन्मानंतर तोडती नाळ जणू कापलेला दोर आहे
अंतापर्यंतच्या भटकण्यावर उमटलेली मोहोर आहे

भरल्या पोटी गातो गाणे निरंजन भाव विभोर आहे
झगड्यावरती रोज लाखोंच्या उमटलेली मोहोर आहे

संस्कृतीगझल

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

19 Jun 2011 - 12:23 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

व्वाह, ननि जियो!! क्या बात! क्या बात!!

अत्रुप्त आत्मा's picture

19 Jun 2011 - 12:33 pm | अत्रुप्त आत्मा

वा वा मि.ननि... मोहोरत राहु दे

धन्या's picture

20 Jun 2011 - 12:05 am | धन्या

नियतीच्या सहस्त्रभुजांत अजस्त्र विक्राळ जोर आहे
विधीलिखितावर अटळपणाची उमटलेली मोहोर आहे

क्या बात हैं...

गझलेची तांत्रिक भाषा मला कळत नाही पण पहिल्या आणि शेवटच्या दोन कडव्यांच्या तुलनेत मधली दोन कडवी कृत्रिम वाटतात.

विधीलिखितावर अटळपणाची उमटलेली मोहोर आहे ही ओळ वाचताना जे भारावलंपण येतं ते पुढच्याच टेबलाशी, खुर्चीत एकेक खिडकीशी बसला चोर आहे या ओळीने कुठल्याकुठे पळून जातं :(

असो. कविता ही उस्फुर्त आविष्कार असतं त्यामूळे हे कडवं असंच का आणि ते तसंच का असं म्हणण्यातही अर्थ नाही म्हणा :)

गझल खुपच सहि आहे .. मनापासुन प्रत्येक शेर आवडला...

आग्रा कधी अमृतसर कधी मोहाली कधी लाहोर आहे
मूक थडग्यांवर अहिंसेची उमटलेली मोहोर आहे

जास्त आवडला हा शेर ..