या विडंबनाची स्फूर्ती आहे अरूण मनोहरांची ही सुंदर गझल, त्या चांगल्या शब्दांचा 'कच्चा माल' म्हणून वापर केल्याबद्दल क्षमस्व!
अताशा असे हे मला काय होते
जराशा श्रीखंडाने पँट तंग होते
रिचवित आलो सागर आमरसाचे
आता पाहून थेंबही मन हे दुभंग होते
खूर्चीस पाठी लोटू, चक्क टेबल की हलावे
भलतेच जडभारी झाले ते माझेच अंग होते
टेकून पाठ थोडी पंखा वरी फिरावा
निद्रेत माझिया झणी नुसते तरंग होते
स्वप्नात पाहिले, कळले माझे मला की
संपत्या सुटीचे ते पूर्वरंग होते
प्रतिक्रिया
23 May 2011 - 12:06 pm | श्रावण मोडक
मनोहरांनी जे केलं आहे तेही विडंबनच आहे हो. मिडलाईफ क्रायसिस की काय तुमचाही? ;)
23 May 2011 - 12:43 pm | अरुण मनोहर
"गझल"चे विडंबन आहे हे नक्की.
मीटर कुठे आहे मालक?