आल्या पावसाच्या सरी -
भिजू एकवार तरी ;
ओल्या माती गंधासंग ...
आणू प्रेमाला ग रंग !
नको साक्षी आणाभाका ,
पुरावा कशाला तो फुका -
साक्ष ओल्या अंगांगांची
पावसाच्या या सरींची !
प्रेम माझे तुझ्यावर
तुझे किती माझ्यावर -
सरींत मोजणी कशाला
जीव कधीचा हरवला !
प्रतिक्रिया
12 Jun 2011 - 8:49 am | पाषाणभेद
काल रात्रीच मोबाईलवर वाचली. मस्त आहे. आपले प्रेम व्यक्त करायला नायकाने पावसाच्या सरींचा आधार योग्य रितीने घेतला आहे.