अरेरे तुझे काय झाले हे जोश्या

आदिजोशी's picture
आदिजोशी in जे न देखे रवी...
27 May 2011 - 11:39 pm

हे आमचे मनाचे श्लोक. शेवटच्या कडव्यातल्या शेवटच्या वाक्याशी बायको सहमत आहे.

अरेरे तुझे काय झाले हे जोश्या,
खुला सांड होतास फसलास जोश्या.
कुर्‍हाडीवरी पाय मारोनी घेशी,
तरी दात वेंगाडुनी हसतोस जोश्या.

अशी बुद्धी तू टाकली का गहाण,
कपाळावरी मारुनी घे वहाण.
उपयोग त्याचा परी शुन्य जोश्या,
खुला सांड होतास फसलास जोश्या.

पाजी जगाला जो बुद्धीचे डोस,
करी देव पोपट त्याचाच खास.
स्वतःहून खड्ड्यात पडलास जोश्या,
खुला सांड होतास फसलास जोश्या.

सगे सोयरे मग्न पार्टीत खास,
मनी हासती ते तुझ्या धाडसास.
इथे वाट परतीची नसते रे जोश्या,
खुला सांड होतास फसलास जोश्या.

जरा आठवी तो दिवस तू भयाण,
जगाच्या समक्ष तुझे शीरकाण.
अजाच्या गळी माळ पडली रे जोश्या,
खुला सांड होतास फसलास जोश्या.

कशी घोडचूक ही केलीस छान,
स्वतः खाटीका हाती देतोस मान.
असा बुद्धीभेद तुझा होई जोश्या,
खुला सांड होतास फसलास जोश्या.

पुन्हा पारतंत्र्यात गेलास जोश्या,
विनाशर्त शरणागत झालास जोश्या,
तुझी लावली तू स्वतः वाट जोश्या,
कसा मूर्ख, बिंडोक आहेस जोश्या.

-------------------------------------------समाप्तच-------------------------------------------

भयानकवावर

प्रतिक्रिया

इंटरनेटस्नेही's picture

28 May 2011 - 2:58 am | इंटरनेटस्नेही

आम्ही म्हणुन 'लिव्ह इन चाच' विचार करत आहोत!
-
(सावध) इंट्या सिंगल.

पैसा's picture

30 May 2011 - 7:27 pm | पैसा

मला जोशीणबैंचा पाशवी हास्य करणारा चेहरा बघायचा आहे!!!

बैलाला मस्त वेसण घातलेली दिसतेय

रॅप साँग आहे काय हे ? एमेनिम च्या चालीत वाचले .. मज्जा आली

-एपेनिम

रेवती's picture

31 May 2011 - 7:39 pm | रेवती

जे झालं ते बरंच झालं हो जोशीबुवा!;)