तिकडम
सगळे जण आग्रह करतात
लवकर नाव घ्याना
तोंडात लाडुचा बकाणा
घेऊ कसा उखाणा?
.
,
.
.
शिकावू डेंटीस्टने- ढिली बनवली कवळी
दात वाजती टणाणा
मधे अडकून जीभ- करतेय नुस्ता ठणाणा
घेऊ कसा उखाणा?
.
.
.
.
पहिल्यांदा पडली टाळी, दुसऱ्याचा झाला हशा
तिसरा सपशेल उताणा
चौथ्याचा जिकर केला, तर लोक म्हणले हाणा
घेऊ कसा उखाणा?
..........................................................