पुरूषांच सोप्प लाईफ.......

पियुशा's picture
पियुशा in जनातलं, मनातलं
9 Jun 2011 - 3:59 pm

पुरूषांच सोप्प लाईफ.......

सकाळी सकाळी नारया का उगवला ?
पाळण्यातला छोटा भोंगा ट्या- ट्या करून वाजला,
बॅचलर होतो तेव्हा भरपूर केला दंगा ,मस्ती मजा ,मारामारी
झालाय लग्न, पडली संसाराची जबाबदारी ,(बोला विट्ठल पांडुरंग हरी)

"काय यार कटकट ,अग तू लक्ष दे ना जरा ,किचनमध्ये काय करते ?
"(आतून) ,मी डब्बा बनवते, थोडा वेळ सांभाळायला तुझे काय जाते ?
आमच्या सुमधुर गाण्याने ते अजूनच बोंबा मारतय,
कधी केस ,चष्मा ,तर कधी मिशी धरून ओढतय ,
तोंडात ब्रश खांद्यावर टॉवेल घेऊन निघाली स्वारी
पण बापूस ने आमच्या बाथरूम अडवलाय, च्या मारी !
रोज मी त्यांना सल्ला देतो "रिटायर्ड लोकांनी सकाळी मस्त १० पर्यंत लोळाव,
अडलेल्या- नडलेल्या लोकांना रोज अस का छळाव?
मिसेस ची सूचना (कृपया ध्यान दे)
"आज शॉर्ट लिव्हवर या आज आपला इंटर व्ह्यू आहे ,
अरे हो, आज तर चिंटीच अडमिशन आहे ,
भली मोठी रांग बघून , २-३ तास उन्हातान्हात थांबून
शेवटी नंबर आलाय, प्रिन्सिपल ने जागाच शिल्लक नाही हा बॉम्ब माझ्यावर टाकलाय,
"काही तरी प्रयत्न करा ना प्लीज ,एक जागा मिळवून द्या"
माझा विनवणीचा सूर पाहून ...
" ठीक आहे २०.००० डोनेशन अन ५ हजार बिल्डींग फंड चा
चेक उद्या येताना घेऊन या
एव्हढ सांगून मॅडम कुत्सितपणे हसल्या
ठेवलेल्या बचतीने मलाच वाकुल्या दाखविल्या
बाप रे ! तोंडातून निघणारच होत कसबस सावरलय,
अरे यार २५००० त मी अख्ख शालेय जीवन घालवलय ,
२५ हजार पगार त्यात नर्सरीची फी पण होत नाही
पर्सनल लोन काढायची मला करावी लागणार घाई
"साला ह्यांनी शिक्षण इतक महाग करून ठेवलय "
इथे नोकरदारांचे हे हाल तर गरिबांना कोन पुसते ?
३ वर्षाची चिंटी १२३ ,ABC ,पोएम काय म्हणते ,
पण "हल्ली" पैशापुढे गुणांना कोण विचारते ?

आज मी चिंटीसाठी शिक्षण विकत घेतलंय
निश्चितच माझ बेरीज अन वजाबाकीच गणित चुकलंय
गाडीचा, फलॅटचा,एल आय. सी. चा हफ्ता वाट बघतोय
५०० - १००० च्या गरम नोटांनी भरलेला खिसा
१५ दिवसातच खाली होतोय
फोन बिल ,लाईट बिल ,दर महिन्याला भरायचय
२५००० हजारात अजून काय काय करायच?
मध्येच दुखणी - खुपण पाहुणे बनून येतात
माझ्या खिशाची वाट लावून जातात
आलाय मार्च, इन्क्रिमेंटची चातकासारखी वाट बघितलीय
कंपनी लॉसमध्ये आहे म्हणून बॉस ने साऱ्यांचीच मारलीय
इन्क्रिमेंट पाहून तोंडावर वाजलेत बारा ,
"साला,हलकट बॉस त्याच्या @%#&() & वर लाथा मारा,
पैशाची बात येते तेव्हा सर्वच हाथ आखडू लागतात
आपल्या नडीला,लोक आपोआप रस्ते बदलू लागतात
कशाला झक मारायला १२-१२ तास काम करायचे
अर्धी - मुर्धी स्वप्न पाहून मन मारत जगायाचे
मला नकोत महागडी स्वप्न त्यांना काय चाटायचं
दुख आपली लुटुपुटू, आपल्यातच आपण वाटायचं

इतिहास कोण लिहितय आपला सुवर्ण अक्षरात ,
आपणच आपले राजे
काय सांगणार अन काय ऐकणार ,जे तुझे तेच माझे

ऐश आरामात का नसेना ,पण मला सुखात जगायचं आहे
सोनेरी स्वप्नाची पहाट होईल, या आशेवर चला निजायच आहे :)

मुक्तकप्रतिसाद

प्रतिक्रिया

रणजित चितळे's picture

9 Jun 2011 - 4:12 pm | रणजित चितळे

छान आहे सोप्प लाईफ. आवडले.

सूड's picture

9 Jun 2011 - 4:13 pm | सूड

झ क्का स !!

किसन शिंदे's picture

9 Jun 2011 - 4:15 pm | किसन शिंदे

चांगल मुक्तक लिहलय पियुशा...विशेषतः शेवटच्या दोन ओळी खुप आवडल्या.

झालाय लग्न, पडली संसाराची जबाबदारी ,(बोला विट्ठल पांडुरंग हरी)......................आणि
बोम्बलापेक्षा सुकट भारी

शर्मीला's picture

9 Jun 2011 - 4:23 pm | शर्मीला

लाईफ.......
इज लाइक...
छान आहे....
पैशाची बात येते तेव्हा सर्वच हाथ आखडू लागतात
आपल्या नडीला,लोक आपोआप रस्ते बदलू लागतात

प्रीत-मोहर's picture

9 Jun 2011 - 4:26 pm | प्रीत-मोहर

मस्त ग पियु :)

स्पा's picture

9 Jun 2011 - 4:34 pm | स्पा

कूल............... :)

आत्मशून्य's picture

9 Jun 2011 - 4:38 pm | आत्मशून्य

काय सांगणार अन काय ऐकणार ,जे तुझे तेच माझे

मस्तच. संपूर्ण मूक्तक चांगलं लिहलय. (विषेशतः आजच्या काळातील) मूली संवेदनशीलता इतक्या सहजतेने व्यक्त करू शकतात हेच खूप सूखद आहे. ते सूध्दा समोरच्यावर इमोशनल अत्याचार न करता ? वा कसलाही भावनीक अतीरेक न दाखवता ? भावनांनी प्रमाणाबाहेर भिजलेले लेखन करणार्‍यांनी या पासून प्रेरणा घेणं फार आवश्यक आहे ;)

५० फक्त's picture

9 Jun 2011 - 4:55 pm | ५० फक्त

मस्त लिहिलंय, लई आवडलं, धन्यवाद पियुषा.

Dhananjay Borgaonkar's picture

9 Jun 2011 - 5:29 pm | Dhananjay Borgaonkar

लय भारी..मस्त!!!!

प्यारे१'s picture

9 Jun 2011 - 5:40 pm | प्यारे१

तरी आम्हाला आधीपासून डाऊट होताच. पियु म्हणजे पियु आहे पियुशा नाही असा. ;)

एवढं वास्तववादी????

(हे कौतुक आहे हे ल घे. भांडायला आल्यास स्त्रीजातीतील पदार्थ आहे हे लक्षात येईलच ;) )

RUPALI POYEKAR's picture

9 Jun 2011 - 5:43 pm | RUPALI POYEKAR

पियुशा...१दम छान.

पिंगू's picture

9 Jun 2011 - 5:53 pm | पिंगू

अजून तरी सोप्या लाईफची सुरुवात व्हायची आहे..

- पिंगू

नगरीनिरंजन's picture

9 Jun 2011 - 8:28 pm | नगरीनिरंजन

ह्म्म्म्म! वा वा पियुषा, बर्‍याच दिवसांनी लिहीलंस आणि छान लिहीलंस.

स्वानन्द's picture

9 Jun 2011 - 8:44 pm | स्वानन्द

मस्त. :)

अतिशय वास्तववादी.. मुक्तक आवडलं.

खरच फारच सोप्प आहे नाही? आवडलं.

कौशी's picture

9 Jun 2011 - 9:36 pm | कौशी

पियुशा
खुप खुप छान लिहीलेस.. आवड्ले.

विलासराव's picture

9 Jun 2011 - 9:40 pm | विलासराव

मुक्तक आवडले

पैसा's picture

9 Jun 2011 - 10:00 pm | पैसा

पण तू त्या बाजूला कशी गेलीस?

अगदी हेच म्हणते.
मुक्तक आवडलं असलं तरी एखाद्या पाशवी शक्तीनं असं का करावं म्हणते मी!;)

शिल्पा ब's picture

10 Jun 2011 - 10:24 am | शिल्पा ब

साधी गोष्ट आहे...नुसती फडफड अन त्रागाच करता येत असेल तर बाजू मांडायला शेवटी आपल्याच बाजूच्या व्यक्तीला जावं लागतंय. नाविलाज हय!!

एखाद्या पाशवी शक्तीनं असं का करावं म्हणते मी!
@ रेवति ताइ तुझि प्रति. निट समजलि नाहि ग नक्कि काय म्हनायचे ते :)

ही चेष्टा म्हणावी का?
जर असेल तर ठीक, नसेल तर म्हणेन की थोडे दिवस थांबा..........धागा येइलच!

नरेशकुमार's picture

10 Jun 2011 - 7:31 am | नरेशकुमार

मन सुन्न झाले वाचुन !

साबु's picture

10 Jun 2011 - 11:35 am | साबु

आयला...... खुपच वास्तववादि आहे.. स्वगतः म्हणतोय का काय असे वाटुन गेल...
मस्तच....

अन्या दातार's picture

10 Jun 2011 - 1:02 pm | अन्या दातार

कित्ती कित्ती सोप्पं आहे ना पुरुषांचे लाईफ!!
जियो, संभाव्य धोक्यांची जंत्री पेश करुन ते अगदीच शिंपल आहेत हे सांगण्याचे स्किल आवडले ;)

परिकथेतील राजकुमार's picture

10 Jun 2011 - 1:15 pm | परिकथेतील राजकुमार

तेच तेच आणि तेच....

हिंदी चित्रपट वाल्यांच्या हातात एखादा हिट फॉर्म्युला सापडला की ते त्या एकाच फॉर्म्युल्यावर चार-पाच चित्रपट काढून मोकळे होतात त्याची आठवण झाली.

अहो असे रागावु नका. तुम्हीही एखादा फॉर्म्युला शोधा अन लेख पाडा.

परिकथेतील राजकुमार's picture

16 Jun 2011 - 5:11 pm | परिकथेतील राजकुमार

तुम्हीही एखादा फॉर्म्युला शोधा अन लेख पाडा.

माझा लेख मीच पाडला तर मिपाकर काय पाडणार मग ?

त्या लेखावर कौलं पाडतील. हवं तर पिडांकाकांना कंत्राट देउन टाकु.

शाहिर's picture

10 Jun 2011 - 3:05 pm | शाहिर

छान लिहीले.
आवडले...

ajay wankhede's picture

16 Jun 2011 - 4:20 pm | ajay wankhede

अर्धी - मुर्धी स्वप्न पाहून मन मारत जगायाचे
दुख आपली लुटुपुटू, आपल्यातच आपण वाटायचं
खुप भाव्लं.